सध्या माझ्या आजूबाजूला काहीतरी विचित्रच घडायला लागलेय
प्रसंग एक : संध्याकाळचे डोंबिवली स्टेशन , मी पार्किंग मधून बाईक काढतोय, अचानक समोरून गडबड गोंधळ , ३ (सुस्वरूप कॉलेजवयीन )मुली आणि १ मुलगा धावत माझ्या दिशेने.. मी आजूबाजूला घाबरून पाहिले काय झाल?? काही विशेष नव्हते , परत नजर समोर घोळका अजून जवळ आलेला, आता ते मला बोलवत पण होते , हे बाब्बासॉर, जल्दी
ओ मी बाबाब्सोर नाही हो मी.. मी .. म्हणेपर्यंत सगळे बाईक वर कोसळलेच, काहीतरी हातात मोबाईल वर त्यांना मिळाले , मग अजून गोंधळ करत तो ग्रुप उडत दुसरीकडे गेला.
माझी बाईक जवळपास आडवी झालेली होती. समोरचा पण टपरी वाला ह्या ह्या करत हसत होता. कशीबशी बाईक सरळ केली आणि मार्गाला लागलो
प्रसंग दोन: घाटकोपर आणि विक्रोळीच्या मध्ये .. दोन तरुण, साला ये ट्रेन को आजी इतना फास्ट जानेका था?
मेर्को रोज ये सर्कल मे रेअर पोकेमोन दिख्ते बट साला ये ट्रेन ( ऑ, आता लोक ट्रेन हळू जावी म्हणून प्रार्थना करायला लागले ? ये क्या हो राहा हे ?
प्रसंग तीन : ऑफिस लंच टाईम : बॉस:ए प्रसु . कल्याण डोंबिवली म्हणजे जंगल ना फुल ?
मी : आ ? का ?
बॉस : नाही रे मी ऐकलय तिथे भारी पोकेमोन फाईंड होतात. यायचं आहे रे , साला इकडे तेच तेच परत दिसतात
मी : ?????
प्रसंग चार : ए तू ट्रेक ला जातोस तर जिथे ३ जी असेल तिथेच प्लान करत जा रे.गाव साइड फुल्ल कलेक्सन अस्ते.
प्रसंग पाच : रात्री १० नंतर एरियात हातात मोबाईल आणि मुंडी खाली असा जमाव इकडे तिकडे पळताना दिसतो . बर्यापैकी भीतीदायक दृश्य असते
नक्की आजूबाजूला सुरु काय आहे कोणी सांगेल काय ?
प्रतिक्रिया
21 Jul 2016 - 11:51 am | प्रचेतस
???
21 Jul 2016 - 11:53 am | सामान्य वाचक
जाऊ दे
दुर्लक्ष्य करा
नवीन फॅड दुसरेकाय
21 Jul 2016 - 11:57 am | अभ्या..
स्पॉकेमोन
21 Jul 2016 - 12:08 pm | मुक्त विहारि
एकदा तरी कट्ट्याला या.
मग बोलूच.
(अर्थात, हा विषय सोडून.)
21 Jul 2016 - 3:37 pm | महासंग्राम
याला 'या टोपी खाली दडलंय काय " गाण्याची चाल फिट्ट बसेल नै
21 Jul 2016 - 12:08 pm | अजया
=))
कचरा वेचतात ना हातात छडी घेऊन तसे लोक पण दिसतील तुला स्पांडु.घाबरु नको.ते पोकेमाॅन वेचतात ;)
21 Jul 2016 - 12:09 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्ही ह्ही ह्ही!
पांडूव्यथा .
21 Jul 2016 - 12:17 pm | टवाळ कार्टा
आँ, अच्चं जालं तल
21 Jul 2016 - 12:40 pm | लालगरूड
pokémon go गेम आहे. असं मॅप मध्ये पोकेमाॅन शोधायच आणि पकडायचं... चु*गिरी.....
21 Jul 2016 - 12:55 pm | मुक्त विहारि
आम्ही अद्यापही घराबाहेर, नोकिया-१०१, वापरत असल्याने, उत्तमच आहे म्हणायचे.
जुने ते सोने आणि नोकियाला पर्याय नाही.
21 Jul 2016 - 12:49 pm | सभ्य माणुस
schoolbus चाललेली असते.अचानक 3-4 दांडगत तरुन बसला अडवे जातात. बस मधे घुसतात. कहीच सेकंदात बाहेत पडतात. "मिल गया पोकेमोन...!"
21 Jul 2016 - 12:56 pm | मुक्त विहारि
http://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/...
21 Jul 2016 - 1:05 pm | वरुण मोहिते
अहो हे कैच नाई. सध्या मुंबईत आहे आमचे काई कॉर्पोरेट बार मित्र पिता पिता बाहेर जातात आणि पोकेमॉन वॉर करून येतात.. काय चालूये
21 Jul 2016 - 1:10 pm | मुक्त विहारि
आणि पोकेमॉन वॉर करून येतात....."
उत्तम रंगलेली मैफिल, अशी अर्धवट सोडणार्यांना आम्ही परत बोलवत नाही.
21 Jul 2016 - 1:29 pm | प्रसाद गोडबोले
मी अत्ता पर्यंत झुबाट वीडली अब्रा रट्टाटा आणि पिड्गे पकडले आहेत ! बुल्बासॉर सगळ्यांनाच मिळतो सुरुवातीला !
बाकी एका पोकेस्टॅप ला विजिट देवुन आलोय !
साला लाईफ मध्ये पहिल्यांदा गेम खेळायसाठी डेटापक मारला पण डेटापॅक चे स्पीड कमी असल्याने बाकीचे पोकेमॉन पकडायला वेळ लागत आहे :)
21 Jul 2016 - 2:08 pm | viraj thale
badges जिंकलेत की नाही
21 Jul 2016 - 1:29 pm | माम्लेदारचा पन्खा
तूर्तास इतकेच !
21 Jul 2016 - 1:31 pm | किसन शिंदे
सध्या बरंच फॅड आहे या गेमचं.
काल दुपारी जेवल्यानंतर खाली पार्कींग प्रिमायसेसमध्ये शतपावली सुरू होती. अचानक मोबाईल फोन हातात घेऊन चालणारी ग्रुपमधली एक पोरगी चालता चालता अचानक "हेहे बॉब्बासॉर..बॉब्बासॉर" करत उड्या मारायला लागली. म्हटलं अचानक काय झालंय बघायला गेलो तर ही थेरं.! =))
21 Jul 2016 - 1:36 pm | स्पा
हा एक फिटनेस गेम आहे असे समजले =))
डॉक खरे अजून सांगितलच या बद्दल
21 Jul 2016 - 1:42 pm | किसन शिंदे
या गेमविषयीची आजची ही ताजी बातमी !
21 Jul 2016 - 1:43 pm | आदूबाळ
हा खेळ पांचट असूदे, पण "ऑगमेंटेड रिअॅलिटी" ही लय भारी आयड्या आहे.
21 Jul 2016 - 2:55 pm | प्रसाद गोडबोले
ही खरतनाकाच कन्सेप्ट आहे ! तरी अजुन पोकेमॉन मधील अवतार पाहिजे तितका परसनलाईझ करता येत नाही . जर तो तसा परसनालाईझ करता आला तर अॅक्च्युअल मध्ये "मॅट्रीक्स" बनवता येईल !!
21 Jul 2016 - 1:44 pm | मोहनराव
मोबाईल झोंबी तयार करण्यासाठी नवीन गेमींग अॅप दिसतय... चालु द्या. अजुन काय काय बघणार भविष्यात काय माहीती?

21 Jul 2016 - 1:49 pm | मराठी_माणूस
ह्यांचेच अजुन एक प्रसिध्द वाक्य
“Two things are infinite: the universe and human stupidity; and I'm not sure about the universe.”
21 Jul 2016 - 1:50 pm | चिनार
नक्की काय प्रकार आहे हा पोकेमॉन गेम ??
21 Jul 2016 - 2:04 pm | सस्नेह
तरीच आमचे चिरंजीव हल्ली स्कूटर सोडून पायी फिरायला लागलेत !!!
21 Jul 2016 - 2:09 pm | कंजूस
पोकेमोनमधल्या कोणी कॅरिक्टरसारखा दिसतोस का?
21 Jul 2016 - 2:18 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मला पण हे शष्प कळले नाही. त्या स्थानावर गेल्यावर मोबाईल मध्ये ते येतात का. कितीही पोकेमान असतात का त्या जागी.माझे अद्यान दुर करा कुणीतरी.
21 Jul 2016 - 2:26 pm | लालगरूड
शष्प म्हणजे काय? नविन शब्द
21 Jul 2016 - 2:29 pm | सूड
गवत, तसूभर कळलं नाही अशा अर्थी.
21 Jul 2016 - 2:28 pm | सूड
मन्याच्या मनीची व्यथा!!
21 Jul 2016 - 2:38 pm | शि बि आय
हा हा हा...
पुढच्या वेळेपासून तुम्ही हातात छडी घेऊनच बाहेर पडत जा... पूर्वी लोक गुरं हाकायचे तसं आता पॉकिमांच्या गुरांना हाकलायला उपयोगी पडेल. पोर रस्त्यात सुध्या 'बॉब्बासॉर.. बॉब्बासॉर मिल गया' करत ओरडत फिरताना पहिली आहेत... लोक बसून गेम खेळण्यावर ऑब्जेक्शन घेतात ना म्हणून आता व्यायाम आणि गेम असं कॉम्बिनेशन आलेलं आहे.
21 Jul 2016 - 2:45 pm | बेकार तरुण
हा खेळ उपलब्ध (लाँच) करुन दिल्यापासुन त्या कंपनीची मार्केट कॅप दुप्पट झाली !!
http://www.business-standard.com/article/international/nintendo-s-market...
21 Jul 2016 - 2:45 pm | कंजूस
एक मोबाइल अॅप आहे अलार्मचे. यात वेळेचा गजर लावायचा नसून जिपिएस अलार्म आहे.अमुक एक अक्षांश रेखांश फिक्स करून गजर लावायचा आणि फोनातले जिपिएस चालू ठेवायचे.जेव्हा तुम्ही त्या जागेवर पोहोचता तेव्हा गजर वाजतो.तशा प्रकारचा गेम असावा.दिलेल्या ठिकाणी गेल्यावर चेकइन करून पॅाइंट्स मिळत असतील.
21 Jul 2016 - 2:46 pm | कंजूस
एक मोबाइल अॅप आहे अलार्मचे. यात वेळेचा गजर लावायचा नसून जिपिएस अलार्म आहे.अमुक एक अक्षांश रेखांश फिक्स करून गजर लावायचा आणि फोनातले जिपिएस चालू ठेवायचे.जेव्हा तुम्ही त्या जागेवर पोहोचता तेव्हा गजर वाजतो.तशा प्रकारचा गेम असावा.दिलेल्या ठिकाणी गेल्यावर चेकइन करून पॅाइंट्स मिळत असतील.
21 Jul 2016 - 6:47 pm | भाग्यश्री कुलकर्णी
21 Jul 2016 - 6:48 pm | भाग्यश्री कुलकर्णी
21 Jul 2016 - 2:49 pm | अभ्या..
आपण मिपावर दुआयडी हुडकायचा गेम चालू करूयात काय?
21 Jul 2016 - 3:29 pm | सूड
करा, आयाम इन !!
21 Jul 2016 - 3:05 pm | रघुनाथ.केरकर
हा गेम जर भारतात ओफ्फीशीयली लाँच झाला तर टेलीकॉम ऑपरेटर किमान १० ते २५ % जास्त पैसे कमावतील.
खरोखरचाच पॉकेट माँन्स्टर होउन जाईल हा गेम.
21 Jul 2016 - 4:01 pm | कंजूस
एक ओगस्टला ओफ लाइन येतोय असं हॅकर्सनी जाहिर केलंय.म्हणजे मोबाइलला दोन पावर ब्यान्क ला वूस ठेवायच्या.
21 Jul 2016 - 4:09 pm | महासंग्राम
याचे सर्व्हर परदेशात आहेत. आणि खेळण्यासाठी GPS आणि कॅमेरा सुरू हवा यामुळे संवेदनशील ठिकाणांची माहिती पोहचू शकते.
21 Jul 2016 - 4:13 pm | स्पा
मज्जा मज्जा आहे सगळी
21 Jul 2016 - 6:07 pm | अत्रुप्त आत्मा
पांडू,
तू पण एक घोस्टर गेम काढ ना असाच!
भूतं पकडायचा.
21 Jul 2016 - 6:12 pm | मुक्त विहारि
"स्पा"चा धागा आणि गुरुजी का नाही?
चला आता "स्पा"च्या धाग्याचे सार्थक झाले.
21 Jul 2016 - 6:34 pm | प्रचेतस
पांडूमॉन.
22 Jul 2016 - 2:52 pm | अत्रुप्त आत्मा
=))
21 Jul 2016 - 5:59 pm | पैसा
पहिला परिच्छेद वाचून वाटले स्पा चे 'ते' खरेच आले का काय!
21 Jul 2016 - 6:06 pm | मुक्त विहारि
"हे" नाही परवडत.
22 Jul 2016 - 10:13 pm | चाणक्य
अगदी अगदी
21 Jul 2016 - 6:09 pm | यशोधरा
कोण असं पोकेमॉन शोधतं? मला नाही कोणी दिसलं कधी..? स्पावड्या, थापा मारतोयस ना?
21 Jul 2016 - 6:18 pm | स्पा
दिसतील दिसतील,
मुंबईत फॅड आलय, आता पुण्यात यायला वेळ नाही लागणार
21 Jul 2016 - 6:23 pm | सूड
कालचा प्रसंगः काल वहुमन मधून निघालो. आणि आमची वर्गमैत्रिण एक डबक्यापाशी रेंगाळली. म्हणलं बयो (हो आम्ही मैत्रीणींना बयो वैगरे म्हणतो.) काय चाललंय. तर म्हणे डबक्यापाशी एक वॉटरपोकेमॉन आहे. एका कारपाशी पण तिला काहीतरी सापडलं. आमच्या वेळी असं नव्हतं हे वाक्य मनातल्या मनात म्हणून परतलो.
21 Jul 2016 - 6:26 pm | यशोधरा
=))
21 Jul 2016 - 6:29 pm | स्पा
लोल
21 Jul 2016 - 7:02 pm | आदूबाळ
लहानपणी काडेपेट्यांचे छाप जमवायचो त्याची आठवण झाली!
21 Jul 2016 - 6:24 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
महासत्ता होण्याकडे वाटचाल.
21 Jul 2016 - 6:33 pm | रघुनाथ.केरकर
आत्ताच एक चार्मेंडर मारला, आजुबाजुला काही दीसत नाही. ऑफिस च्या वाय-फाय क्षेत्रात सगळं फिरुन झालं पन एक बी पोकेमोन नाही सापडला, बदलापुर ला बघतो सापडतात का?
21 Jul 2016 - 6:59 pm | सूड
बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही?
21 Jul 2016 - 6:59 pm | सूड
बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही?
21 Jul 2016 - 6:59 pm | सूड
बदलापूरात कुठे म्हणे तुम्ही?
21 Jul 2016 - 7:08 pm | रघुनाथ.केरकर
Manhohar vikas residency
21 Jul 2016 - 7:41 pm | सूड
ओके!!
22 Jul 2016 - 3:27 pm | रघुनाथ.केरकर
आपण सुद्धा श्रीक्षेत्र बदलापुरचेच का?
22 Jul 2016 - 4:01 pm | सूड
नाय नुसतं बदलापूर, आम्ही पुण्यनगरीत निघून आल्याने आता ते श्रीक्षेत्र राहीलं नाही.
22 Jul 2016 - 6:07 pm | अभ्या..
हाण्ण्ण तिज्यायला.
माउली स्पेअर पादुका हैत का? खडावा, खडावा.
22 Jul 2016 - 10:54 pm | सूड
एक साधा जोड आहे, दुसरा तुमच्याकडून डिझाईन करुन घ्यायचाय. म्हणजे सणावाराला वापरायला बरा!! ;) =))
23 Jul 2016 - 11:54 am | रघुनाथ.केरकर
Bhagya punya nagariche
21 Jul 2016 - 6:45 pm | मोहनराव
सिरियात खुप पोकेमॉन सापडत असतील.. तिकडे जा म्हणाव!!
21 Jul 2016 - 7:32 pm | बहुगुणी
इन्ग्रेस
हा खेळ खरोखरीच जगभर पसरलेला आहे, भारत धरून, आणि serious गेमर्स यासाठी तासंतास घालवायचे. त्याच कंपनीने (Niantic) आता पोकेमॉन गो आणला आहे.
21 Jul 2016 - 8:15 pm | जव्हेरगंज
खतरनाक!
21 Jul 2016 - 8:57 pm | खटपट्या
एक दोघे गाडीखाली आले की फॅड कमी होइल...
21 Jul 2016 - 9:37 pm | आनन्दिता
ऑ!! अच्चं झालं तर !
21 Jul 2016 - 10:31 pm | गामा पैलवान
मी खेळंत नाहीये तर मला पकडतील का हे लोकं? बहुतेक नाही. बरोबर?
-गा.पै.
22 Jul 2016 - 3:47 am | मराठमोळा
हे सर्व काय चाललंय हे समजत नसेल आणी समजल्यानंतर न आवडल्यास आपलं वय बरंच वाढलंय आणि अजूनही केला नसल्यास गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची वेळ आली आहे हे समजून घ्यावे.
22 Jul 2016 - 7:30 am | स्पा
विमे ची आठोण आली ;)
28 Jul 2016 - 1:55 pm | रघुनाथ.केरकर
मिपा वरचा हा धागा पाहीला, अन लग्गेच पोकेमोन इंस्टाल केला, २ - ३ दीवस खेळुन पाहीला, पण ज्याप्रकारे नेट , टीव्हीवर पोकेमॉन ची चर्चा आहे तेवढा काही खास वाटला नाही, कात्रप, शीरगाव, हेन्द्रे पाडा , वाणीवली, एरंजाड, शिवाजी चौक अगदी बदलापुर गाव देखी पालथं घातलं पण मोजुन ४ ते ५ पोकेमॉन गावले. उगाच डिजेल, नेट आनी वेळ वाया गेला. काहिच थ्रिल वाटलं नाही.
22 Jul 2016 - 5:48 pm | जगप्रवासी
काल एका ठिकाणी जायचं होत, एका मित्राला म्हटलं मला सोडशील का तिथे तर नेहमी नखरे करणारा मित्र लगेच तयार झाला. त्याच्या बाईक वरून जाताना त्याने भर रस्त्यात अचानक ब्रेक मारून गाडी थांबवली. मागून बेस्ट बस वाला हॉर्न मारतोय, मी त्याला शिव्यांची लाखोली वाहायला चालू केली तर हे महाशय पॉकेमॉन पकडत होते. जर बसच्या ड्रॉयव्हरने वेळेत ब्रेक मारला नसता तर आम्ही दोघे पण फोटोत जाऊन बसलो असतो. शुद्ध वेडेपणा आहे हा खेळ म्हणजे.
22 Jul 2016 - 5:56 pm | माम्लेदारचा पन्खा
काळजी घ्यावी मालक !
सध्या नोकिया वापरणारे आता देवदूत म्हणून ओळखण्यात येत आहेत....
22 Jul 2016 - 9:50 pm | कंजूस
आजच संध्याकाळी cnbc awaaz tv18 चानेलवर दोन एपिसोड दाखवले पोकेमनवर छान होते.१) टेकगुरू -गेमिंग स्पेशल ,२)pokemania नेटवर चसेल तर पाहा.
एक जाहिरातही दाखवली परदेशी त्यात हेल्मेट घालून पोकेमोन खेळा असा संदेश दिलाय.
23 Jul 2016 - 1:38 pm | चतुरंग
आचरटपणा आहे!
http://www.cartelpress.com/pokemon-go-major-highway-accident-man-stops-m...
हायवेवरती मधेच पोकेमॉन पकडायला गाडी थांबवणारे महाशय!
ही फक्त सुरुवात आहे....
23 Jul 2016 - 2:02 pm | स्पा
डेंजर हाय
28 Jul 2016 - 1:39 pm | आंबट चिंच
ऑ!!आँच्च जाँल्ल झालं तर !
साभार परत स्पांडुजी
28 Jul 2016 - 1:44 pm | स्पा
ओके आंची
वेळ मिळेल तसे माझ्या इतर लेखांवर पण टाका न प्लीज एक एक कमेंट
28 Jul 2016 - 1:45 pm | उडन खटोला
खि खि खि. तु पोकेमोन पकडत असणार ;)
28 Jul 2016 - 2:09 pm | गवि
रोचक खेळ आहे. ऑगमेंटेड रियालिटी पुढे आणणारा.
पण भारतात गेम रिलीज झालेला नसेल तर भारतातल्या भौगोलिक अक्षांशरेखांशांवर पोकेमॉन तरी कसे दिसतात?
(मूळ कंपनीने फक्त जिथे गेम रिलीज करायचा तिथल्या प्रदेशातल्याच ठराविक जागीच आभासी पोकेमॉन सर्वर प्रोग्राममधे पेरले असणार असं गृहीत धरुन)
28 Jul 2016 - 2:42 pm | प्रसाद गोडबोले
मी माझी ट्रु जी.पी.एस लोकेशन हाईड करुन फेक जी.पी.एस लोकेशन क्रियेट केली की जेणे करुन मला एका जागी बसुन वेगवेगळ्या ठिकाणांचे पोकेमॉन पकडता येतील किंव्वा पोकेस्टॉप विजिट करुन पोकेबॉल मिळवता येतील , बट इट डिडन्ट वर्क. पोकेमॉन गेम फेक जी.पी.एस लोकेशन डिटेक्ट करतंय :( Perhaps I was being to naive to assume that they would make such a simple mistake :P
असे फेक जीप.पी.एस लोकेशन सिम्युलेट करता आले असते तर आपण मॅट्रिक्स चित्रपटासारखे संपुर्ण सिम्युलेटेड रियालिटी कन्सेप्टला फार जवळ आलो असतो .
असो . थोडक्यात काय तर , स्वतःचे बुड हलवल्या शिवाय पोकेमॉन पकडता येणार नाहीत . उठा आणी चालायला लागा . त्या निमित्ताने व्यायाम :))))
अवांतर : अॅन्ड्रोईड गेम्स चे कोड स्वतःपुरते मॉडीफाय करता येतात का ? आणि तसे करणे लीगल असते का ?
10 Aug 2016 - 8:01 pm | तेजस आठवले
हा गेम राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असू शकतो. तसेच अपघातांची संख्या वाढत जाणार हे पण नक्की.
10 Aug 2016 - 8:38 pm | स्वामी संकेतानंद
महामूर्खपणा आहे हा. लोकांच्या आणि देशाच्याही सुरक्षेला धोका!
10 Aug 2016 - 9:58 pm | हेमन्त वाघे
देशाच्याही सुरक्षेला धोका कसा ते जरा सांगाल का?
10 Aug 2016 - 10:31 pm | लालगरूड
कॅमेरा चालू असतो डाटा अपलोड होतो यामुळे गुगल मॅप्समधून जेवढी माहिती मिळणार नाही तेवढी कळेल.