अंड्याचा पुलाव

जागु's picture
जागु in पाककृती
8 Jul 2016 - 2:34 pm

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते.

बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे.

साहित्यः
६ किंवा आवश्यकतेनुसार अंडी (उकडून, साले काढून आणि काट्याने मध्ये मध्ये अलगद टोचे मारुन)
दोन वाट्या तांदुळ
दोन कांदे चिरुन
अर्धा वाटी दही
२ चमचे आल-लसुण पेस्ट
१ मोठा चमचा मसाला किंवा १ लहान चमचा तिखट
फोडणीसाठी तेल
चविनुसार मिठ

कोरडा मसाला:
१ चमचा जिर
१ चमचा धणे
दालचिनी १ ते २ तुकडे
३ वेलच्या
४-५ लवंग

पाककृती :
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते.

बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे.

कोरड्या मसाल्याचे सामान तव्यावर थोडे भाजून मिक्सर मध्ये पुड करा. कुकर किंवा भांडे गॅसवर चांगले तापवून तेलावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर त्यावर आल-लसुण पेस्ट व कोरडा मसाला टाकुन परतवा. (आहाहा मस्त घमघमाट सुटलेला ह्या मिश्रणाचा)

त्यावर दही व मसाला घालून परतवा. (कलर कॉम्बीनेशन छान दिसत आहे ना?)

आता मिश्रण ढवळून त्यात अंडी घालून हलकेच परतवा.

आता तांदुळ आणि मिठ घालून मन शांत ठेऊन, कोणाचाही राग ह्या मिश्रणावर न काढता हलक्या हाताने सगळे परतवा. हा उपदेश अंड्याची चिरफाड होऊ नये म्हणून .

आता तांदुळाच्या दुप्पट किंवा तुम्ही नेहमीच्या अंदाजाने पाणी घाला. (हा माझा नविन मसाला आहे. कसा रंग आहे?)

जर कुकर लावत असाल तर थोडे कमी घाला. पुन्हा थोडे ढवळून कुकर लावा किंवा टोपात शिजू द्या. कुकरच्या तिन शिट्यात पुलाव तयार होतो. पातेल्यात करत असताना मधूनच एक-दोनदा अलगद परतत रहा.

झाला आहे तयार अंड्याचा पुलाव.

थोडा अजुन जवळून

प्राजक्ता म्हात्रे
कृपया रेसिपी शेयर करताना नावासकट शेयर करावी.

अधिक टिपा:
घाबरू नका अंडी तुटली तरी आपल्याला खायचीच आहेत फक्त डेकोरेशन करता येणार नाही इतकच. त्यामुळे बिनधास्त.

हाच पुलाव मसाल्या ऐवजी आल-लसुण पेस्ट मध्ये मिरची घालूनही करता येतो.

रेसिपीखाली नाव मुद्दम टाकल आहे. कारण फेसबुकवर बहुतेक माशांच्या रेसिपीज नाव न टाकता चोरीला गेल्या आहेत. तसे हे नाव काढूनही चोरले जाऊ शकतात पण एक मानसीक समाधान स्वतःचेच. :हाहा:

प्रतिक्रिया

मोदक's picture

8 Jul 2016 - 2:42 pm | मोदक

भारी..!!!!

गणामास्तर's picture

8 Jul 2016 - 2:45 pm | गणामास्तर

तळलेली अंडी घातली तर अजून बहार येईल.

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 2:48 pm | धनंजय माने

वा वा!
अब खाना ही पड़ेगा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

8 Jul 2016 - 3:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

ते बैदा रोटी वाले भाऊ अन इकडे जागु ताई काय सुट्टी देईनात जिभेला लाळ गाळण्यात ओव्हरटाईम करायला लागतोय तो वेगळाच त्रास

अनिरुद्ध प्रभू's picture

8 Jul 2016 - 3:10 pm | अनिरुद्ध प्रभू

मनातलं बोललात बघा.....

जागु's picture

8 Jul 2016 - 3:30 pm | जागु

मोदक, गणामास्तर, धनंजय मोने, सोन्याबापू, अनिरुद्ध धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल.

धनंजय माने's picture

8 Jul 2016 - 4:08 pm | धनंजय माने

माने. धनंजय माने. ;)

जागु's picture

8 Jul 2016 - 4:34 pm | जागु

सॉरी. माने.

संजय पाटिल's picture

9 Jul 2016 - 10:37 am | संजय पाटिल

माने काय, मोने काय अन प्यारे काय.. कि फर्क पैण्दा??

संजय पाटिल's picture

9 Jul 2016 - 10:38 am | संजय पाटिल

अर्र पुलाव भारी आहे हे राह्यलच!!

धनंजय माने's picture

9 Jul 2016 - 11:20 am | धनंजय माने

ब्रोब्र आहे.
अंडा बिर्याणी खाल्ल्यावर विश्वास सरपोतदार म्हटलं तरी काय फरक पडतो म्हणा. आय माय स्वारी पातेलं. ;)

ते बॉण्ड, जेम्स बॉण्ड च्या चालीत बसलं म्हणून बोललो. बाकी धनंजय माने आणि बॉण्ड चा लांब लांब पर्यन्त संबंध नाही याबाबत निश्शंक आहोत.

जागुतै, पाकृ वर अवांतर केल्याबद्दल क्षमस्व.

मोहनराव's picture

8 Jul 2016 - 3:31 pm | मोहनराव

तोंपासु

टवाळ कार्टा's picture

8 Jul 2016 - 3:35 pm | टवाळ कार्टा

लैच जब्रा...नुस्ता पुलाव येतो करता...हे पण ट्राय करुन बघेन

मारवा's picture

8 Jul 2016 - 3:41 pm | मारवा

अप्रतिम
तोंडाला पाणी सुटल राव.
तुमचे फॅमिली मेंबर भाग्यवान आहेत हो.

माफ करा
प्राजक्ताजी

विशाखा राऊत's picture

8 Jul 2016 - 3:46 pm | विशाखा राऊत

जागुतै मस्तच पुलाव.. झटपट प्रकार दिसतोय. करुन बघायला हवा.
मसाला रंग एक नंबर आहे. :)

कविता१९७८'s picture

8 Jul 2016 - 7:44 pm | कविता१९७८

वाह , आवडीचा पदार्थ

पिलीयन रायडर's picture

8 Jul 2016 - 8:11 pm | पिलीयन रायडर

काय रंग आहे!!! आहाहा!!

भात वेगळा शिजवुन मग मसाल्यात मिक्स केला तर अंडी सुद्धा जास्त शिजणार नाहीत ना?

इरसाल's picture

9 Jul 2016 - 2:04 pm | इरसाल

कालच करुन खाण्यात आलेला आहे मी तर टोचे मारायला विसरलो होतो म्हटला शिट्टी घेताना फुटतील तर खीर होईल पण तसे झाले नाही.
जागुतै भारी होता गं !

रातराणी's picture

8 Jul 2016 - 11:21 pm | रातराणी

मस्त दिसतोय!

अजया's picture

9 Jul 2016 - 11:04 am | अजया

जबराट!

बोका-ए-आझम's picture

9 Jul 2016 - 12:15 pm | बोका-ए-आझम

आजच करणार! धन्यवाद जागुताई!

शिद's picture

9 Jul 2016 - 3:10 pm | शिद

जबराट!!!

(हा माझा नविन मसाला आहे. कसा रंग आहे?)

रंग अगदी झणझणीत आला आहे. हा नविन मसाला तुम्ही मसाल्याची रेसिपी दिल्याप्रमाणेच बनवला आहे कि वेगळा?

अभ्या..'s picture

9 Jul 2016 - 3:55 pm | अभ्या..

जागुताई, रेसीपी आणि फोटो अप्रतिम.
.
अंडं असल्यामुळे माझा पास. ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

9 Jul 2016 - 7:36 pm | कैलासवासी सोन्याबापु

=)) =))

बोका-ए-आझम's picture

11 Jul 2016 - 11:18 pm | बोका-ए-आझम

अंडं असल्यामुळे माझा पास. ;)

आँ? शुद्ध शाकाहारी हाईस की काय?

धनंजय माने's picture

11 Jul 2016 - 11:48 pm | धनंजय माने

मग! तुम्हाला काय वाटलं?
देवमाणुस एकदम. अतिशय सात्त्विक, निरागस, सालस, राजबिंडं व्यक्तिमत्व.
बघा कुणी असलं तर.... ;)
(हानतंय अभ्या मला)

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Jul 2016 - 7:37 am | कैलासवासी सोन्याबापु

*फेसपाम*

अभ्या शाकाहारी असल्यास 'मेरुने मुंगी पर्वत गिळला काय' असे विचारावे लागेल!, बोकडे आनंदात उड्या मारू लागतील अन जागतिक कोंबडी लोकसंख्या एकदम 10 टक्के वाढेल!

@माने,

तुम्ही म्हणे कोंबड्या परत चापणे सुरु केलेत?

धनंजय माने's picture

12 Jul 2016 - 11:58 am | धनंजय माने

शंतनु च्या बायकोला सुधाला तर ना.... कोण कोण मित्र बनवलेत कुणास ठाऊक. तिकडे सांगत आली का?

अहो त्या दिवशी पार्वतीने थोडं झनझनित बनवलं आमच्या सोन्याबापुच्या पाकृ प्रमाणे. खाल्ला रस्सा आणि आवडला. मग लेगपीस घेतला मग दुसरा आणि असं करत कढाई चं काम च झालं. (नंतर दोन दिवस आड्या जोशाच्या पाचव्या खोलीच्या आसपास होतो ते वेगळं) तर असा सगळा प्रकार झाला.

विश्वास सरपोतदार बंगल्याभोवती सगळी सुवासिक फुलझाडं लावत बसलेत.

अभ्या..'s picture

12 Jul 2016 - 12:05 pm | अभ्या..

अधून मधून असल्या चाव्या माराव्या लागतेय. मिपाकर लै बारीक नजरेचे हे सिद्ध होतंय. आमच्याकडे तर आजकाल लै जणांचं बारीक लक्ष असतंय. कुठं बॉम्ब बिंब घेऊन फिरल्यागत. :(

अनन्न्या's picture

9 Jul 2016 - 4:07 pm | अनन्न्या

पण यात अंड्याऐवजी पनीर वापरता नाही येणार...मस्त लागत असणार.

स्ल्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प

स्मिता_१३'s picture

11 Jul 2016 - 11:33 am | स्मिता_१३

जागुतै पुलाव मस्तच. कालच बनवला. घरी सगळ्यांना आवडला. थॅंक्यु !!!

नीलमोहर's picture

11 Jul 2016 - 11:42 am | नीलमोहर

पुलाव बनवून पाहिला, थोडा पुदिनाही घातला होता, मस्त झाला.

धनंजय माने's picture

11 Jul 2016 - 11:58 am | धनंजय माने

पाहिला?

ब्वार्रर्र!

नीलमोहर's picture

11 Jul 2016 - 12:23 pm | नीलमोहर

पुलाव बनवून पाहिला, थोडा पुदिनाही घातला होता, मस्त झाला.
पुरवून पुरवून दुसऱ्या दिवशीही खाल्ला, तेव्हा जास्त छान लागला.
अंड्याशिवाय तर अजून जास्त छान लागला,
आणि काय बरं...

बोका-ए-आझम's picture

11 Jul 2016 - 11:17 pm | बोका-ए-आझम

पुलाव लय भारी! करुन पाहिला. चांगला झाला होता. अंडी टोचण्याचा प्रकार जमला नाही.

जागु's picture

13 Jul 2016 - 2:13 pm | जागु

सगळ्यांचे धन्यवाद.

जर अंडी वातड होत आहेत असे वाटत असेल तर उकडलेली अंडी मसाल्यावर थोडी फ्राय करून पुलाव झाल्यानंतर मिक्स केले तरी चालेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Jul 2016 - 2:20 pm | कैलासवासी सोन्याबापु

शिंगाळ्यांच्या अंड्यांचा पुलाव होऊ शकेल काय???

शिंगाळ्याची अंडी तुम्हाला माहीत आहेत म्हणजे फारच मत्सप्रेमी खवय्ये दिसता...मस्तच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Jul 2016 - 6:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

आम्हांस जागु ताई लेखन प्रसन्न आहे शिदजी :)

मुक्त विहारि's picture

14 Jul 2016 - 5:50 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. .