पाव भाजीची गोष्ट

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Jun 2016 - 11:46 am

गेल्या महिन्यातील गोष्ट चिंकी आणि तिची बहिण दिल्लीला येणार होती. गेल्या वेळी तिची दिल्लीची पाव भाजी खाण्याची इच्छा राहून गेली होती. तिचा फोन आला होता, काका या वेळी दिल्लीची पावभाजी टेस्ट करायची आहे. रविवारी सकाळच्या गाडीने चिंकी येणार होती. घरी पोहचता पोहचता तिला किमान ८ तरी वाजणार होते. घरा शेजारी शनी बाजार लागतो. सौ.ने हुकुम दिला पावभाजी साठी लागणार्या भाज्या घेऊन या. बाजारात भाजी घेताना, चिंकीला कसे मूर्ख बनवायचे हा विचार करू लागलो. मनातील खोडकर शैतान मुलगा जागा झाला. तिला न आवडणार्या भाज्या वापरून अश्यारितीने भाजी बनविली पाहिजे कि चिंकीला कळले हि नाही पाहिजे. वयाने मोठा झालो असलो तरी एखाद्या शैतान मुलासारखे दुसर्यांची विशेष करून बालगोपाळांची फिरकी घ्यायला अजूनही आनंद मिळतो. सौ.ला आमची कल्पना काही विशेष आवडली नाही. पण तिने विरोध हि केला नाही फक्त एवढेच म्हंटले, मी काही यात मदत करणार नाही. तुम्हाला वाटेल ते करा.

रविवारी सकाळी चहा पिऊन, जवळपास ६ वाजता भाज्या चिरायला घेतल्या. घरी बाजी चिरण्यासाठी लाकडाचा ट्रे आहे. चाकूने बारीक बारीक भाज्या चिरायचे ठरविले. सर्व प्रथम ३-४ बटाटे (२५०ग्राम) बारीक चिरले, नंतर लाल भोपळा आणि दुधी भोपळा (प्रत्येकी २५० ग्राम) वरचे जाड साल काढून बारीक चिरला. एक वांगे (वरचे साल काढून टाकले) बारीक चिरले. वांग्यामुळे भाजीला एक वेगळा तेज स्वाद येतो. एक फुलगोबी (फ्लावर- ३०० ग्रामचे असेल) बारीक चिरले. मटार २५०ग्राम (एक वाटी) घेतला. दोन ढोबळी मिरच्या बारीक चिरून टाकल्या. या शिवाय लोबियाच्या हिरव्या शेंगा (मराठीत काय म्हणतात माहित नाही- तश्या कुठल्याही शेंगा चालतील) बारीक चिरून टाकल्या. ५ लिटरचे कुकर भाज्यांनी भरून गेल्यावर भाज्या कापणे बंद केले. भाज्या चिरायला १ तास लागला.

भाजी

आता दीड गिलास पाणी टाकून कुकर गॅस वर ठेवले. एक पूर्ण लसूण,८-१० हिरव्या मिरच्या आणि १ इंच अदरक यांची पेस्ट तैयार करून घेतली. अर्धा किलो टमाटर (आंबट वाले नको) आणि अर्धा किलो कांदे बारीक चिरले. या पैकी काही फोडणी साठी आणि काही नंतर सर्व करण्यासाठी. एक जुडी कोथिंबीरआणि तीन लिम्बांचे चार-चार तुकडे करून ठेवले. दोन शिट्या झाल्यावर कुकर गॅस वरून उतरवून घेतले. तो पर्यंत चिंकीचे हि घरात पदार्पण झाले होते. काका कशी भाजी बनवितात आहे,हे पाहण्यासाठी स्वैपाकघरात आली. त्या वेळी मी पनीर (२५० ग्राम) बारीक चिरीत होतो. तिला पाहताच मी गुगली फेकली, म्हणालो चिंता करून नको तुझ्या आवडीच्याच भाज्या आहेत, यात फ्लावर, बटाटे, बिन्स आणि पनीर आहे. शिवाय माझ्या सारखा अडाणी तुझ्या सारख्या डॉक्टरीण बाईला मूर्ख बनवू शकतो का? काका तू किनई,.... म्हणत ती बाहेर पडली. तिने कुकर उघडून पाहण्याची जुर्रत केली नाही. हायसे वाटले. आता वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. घरात एक मोठी कढई आहे. ती गॅस वर ठेवली. २-३ डाव तेल टाकले. एक चमचा मोहरी टाकली. मोहरी तडतडलल्या वर अदरक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली. नंतर कांदे घातले. कांदे थोडे ब्राऊन झाल्यावर, टमाटर टाकले. टमाटरला तेल सुटे पर्यंत ४-५ मिनिटे लागतातच. तो पर्यंत वाट पहावीच लागते. घाई केल्यास टमाटर व्यवस्थित तळल्या जात नाही. अपेक्षित स्वाद हि मिळत नाही. कुकर उघडून, एका पळीने भाजी ढळवून काढली. टमाटरला तेल सुटू लागल्यावर, १ मोठा चमचा, हळद, तिखट आणि गरम मसाला आणि २ चमचे धने पूड त्यात घातली. नंतर भाजी घातली. आपल्याला भाजी जेवढी पातळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकू शकतात. मला थोडी घट्ट भाजी आवडते म्हणून जास्त पाणी घातले नाही. नंतर बारीक चिरलेले पनीर त्यात घातले. एक उकळी आल्यावर तीन चमचे MDH पावभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ त्यात घातले. २-३ मिनिटानंतर गॅस बंद केला. कुठलाही पदार्थ झाल्यावर चिरंजीवाला स्वाद पाहण्यासाठी बोलवतोच. त्याची पावती मिळाली म्हणजे पदार्थ चांगला झाला आहे, हे समजावे. त्यांनी टेस्ट करून पावती दिली. मी स्वैपाक घरातून बाहेर आलो. घामाघूम झाल्यामुळे सरळ स्नान घरात जाऊन आंघोळ केली. तो पर्यंत सौ. ने स्वैपाकघराचा ताबा घेतला होता. घरात काढलेल्या लोण्यात पाव परतून पावभाजी सर्व केली.

पावभाजी

चिंकीला पाव भाजी भारी आवडली. तरी हि तिने म्हंटले, मला माहित आहे काका, तुम्ही निश्चित मला न आवडणार्या भाज्या यात घातल्या असतील. आम्ही सर्व जोरात हसलो...

पाकक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

विवेकपटाईत's picture

19 Jun 2016 - 11:48 am | विवेकपटाईत

घाई घाईत कापी पेस्ट करताना गडबड झाली.

आदूबाळ's picture

19 Jun 2016 - 12:15 pm | आदूबाळ

छान लेख! पटाईतकाकांचे स्वयंपाकाचे प्रयोग वाचायला नेहेमीच आवडतात. ते साहित्य, कृती वगैरेचं कोरडं लेजरबुक ना मांडता तपशीलवार रसाळ वर्णन करतात.

एस's picture

19 Jun 2016 - 12:48 pm | एस

मस्त पावभाजी.

पावभाजी म्हणजे कांदे बटाटे टमाट्याचं गरम मसाल्यातलं भरपूर बटर टाकलेलं फदफदं असतंत्यात ता।तुम्ही टाकलेले भोपळा वांगी कळली आणि नातीने बोट लावलं नाहीतर पाच लिटर्सचे काय पराठे करावे लागतील.

विवेकपटाईत's picture

19 Jun 2016 - 4:08 pm | विवेकपटाईत

पाव भाजीचा खरा स्वाद वांगे, भोपळ्यात असतो बटाट्यात नाही. बाकी शिजल्या नंतर ५ लिटर भाजी राहत नाही. शिवाय ७-८ दिल्लीकर खाणारे असतील तर एवढी भाजी सुद्धा कमी पडू शकते.

वांगी भोपळा घातलेल्या भाजीला फारतर उंधियो म्हणता येईल.असली पावभाजी मुंबईकडे कोणी खाणार नाही.

असंका's picture

20 Jun 2016 - 8:56 am | असंका

=))

विअर्ड विक्स's picture

20 Jun 2016 - 3:01 pm | विअर्ड विक्स

+ १

मुंबईकरांना पावभाजी हि लालच दिसली पाहिजे …. फोटो पाहून भरीत वाटले… क्षमस्व…

अवांतर - दिल्ली , गुरगाव साईडला पावभाजीचे कौतुक नाही. खायचीच झाली तर हल्दीराम मध्ये चांगली मिळते.

काय झकास वर्णन केलंय.केवढ्या भाज्या चिरल्यात .मजा आहे काकुंची!

विवेकपटाईत's picture

19 Jun 2016 - 4:06 pm | विवेकपटाईत

नाव ठीक केल्या बाबत संपादकांना धन्यवाद. बाकी आजकालच्या पोरांना १०-२५ वर्षे फक्त स्वाद कळतो. त्याना मूर्ख बनविणे सौपी असते.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

19 Jun 2016 - 4:10 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

खरं हाय

हेमंत लाटकर's picture

19 Jun 2016 - 4:35 pm | हेमंत लाटकर

तुमच्या सौ भाग्यवान आहेत, स्वयंपाकात मदत करणारा नवरा भेटला.

इशा१२३'s picture

19 Jun 2016 - 8:02 pm | इशा१२३

मस्त पावभाजी!वर्णन आवडले.

इशा१२३'s picture

19 Jun 2016 - 8:02 pm | इशा१२३

मस्त पावभाजी!वर्णन आवडले.

इशा१२३'s picture

19 Jun 2016 - 8:02 pm | इशा१२३

मस्त पावभाजी!वर्णन आवडले.

पद्मावति's picture

19 Jun 2016 - 9:28 pm | पद्मावति

मस्तं!

रमेश आठवले's picture

19 Jun 2016 - 9:41 pm | रमेश आठवले

चवळी आणि रगडा
लोबियाला मराठीत चवळी म्हणतात असे वाटते.
ठेल्यावर मिळणारा रगडा प्याटीस हा पदार्थ आवडतो पण रगड्यात काय काय असते हे विचारण्याचे धाडस कधी केले नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2016 - 6:54 am | डॉ सुहास म्हात्रे

हो, लोबिया म्हणजे चवळी.

नाखु's picture

20 Jun 2016 - 10:07 am | नाखु

वाकप्रचार आहे का "सोणी/कुडी तू लोबिया शेंगेंसारखी आहेस म्हणून"

शंकायनी नाखु.

अति अवांतर : आपण पाकघरातही पटाईत आहात हे चांगले आहे

संसारी नाखु

रेवती's picture

20 Jun 2016 - 5:24 am | रेवती

पाभाची गोष्ट आवडली.

पांथस्थ's picture

20 Jun 2016 - 9:38 am | पांथस्थ

मस्त पाककृती!

बादवे, लोबियाच्या शेंगा म्हणजे मराठी मधे चवळीच्या शेंगा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2016 - 9:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी. :)

-दिलीप बिरुटे

धनंजय माने's picture

20 Jun 2016 - 10:40 am | धनंजय माने

लोबिया म्हणजे फरसबी सुद्धा असू शकते. तीच वर चित्रात दिसते.
अमारा कूक लोबिया दी ब्जी अड़ी च्छी अनाता है जी!
लेबी खाओ जी लेबी.
(शब्दातलं पहिलं अक्षर आतल्या आत बोलणारे अंजाब्बी)

चांदणे संदीप's picture

20 Jun 2016 - 12:31 pm | चांदणे संदीप

पटाईतकाका जोरात कारेक्रम!!

Sandy

विशाखा राऊत's picture

20 Jun 2016 - 2:30 pm | विशाखा राऊत

पाभा मस्तच.. ऑलटाईम फेवरेट
पण पाभात मोहरी, वांगी घालुन मिक्स वेज केलेय की :)

विचार केला नाही कधी, पण आता तुम्ही म्हणताय तर बरीच झाली असणार!!

रातराणी's picture

21 Jun 2016 - 12:02 pm | रातराणी

आणा ते ताट इकडं!

विवेकपटाईत's picture

23 Jun 2016 - 7:26 pm | विवेकपटाईत

सर्वांना धन्यवाद. पाव भाजीच्या भाजीत काहीही टाका पण पनीर शिवाय चव येत नाही.

तुमच्या पावभाजी च्या पाककृतीला आक्षेप नाही पण खरा पावभाजी भक्त असल्याने राहवले नाही. अस्सल पावभजीत वांगे टाकत नाहीत (लाल भोपळा तर अती झाल) पनीर घालणे म्हणजे बाकी भजीवर आत्मविशवास नाही असे वाटते. पावभाजीची खरी चव ही फ्लवर+बटाटा+टोमॅटो+सिमला मिरची+हिरवे वाटणे यांच्या योग्य मिश्रणात मिळते.
ठाण्या - मुंबईत बर्‍याच ठिकाणी चांगली पावभाजी मिळते, पुण्यातही काही ठिकाणी चांगली (कर्वे रस्त्यावरील शीतल ईत्यादी)मिळते.
हॉटेलमधली पावभाजी पुरत आणि परवडत नाही म्हणून स्वतः शिकून घेतली आहे.
लहानपणी अत्त्या, मावश्या इतर शिल्लक राहिलेल्या भाज्या खपवण्यासाठी एक मिश्र भाजी करून पावभाजी म्हणून खपवत असत त्याची आठवण झाली :)