आळस

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
10 Jun 2016 - 7:48 pm

कधी कधी मन भरून येतं काठोकाठ
जावंसं वाटतं दूर दऱ्या डोंगरात
डुंबावं वाटतं भल्याथोरल्या समुद्रात
पण अशावेळी मला आळसंच येतो
मग झोप झोपतो मी गपगार पांघरुनात

कधी वाटतं चमकाव्या विजा कडाडून आकाशात
बरसाव्या धारा मुसळधार अंगणात
पण रखरखीत उनंच पडतं दिवसभर
मग बसावं लागतं सावलीत
आडवं व्हावं लागतं
काटकोनातलं जग दिसतं राहतं स्वप्नात
आळसंच दाटलेला असतो म्हणा जगण्यात

आळसाचे असतात प्रमुख तीन प्रकार
ऑय य्यॉय याय ...
उद्या सागेनॉय य्यॉय
जरा आळसंच आलॉय य्यॉय यियॉय्य
.
.
हम्म..

जिलबीरतीबाच्या कवितासामुद्रिक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

10 Jun 2016 - 9:53 pm | चांदणे संदीप

हम्म..

जव्हेरगंज's picture

10 Jun 2016 - 10:27 pm | जव्हेरगंज

g