या वर्षी जावु नाहीतर पुढल्या वर्षी नक्कीच जावु करत करत १५ वर्ष अशीच गेली. कुठल्याही पावसाळ्यात या ना त्या कारणाने पावसाळ्याची भटकंती लांबणीवर पडत होती. पण यंदा तो योग जुळुन आला आणि सहकुटुंब भिवपुरी येथील आषाणे कोषाणे धबधब्यावर जाणे झाले. आधी खरंतर पळसदरी मनात होते. पण लोकमतमध्ये पावसाळी भटकंती वर एका दिवसात करता येण्याजोगे ट्रेक विषयी एक सदर आले होते. त्यामध्ये या भिवपुरीच्या धबधब्याची माहिती आली होती. तिथे रॅपलिंग सुध्दा करता येते असे लेखात म्हंटले होते. म्हणुन तिथेच जायचे नक्की केले. मग काय कालच्या रविवारी बॅग भरुन तडक ठाणे स्टेशन गाठले.
स. ९.०० ची कर्जत लोकल मुंबईहुन येतानाच खचाखच भरुन आली होती जी काही २/४ माणसे उतरली त्यांच्या जागेवर पण दरवाजातच आम्हाला कसंबसं उभं राहाण्यापुरती जागा मिळाली. सर्वजण कुठे ना कुठे तरी भटकंतीलाच जात होते. डब्यात तर नुसता हलकल्लोळ माजला होता. गणपती बाप्पा..., शिवाजी महाराज... शिट्या ,आरोळ्या वगैरेंनी गाडी दणानुन सोडली होती. १०.३० ला भिवपुरीला पोहचली तर फलाटावर पाय ठेवायलाही जागा नाही इतकी गर्दी होती. सर्वजण २ क्रमांकाच्या फलाटावरुन उतरुन कर्जतच्या दिशेने चालु लागताच आपणही आपसुक त्या गर्दीबरोबर उत्साहाने चालु लागतो. साधारणपणे २ मिनिटात तुम्ही कर्जत मुरबाड रस्त्याला लागता. या रस्त्यावर डावीकडे वळुन पुन्हा कर्जतच्या दिशेने जात राहिलात की १ कि.मी अंतरावर उजवीकडे गोरीवली की कायसं गाव लागते. त्या ठिकाणी मग डोंगराकडे जाण्यासाठी रस्ता आहे.
मग आपण सर्वजण दुतर्फा घरे , शेती यातुन वाट काढत डोंगर चढु लागतो. साधारण पणे १५ मि. पहिला गुढघ्याएवढ्या पाण्याचा ओढा लागतो की गाव संपुन माळरान चालु झाल्याची खुण पटते.
गावातुन जाताना तुम्हाला गावाकर्यांच्या दारासमोर घरगुती जेवणाचे फलक लागलेले दिसतील. तिथे धबधब्यावर जाण्याआधी तुम्ही त्यांच्याकडे आगावु जेवणाची सोय करु शकता. तेव्हा खायची , प्यायची काळजी न करता बिनधास्त या सहलीचा आनंद लुटा.
या रस्त्याला डोंगराकडे जाण्यासाठी भरपुर वाटा आहेत. इतर वेळेचं माहित नाही पण कालच्या रविवारी इथे किमान २० हजाराच्या आसपास जनसागर होता. तुम्हाला जास्त चढण चढावी लागत नाही. पहिल्या ५ मिनिटाच्या आत धबधब्याचे दर्शन होते. तीन टप्प्यामध्ये पाणी खाली कोसळत येते. आता हे खालचे फोटोच सांगतील की काय अफाट गर्दी होती.
गाव चालु झाले आणि झुलणारी शेते दिसु लागली.
काही ठिकाणी नुकतीच नांगरणी झाली होती.
पाऊले चालती धबधब्याची वाट, डोंगरावरुन दिसणारे भिवपुरी स्टेशन परिसर.
हे बघा धबधब्याचे पहिले दर्शन
हा काय आलोच की आपण धबधब्याजवळ.
काही ठिकाणी भाताच्या खाचरात पाणी साठले मग काय तिथेच फुटबॉल खेळणे, डुंबणे चालु होते.
ही बघा रंगीबेरंगी जत्रा , अवखळ धबधब्याला भेटली तेव्हढीच अवखळ तरुणाई !
मध्येच पावसाने थोडी उसंत घेतली.
ते वरचे तिघे दिसताहेत तो पहिला टप्पा.
और ये मोती बिखर गये.
प्रतिक्रिया
12 Jul 2016 - 3:47 pm | वेल्लाभट
वा. मस्त सहल !
12 Jul 2016 - 3:59 pm | मुक्त विहारि
ट्रिप मस्त एंजॉय केलेली दिसत आहे.
आमचे कंजूस म्हणतात तेच खरं....
शनिवार-रविवार अशा ठिकाणी जावू नये.
12 Jul 2016 - 4:11 pm | अजया
मधल्या दिवशी जायचे धबधबे हे! पुढे माथेरानच्या डोंगरात पण मस्त धबधबे आहेत.कर्जतच्या दिशेने चौककडे येताना भिलवल्याचा धबधबा आणि धरण आहे.तिथे ज रा कमी गर्दी असते!
12 Jul 2016 - 5:50 pm | कंजूस
माथेरानला वर जाताना जुमापट्टी स्टेशन/गावाच्या डावीकडे एक डोंगरात लपलेला धबधबा आहे तो कोणाला दिसत नाही रस्त्यावरून.तिथे कोणी नसतं रविवारीसुद्धा.
12 Jul 2016 - 6:50 pm | अजया
:)तोच तो!पण तो माहित असायला लागतो ;)
अजून एक आहे.जरा अलिकडे. पुलाजवळ.त्याच्या तर आत गुहेसारखं आहे.समोरून पाणी येतं.
13 Jul 2016 - 10:56 am | रघुनाथ.केरकर
तो आता इतिहास झालाय. आता तेथे ७ ही दीवस गर्दी असते. RKT आणी CHM चीच जास्त गर्दी असते, पण बरेच लहान मोठे धब्धबे अस्ल्याने गर्दी विखुरली जाते.
पण आषाणे पेक्षा कमिच गर्दी असते.
वन्डे रीटर्न साठी मस्स्त ठीकाण आहे.
12 Jul 2016 - 4:15 pm | पद्मावति
मस्तं!
12 Jul 2016 - 4:22 pm | प्रचेतस
लै भारी.
केव्हढी ही गर्दी पण.
12 Jul 2016 - 4:22 pm | प्रचेतस
लै भारी.
केव्हढी ही गर्दी पण.
12 Jul 2016 - 4:26 pm | किसन शिंदे
बाब्बौ !! केवढी ही गर्दी
शनवार रयवार जायलाच नको.
12 Jul 2016 - 4:28 pm | आदूबाळ
माझ्या आजोळचं गाव जवळच आहे. :)
12 Jul 2016 - 4:37 pm | स्वच्छंदी_मनोज
मस्तच पण...
केवढी ही गर्दी.. २० हजारच्या आसपास??? पावसाळ्यात मुंबईजवळची ठीकाणे जाण्यासारखी राहीली नाहीत हेच खरे.
12 Jul 2016 - 5:44 pm | कंजूस
छान आहे धबधबा.गर्दी मात्र टाळायला हवी.
12 Jul 2016 - 5:49 pm | स्पा
नक्की टाळले जाईल हे ठिकाण :)
12 Jul 2016 - 5:51 pm | रघुनाथ.केरकर
ह्या धबधब्याला खुप गर्दि असते, मद्यपि टोळकी पण बर्याच प्रमाणात असतात, ह्याच धबधब्याच्या मागच्या बाजुस एक लहान धबधबा आहे, तीथे मात्र कुणि सहसा फिरकत नाही.
मुख्य धबधब्याकडे जाताना वाटेत एक ओढा लागतो, तोच पकडुन वर चालत रहायच.
12 Jul 2016 - 6:56 pm | माम्लेदारचा पन्खा
तो हम कैसे यकिन कर ले की तुम वहाँ गये थे ?
12 Jul 2016 - 7:46 pm | खटपट्या
अशा गर्दीच्या ठीकाणी काय मजा येणार. बेवडेच जास्त असतील...आणि जाताना घाण करुन जाणार
13 Jul 2016 - 10:09 am | नाखु
अस्म म्हणू नये, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते असा धागा येऊ शकतो.
गर्दीला टाळणारा दर्दी नाखु
13 Jul 2016 - 10:20 am | प्रमोद देर्देकर
अहो तुम्हाला ही गर्दी जास्त वाटत्येय पण त्याच दिवशी लोणावळ्याच्या भुशी डॅमवर बघा काय कहर आहे. गर्दीचा अक्षरश: चेंगराचेंगरी इतपत गर्दी होती. हा खालचा व्हिडीयो पहा.
13 Jul 2016 - 10:26 am | मदनबाण
मस्त सहल !
भुशी डॅम ला कधी काळी मित्रां सोबत गेलो होतो... वाहत्या पाण्यात लोळत तिथेच मस्त मिळणारी कणसे खात धमाल केली होती ! वरचा इडियो पाहिला... च्यामारी सगळीच दंगल दिसतेय.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-ये जवानी हद कर दे, बूढ़े जवां को मस्त कर दे, कोई न जाने कल क्या हो, आने वाला पल क्या हो, ले मज़ा ले ज़िंदगी का ज़िंदगी का ज़िंदगी का... ;) :- Sarfarosh
13 Jul 2016 - 10:51 am | पक्षी
बाबौ, केवढी ती गर्दी.
पिकनिकला गेला होता की पोलीस भरतीला :-)
13 Jul 2016 - 12:43 pm | पियुशा
भारी फोतोज :)