* (मूळ लेखक स्वामी विश्वरूपानन्द यांच्या पूर्वानुमत्तीने पुनर्प्रकाशित )
माझ्या सारख्या संन्याश्याला काय पडले आहे डोनाल्ड ट्रम्प आणि त्याच्या इमिग्रेशन पॉलिसीशी ? असा प्रश्न आपणास पडणे स्वाभाविक आहे . परन्तु आज एक विचारप्रवर्तक लेख वाचनात आला आणि मग एक विचारचक्र सुरु झाले , मग त्यातून अनेकानेक मुद्दे सुचू लागले जे कुठे ना कुठे भारतीय वैदिक हिन्दू संस्कॄती अन इतिहासाशी संलग्न आहेत ...म्हणूनमग त्यावर विचारमन्थन व्हावे यासाठी हा लेखनप्रपन्च ... असो
हा लेख वाचल्यानन्तर अनेक परदेशस्थ अथवा आम्रविका खंडनिवासी मंडळींस मी प्रतिगामी विचारान्चा आहे की काय? असा प्रश्न जरूर पडेल. परन्तु मला वाटते एकूण जगाचे भले कशात आहे ? याचा विचार करता मी मांडत असलेले मुद्दे योग्यच वाटतात . असो .......नमनास घडाभर तेल घालवून झाल्यावर आता मुख्य प्रतिपाद्य विषयाकडे वळूया ...
१. एखाद्या देशाचा /समाजाचा विकास अन समॄद्धी आपण नक्की कोणत्या एककांत / परिमाणात मोजतो?
२. आजकाल आफ्रिका व आशिया खण्डातील जनता मोठ्या प्रमाणात युरोप अथवा अमेरिकेत स्थलान्तर करीत आहे . हा ट्रेन्ड गेल्या सुमारे शतकभरापासून सुरू झाला अन दिवसेन्दिवस वाढतच गेला . युरोपात तर काही ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मूळ युरोपियन लोकांपेक्षा स्थलान्तरित जनतेचे प्रमाण जास्त होत असल्याचा सम्भव आहे. अमेरिकेस सुद्धा इमिग्रेशन आणि इल्लिगल एमिग्रन्ट्स ची समस्या फार मोठी डोकेदुखी आहे!
३. या एमिग्रन्ट्स मुळे स्वस्त लेबर मिळणे या एकाच फायद्यासाठी अनेक घातक समस्या अन प्रश्न अमेरिकन्स अन युरोपियन्स च्या बोकांडी बसले आहेत. विस्थापित्/स्थलान्तरित इस्लामिक जनतेमधून जिहादी अन आयसिस सारख्या संघटनांचे आतंकवादी देखील घुसले .एवढेच नव्हे तर पूर्वापार काही दशकापासून युरोप-अमेरिकेत राहणार्या इस्लामी तरुणामध्ये देखील जिहादी दहशतवादाची बीजे फोफावली . आणि इस्लामी आतंकवादाचा धोका संपूर्ण जगास निर्माण झाला . यामुळे सर्वाधिक नुकसान प्रामाणिक निरपराध मुस्लिमांचे झाले आहे कारण रोजीरोटी कमावण्यासाठी स्थलान्तर करू पाहणार्या प्रत्येक मुस्लिमाकडे आता संशयाच्या नजरेतूनच पाहिले जाऊ लागले आहे.
४. याखेरीज त्या त्या देशांच्या साधनसंपत्तीच्या स्रोतांवर विस्थापित/ स्थलान्तरितांमुले अतिरिक्त ताण येणे , तसेच प्रवाशांची संख्या अतोनात वाढलुयाने विमानप्रवास व तत्सम वाहतुकीची साधने वाढून अधिकाधिक तेल वापरून संपवणे , या अधिकच्या लोकसंख्येसाठी अन्नधान्य आणि अन्य साधनसामुग्रीची वाहतूक वाढून कार्बन फूटप्रिन्ट वाढणे अशा अनेक दुष्परिणामांस सामोरे जावे लागत आहे. एका बाजूने या गोष्टींकडे " बिझनेस मधील वाढ /विकास " म्हणून पाहिले जात असले तरी प्रत्यक्षात ते तसे आहे का? हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे .
५. याखेरीज गुन्हेगारी /बलात्काराच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होणे आणि नेटिव्ह लोकाना हे उपरे वरचढ होउ लागल्याची सल वाटणे याही बाबी आहेतच...
तर मुख्य मुद्दा असा की हे इमिग्रेशन खरेच गरजेचे आहे का ? पश्चिमेतील काही व्यापारी कम्पन्यांच्या डोक्यातून निघालेले हे ग्लोबलायझेशन चे खूळ ! त्यालाच विकासाची संकल्पना अन्धपणे मानण्याची चूक प्रत्येकाने करावीच का? प्रत्येक देश स्वयम्पूर्ण अन सार्वभौम झाल्यास, त्या त्या देशाने देशातील सर्व नागरिकांस योग्य त्या सन्धी दिल्यास ते नागरिक परदेशी जाण्याची आस का धरतील?
किंबहूना मला तर इमिग्रेशन ही संकल्पना २१व्या शतकातील गुलामगिरीचे आधुनिइक स्वरूप वाटते. हे अमेरिकन्स आपली कामे आपण करू शकत नाहीत का? का आम्ही यांची हलकीसलकी कामे करण्यासाठी गुलामासारखे अथवा भिकार्यासारखे व्हिसाच्या रांगेत उभे रहावे/?
असो... या मुद्द्याला दुसरी बाजूही आहे. अरब राष्ट्रांत जसे जास्तीत जास्त २ ते ५ वर्षांच्या एम्प्लॉयमेन्ट व्हिसावर प्रवेश देतात , तसेच इतरही देशानी सुरु करावे. त्या नवीन देशात कोणत्याही प्रकारे प्रॉपर्टी खरेद्दी करणे अथवा तिथे सेटल होणे /तिथल्या मुलीशी लग्न करणे अजिबात शक्य असणार नाही. स्थलान्तरित देशात जन्माला येणार्या मुलांस कोणतेही प्रिव्हिलिजेस असणार नाहीत. त्यान्ची नागरिकता मूळ देशाचीच असेल .
असे झाल्यास परदेशात सेटल होण्याच्या रॅट रेस ला जबरदस्त हिसका बसेल . किम्बहूना ती मनोवॄत्तीच नष्ट होइल. सर्व एमिग्रन्ट्स हे फक्त आणि फक्त एम्प्लॉयी म्हणून येतील . आणि ठराविक काळाने परत मायदेशी जातील. मग त्यांच्य पुढच्या पिढ्या मूळ संस्कॄतीपासून दूर जाणे वगैरे फाजील प्रकार देखील बन्द होतील . आणि प्रत्येक देशाची विशिष्ट ओळख सांगणारी संस्कॄती देखील घट्ट रुजेल ....
येणार्या यु एस प्रेसिडेन्ट शिप च्या निवडणुकीत ट्रम्प महोदय विजयी झाल्यास त्यानी अशा प्रकारची इमिग्रेशन पॉलिसी जररूर राबवावी ,एवढेच नव्हे तर जगभरात स्र्वत्र अशीच पॉलिसी असावी अशी सदिच्छा ! यावर लिहिण्यासारखे अजून बरेच काही आहे , पण आज इथेच थाम्बतो...
इत्यलम !
सर्वाधिकार सुरक्षित
स्वामी विश्वरूपानंद
दि. २७-जुलै-२०१६
दक्षिण डकोटा गणराज्य
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
प्रतिक्रिया
27 Jul 2016 - 11:17 pm | खटपट्या
तुम्ही कुठे आहात ?
परदेशात असाल तर कोणत्या देशात?
परदेशात सेटल झाला आहात का?
सद्या एवढेच...
27 Jul 2016 - 11:50 pm | उडन खटोला
तुम्ही कुठल्या देशात आहात यावरून तुमचा 'पर'देश कळेल. दुसरं असं की तात्या हे सर्वनाम एकच असले तरी तात्या नावाच्या अनेक व्यक्ती बघता येतील.
तुम्ही देखील अनेक तात्यांपैकी एक तात्या आहात त्यामुळे दुसऱ्या ला कशाला बोलायचं? बाकी लेखक वेगळ्या आणि प्रतिसादक वेगळ्या चष्मयातून जग बघू शकतोच की!
28 Jul 2016 - 12:00 am | खटपट्या
ओके, आर्य परदेशातून येउन भारताते "सेटल" झाले असे म्हणतात...
27 Jul 2016 - 11:23 pm | अमितदादा
लेखाचा नाव आणि आशय वेगळा वाटला. आणि स्वामी अमेरिकेत स्थायिक आहेत की भारतात स्थायिक आहेत ? मला तर इमिग्रेशन हे शतको आणि शतका पासून होत आलाय आणि भविष्यात चालू राहील असा वाटतंय.
28 Jul 2016 - 1:30 pm | मंदार कात्रे
लेख विचारप्रवर्तक आहे हे नक्की!
28 Jul 2016 - 11:13 pm | चंपाबाई
आर्य इथेच रहातात का ?
28 Jul 2016 - 11:15 pm | चंपाबाई
असले विचार असणार्या व्यक्तीचे नाव विश्वरुपानंद नव्हे तर गल्लीबोळानंद हवे ना ?
29 Jul 2016 - 12:17 am | ट्रेड मार्क
इमिग्रंट हे सर्व देशांमधून आलेले विविध धर्मांचे लोक असतात. लेख फक्त मुस्लिम स्थलांतरणाविषयी आहे का सरसकट सर्व देशांतील व सर्व धर्माच्या लोकांवर भाष्य करतोय?
गोंधळ वाटलेले मुद्दे -
मुद्दा ३. स्वस्त लेबर फक्त स्थलांतरण करते असं नाही. कोणाला कशी संधी मिळते व कोण किती टिकून उभा राहतो/ राहते यावर स्थलांतरण अवलंबून आहे. तसेच परदेशात स्थायिक असणाऱ्या मुस्लिमांमध्ये फक्त स्थलांतरित मुस्लिम लोकांमुळे दहशतवादाची बीजे पसरली हे म्हणणे फारसे बरोबर नाही. इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत.
मुद्दा ४. त्या त्या देशांच्या साधनसंपत्तीच्या स्रोतांवर विस्थापित/ स्थलान्तरितांमुले अतिरिक्त ताण येतो हे पण फारसे बरोबर नाही. उलट भारतीय स्थलांतरितांमुळे इकॉनॉमीला भरपूर चालना मिळते. प्रवाश्यांची वाढ फक्त स्थलांतरितांमुळेच होते असं नाहीये. अमेरिकेत रोज नवीन किती लोक स्थलांतरित होतात याची आकडेवारी आहे का? एवढी विमाने काय फक्त नवीन स्थलांतरित लोकांनी भरतात?
मुद्दा ५. हा मुद्दा युरोपात सध्या चालू असणाऱ्या घटनांबद्दल आहे का? ट्रम्पचा इथे संबंध? भारतीय लोक हे बाकी सर्व लोकांपेक्षा इमिग्रंट म्हणून चांगले आहेत. पैश्याची बुडवाबुडवी फारशी करत नाहीत. बलात्काराचा मुद्दा मांडलाय त्या गोष्टीत भारतीयांचा सहभाग अतिशय नगण्य आहे. बाकी मारामाऱ्या, ड्रग्स यात पण भारतीय फारसे नसतात.
अरब राष्ट्रांत जसे जास्तीत जास्त २ ते ५ वर्षांच्या एम्प्लॉयमेन्ट व्हिसावर प्रवेश देतात, तसे एम्प्लॉयमेन्ट व्हिसा सर्व देशांत आहे. अमेरिकेत H१, L१; UK मध्ये वर्क परमिट, कॅनडा मध्ये वर्क परमिट ई ई.
कितीतरी गोरे अमेरिकन्स दुबई मध्ये जाऊन सेटल झालेले आहेत. अमेरिकेतल्यापेक्षा जास्त पगार, तो पण टॅक्स रहित मिळतो. बाकी पण बरेच फायदे मिळतात. दुबईमध्ये भारतीयांना घर पण घेता येते.
स्वामी विश्वरूपानंद यांचे सामान्यज्ञान जरा कमी पडलंय. सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे स्वामीजी दक्षिण डकोटा गणराज्य, अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे बसून असे उपदेश करत आहेत.
29 Jul 2016 - 12:28 am | चंपाबाई
दुबईमधील हॉस्पिटल क्षेत्रात अनेक भारतीय लोक कित्येक वर्षापासुन कायमचे सेटल झालेले आहेत.
बोलायचं मुसलमानांबद्दल , पण्प्रत्यक्ष बोलायचे धाडस नाही , मग असे लेख पाडले जातात.
स्थलांतरीत मुसलमान देश तोडतात म्हणे ... १५ ऑगस्ट येणार पुढच्या महिन्यात . एका स्थलांतरीत मुसलमानाच्या पोराने दिल्लीत लाल किल्ला बांधला .. अख्ख्या देशासाठी एक झेंडा लावायला... दहा हजार वर्षे रहात असलेल्या स्थानिकांना जे जमलं नाही , ते एका स्थलांतरीत परधर्मियाने करुन दाखवले.
29 Jul 2016 - 12:39 am | खटपट्या
रोचक, अजुन वाचायला आवडेल
29 Jul 2016 - 1:00 am | ट्रेड मार्क
स्थलांतरित मुस्लिम असो वा स्थायिक झालेले असोत, हे तेथील स्थानिक लोकांबरोबर जुळवून घेऊ शकत नाहीत हे सत्य आहे. स्थायिकांमध्ये जोपर्यंत संख्या कमी असेल तोपर्यंत हे फारसं काही करणार नाहीत परंतु संख्या वाढली (ज्याला फार वेळ लागत नाही त्यांना) की मग स्थानिकांना आणि स्थानिक चालीरीतींना विरोध चालू होतो. बाकी कुठेही अशांतता माजवण्यात याच लोकांचा सगळ्यात जास्त सहभाग असतो.
असो. विषय वेगळा आहे, उगाच फाटे नको.
अवांतरः चंपाबाईची सहमती मिळाली... संमिश्र भावना आहेत ;)
29 Jul 2016 - 3:02 am | फेरफटका
विकास / समृद्धी: कितीही पटो वा ना पटो, समाजाच्या विकासाचा, समृद्धीचा पाया हा अर्थशास्त्रावरच अवलंबुन आहे. हे सत्य, 'अर्थस्य पुरूषो दासः' म्हणणार्या द्रोणाचार्यांपासून, चाणक्यापासून, कार्ल मार्क्सपासून ते रघुराम राजन पर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहेच आणी आपल्याला ते पटलं, रुचलं वा कळलं किंवा नाही तरी वस्तुस्थिती बदलत नाही.
ग्लोबलायझेशन - स्थलांतरः हा मुद्दा सुद्धा गेल्या शतकातला आहे असं म्हणणं गैर आहे. युरोपातल्या मध्ययुगीन लढाया - १४५३ मधे झालेला कॉन्स्टंटिनोपल चा पाडाव - त्यानंतर चे अफ्रिकेला वळसा घालून किंवा पश्चिमेकडून युरोपातून आशियात येण्याच्या धाडसी मोहीमा ही सगळी ग्लोबलायझेशन - ईमिग्रेशन - स्थलांतर ह्याचीच वेगवेगळी रूपं आहेत. विस्तारत, प्रगत होत जाणं ही निसर्गातल्या प्रत्येक जीवाची नैसर्गिक प्रेरणा आणी स्थायीभाव आहे. ह्यालाच योगी अरविंदांनी 'विस्तारत जाणार्या जाणीवांची वर्तुळं' म्हटलय. ह्या प्रक्रियेत संघर्ष अनिवार्य आहे.
प्रत्येक जीव हा स्वतंत्र च जन्माला येत असतो आणी स्वातंत्र्य हा हक्क आहे - प्रिव्हीलेज नाही. त्यावर गदा आणणं हा मानवतेचा गुन्हा आहे.