नाडी ग्रंथ भविष्य आणि इंडॉलॉजिकल स्टडी
नाडी भविष्य ताडपत्रावर कोरून लिहिलेले असते. त्याची भाषा तमिळ असते. ताडपत्रवर कोरून लिहिण्याची प्रथा आता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ताडपत्रे फारच जीर्ण झाल्याने त्यांची डिजिटल पद्धतीने राखण करून त्यातील मजकुराचा अर्थ तज्ञांकडून माहित करून घेण्याचे कार्य अनेक इंडॉलॉजीकल संस्थांतून केले जाते. त्यासाठी भारत सरकार तर्फे नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स. डिपार्टमेंट ऑफ कल्चर - मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अँड कल्चरतर्फे बरेच धन उपलब्ध करु दिले जाते. पहा www.namami.nic.in त्याशिवाय युनेस्कोच्यातर्फे ही अपार धन विविध शोधसंस्थांना उपलब्ध करुन दिले जातो.
तमिळ भाषेतील अशा ताडपत्रावरील विचारधनाला संरक्षण व संग्रहित करण्याचे काम चेन्नई येथील इन्स्टीट्यूट ऑफ एशियन स्टडीज या संस्थेला आणि इन्स्टीट्यूट ऑफ पांडेचरी यांना सोपवल गेले आहे. त्या दोन्ही शोध संस्थांना मी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कार्याची ओळख करुन घेतली. त्यांचे काम अत्यंत प्रभावीपणे चालू होते. त्यापैकी चेन्नईच्या संस्थेचे संचालक डॉ. जी. जॉन सॅम्युएल आणि त्यांच्या सोबत तमिळ ताडपत्रावर काम करून पीएच डी मिळवणाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ श्रीमती लक्ष्मी यांनी पुण्यात १४ ऑक्टोबर २००७ला उद्यानप्रसाद कार्यालयात झालेल्या नाडी भविष्यावरील पहिल्या अधिवेशनाला अनुक्रमे अध्यक्ष आणि मुख्य अतिथि म्हणून स्थान भूषवले.
डॉ. जी जॉन सॅम्युएल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असा आवर्जून उल्लेख केला की नाडी भविष्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची उत्सुकता आणि जागरूकता पाहून मला याचे आश्चर्य वाटते की माझ्यासाऱ्ख्या तमिळ भाषातज्ञ व जाणकार म्हणवून घेणाऱ्याला अजूनही या विषयावरील ताडपट्ट्यावर शोधकार्य करायला कसे सुचले नाही? मी नुकताच जपानहून आलेल्या एक शिष्ठमंडळाला घेऊन विविध नाडी भविष्य केंद्रातून भविष्य कसे असते याचे मार्गदर्शन करुन आलो. तथापि या ताडपट्टया काही लोकांच्या व्यक्तिगत संपत्तीचा भाग असल्यामुळे या विषयाला त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आमच्याकडे अशी एकही ताडपट्टी नाही की ज्यावरून आम्ही यावर काही शोधकार्य करू शकू. विंग कमांडर शशिकांत ओकांनी अशी ताडपत्रे उपलब्ध करून दिली तर माझी संस्था यावर आणखी काम करेल, याचे आश्वासन मी आपणासमक्ष देतो. या शिवाय सांगायला आनंद वाटतो की एका अर्थाने या कार्याची सुरवात विंग कमांडर शशिकांत ओकांनी त्याच्या आधीच्या भेटीत आम्हाला दिलेल्या काही नाडी पट्टीतील भविष्य कथनाच्या वह्यांच्या झेरॉक्सनी झालेली आहे. त्यांनी विनंती केल्यावरून विशेषतः डॉ. लक्ष्मींच्या उत्साही सहकार्यामुळे नाडी भविष्यातील शंभर शब्दांची एक सॅम्पल डिक्शनरी - नमुना शब्दकोश – मी त्यांना अर्पण करतो. इच्छुकांना या अधिवेशनाचा संपूर्ण अहवाल व फोटो अल्बम www.naadiguruonweb.org यावर न्यूज इव्हेंट्स मधे पहाता येतील.
यावेळी अनेकांच्या विनंतीवरून डॉ.लक्ष्मींना मी माझ्या मराठी आणि हिंदी पुस्तकातील दोन नाडीपट्ट्यांच्या रंगीत फोटोमधील मजकूर वाचून सांगावा अशी विनंती केली त्यावेळी त्यांनी त्या दोन्ही फोटोमधे च किंवा श, ची किंवा शी, का, इन, त ही अक्षरे कुठे व कशी आहेत हे काही उपस्थितांसमोर दाखवले व सर्वांचे समाधान केले.
नाडी भविष्याची मस्करी वा तुच्छतापुर्ण हेटाळणी करून या विषयाला अनुल्लेखाने टाळणे ही शक्य आहे. किंवा यावर आणखी बरेच अभ्यासकार्य करता येणे शक्य आहे. ते कसे करावे या संबंधी सकारात्मक विचार वा कृती कोणी या माध्यमातून करु इच्छित असेल तर त्यांचे सहकार्य घ्यायला मला कधीच संकोच वाटणार नाही. विरोधांच्या समाधानासाठी भले एक वेळ आपण असे मानू की या ताडपट्टयांमधून भविष्य वगैरे काहीही लिहिलेले नसते. त्यावर जो काही मजकूर लिहिलेला असतो त्याचा भविष्यकथनाशी संबंध नसतो. पण ज्या अर्थी त्या पट्ट्या तमिळ लोकांना वाचायला येतात त्या अर्थी त्यातील भाषा तमिळसदृष्य असावी. त्या त्यांच्या ताडपत्रावरील कष्टपुर्वक कोरीव कामाची निदान नोंद घ्याल. बऱ्याचदा आपण निरर्थक आलेली पत्रे वाचतो व फाडून फेकून देतो. का तर भले मला त्यातील मजकूर महत्वाचा वाटला नसेल तरीही ज्याने तो लिहून तयार करण्याचे कष्ट घेतले त्याच्या कष्टांची दाद म्हणून आपण नजर फिरवतो. इथे तर कित्येकांची आयुष्ये घडली असे अनुभव लोक सांगतात.
आपणापैकी कित्येक परदेशात उच्चपदे विभूषित करता. आपणासारख्यांच्या तेथील विविध विश्वविद्यालयात भारतीय भाषांवरकाम करणाऱ्या तज्ञांच्या ओळखी असतील. परदेशातून मुद्दाम येऊन नाडी ताडपट्टयांचे नमुने घेऊन त्यांचे कार्बन १४ कसोटीचे काम केले जाते. मग आपण फक्त या साहित्याला माझ्या विचारधारेशी मिळत नाहीत म्हणून सावत्रपणाची वागणूक देणे योग्य आहे काय? याचा विचार व्हावा. नाडी भविष्य हे थोतांड आहे म्हणून प्राणपणाने लढू इच्छणाऱ्यांनीही नाडी ग्रंथ भविष्य हे थोतांड नक्की नाही असे म्हणणाऱ्यांशी वैचारिक मतभेद बाजूला सारून एकत्र येऊन हे काय आहे? याचा सर्वांसाठी / मानवतेसाठी काही उपयोग होऊ शकतो का? याचा विचार करायला हरकत नसावी.
तुम्ही आलात तर तुमच्या सोबत नाही आलात तर तुमच्या विना कार्य चालू ठेवायला हरकत नसावी. ठीक आहे मदत करू नका. निदान आघात करून काम करणाऱ्यांना नामोहरम करू नका. ते तरी तुमच्या हातात आहे?
नाडी पट्टीतील शशिकांत ही अक्षरे कुठे व कशी आहेत याचे प्रात्याक्षिक
http://lh6.ggpht.com/shashioak/SNfh6GJ2WaI/AAAAAAAAAPc/tetrlyNtPNI/s160/...
प्रतिक्रिया
23 Sep 2008 - 12:06 am | खादाड_बोका
काहो तुम्ही काय लोकांना काय मुर्ख समजतात काहो. जर तुम्हाला येवढा नाडीभवीष्यांवर विश्वास असेल तर अंन्धश्रध्दा समीतीचे "Challenge" स्विकाराल काय ?
मला तर स्वप्नातही भुक लागते....
23 Sep 2008 - 12:11 am | प्राजु
काहीच नीट दिसत नाहीये..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2008 - 8:38 am | प्रकाश घाटपांडे
From समाज
प्रकाश घाटपांडे
23 Sep 2008 - 12:14 am | यशोधरा
चालूच आहे का नाडी पुराण?
23 Sep 2008 - 12:43 am | टारझन
नो कमेंट्स .. जसे तुम्ही म्हणता तसे ... नो कमेंट्स ...
गंमत म्हणून पोपट वाल्याकडून भविष्य काढून घेऊन किमान चार वेळा (कागदोपत्री) जिवनात सुंदर स्त्री आलेला - टारझन
(एकदा तर माझ्या मैत्रिणीच्या पण आयुष्यात सुंदर स्त्री येणार असं भविष्य आलेलं ... मी जाम घाबरलेलो ,, तेंव्हा पासून पोपट बंद झाला)
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
23 Sep 2008 - 1:02 am | विसोबा खेचर
अवांतर -
काय पण म्हणा बाकी, नाडी अन् गुंड्यांची बटणे असलेल्या हवेशीर, चट्टेरीपट्टेरी घरगुती चड्ड्यांची मजाच वेगळी! :)
असो,
बाकी चालू द्या, विषयांतराबद्दल क्षमस्व!
आपला,
(चट्टेरीपट्टेरी चड्डीतला मुंबईकर चाळकरी) तात्या.
--
काय रे गधड्या, नाडी का चोखतायस? बाप उपाशी ठेवतो का तुझा? :)
(इति पु ल देशपांडे - बिगरी ते मॅट्रिक!)
23 Sep 2008 - 7:53 am | अरुण मनोहर
आजच्या विज्ञानातील काही गोष्टी कालच्या अंधश्रद्धा होत्या. हे जरी खरे असले तरी कालच्या सगळ्याच अंधश्रद्धा आज विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्या नाहीत हेही खरे आहे. कदाचित उद्या तसे होईल, कींवा होणारही नाही. त्यामुळे तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर असल्या गोष्टी सिद्ध होईपर्यंत नो कमेंट्स.
23 Sep 2008 - 10:06 am | विजुभाऊ
बऱ्याचदा आपण निरर्थक आलेली पत्रे वाचतो व फाडून फेकून देतो. का तर भले मला त्यातील मजकूर महत्वाचा वाटला नसेल तरीही ज्याने तो लिहून तयार करण्याचे कष्ट घेतले त्याच्या कष्टांची दाद म्हणून आपण नजर फिरवतो
प्रत्येक कचर्याला काहितरी ( भंगारवाल्याच्या नजरेतून) मूल्य असतेच म्हणून सर्व कचरा साठवून ठेवायचा का?
तुम्ही आलात तर तुमच्या सोबत नाही आलात तर तुमच्या विना कार्य चालू ठेवायला हरकत नसावी. ठीक आहे मदत करू नका. निदान आघात करून काम करणाऱ्यांना नामोहरम करू नका.
हे म्हणजे शेजारच्या घरात चोरीला आलेल्या चोराला जाब विचारल्या नन्तर त्याने दिलेले उत्तर आहे.
नाडी पट्टीचा भोंदु पणा आणि अंधश्रद्धा पसरविण्याचे काम बिनधास्त चालु द्यावे. असेच ना?
अवांतरः एखाद्या नाडी जोतिष्याने तुमची नाडी पट्टी सापडली नाही म्हणुन गिर्हाईक परत पाठवल्याचा कोणाचाच अनुभव न॑सतो का?
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
23 Sep 2008 - 10:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
विरोधांच्या समाधानासाठी भले एक वेळ आपण असे मानू की या ताडपट्टयांमधून भविष्य वगैरे काहीही लिहिलेले नसते. त्यावर जो काही मजकूर लिहिलेला असतो त्याचा भविष्यकथनाशी संबंध नसतो. पण ज्या अर्थी त्या पट्ट्या तमिळ लोकांना वाचायला येतात त्या अर्थी त्यातील भाषा तमिळसदृष्य असावी. त्या त्यांच्या ताडपत्रावरील कष्टपुर्वक कोरीव कामाची निदान नोंद घ्याल.
अर्थात, इथे काही लोकांनी तोच मुद्दा मांडला आहे, त्या कोरीव कामाची नोंद झालीच पाहिजे आणि त्यावर संशोधन झालंच पाहिजे. भाषेच्या संशोधनात, या पट्ट्या पाच हजार वर्ष जुन्या असतील तर, खूपच मदत होईल. आणि जुन्या काळी लिखाण कसं केलं जात असे या संशोधनातही त्याचा उपयो होईल.
पण .... म्हणून या पट्ट्यांवर भविष्य लिहिलं आहे, ते सगळं खरं आहे हे का मान्य करावं याचं एकही समर्थन मला सापडलं नाही आहे.
घोड्याला पाण्यापर्यंत नेलं तरच घोडा पाणी पिणार ना? "तुला तहान लागली नाही, पाणी विष असतं", असं कानात सांगत राहिलं तर घोडा का जाईल पाण्याकडे? (पाण्यापेक्षा बिअर बरी, अल्कोहोलमधे जंतू टिकत नाहीत ना!) अजूनपर्यंत, पाण्यापर्यंत गेलेलेसुद्धा पाणी न पिता परत आल्याचंच मिपावर वाचनात आलंय!
23 Sep 2008 - 10:28 am | वेताळ
ह्याला शास्त्रीय काही आधार आहे काय? मी पाहिलेल्या नाडी पट्या मला दोन तीन वर्षे जुन्या वाटल्या.आणि हो महत्वाचे म्हणजे हिंदु सोडुन इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीचे नाडी पट्टी नसते. हे मला पटले नाही.
वेताळ
23 Sep 2008 - 12:38 pm | विसुनाना
'मिसळपाव' आणि 'तात्या अभ्यंकर' असे लिहून आलेले आपण प्रत्यक्ष पाहिल्याचे काही जाणकारांनी सांगितल्याचे काही कमी जाणकारांकडून कानावर आलेले आहे.
23 Sep 2008 - 2:04 pm | प्रकाश घाटपांडे
काही दिवसांनी तात्याचे नाव या यादीत जायचं. आन वेताळ बाबा भायेरच्या मान्सांच्या बी पट्ट्या सापडतात बर का? पघा त्या यादीत. आता यवडी मान्स काय येडि हायत का? आन मिपा शाहन !
प्रकाश घाटपांडे
23 Sep 2008 - 2:12 pm | वेताळ
त्यानी तुमची नाडीपट्टी नाही म्हणुन सांगितली.
वेताळ