फेब्रुवारी मधील ३ राज्ये, जवळपास ५० किल्ले, ३५०० किमी ची कोस्टल राईड नंतर
आता एक भन्नाट प्रवास.....
"पूर्वांचल मैत्री अभियान" दुचाकिस्वारी
नियोजन, व्यवस्थापन , पथदर्शन - डॉ. संदीप महिन्द
पुर्वांचल सफर.
*तब्बल 9 राज्यांतुन प्रवास.
*नेपाळ, भुतान, चीन, म्यानमार, बांग्ला सीमा.
*नागा, गारों, खांसी यांची संस्कृती व लोकजीवन अनुभवण्याची संधी.
*प्रचंड पाऊस विचारात घेता एक चित्तथरारक प्रवास, पर्वतीय रस्ते, घनदाट जंगले, चेरापुंजीसारखी अतिपर्जन्यछायेतील क्षेत्रे म्हणजे शारिरीक क्षमतेला आव्हानच, तेही जुलै ऑगस्ट मध्ये म्हणजे उकळत्या तेलात हात घालुन नाणे काढण्यासारखचं!
* अतिउंच प्रदेश, विरळ हवा, मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी घनदाट जंगले यांना भेदुन प्रवासाच आव्हान असणार आहे.
नियोजित प्रवास असा असेल
२७ जुलै – प्रवास सुरु ७:२५ वा. मुंबई - १०:१० वा . कोलकाता विमानतळ
२८ जुलै – कोलकाता शहर, कृष्णानगर, बहरामपूर, (WB)
२९ जुलै - बेहरामपूर, फरक्का , मालदा
३० जुलै – रायगंज , किशनगंज, सीलीगुडी.
३१ जुलै – अलीपूरद्वार, बोंगाईगाव, नलबाडी (AS)
१ ऑगस्ट – गुवाहाटी,
२ ऑगस्ट –जोराबत, नांगपोह, शिलॉंग, जावई (ML)
३ ऑगस्ट -लूंश्नोन्ग, सिल्चर, (AS )
४ ऑगस्ट – धरमनगर, आगरताळा (TR)
५ ऑगस्ट – आगरताळा
६ ऑगस्ट – सिल्चर, ऐझवाल (MZ)
७ ऑगस्ट – ऐझवाल
८ ऑगस्ट –सिल्चर, हाफलॉंग. (AS)डिफू
९ ऑगस्ट – डिफू, दिमापूर. (NL)कोहिमा, मावो, इम्फाळ,
१० ऑगस्ट –इम्फाळ, (MN)
११ ऑगस्ट –दिमापूर, गोलाघाट, तेजपूर (AS)
१२ ऑगस्ट -भालुकपॉंग, तेंगा, बोमडीला, सप्पर (AR)
१३ ऑगस्ट – सेला,जसवंतगढ तवांग.
१४ऑगस्ट -तवांग
१५ ऑगस्ट -बुमला बॉर्डर, तवांग
१६ ऑगस्ट -जसवंतगढ,बोमडीला,तेंगा
१७ ऑगस्ट – तेजपूर airbase, इटानगर (AR)
१८ ऑगस्ट -पार्वतीपुर, न. लखीमपूर, धेमाजी (AS)
१९ ऑगस्ट -दिब्रुगढ,
२० ऑगस्ट- शिवसागर, जोरहाट, माजुली
२१ ऑगस्ट - काझीरंगा, नागाव.
२२ ऑगस्ट - जोरहाट, बॉंगाईगाव
२३ ऑगस्ट - अलीपूरद्वार, बिन्नागुडी, कालिंपोंग (WB)
२४ ऑगस्ट - गंगटोक, नाथूला बॉर्डर, गंगटोक (SK)
२५ ऑगस्ट - गंगटोक, दार्जिलिंग, सिलिगुडी (WB)
२६ ऑगस्ट - कोलकाता, प्रस्थान आझाद हिंद एक्सप्रेस
२८ ऑगस्ट - मुंबई
आधीचे लिखाण अजून हि अपुरे असताना आता याची भर पडली
भेटू लवकरच फोटोंसहित ;) ;)
प्रतिक्रिया
26 Jul 2016 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे
सफर सुखद आणि निर्धोक होण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !
26 Jul 2016 - 12:17 pm | स्वच्छंदी_मनोज
हेच म्हणतो.
आणी आल्या आल्या लगोलग सफर वृत्तांत टाकावा हेही म्हणतो.
26 Jul 2016 - 12:17 pm | एकनाथ जाधव
शुभेच्छा !
26 Jul 2016 - 12:38 pm | नाखु
आणि तिथे कुणी मिपाकर असतील (असणार्च ) त्यांना भेटणे. बहुदा चिगो असावेत इथे.
एक मिपाकर भेटल्याचा त्यांनाही आनंद होईल.
प्रवासाला शुभेच्छा आणि सुरक्षीत+आरोग्यदायी रहा हीच सदीच्छा
नितवाचक्क नाखु
26 Jul 2016 - 2:14 pm | योगेश आलेकरी
हो नक्किच
26 Jul 2016 - 12:44 pm | बरखा
सफर उत्तम होण्यासाठी शुभेच्छा !
26 Jul 2016 - 12:44 pm | मंजूताई
व्यनि पहावा.
27 Jul 2016 - 12:16 am | योगेश आलेकरी
पहिला :)
26 Jul 2016 - 1:22 pm | नि३सोलपुरकर
अनेकानेक शुभेच्छा !
26 Jul 2016 - 1:38 pm | यशोधरा
शुभेच्छा.
26 Jul 2016 - 1:54 pm | योगेश आलेकरी
कोणी मार्गावर असेल या तर भेट होईल संपर्क वाढेल या उद्देशाने पोस्ट केले
26 Jul 2016 - 3:05 pm | कंजूस
सटेलाइट फोनवरून अधुनमधून अपडेट्स लिहा.
26 Jul 2016 - 4:54 pm | रंगासेठ
आपल्या या मोहिमेसाठी अनेकानेक शुभेच्छा!
27 Jul 2016 - 12:12 am | समर्पक
तुमचा आराखडा बराच निश्चित झाला असेल, पण; वेळ, तुमचा मूळ आराखडा व सोबती असे सारे लक्षात घेता जर शक्य असेल तर खालील गोष्टी समाविष्ट करू शकता.
चुकवू नये असे काही :
आसाम : गुवाहाटी मध्ये उत्कृष्ठ 'आसाम थाळी' मिळण्याची जागा 'गॅम्स डेलिकसी' दिसपूर जवळ. अतिशय उत्तम जेवण व स्थानिक पद्धतीच्या वातावरणाचा व पाककृतींचा आस्वाद.
गुवाहाटी मध्ये वेळ असल्यास 'उमानंद' हे बेटावरचे शिवमंदिर जरूर पाहावे, बेटावरील सुवर्णकपि एका अतिशय दुर्मिळ जातीचे प्रतिनिधी आहेत.
अधिक वेळ असल्यास ब्रह्मपुत्र ओलांडून सॉलकुची या रेशीम उद्योगाच्या ठिकाणास भेट द्या. अतिशय समृद्ध कला. तसेच आसामची 'सत्र', कला व संस्कृतीच्या जपणुकीत फार महत्वाची आहेत, जमल्यास त्यातीलही काही पाहावीत अशी विनंती.
नागालँड : किसामा नावाचे अलीकडे उभारलेले मुख्य नागा जातींच्या जीवनशैलीचे दर्शन घडवणारे प्रातिनिधिक खेडे कोहिमा पासून फार जवळ आहे. तसेच सरकारी कला व सांस्कृतिक विभागाचे दुकान संग्रहालयाच्या थोडे पुढे आहे, तेथे नागा हस्तकलेच्या वस्तू रास्त दारात मिळतात. राहावयास काही मदत हवी असल्यास माझ्या ओळखीत एक हॉस्टेल आहे. व पर्यटन क्षेत्रात कार्यरत एक मैत्रीणही आहे. तीही मदत करू शकेल.
मणिपूर : इंफाळ मध्ये राहण्यास स्वस्त व मध्यवर्ती जागा 'युथ हॉस्टेल', शेजारीच आसाम रायफल्स चे केंद्र असल्याने सुरक्षित. मणिपुरी वैष्णवांचे शाकाहारी पदार्थ जरूर चाखावेत. पुर्वोत्तरेत सर्वोत्तम शाकाहारी खाणे मिळणाऱ्या भागात हा अग्रणी. वेळ असल्यास 'मोरे' या ब्रह्मदेशाच्या सीमेवरील गावास जरूर भेट देणे. येथे ब्रह्मदेश मैत्री करारानुसार तुम्ही १६ मैलांपर्यंत त्या देशाच्या सीमेत जाऊ शकता. तेथील 'तामु' गावास भेट देऊ शकता. रस्ता अतिशय सुंदर आहे, सैन्याचे वर्चस्व असल्याने जागोजागी चेकिंगची तयारी ठेवा, फोटो वर अनेक बंधने आहेत व ती पाळावीत हि विनंती. ब्रह्मदेशात जाण्यासाठीचे सही शिक्क्याचे पत्रक सैन्य दलाकडून मिळते.
त्रिपुरा : वाघा सीमेप्रमाणे येथे बांगलादेश सीमेवर ध्वजावरोहण सोहळा रोज सायंकाळी साजरा होतो. अजून फार विकसित पर्यटन नसल्याने सुधारणेस बराच वाव आहे पण बघण्यासारखे. शहरातील राजवाडा सुंदर आहेच, पण अजून दक्षिणेकडे 'नीरमहाल' एक अजून सुंदर जागा. 'सिपाहीजॉला' अभयारण्य तर अत्यंत सुंदर! पुर्वोत्तरेकडून राज्यात येताना 'उनकोटी' एक रम्य जागा, ढलाई नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश फारच सुंदर.
उपयोगी असल्यास, अधिक काही आठवले तर व्यनि करेनच...
27 Jul 2016 - 12:18 am | योगेश आलेकरी
अरे वाह्ह ... खजाना ओतलात ... हाच फायदा होतो पोस्टण्याचा ;) वरील सर्व नक्की आराखड्यत सामावण्याचा प्रयत्न राहील .. खूप धन्यवाद
27 Jul 2016 - 12:21 am | योगेश आलेकरी
अधिक काही असल्यास व्यनि करावा लवकरात लवकर. पुन्हा नेटवर्क मिळाला नाही तर माहिती पडून राहील
27 Jul 2016 - 3:58 am | समर्पक
तुमचा आराखडा बारकाईने पहिला, फार घाईतला दिसतो आहे, विशेषतः त्रिपुरा मिझोराम मणिपूर व नागालँड. असो, हवामान पाहता सांभाळून.
आसाम :
३१ जुलै – नलबाडी : बोडोलँड मधून प्रवास आहे त्यामुळे...
१ ऑगस्ट - गुवाहाटीमध्ये उत्तरेकडून प्रवेश करत असल्याने 'मदन कामदेव' मंदिर वेळ असल्यास पहा, भग्न मंदिर असले तरी या प्रदेशास 'कामरूप' नाव ज्यावरून पडले ते हे स्थान व दर्शनीय. कामाख्या शक्तीपीठ सर्वश्रुत आहेच, दश महाविद्यांची स्थाने या निलाद्री पर्वतावर आहेत, जाणारच असाल आणि खूप गर्दी असली तर मुख्य मंदिरापेक्षा वरच्या बाजूस भुवनेश्वरी व बगलामुखी या देवतांची मंदिरे आहेत, ती पाहावीत. तेथून गुवाहाटी महानगर, ब्रह्मपुत्राचे पात्र, आय आय टी कॅम्पस याचे छान दृश्य दिसते. तसेच सर्व १० देवता या निर्गुणी (मूर्ती नाही) स्वरूपात आहेत त्यामुळे वेळेचा अभाव असेल तर हे करू शकता.
मेघालय:
२ ऑगस्ट – जोवाई जवळ १० किमी डीटूर, नारतीयांग येथील मोनोलिथ (पुरातत्व शास्त्र रुची असणाऱ्यात) प्रसिद्ध आहेत. जवळच (५१ पैकी) जयंति शक्तीपीठ (जैंतिया टेकड्यांचा प्रदेश, या स्थानावरून नाव मिळाले असावे)
त्रिपुरा :
४ ऑगस्ट – आगरतळा कडे - कुमारघाट हुन ३-५ किमी डीटूर, उनकोटी. अखंड शीलेतील लेण्यांप्रमाणे शिल्पे
मणिपूर :
अतिशय बेभरवशी कारभार असल्याने सांभाळून प्लॅन करावा कधी कसले खुसपट काढून राज्यव्यापी बंद वगैरे करतील सांगता येत नाही व तो किती दिवस चालेल हे हि सांगता येत नाही.
एकंदरच सगळ्या राज्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारची अशांतता सतत असते त्यामुळे सीमा सुरक्षा दल आसाम रायफल्सशी चांगले संबंध ठेवणे उपयोगाचे ठरते. कोणी ओळखीचे असल्यास अजून उत्तम.
एक अनुभव: मणिपूर सीमेवर पुण्याचे एक पाटणकर म्हणून अधिकारी भेटले. एकतर एवढ्या दूर आपल्या प्रदेशातील माणूस भेटणे हा आनंद (त्यांना अधिक) आणि त्यात रोजच्या कामात त्यांना तस्कर, पारधी अशा लोकांशी डील करावे लागत असल्याने अशा वेगळ्या कारणासाठी इथे लोक आले की त्यांचे फार कौतुक. हा एकट्या दुकट्याने फिरण्याचा प्रदेश का नाही यावर त्यांनी प्रेमळ कान उघाडणीही केली, परंतु अतिशय उपयोगाची माहिती व मदत देऊ केली. पुढे कुठे लागले तरी माझे नाव सांगून आसाम रायफल्स कडे आश्रय घे असेही सांगितले (तशी कुठे आवश्यकता पडली नाही).
मुद्दा एवढा कि कुठेही काही वावगे घडले तर आसाम रायफल्स व विमानतळ येथे पहिला आश्रय शोधा. नंतर स्थानिक पोलीस वगैरे... (असे माझे अनुभवांती मत)
हि माहिती जाणाऱ्या सर्वांस उपयोगी असल्याने व्यनि पेक्षा येथेच देतो.
29 Jul 2016 - 10:06 am | योगेश आलेकरी
हो खुपच घाईत आहे.. स्नेहभेटी ला अग्रक्रम आहे त्यानंतर स्थळदर्शन.. सैन्यदलाशी संपर्क झालेत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून..
बाकी अत्यंत उपयोगी माहीती
27 Jul 2016 - 12:19 am | योगेश आलेकरी
व सर्वचे आभार :)
27 Jul 2016 - 1:26 am | स्रुजा
वाह ! उत्तम बेत. समर्पक यांच्या प्रतिसादासाठी वाखु साठवली आहे.
तुम्हाला प्रवासाच्या शुभेच्छा ! वृत्तांताची वाट पाहत आहोत.
27 Jul 2016 - 10:35 am | वेदांत
प्रवासासाठी शुभेच्छा ..
समर्पक यांनी दिलेली माहिती खूप मोलाची आहे..
27 Jul 2016 - 10:57 am | मंजूताई
समर्पकांनी खूप छान माहिती दिली ये. वाखुत साठवली. पार्वतीपुरमध्ये श्री व सौ वर्णेकरांनी चहामळा कामगारांच्या मुलांसाठी शाळा काढलीये आवड व जमल्यास भेट त्याला
29 Jul 2016 - 7:05 pm | एस
क्या बात है! प्रवासाला शुभेच्छा. समर्पक यांचे प्रतिसाद अतिशय उपयुक्त!