इंडियाज गॉट टॅलेंट आणि सारेगामा या दोन कार्यक्रमांची अंतिम फेरी (त्यांच्या भाषेत ग्रँड फिनाले) पाहण्याचा योग आला. तसेही या कार्यक्रमांचे अनेक भाग मी पाहिले होतेच. पण अंतिम निकालाने घोर निराशा केली.
झालं काय, की
इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये पपया व अंकिता (ही दोघेही गरीब घरातील आहेत हा भाग अलाहिदा) यांचे अप्रतिम सादरीकरण झाले. त्यांच्या स्पर्धेत सुलतान हा बासरीवादक होता. त्याचे बासरीवादनही अप्रतिमच. त्यात दुमत नाही. पण पपया व अंकिता यांच्या नृत्यात इतके स्टंट होते, की ते अभावानेच कोणी केले असतील. बासरीवादन आणि त्यांच्या नृत्यातल्या नजाकत दोन्हीही सुरेखच. पण भारतातलं टॅलेंट शोधायचं तर त्याला काही तरी निकष लावायलाच हवे. बासरीवादनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सगळीकडेच आहे. पण अंकिता-पपयाच्या नृत्यातला अशी नजाकता कोणाकडून सहजपणे शिकायला मिळणार नाही. ही त्यांनीच विकसित केलेली शैली होती. म्हणजे कोरिओग्राफर त्यांना कोणीही नव्हता. खरं तर या स्पर्धेचे ते विजेते असायला हवे होते, असं मला व्यक्तिशः वाटतं...
दुसरा शो म्हणजे सारेगामा. अर्थातच गायन ही स्पर्धा. सर्वाेत्तम गायकाची ही शोधपरीक्षा. बंगालचा कुशल, उत्तर प्रदेशचा सचिन, पंजाबचा (ठाम नाही) प्रीतज्योत अशा काही निवडक स्पर्धकांमध्ये प्रीतज्योत आणि सचिन यांची गायकी अप्रतिम होती.या दोघांच्या तुलनेत कुशलचा आवाज अजिबात भावला नाही. इथे विजेतेपद प्रीतज्योत आणि सचिन यांच्यापैकीच कोणाला तरी मिळेल, असं वाटत होतं. पण विजेतेपद कुशलला मिळालं आणि धक्काच बसला..
हे निकाल पाहिल्यानंतर माझा तर दोन्ही रिअॅलिटी शोवरील विश्वासच उडाला. अर्थात, माझं वैयक्तिक मत आहे. मी फक्त मत शेअरलं. तुम्हाला काय वाटतं
मला तर बुवा ही भंपकगिरीच वाटते
प्रतिक्रिया
19 Jul 2016 - 1:47 pm | अजया
कशाला बघता मग?
21 Jul 2016 - 1:29 pm | पी महेश००७
चूक झाली... माफ करा
19 Jul 2016 - 1:51 pm | मोहनराव
हे शोज पाहत नाही. त्यामुळे काही वाटत नाही.
21 Jul 2016 - 1:30 pm | पी महेश००७
चला तुम्ही सुटलात तर...
19 Jul 2016 - 1:52 pm | धर्मराजमुटके
तुमच्या लेखाच्या शिर्षकाशी सहमत आहे. फरक एवढाच की तुम्हाला सगळे शो शेवटपर्यंत पाहिल्यावरच ती भंपकगिरी आहे हे समजले तर मला ते न बघता अगोदरच समजले होते. आम्ही जन्मजातच अति शहाणे आहोत. :)
21 Jul 2016 - 1:30 pm | पी महेश००७
हा हा हा
19 Jul 2016 - 1:55 pm | मुक्त विहारि
हे काय असते?
(अज्ञानी) मुवि
21 Jul 2016 - 1:31 pm | पी महेश००७
हा हा हा
19 Jul 2016 - 1:55 pm | राजाभाउ
अच्छा हे अजुन सुरु आहे का सगळे (इंडियाज गॉट टॅलेंट , सारेगामा वगैरे)
21 Jul 2016 - 1:32 pm | पी महेश००७
हा हा हा
19 Jul 2016 - 2:33 pm | बोका-ए-आझम
तो जिंकला नाही म्हणून Reality Shows ना भंपक म्हणत असाल तर कठीण आहे. मग या न्यायाने निवडणुका, कोर्ट केसेस, परीक्षा वगैरे सगळ्या गोष्टी भंपक आहेत असंच म्हणायला हवं. परीक्षकांचे निकाल आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद या दोन्हीही गोष्टी जर असतील तर थोडंबहुत १९-२० होऊ शकतं. पण त्यावरून हे शोज भंपक आहेत असा निष्कर्ष काढणं टोकाचं आहे. बरं, तुम्ही उदाहरण देताय २ Reality Shows चं अणि भंपक म्हणताय सगळ्या Reality Shows ना ज्यात Wipeout, Survivor आणि Shark Tank सारखे पाश्चात्त्य देशांमधले Reality Shows पण येतात. तेही भंपक आहेत का? भारतातलेही सगळे Reality Shows भंपक आहेत का? असायलाही हरकत नाही, पण नीट कारण द्या. तुम्हाला हवा असलेला स्पर्धक न जिंकणं हे कार्यक्रम भंपक असल्याचं कारण असू शकत नाही.
19 Jul 2016 - 2:42 pm | प्रसाद_१९८२
pawn stars व इतर अमेरिकन रिअॅलिटी शो खरोखर पहाण्यासारखे आसतात.
21 Jul 2016 - 1:49 pm | पी महेश००७
मी फक्त दोन रिअॅलिटीज शोविषयी मत मांडलं आहे आणि ते दोन्ही भारतातील आहेत. त्यामुळे समस्त भूतलावरील अन्य देशांतील रिअॅलिटी शोविषयी माझे काहीही म्हणणे नाही आणि मी ते पाहतही नाही. मी फक्त दोन रिअॅलिटी शोविषयीच भाष्य केले आहे. यापूर्वीचेही काही शोविषयी माझा काही वेगळा अनुभव नाही. मात्र, ते आता आठवत नाही इतके ते देखणे नक्कीच होते!
(तो जिंकला नाही म्हणून Reality Shows ना भंपक म्हणत असाल तर कठीण आहे. थोडंबहुत १९-२० होऊ शकतं वगैरे...)
असं बिलकूल नाही. मी यापूर्वीही असे शोज बघितले आहेत. त्यानंतरच हे वैयक्तिक मत ठामपणे मांडले. ज्यांनी कोणी हे रिअॅलिटीज शो पाहिले असतील ते ठामपणे सांगू शकतील की निकाल चुकीचे दिले आहेत. थोडंबहुत १९-२० होत असेल तर हरकत माझीही नाही, पण बऱ्याच शोमध्ये १९-२० होत असेल तर कसं चालेल?
19 Jul 2016 - 2:59 pm | स्वच्छंदी_मनोज
रियॅलीटी शोज बघतच नाही त्यामुळे भंपक का खरच रिअल ह्याचा विचार करावा लागत नाही.
बादवे -
>>> शब्द आवडला बुवा...
21 Jul 2016 - 1:50 pm | पी महेश००७
छान
19 Jul 2016 - 3:12 pm | इरसाल
धमु शी सहमत हाओत.
19 Jul 2016 - 3:13 pm | मोदक
मी काय म्हन्तो.. हे असले तद्दन टुकार शो बघण्यापेक्षा थोडे हिरव्या देशातले रिअॅलिटी शो बघा. खाडकन डोळे उघडतील आणि परत असल्या फालतूगिरीच्या वाटेला जावेसे वाटणार नाही.
आणि बिग बॉस टाईप्स कचाकचा भांडणारे शो आवडत असतील तर गॉर्डन रॅमसे चे शो बघा..
21 Jul 2016 - 1:53 pm | पी महेश००७
संदर्भ दिल्य़ाबद्दल धन्यवाद... परदेशातील रिअॅलिटी शोजची माहिती हवीच होती.
19 Jul 2016 - 11:00 pm | पद्मावति
बिग बॉस मधे फार कचाकचा भांडतात. त्यांची भांडणं ऐकून माझीच स्ट्रेस लेवल वाढते. पण सगळे चांगल्या मूड मधे असतील तर मस्तं वाटतं. बिग बॉस मी पाहते आणि मला वाटतं ते फार rigged नसावं बहुदा.
21 Jul 2016 - 1:56 pm | पी महेश००७
बिग बॉस अजिबात न आवडलेला प्रकार... यात जिंकण्याचे नेमकी निकष काय आहेत हे अद्याप कळलेलं नाही... आता तर कोणत्याही भांडकुदळ माणसांना या शोमध्ये घेतलं जाणार आहे म्हणे... तद्दन फाल्तू
20 Jul 2016 - 12:01 am | सुंड्या
हे जे काही रियालीटी शोज चालतात ना खास करून 'इंडिअन मूर्ख डब्ब्यावर' एकदम भिकारी साले...गाणे काय गातात (काही खरोखरच चांगले गातात...त्या सचिनचे गाणे ऐकले होते आणि आवडले सुद्धा) ते गाणं संपल्यावर घरची परिस्थिती सांगून मधातच रडणे..उगीच 'दिखाव्यासाठी' आसू सुद्धा आणतात...अर्रे काय भावनांचा बाजार मांडतात....वरून आसू पुसत 'मुझे वोटे देणे के लिये अमका ढिकाना टाइप करके फलाने नंबर पे भेजे'....आणि ते 'डान्स शो' आहेत का सर्कस? काय समजत नाय बुआ..गाणं भलतीकडे जातं अन त्याच्यावर 'डान्स' करणारे भलतीकडं ,कधी दोरखंड बांधून उलटेपालटे काय होतात, कधी रिंग घेऊन नाचतात..काय नृत्य आहे की माकडचेष्टा..हेच काय कमी तर ते त्या 'शो'चे 'जजेस' सारे एकापेक्षा एक चोपडे गंड्यागडू (अपवाद असतील) वरून तो बिग बॉस...कायच्या काय मानसिक त्रास...एकदा आमची एक नातलग ते बिग-बॉस पाहत होती तेव्हा बघितला होता...लाज वाटली राजेहो ते एकमेकाच्या चुगलखोरी अन लहासहान गोष्टी वरून एकमेकावर खायच्या प्यायच्या वस्तू फेकणे पाहून...अन दर्शकांची अवस्था 'बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना'.
21 Jul 2016 - 1:59 pm | पी महेश००७
अगदी बरोबर
प्रत्येक रिअॅलिटी शोमध्ये भावनांचा बाजारच मांडलेला आहे. कलेला दाद मिळायला हवी की सहानुभूतीला, या कचाट्य़ात सापडलेले हे शोज...
20 Jul 2016 - 12:23 am | रुपी
टी.व्ही. नसल्यामुळे रियालिटी शो किंवा एकंदरीतच काहीच पाहण्याचा प्रश्नच येत नाही. कुणीतरी फेसबूक वगैरेवर एखादा व्हिडिओ टाकला तर पाहण्यात येत होता. त्यातल्या त्यात गाण्याच्या शोमध्ये काही काही सुरेख गातात. पण ते डान्सचे कार्यक्रम तर वरच्या प्रतिसादाप्रमाणे भलतीकडेच चाललेत. त्यांचे ते हावभाव, अतिशय तोकडे कपडे आणि "लिफ्ट्स" च्या नावाखाली विभद्र चाळे बघून तर लाज वाटते. लहान लहान मुले तर जी उत्तरे देतात ते पाहून ज्यांना कौतुक वाटते त्यांना गदागदा हलवावेसे वाटते. मध्ये भारतवारीत माधुरी दीक्षित परीक्षक असलेल्या कार्यक्रमात तर एक मुलगी तिला म्हणाली की माझ्या बाबांनी माझी आई तुमच्यासारखी दिसते म्हणून तिच्याशी लग्न केले. आईलाही त्यात अगदी धन्यता वाटत होती!
20 Jul 2016 - 5:26 am | रेवती
बरं झालं असलं काही बघत नाही.