पाककृती सुचवा वात प्रकृती साठी

सतिश रानडे's picture
सतिश रानडे in पाककृती
29 Jul 2016 - 2:31 pm

माझी पत्नी आमवाताने त्रस्त आहे. खाण्यावर बरीच बंधने आहेत नेहमीच तेच तेच पदार्थ साळीच्या लाह्या वगैरे खाऊन कंटाळली आहे सबब समस्त बल्लवाचार्याना / बंधुभगिनींना विनंती आहे कि काही तरी नवीन पदार्थ सुचवावे . माझे हे पहिलेच लेखन आहे काही चुकल्यास क्षमा असावी

प्रतिक्रिया

आमवात,वात वगैरे नक्की काय आहे ते बघा.दोन्ही वेगळे आहे.

सतिश रानडे's picture

29 Jul 2016 - 6:06 pm | सतिश रानडे

धन्यवाद - वैद्यांच्या मते आमवात हा वाताचा प्रकार आहे बहुतेक माझ्याकडून विषय मांडताना चुकलेले आहे

मुक्त विहारि's picture

29 Jul 2016 - 6:23 pm | मुक्त विहारि

मुंबई परीसरात असाल तर,

डोंबिवलीला वैद्य विनय वेलणकर आहेत, ते योग्य तो आहार मस्त गप्पा मारता-मारता सुचवू शकतात.

दादरला रहात असाल तर, खडीवाले वैद्य योग्य तो आहार सुचवू शकतात. हे वैद्य बर्‍यापैकी सडेतोड असल्याने फार सांभाळून बोलावे लागते.पण गूण जबरदस्त.

रत्नागिरीला रहात असाल तर वैद्य अभ्यंकर (जोशी पाळंद) आणि वैद्य उमेश केळकर अप्रतिम.

चिपळूण परीसरात रहात असाल तर, वैद्य विद्यानंद दिक्षित.

मला तरी पोटाच्या विकारांवर वैद्य लोकांचे औषध जास्त उपयोगी ठरले आहे.

सतिश रानडे's picture

29 Jul 2016 - 6:34 pm | सतिश रानडे

मी अंबरनाथ येथे राहतो मला डोंबिवली जवळ पडेल

मुक्त विहारि's picture

29 Jul 2016 - 8:04 pm | मुक्त विहारि

"संदेश" पाठवला आहे.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jul 2016 - 6:37 pm | प्रसाद गोडबोले

बाकी जास्त माहीत नाही पण हवाबाण हर्डे देवु नका हे नक्की =))))

अवांतर : आला लगेच मिपाडॉक्टर येतील औचित्यबौचित्यभंग की काहीबाही म्हणत , त्यांना द्या हवाबाण हर्डे =))))

उडन खटोला's picture

29 Jul 2016 - 7:47 pm | उडन खटोला

प्रतिसाद आवडला नाही.

किसन शिंदे's picture

29 Jul 2016 - 7:55 pm | किसन शिंदे

थोडे तरी सिरियस व्हा की राव गिर्जा.

कविता१९७८'s picture

29 Jul 2016 - 7:52 pm | कविता१९७८

आमवातामधे शक्यतो आम्बट , आम्बवलेले पदार्थ खाउ नयेत. ज्वारी, नाचणीची ताक न घातलेली उकड ट्राय करु शकता.

कविता१९७८'s picture

29 Jul 2016 - 7:52 pm | कविता१९७८

आमवातामधे शक्यतो आम्बट , आम्बवलेले पदार्थ खाउ नयेत. ज्वारी, नाचणीची ताक न घातलेली उकड ट्राय करु शकता.

सतिश रानडे's picture

30 Jul 2016 - 8:55 am | सतिश रानडे

धन्यवाद

वात: गुडघे दुखणे वगैरे असेल तर अधूनमधून एरंडेल चमचाभर घेणे.
आमवात: खाल्लेलं नीट पचत नाही आणि पचून उरलेलं शरीराबाहेर टाकलं जात नाही तो आम होय.तो वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दाखवतो-झोप येत राहाणे/पाय दुखणे/डोकं जड होणे/खोकला/निरुत्साह /अंगाला कंड सुटणे वगैरे.- त्रिकटु चूर्ण चिमुटभर जेवताना घेतल्यास काय वाटेल ते पचते.अधूनमधून त्रिफळा घेणे.

चंपाबाई's picture

30 Jul 2016 - 9:56 am | चंपाबाई

आम वात म्हणजे र्‍हुमटिक आर्थायटिस ना?

सतिश रानडे's picture

30 Jul 2016 - 10:10 am | सतिश रानडे

हो

सतिश रानडे's picture

30 Jul 2016 - 10:35 am | सतिश रानडे

हो

मनिमौ's picture

30 Jul 2016 - 8:10 pm | मनिमौ

ऊत्तम आहेत.शक्यतो आंबवलेले पदार्थ जसे की इडली सुधा वर्ज्य असते.