कोण होईल करोडपती --सूत्रसंचालक कोण ?

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in काथ्याकूट
1 Jul 2016 - 7:35 pm
गाभा: 

कलर्स मराठीवर सध्या 'कोण होईल करोडपती' ची जाहिरात दिसू लागलीये.
येत्या मौसमात सूत्रसंचालक कोण असेल ते जाहिरातीत दाखवत नाहीयेत. त्यांचा सूत्रसंचालक ठरला/ली आहे की नाही माहीत नाही.
पण मिपाकरांच्या मते कोण योग्य सूत्रसंचालक होवू शकतो हे जाणून घ्यायला आवडेल.
माझ्या मते मागच्या मौसमात 'सचिन खेडेकर'ला घेवून सूत्रसंचालन पूचाट झाले होते.

कोण योग्य सूत्रसंचालक असू शकेल याचा विचार करत असताना मला सूचली ती ही नावे... विक्रम गोखले, मोहन जोशी ही भारदस्त आवाजाची दिग्गज मंडळी , स्वप्नील जोशी सारखा स्टायलिश अभिनेता.
कदाचित एखादी गुणी अभिनेत्रीपण सूत्रसंचालन करु शकते , इरावती हर्षेचे मराठीतून दमदार पुनरागमन झाले तर आवडेलच :) ..पण त्यावर अजून फारसा विचार केला नाही.

पण मग एक नाव सूचले... आणि मग तेच सर्वात योग्य वाटले ते म्हणजे किशोर कदम उर्फ कवी सौमित्र. गारवा या मिलिंद इंगळेच्या अल्बममधील गाणी त्यांनीच लिहली होती आणि गद्द्याला आवाज दिला होता.

काय वाटते तुम्हाला...

प्रतिक्रिया

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

1 Jul 2016 - 7:44 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मला वाटते,
इथे मिपावर खामुंपाधुं नावाचे एक आयडी आहेत,अतिशय तेजस्वी आणि भारदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांचे!!!
त्यांना सूत्रसंचालक केले तर शो हिट* होईल.

'
'
हिट=गरम नव्हे.

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2016 - 7:47 pm | टवाळ कार्टा

म्हाग्रु

नक्को मिसळपाव तर्फे आपन टवाळ कार्ट्याला पाठऊन देऊ

नक्को मिसळपाव तर्फे आपन टवाळ कार्ट्याला पाठऊन देऊ

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2016 - 8:10 pm | टवाळ कार्टा

पैसे किती देणार त्यावर उत्तर काय द्यायचे ते ठरवेन

चौथा कोनाडा's picture

2 Jul 2016 - 9:33 pm | चौथा कोनाडा

______ :-))) _______ टका !

आपलं हे भारी,
आपलं ते भारी,
आपलं सगळंच भारी !
प्रोग्राम झाला फुस्स तर
वीट डोक्यात पडलं भारी !

अनिता ठाकूर's picture

1 Jul 2016 - 8:16 pm | अनिता ठाकूर

आदेश बांदेकर, नीलेश साबळे

भोळा भाबडा's picture

1 Jul 2016 - 8:30 pm | भोळा भाबडा

सयाजी शिंदे
नागेश भोसले

खलनायकांनी कुणाचं घोडं मारलं नाय,सारखं सारखं नायकच कशाला हवा?

माहितगार's picture

1 Jul 2016 - 8:40 pm | माहितगार

जागा रिकामी आहे आणि आपण जागा भरत आहात का? कारण सध्या मी काम शोधतो आहे :) ! (ह. घ्या.)

माहितगार काकांना कंप्युटरचा रोल द्या. ;)
सूत्रसंचालक कुनीबी ठेवा, मराठीत स्टार व्हॅल्यूवाला डॅशिंग हायेच कोण?

कुणीतरी माझा वशिला लावा.
मिपाकरांना दुसर्या फेरीत घेऊन जाईल.
लखपती व्हाल लेकोहो.
आहात कुठे..!

-
अतुल कुलकर्णी

सचु कुळकर्णी's picture

1 Jul 2016 - 9:05 pm | सचु कुळकर्णी

कोण कोण होईल करोडपती ?

आम्हाले कराचिहुन राँग नंबर वर कॉल येत नाहि.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Jul 2016 - 10:30 am | कैलासवासी सोन्याबापु

अरे हट सायचं बेक्कार होता हा आयटम एकदम गहरा न हो! निराच दांगडो =)) =))

नाखु's picture

2 Jul 2016 - 10:11 am | नाखु

फक्त मक्या आणि नाहीच मिळाला तर.....

सागर कारंडे

असंका's picture

2 Jul 2016 - 11:08 am | असंका

मकरंद अनाजपुरे...कहर...धिंगाणाच एकदम!!

+१...

मराठी कथालेखक's picture

2 Jul 2016 - 12:06 pm | मराठी कथालेखक

मक्याने पुर्वी कोणतातरी शो केला होता नेमकं आठवत नाही, पण तितकसा जमला नव्हता, तेच ते त्याचे पठडीतले विनोद , मध्येच विनाकरण भावूक वाक्य फेकणं वगैरे.

माहितगार's picture

2 Jul 2016 - 12:25 pm | माहितगार

तेच तर सगळा तोच 'तो' पणा ! म्हणूनच नवेपणासाठी, नवा कार्यक्रम काय असावा ते त्याचे सूत्रसंचालन मिपा करांकडे दिले म्हणजे झाले :) !

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

2 Jul 2016 - 12:24 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

सई ताम्हणकर

मराठी कथालेखक's picture

2 Jul 2016 - 12:29 pm | मराठी कथालेखक
नावातकायआहे's picture

2 Jul 2016 - 1:16 pm | नावातकायआहे

नाना ?

मराठी कथालेखक's picture

4 Jul 2016 - 1:29 pm | मराठी कथालेखक

हो.. नानाचाही पर्याय चांगला आहे.. चांगला trp मिळू शकेल.

_मनश्री_'s picture

2 Jul 2016 - 6:19 pm | _मनश्री_

प्रशांंत दामले,अंंकुश चौधरी

अबोली२१५'s picture

2 Jul 2016 - 6:37 pm | अबोली२१५

सुबोध भावे... किवा पुस्कर श्रोत्रि

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Jul 2016 - 8:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अशोक सराफ?

महाराष्ट्राचे महासूत्रसंचालक....

महागुरू!

किसन शिंदे's picture

3 Jul 2016 - 10:49 pm | किसन शिंदे

आदूबाळशी (बक्षिसाचे) एकशे एक (रूपये) वेळा सहमत =))