@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
10 Jul 2016 - 1:21 am
गाभा: 

प्रिय संपादक,

मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे.

इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला?

मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक.

कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन.

पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.)

आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला.

प्रामाणिकपणे सांगायचे तर,

इथे खूप काही मिळाले.

व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे.

काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.)

पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच,

डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे.

माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही.

पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच.

मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती.

मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे.

आपलाच,

मुवि

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

13 Jul 2016 - 6:05 pm | पिलीयन रायडर

ओ काका,

मला डु आयडी ची कातडी पांघरुन असभ्य व्यनि येत असतील तर मी अशाच शिव्या घालणार. आणि डु आयडीच नाही तर अगदी खरं नाव लिहुनही कुणी असभ्य धागा / प्रतिसाद / व्यनि / खरड करत असेल तरीही मी हेच करणार. "जाहिर पब्लिक फोरम वर" करणार.

इथे नीट चर्चा करण्याचा प्रयत्न करत असताना केवळ एखाद्याच्या सडक्या मेंदुला मी स्त्री आहे हेच समजत असेल आणि मी बोल्ड लिहु - बोलु शकते म्हणुन मी व्यनि मध्ये "तसल्या" चर्चेला अव्हलेबल आहे असं वाटत असेल तर मी लाथच घालणार आणि वर इथे येऊन शिव्याच घालणार. तरी कुत्तरड्या ही अत्यंत साधी शिवी आहे.. मुळात शिवीच आहे का? कारण बोकाभाऊ म्हणतात तसं हा कुत्र्याचा अपमान आहे. कुत्रे खुपच चांगले आणि इमानी असतात.

मी जे लिहीलय ते मुविंनी त्यांना होत असलेल्या डुआयडींच्या त्रासाला उद्देशुन लिहीलय की डू आय्डींचे त्रास आम्हालाही होतात. आम्ही ह्या हरामखोरांना लाथा घालतो. आता ज्याला ही पदवी अंगावर घ्यायची असेल त्याने घ्यावी.

साला वैताग आलाय फालतुपणांचा..

आता मी जेव्हा दिल्लीला कामाला होतो तेव्हा भुसावळ ते भोपाळ दरम्यान ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते.

पूर्ण वाक्य न पाहता केवळ मर्यादित शब्द वापरून शब्दच्छल करण्याचा हा अजब प्रकार आहे. इरसाल साहेबानी स्पष्टपणे अनुभवातील उपमा दिली आहे.
त्यावर भंपकपणे हे प्रतिसाद आणि त्याला अनुमोदन.
उद्या कोणी चुकीचा वागताना उघड पडला आणि दुसर्याने "गाढवही गेले आणि ब्रम्हचर्यही गेले' अशी म्हण वापरली. तर त्याला गाढव म्हणाले म्हणून टीका करणार का?
मराठीत असे अनेक शब्द आहेत उदा. "गलथान" हा शब्द एखाद्या माणसाने एखाद्या लिंग विरहित आयडीला वापरला आणि असा आयडी एखाद्या स्त्रीचा असेल तर आपण त्याच्या नावाने शिमगा करणार का?
पूर्ण वाक्य नीट वाचले तर इरसाल साहेबानी कोणतीही चूक केली नाही असे माझे स्पष्ट मत आहे आणि मी ते बदलणार नाही.
सगळा भंपकपणा आहे.

चेतन सुभाष गुगळे's picture

12 Jul 2016 - 4:36 pm | चेतन सुभाष गुगळे

फायदा आणि तोटा

http://www.maayboli.com/node/51977

http://www.aisiakshare.com/node/612

गड्या आपुला ब्लॉग बरा - सर्व मराठी संकेतस्थळ जवळपास सारखेच.

नाखु's picture

12 Jul 2016 - 4:55 pm | नाखु

विद्वत्तापुर्ण ,अभ्यासू ,व्यासंगी असले तरी एका संस्थळाविषयी तिथे न लिहिता दुसरीकडे का टंकावे वाटले?

मिसळपाव (व काही प्रमाणात ऐसी अक्षरे वर देखील) या मराठी संस्थळावर सरळ सरळ जुगार चालतो म्हणजे तुम्हाला प्रशंसा हवी असेल तर लेख प्रदर्शित करा पण टीकेलाही सामोरे जायची तयारी ठेवा. अर्थातच टीका अनेकवेळा अवांतर, व्यक्तिगत स्वरूपाची व अतिशय हीन शब्दांत केली जाणारी असते. अशी शेरेबाजी सहन न करू शकणारे मराठी संकेतस्थळावर वावरू शकत नाहीत मग ते स्त्री असो वा पुरूष. माझ्या माहितीत अनेक पुरूषांनीही मिसळपाव याच कारणाने सोडलंय. खरे तर तिथे अपेक्षा क्रमांक ४ ची ज्या प्रचंड प्रमाणात पूर्तता होते तेवढी इतर कुठल्या संस्थळावर क्वचितच होत असेल, पण त्या बदल्यात जो प्रचंड मनस्तापही सहन करावा लागण्याची तयारी असावी लागते ते पाहता हा जुगार न खेळणंच उत्तम असं अनेकांना वाटतं. शिवाय पुढे पुढे त्या अपेक्षा क्रमांक ४ मधून ही फारसा आनंद मिळत नाहीच.

कारण, माझ्या लेखाला दुसर्‍या संकेतस्थळावर जेमतेम दोन आकडी प्रतिसाद मिळतात तर मिसळपाववर सहज शतक गाठलं जातं पण नीट नजर टाकली तर असं दिसून येतं की सुंदर मुलगी कशी पटवावी? असे शीर्षक असणार्‍या दहा ओळींच्या धाग्याला देखील ११२ प्रतिसाद मिळतात तर माझ्या हजार शब्दांच्या लेखाला मिळालेल्या १०५ प्रतिसादांचं काय ते कौतूक? शिवाय काही व्यक्ति कंपूबाजी करून तुम्हाला त्रास देतात. संस्थळाचा टीआरपी कायम राखण्याच्या नादात संपादक ही अशा सदस्यांना पाठीशी घालतात. पक्षपाती वागणूक देतात. अशा वेळी जर अनेक पुरूष देखील संस्थळ सोडत असतील अथवा आपला वावर मर्यादित ठेवत असतील तर स्त्रियांचा सहभाग देखील आपोआप कमीच असणार.

आता मनोगत, उपक्रमवर संपादन टाईट आहे तर मिसळपाववर एकदम लूज. त्यामुळे मिसळपाववर काहीही लिहा किमान दोन आकडी प्रतिसाद येणारच व अनेकदा फालतू एकोळी धाग्यांनीही अवांतर प्रतिसादांसह शतक गाठलेले दिसून येते. त्यामुळे त्या संस्थळाची सदस्यसंख्याही वाढत चाललेली दिसते. परंतु ही सूज आहे. अनेक आयडी हे मृत, सुप्त, निष्क्रिय व बरेचसे बोगस देखील आहेत. ऐसीअक्षरेवरही अनेकदा ढिले संपादन, श्रेणी देण्याच्या प्रकारात पक्षपात असे प्रकार दिसून येत आहेत. अर्थात हे नवीन संस्थळ असून आपली वाटचाल मनोगत, उपक्रम प्रमाणे करायची की मिसळपाव प्रमाणे हे इथल्या चालकांना ठरवावे लागणार आहे.

अता अशी शेरेबाजी दुस्र्या संस्थळावर करणे हे तुमच्या साधनसुचीतेमध्ये बसत असेल तर मग नक्की खरे चेसुगु कुठले?

  • जे सगळ्यांनी खर्या नावानी जालावर वावरावे असे वाटणारे
  • ज्यांना मिपाव्र फक्त कंपुबाजी चालते असे ठाम मत असलेले आणि वारंवार तसा प्रतिसाद देणारे
  • ज्यांना आपण इतर व्यक्ती संस्थळांबद्दल इथे चर्चा (ते बाजू मांडू शकत नसतील तर ) आरोप करू नये म्हणून "आचार्य जालसंहीता स्व नियंत्रण आचरणप्रिय बाबा बर्वे"
  • की आप्ल्या ब्लॉगची जाहीरात करायला नेमका हाच धागा निवडणारे? (म्हणजे आपणही नियमीत मिसळपाव वाचता तर)

उत्तरे आप्ल्या सोयीने द्या घाई नाही...

मिपाचा नियमीत वाचक आणि एक किरकोळ (आंतर्जालाच्या खिजगणतीतही नसलेला) मिपा वारकरी नाखु

चेतन सुभाष गुगळे's picture

12 Jul 2016 - 5:24 pm | चेतन सुभाष गुगळे

तुम्चे लिखाण विद्वत्तापुर्ण ,अभ्यासू ,व्यासंगी असले तरी एका संस्थळाविषयी तिथे न लिहिता दुसरीकडे का टंकावे वाटले?

  • सदर लेखन हे (लांबीला अधिक असल्याने प्रतिसादात न लिहिता) जरी स्वतंत्र धागा काढून प्रकाशित करण्यात आलेले असले तरीही ते ठरवून केलेले स्वतंत्र लिखाण नव्हते तर http://www.aisiakshare.com/node/606 या ३_१४ अदिती यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया स्वरूप सदर ले़खन होते.
  • सदर लेखन हे (शनिवार, 10/03/2012 - 15:01) रोजी प्रकाशित करण्यात आलेले होते. त्या कालावधीत माझे / माझ्याविषयीचे या संकेतस्थळचालकांना न पटणारे लिखाण ते अप्रकाशित / वाचनमात्र करीत असत हा इतिहास इथले जुने सदस्य जाणून आहेत. (संदर्भ :- http://www.misalpav.com/node/20138 आणि https://drive.google.com/file/d/0B9-2hmnBdOPQNzk1YTM5ZmItNGRkMi00MTkyLTk...) तेव्हा हे लेखन या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे काहीच प्रयोजन नव्हते.
  • मी मिसळपाववर व्यक्त होणे सोडून दिल्यावरही कित्येक काळ इथले सदस्य चर्चांमध्ये माझा उल्लेख करीत मग मी या संकेतस्थळाचा दुसरीकडे उल्लेख करणे अयोग्य ठरते का?

की आप्ल्या ब्लॉगची जाहीरात करायला नेमका हाच धागा निवडणारे?

मी माझ्या ब्लॉगची इथे जाहिरात केलेली कुठे दिसली? मुख्य म्हणजे ज्या लेखाची लिंक दिलीय ती माझ्या ब्लॉगची नसून इतर संकेतस्थळांची आहे जिथे मी आता लिहित नाही. "गड्या आपुला ब्लॉग बरा" या विधानाचा अर्थ स्वतःच्या ब्लॉगवर लिहिलेले बरे असा आहे. आपुला म्हणजे वैयक्तिक माझा नव्हे तर ज्याचा त्याचा...

(म्हणजे आपणही नियमीत मिसळपाव वाचता तर)

वाचू नये का?

सुबोध खरे's picture

12 Jul 2016 - 7:09 pm | सुबोध खरे

चे सु गु साहेब
तुम्ही लिहा हो जिथे पाहिजे तिथे.
लोकांसाठी पौड फाटा आळेफाटा अशा अनेक जागा आहेत.
काय म्हणता.

धनंजय माने's picture

12 Jul 2016 - 7:14 pm | धनंजय माने

ओ सर, केला का बल्ल्या?
चेतन सुभाष गूगळे असं पूर्ण म्हणायचंय. Its compulsary.

गणामास्तर's picture

13 Jul 2016 - 9:34 am | गणामास्तर

गूगळे नाही गुगळे. लिहा आता १०० वेळा.

गवि's picture

13 Jul 2016 - 10:41 am | गवि

सुखंशी सहमत.

चेतनजी, पूर्वीचं बाजूला ठेवून तुम्ही पुन्हा इथे लिहायला सुरुवात करावीत अशी इच्छा व्यक्त करतो. वाद वाढवत नेणं/ न नेणं आपल्या हातात असतं. शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jul 2016 - 11:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता मिपावर लिहायला सुरुवात करा. "कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहेना" लोक काय म्हणतात या कडे दुर्लक्ष करून मिपा इंजॉय करता आलं पाहिजे.

-दिलीप बिरुटे

धनंजय माने's picture

13 Jul 2016 - 11:57 am | धनंजय माने

माई मोड ऑन
दिलीपशी सहमत.
माई मोड ऑफ

शलभ's picture

13 Jul 2016 - 3:53 pm | शलभ

+१
गुगळेंचा आदित्य कादंबरी वरचा लेख आवडला होता.

टवाळ कार्टा's picture

13 Jul 2016 - 3:29 pm | टवाळ कार्टा

गवि - Wed, 13/07/2016 - 10:41
सुखंशी सहमत.

चेतनजी, पूर्वीचं बाजूला ठेवून तुम्ही पुन्हा इथे लिहायला सुरुवात करावीत अशी इच्छा व्यक्त करतो. वाद वाढवत नेणं/ न नेणं आपल्या हातात असतं. शुभेच्छा.

हिच विनंती तुम्हालापण :)

बोका-ए-आझम's picture

13 Jul 2016 - 5:50 pm | बोका-ए-आझम

असेच म्हणतो. शेवटचा लेख सेशायल्सवर होता. दुसरं महायुद्ध नुकतंच संपल्यावर टाकला होता. लई दिवस झाले त्याला आता!

पिलीयन रायडर's picture

13 Jul 2016 - 6:19 pm | पिलीयन रायडर

=))

सहमत!

सतिश गावडे's picture

12 Jul 2016 - 4:56 pm | सतिश गावडे

ब्लॉगवरील लेखन स्वांतसुखाय असतं. हल्ली मराठी संस्थलांमुळे ब्लॉग वाचन कमी झालंय लोकांचं.

अर्थात विवादास्पद लेखन असणारे ब्लॉग नेहमीच चर्चेत असतात.

चेतनजी
तुमचा लेख वाचला सर्वच मुद्दे जरी मान्य नसले तरी
तुमच्या विषयाचे ज्या तार्कीकतेने सखोलतेने गंभीरतेने तुम्ही विश्लेषण केलेले आहे.
ते फार आवडले. एखाद्या विषयाचा मुलगामी वेध घेणारी ही शैली आवडली.
तुमच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली व तुम्ही इतर काय लेखन केलेलं आहे ते एकदा वाचुन बघावे असे वाटले.
तुम्ही गवि म्हणतात त्याप्रमाणेच म्हणतो पुन्हा लिहायला सुरुवात केली तर बर वाटेल.
धन्यवाद

चेतन सुभाष गुगळे's picture

13 Jul 2016 - 7:14 pm | चेतन सुभाष गुगळे

मारवा, गवि, सुबोध खरे आणि इतरही प्रतिसादकांचे आभार.

खरे तर मुक्त विहारी यांनी शीर्षकातच एक प्रश्न विचारला आहे.

संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?

हा प्रश्न संपादकांना उद्देशून असला तरी आणि संपादकेतर अनेक सदस्यांनी त्यांना इथे या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्याचप्रमाणे मीदेखील त्यांना उत्तर दिले आहे.

इथून तिथून सर्वच मराठी संकेतस्थळे जवळपास सारखीच तेव्हा स्वतःचा ब्लॉग हाच उत्तम पर्याय.

माझ्या या एक ओळीच्या उत्तराच्या पुष्टीकरिता मी त्यांना माझ्या इतरत्र प्रसिद्ध झालेल्या एका लेखाची लिंक दिली आहे. मी स्वतः काही सदस्यांना कंटाळून काही काळापूर्वी संपादकांना उद्देशून असेच पत्रस्वरुप लेखन केले होते तर तत्कालीन संपादकांनी ते लेखनच इथून अप्रकाशित केल्याने मी मिसळपाववर लेखन करणे सोडून दिले. माझ्या या अनुभवावरूनच मी मुक्त विहारि यांना सल्ला दिला आहे.

तुम्ही गवि म्हणतात त्याप्रमाणेच म्हणतो पुन्हा लिहायला सुरुवात केली तर बर वाटेल.

आपल्या या सल्ल्याबद्द्ल पुनश्च आभार, पण तरीही आता हे जमेल असे वाटत नाही.

पक पक पक's picture

12 Jul 2016 - 7:29 pm | पक पक पक

मुक्त विहार करा

अभिदेश's picture

13 Jul 2016 - 1:22 am | अभिदेश

हे तुमचे खरे नाव नाहीच ना ,मग तुम्ही इतरांच्या आयडी बद्दल का तक्रार करताय ? ज्या प्रमाणे टी.वि. वर काय बघावे हे तुम्ही ठरवता तसाच काय वाचायचं हे तुम्ही ठरवू शकता ना. का हा लेख तुम्ही मी किती प्रसिद्ध आहे ते बघण्यासाठी टाकलाय ? :-) निवडणुकीला उभं राहण्याचा विचार नाही ना ?

साहेब..'s picture

13 Jul 2016 - 8:26 am | साहेब..

+1

सतिश गावडे's picture

13 Jul 2016 - 8:49 am | सतिश गावडे

तुम्हाला मुद्दा कळलेला नाही.

बाकी काही असो...मुवींनी मला भेटायची इच्छा व्यक्त केली हे ही नसे थोडके..

आता बास झाले.या धाग्याच्या निमित्ताने बर्याच लोकांच्या खपल्या निघाल्या, स्कोअर सेटल झाले,स्वभाव दिसून आले.
आता यातून फक्त शब्दच्छलच होणार असेल तर असा धागा वा मा व्हायला हवा.

धनंजय माने's picture

13 Jul 2016 - 7:38 pm | धनंजय माने

अनुमोदन!
सगळे जण दुदु आहेत.