मिपाकरांचा सल्ला हवाय! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
23 Sep 2008 - 12:18 pm
गाभा: 

मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,

जरी हा काथ्याकूट विरंगुळा आणि मौजमजा ह्या सदरात घातला असला तरी तो सत्यघटनेवर आधारीत आहे!

नुकतेच मला "अबक" नावाच्या व्यक्तिचे पोष्टकार्ड (व्य नि) आले आहे. त्यातला मजकूर साधारणत: असा आहे -

"आपण मिपाचे मालक आहात हे समजले. मला मिपावर एक चांगला लेख द्यायचा आहे. त्याचे मला तुम्ही किती पैसे देणार?"

-- अबक.

बापरे माझ्या! अहो मंडळी, हा तात्या गरीब आहे हो! पैशे आणणार कुठून? :)

म्हणूनच मला आपल्यासारख्या मिपाकर हितचिंतकाचा सल्ला हवा आहे. काय उत्तर द्यावं आम्ही त्या 'अबक'ला?

की त्याला आम्ही,

"शिन्च्या, मिपावर तुझा लेख प्रसिद्ध होतो आहे म्हणून उलट तूच मला पैशे दे लेका!" असे लिहावे? :)

छ्या! काय पण एकेक मंडळी असतात! आणि अहो उद्या जर तुमच्यापैकी प्रत्येकचजण इथे लिहिण्याचे पैशे मागू लागला तर डुबलाच की हा गरीब तात्या आणि मिपाही डुबलेच की! :)

असो, आपल्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत! तोही फुकटचा असेल तरच द्या! विकतचा सल्ला घेण्यास आपल्याकडे पैशे नाहीत! :)

आपला,
('अबक' ला द्यायला पैशे कुठून आणावेत या काळजीत!) तात्या.

प्रतिक्रिया

मनिष's picture

23 Sep 2008 - 12:38 pm | मनिष

"शिन्च्या, मिपावर तुझा लेख प्रसिद्ध होतो आहे म्हणून उलट तूच मला पैशे दे लेका!"

प्रेमाने लिहायचे असेल तर लिहा, नाहीतर त्याला म्हणा ब्लॉग काढून लिही हवे ते! :)

- मनिष

प्राजु's picture

23 Sep 2008 - 7:54 pm | प्राजु

प्रेमाने लिहायचे असेल तर लिहा, नाहीतर त्याला म्हणा ब्लॉग काढून लिही हवे ते!

मनिषशी सहमत आहे..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

23 Sep 2008 - 12:39 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
एम्.एफ मध्ये जा असे सागावे. त्याला तिथे मिळाले किंवा नाही मिळाले तो त्याचा प्रश्न.
समाज सेवा करणार्या लोकांना पैसे मिळतात. लिहुन स्व माज सेवा करण्यासाठी नाही.
वि.प्र.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2008 - 12:41 pm | प्रकाश घाटपांडे

मला वाटल तात्या संपादकाला सांगुन त्याचे लेख उडिवतोय. तव्हा तो इचारतोय "आपण मिपाचे मालक आहात हे समजले. मला मिपावर एक चांगला लेख द्यायचा आहे. त्याचे तुम्ही किती पैसे घेणार?"

प्रकाश घाटपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"आपण मिपाचे मालक आहात हे समजले. मला मिपावर एक चांगला लेख द्यायचा आहे. त्याचे मला तुम्ही किती पैसे देणार?"

चांगला का वाईट ते आमचं संपादक मंडळ आणि त्यांचे मदतनीस ठरवतात, आणि यांत मिपाचे सगळेच सभासद येतात. तेव्हा आधी त्यांना लेख वाचूदेत मग निर्णय पाच लोकांच्या कमिटीवर सोपवण्यात येईल. त्या कमिटीत कोणाला घ्यायचं यासाठी मिपावर एक कौल घेण्यात येईल. आणि मग कमिटी जो निर्णय घेईल तो मान्य आहे का नाही हे पुन्हा कौलावर चढवण्यात येईल ....

(हुश्श दमले. या वयात यापुढे टायपिंग नाही होत माझ्याच्यानी!)

सखाराम_गटणे™'s picture

23 Sep 2008 - 12:41 pm | सखाराम_गटणे™

मला वाटते की तात्या तुम्ही त्याला सत्यपरीस्थीती सांगावी.
त्याला येथील अनुभाव नसावा.
आपण त्याला समजावावे.

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

विसोबा खेचर's picture

23 Sep 2008 - 12:45 pm | विसोबा खेचर

नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

हसता हसता खुर्चीतून धापकन खाली पडलो!

=))

दिपोटी's picture

23 Sep 2008 - 12:44 pm | दिपोटी

तात्यांनु,

त्यांका सांगा की हंयसर मिपावर फुक्काट करमणूक, गाणी-बजावणी, इनोद-विनोद, मनोरंजन होतांसा त्यां क्काय तुकां कमी आसां म्हून तू त्यांचे पैसे मांगतसयस ?

- दिपोटी

मनस्वी's picture

23 Sep 2008 - 12:50 pm | मनस्वी

प्रतिसाद देण्याचे किती पैसे मिळतील?
(म्हणजे प्रति प्रतिसाद अमूक अमूक पैसे अबकने मिसळपाव कल्ला समितीत जमा करावेत.)

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

टारझन's picture

23 Sep 2008 - 2:51 pm | टारझन

तात्या असं असेल तर आमाना बी पैसं पाहेन ,.... काय ग मने ... माजे धा प्रतिसाद ... लगिच ....
बाकी लेखक धंदेवाइक (सुद मराठीत प्रोफेशनल हो) असावा. पण त्यांना सांगावे की इथे "फ्रि सोर्स कोड" चा फंडा चालतो , आणि लेखक वाचक चालक मालक पालक ... सगळेच हा एक स्वखुषीसाठी प्रकल्प राबवत आहेत

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

शैलेन्द्र's picture

23 Sep 2008 - 12:54 pm | शैलेन्द्र

तात्या,

त्याला म्हणाव, मि पा साठि तिकीट सुरु केल कि असे पैसे मिळ्तील..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 12:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या,

त्यांना पिडाकाकांची कविता "मिपावर लिहिणं धोक्याचं" पाठवा आधी!

जैनाचं कार्ट's picture

23 Sep 2008 - 1:01 pm | जैनाचं कार्ट (not verified)

तात्या त्याला नाडी केंन्द्रामध्ये पाठवा आधी ;)
आपल्या लेखनाचे भविष्य व येणार शुन्य प्रतिसाद तर पाहून घेईल.... मग तुम्हालाच पैसे देईल की लेखन प्रसिध्द करा ह्यासाठी :)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Sep 2008 - 1:06 pm | बिपिन कार्यकर्ते

आपुनबी येईच बोलता है...

बिपिन.

यशोधरा's picture

23 Sep 2008 - 2:23 pm | यशोधरा

तात्या, त्यांना म्हणावे, या प्रश्नाने तुम्ही मला बुचकळ्यात टाकून उगाच माझा वेळ खाल्ला, मग पुन्हा मिपाकरांचा सल्ला घेण्यासाठी मी हा लेख लिहिला, मग मिपाकरांनी हे वाचले आणि वेळात वेळ काढून इथे प्रतिसाद टायपले... तुमच्या एका अश्या पत्राने आम्हां सर्व मिपाकरांचा इतका वेळ घेतला, त्याबद्दल तुम्हीच ( म्हणजे अबक) आम्हां सर्वा मिपाकरांना किती पैसे देणार???

याचे उत्तर तुम्हांला अबक देतील असे काही वाटत नाही!! :D

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2008 - 2:32 pm | प्रभाकर पेठकर

तात्या,
त्याला म्हणावे 'मिसळपावाचा' आस्वाद घेतल्यावर पैसे (आस्वादघेणार्‍याला) मालकांना द्यावे लागतात. हॉटेलात येणार्‍या गिर्‍हाईकाला त्याच्या येण्याचे पैसे 'मालक' देत नसतो.

सरकारी शिरस्त्यानुसार...
१.आपले "मॉल्यवान" लेखन आंतर जालावर कोठे प्रकाशित झाले ते विचारा..
२.हे साहित्य तुमचेच आहे याचा पुरावा काय? चॉरि नाहि.. याला पुरावा काय?
३.आपल्या आधिच्या लेखनास अस्सल प्रतीसाद किती व कुणाचे आले आहेत?

मला वाटते ही माहीती पुरेशि आहे "सोलायला"

नाद खुळा
(सरपंच आणि पारावरचि मंडळी कशी "सोलतात " याचि ऊत्सुकता असलेला.)

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

छोटा डॉन's picture

23 Sep 2008 - 3:06 pm | छोटा डॉन

त्याला म्हणावं की बाबारे तुझे " बहुमोल साहित्य मिपावर " जरुर प्रकाशित केले जाईल व त्याला योग्य ती किंमतही दिली जाईल.
त्याबाबत बिणधास्त रहा पण ...
त्याला यासाठी खालील कागदपत्रे " सरकारी णियमानुसार व मराठी साहित्य परिषदेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार " खालील कागदपत्रे वरीजनल व त्याच्या ५ ऍटेस्टेस प्रतींसह मिपाच्या कार्यालयात व कार्यालयीन वेळात सादर करावी लागतील ...

१, साहित्य स्वतःचेच असल्याबद्दलचे हाय कोडतामधुन प्रतिज्ञापत्रक ...
२, ते कुठे पुर्वप्रसिद्ध असल्यास त्या साईट वर कॉपीराईट हक्काच्या उल्लंघनाबद्दल खटला भरल्याचा पुरावा म्हनुन संबंधित कागदपत्रे ...
३, पुर्वप्रकाशित नसल्यास त्याचा "चौर्याचा " प्रतिबंधक उपाय म्हणुन " माहिती तंत्रज्ञान गुन्हे अन्वेषण विभागाला " सादर केलेले २ संरक्षण प्रतिज्ञापत्र" ...
( याला त्या विभागाच्या विभागीय आयुक्तांचे ओळखपत्रची छांयांकित प्रत जोडली असावी.)
४, ते साहित्य मराठीतुन व सुद्धलेखनाच्या पातळीवर उतरले असल्यास त्यासंबंधीचे " अबक साईटच्या प्रशासकाच्या सहीचे " प्रतिज्ञापत्र ...
५, जर त्यात गैरमराठी शब्दांचा वापर झाला असल्यास त्याच्या परवानगीचे " राज ठाकरे वा आबा पाटलांच्या" सहीचे पत्र ...
६, ते ज्या संगणकवर टायपले गेले त्याची खरेदीची बिले ...
७, त्यावर असणार्‍या " सॉफ्तवेअर्स्च्या खरेपणाबद्दल" ऍन्टी- पायरसी सेल" चे पत्र ...
८, लिहण्यासाठी वापरलेल्या खोलीच्या जागेचा ७-१२ चा उतारा, प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची नोंद व ती बिनाशेती व कुठलेही कर्जरहीत अस्सल्याचा पुरावा ...
९, लिहताना वापरलेल्या विजेचे भरलेले बील व त्यामगची पुर्ण थकबाकी रहीत बिले ...
१०, त्यावर येणार्‍या प्रतिसादाबद्दलचे ना-हरकत प्रमाणपत्र ...
११, प्रतिसाद वाचुन झीट येणार नाही हे सिद्ध करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र ...
१२, मानसीक संतुलन ठीक असल्याचा पुरावा ....
१३, ज्या खात्यात पैसे पाठवायचे आहेत त्याचे डिटेल्स ...
१४, मागच्या ५ वर्षाचे टॅक्स रिटर्न्स ...
१५, ह्या पैशातला १० % भाग सामाजीक कार्याला आगाऊ दिल्यासंबंधीच्या घोषणेचे प्रतिज्ञापत्र ...
१६, ते स्वतः कोण आहेत ह्यासंबंधीची सर्व सरकारी कागदपत्रे ...
( ह्यात त्यांच्या मागच्या ३ पिढ्यांसबंधी पण कागदपत्रे द्यावी लागतील ...)
१७, त्यांचा उत्तम चरित्राची व सद्ध्वर्तवणुकीची साक्ष देणारे गॄहमंत्रालयाचे प्रतिज्ञापत्र ...
१८, ते कुठल्याही " राजकीय पक्षाशी , धार्मीक संघटनांशी २ संबंधीत नसल्याचा पुरावा म्हनुन त्या त्या पार्टीकडुन पत्रे ...
१९, "५ प्रसिद्ध लोकांचे " ओळखीसाठी साक्षीपत्र ...
२०, वरील सर्व कागदपत्रे खरी असल्याचे सांगणारे त्यांचे " सिप्रीम कोर्टातले" प्रतिज्ञापत्र ...

हुश्श !!!!

एवढे करुन मगच त्यांना पैसे द्या ...

अवांतर : पैसे दिल्यावर त्यांचा " दुरध्वनी क्रमांक " आम्हाला द्यायला विसरु नका ...
आम्ही इकडुन " खंडणीसाठी" फोन करतो ...
च्यायला लोकं लाख - लाख रुपये कमवतात, मग आम्हाला " प्रोटेक्सन मनी " द्यायला नको का ???

सरकारी बाबु - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

23 Sep 2008 - 3:09 pm | मनस्वी

भले शाब्बास डान्या! खंडणीवसुली पथकाचा 'डान' शोभतोस खरा!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 3:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्यांनी सुरुवातच "सभ्य स्त्रीपुरूषहो" अशी केली आहे. तेव्हा कोणाला शंका येऊ शकेल इथे डॉन लोकं काय करत आहेत.
डॉन या शब्दाचा एक अर्थ सभ्य पुरूष, ज्याला मराठीत झंटलमन म्हणतात. स्पॅनिशमधे तर श्रीयुतच्या ऐवजी डॉनच म्हणतात!

छोटा डॉन's picture

23 Sep 2008 - 4:08 pm | छोटा डॉन

तात्यांनी सुरुवातच "सभ्य स्त्रीपुरूषहो" अशी केली आहे. तेव्हा कोणाला शंका येऊ शकेल इथे डॉन लोकं काय करत आहेत.

अरेरे ...
गलतीसे मिश्टेक हो गयी, माफी असावी "डॉण आदिती ( रेफ : सरकार - ३ ) ...

पण हे " सभ्य उर्फ झंटलमन " कसे व्हायचे ?
काही छोटासा क्रॅश कोर्स आहे का ?

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 4:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण हे " सभ्य उर्फ झंटलमन " कसे व्हायचे ?
आपण व्याख्येनेच " सभ्य उर्फ झंटलमन " आहात ... झंटलमन बाय डेफिनीशन! काळजी नका करू!

गलतीसे मिश्टेक हो गयी, माफी असावी "डॉण आदिती ( रेफ : सरकार - ३ ) ...
सरकार - ३ मी पहाणार नाही कारण त्यावर "बहिष्कार" आहे!

छोटा डॉन's picture

23 Sep 2008 - 4:11 pm | छोटा डॉन

म्हणुन काढुन टाकला आहे ...
तसदीबद्दल क्षमस्व !

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2008 - 3:17 pm | प्रकाश घाटपांडे

\ =)) प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

23 Sep 2008 - 3:21 pm | विसोबा खेचर

डॉन्या,

तुझी नियमावली सह्हीच आहे रे! :)

तात्या.

शितल's picture

23 Sep 2008 - 7:27 pm | शितल

डॉन्या,
जबरा प्रतिसाद रे !
:)

लिखाळ's picture

23 Sep 2008 - 7:57 pm | लिखाळ

१०, त्यावर येणार्‍या प्रतिसादाबद्दलचे ना-हरकत प्रमाणपत्र ...
११, प्रतिसाद वाचुन झीट येणार नाही हे सिद्ध करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र ...

भारी आहे बुवा.. :)
--लिखाळ.

भास्कर केन्डे's picture

23 Sep 2008 - 8:25 pm | भास्कर केन्डे

डॉन बाबा, खासच नियमावली!!!

वाचून वेगवेगळ्या हापिसात कारकूनांकडून झालेल्या अत्याचाराची आठवण झाली.

देवदत्त's picture

23 Sep 2008 - 9:56 pm | देवदत्त

=))

ह्या पैशातला १० % भाग सामाजीक कार्याला आगाऊ दिल्यासंबंधीच्या घोषणेचे प्रतिज्ञापत्र ...
हे आहे म्हणून.
नाही तर मिळालेल्या रुपयांवरील कर सरकारला भरल्याची पावती ही नंतर सादर करणे.

स्वप्निल..'s picture

24 Sep 2008 - 5:23 am | स्वप्निल..

डॉन,

वाचता वाचता खाली पडलो..एकदम झक्कास प्रतिक्रिया...

स्वप्निल

नोहिद सागलीकर's picture

23 Sep 2008 - 6:13 pm | नोहिद सागलीकर

"आपण मिपाचे मालक आहात हे समजले. मला मिपावर एक चांगला लेख द्यायचा आहे. त्याचे मला तुम्ही किती पैसे देणार?"

-- अबक.

बाबारे इथ ''बोला चिच कडी आणी बोला चाच भात ''
इथ आनंद्,प्रेम ,ज्ञान,वीरंगूळा ,
तुला भरभरुन मिळेल ,
पन बाळा तुला हे काय ?साहित्य परिषद वाटली का काय पैसे मागतोय वेड्या .........................................................

झकासराव's picture

23 Sep 2008 - 6:43 pm | झकासराव

डॉन तु सरकारी हापिसात ७-८ वर्ष कामाला होतास की काय?? :)
तुझ्या अटी भारीच आहेत.
तात्या शेठ. त्या अबक ला सांगा तशी गरजच न्हायी.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनामिक's picture

23 Sep 2008 - 7:13 pm | अनामिक

पैसे नाही देणार पण तुमच्या खरडवहीत ;">"तुमचा लेख खुप छान आहे. तुम्ही कित्ती कित्ती हुश्शार!" अशी मोठ्ठ्या अक्षरातली खरड नक्कीच टाकण्यात येईल असे अश्वासन द्यावे.

छोटा डॉन's picture

23 Sep 2008 - 7:34 pm | छोटा डॉन

भारीच रे ... झक्कास !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ब्रिटिश's picture

23 Sep 2008 - 7:31 pm | ब्रिटिश

जेआयला तेला पैस हावं ? पैस हावं ?
पोकल बांबूच फटक देत बोल

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

संदीप चित्रे's picture

23 Sep 2008 - 7:48 pm | संदीप चित्रे

एखाद्या खेळाडूने ऑलिंपिकच्या चाचणी परीक्षेआधीच विचारायचे -- भाग घेण्यासाठी किती पैसे देणार ?

तात्या,
'अबक'ना कळव 'हौसेला मोल नसतं साहेब.'
--------
(अवांतरः च्यायला, उद्या लोक विचारतील मल मिपा वाचायचंय, किती पैसे देणार ? !!) ;)

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Sep 2008 - 7:52 pm | ब्रिटिश टिंग्या

सल्ला द्यायचे पैशे लागतील!
मला तुम्ही किती पैशे देणार? ;)

(झानटामाटिक) टिंग्या ;)

चतुरंग's picture

23 Sep 2008 - 8:23 pm | चतुरंग

अहो मिपाकर एवढे पोचलेले आहेत की तुम्हालाच दिवसाला २० प्रमाणे लेख पाडून देतील तुमच्या ब्लॉगवर टाका पाहिजे तितके आणि प्रत्येकी ५०रु. प्रमाणे १०००रु. रोकडा तुम्हीच आम्हाला द्यावेत.
(विडंबने हवी असल्यास रु.१०० प्रत्येकी , कच्चा माल शोधून देण्याची जबाबदारी तुमची नाहीतर त्याचे वेगळे रु.५० प्रत्येकी ;) ) तेवढाच मिपा कट्ट्यासाठी निधी! B)
काय कशी वाटते आयडियाची कल्पना?

चतुरंग

वेताळ's picture

24 Sep 2008 - 10:20 am | वेताळ

मला वाटते अबक हा परिस्थीतीशी झगडणारा विद्रोही नवलेखक असावा . प्रत्येक संपादकाच्या दारावर थपडा खाउन तो मिपावर खुप आशेने आला असावा.तुमच्या कडुन बिचारयाला खुप अपेक्षा असाव्यात.त्याला काही वंगाळ न बोलता त्याचे लेखन प्रसिध्द करावे व पैश्याचा मोबदला म्हणुन ४ ऑक्टोबर च्या मिपाच्या बैठकीत असात्विक गटात त्याला सामिल करुन घ्यावे.तेवढीच त्याची साहित्यीक त्रुष्णा शांत होइल.
वेताळ

सर्किट's picture

24 Sep 2008 - 12:10 pm | सर्किट (not verified)

प्रिअ अबक,

आपले एटीएम कार्ड आणि पिन नंबर पाठवून द्यावा. लेख प्रकाशित झाल्यावर मानधन ब्यांकेत जमा करण्यात येईल.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)