बाइक्स घेताना - भाग ५ - बायकांच्या बैका

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in तंत्रजगत
10 Jun 2016 - 3:55 pm

बाईक्स घेताना - भाग १ - बायकर्सचे प्रकार
बाइक्स घेताना - भाग २ - १००-११० cc
बाइक्स घेताना - भाग ३ - १२५ cc
बाइक्स घेताना - भाग ४ - १३५ cc

(पूर्वी...कोणे एके काळी) आधी जाहीर केल्याप्रमाणे हा भाग अनाहिता पेश्शल :)

भारतात जश्या १९९० नंतर स्कूटरचा जमाना मागे पडून बाईक्स जास्त लोकप्रिय होऊ लागल्या अगदी तस्सेच्च २००५ नंतर हळूहळू ऑटोमॅटिक स्कूटरची लोकप्रियता वाढत आहे. मला आठवते त्यानुसार भारतात ऑटोमॅटिक स्कूटर बहुतेक पहिल्यांदा "TVS सनी / स्कुटी" (तीच ती काजूतैंकडची) होती (त्या आधीचे म्हैत नै कारण मी फार लहान होतो :D) आणि त्या नंतर पटकन आठवणारे नाव म्हणजे "Kinetic होंडा". शालेय जीवन संपेपर्यंत या दोनच "स्कुटी" माहित होत्या..."स्कुटी" हे नाव सर्रास ऑटोमॅटिक स्कूटरसाठी वापरले जाते (जसे फ़ोटोकोपी साठी xerox) यावरून "TVS सनी / स्कुटी"ची लोकप्रियता समजावी. पण हिरो-होंडाच्या बाईक्सच्या उदयानंतर "बाईक्स = माचो लुक्स" म्हणून पुरुषांसाठी आणि "ऑटोमॅटिक स्कूटर = चालवायला सोप्या...आकाराने आणि पॉवरने कमी" म्हणून बायकांसाठी असा सोपा हिशोब झाला...त्यातच Bajaj ने Pulser साठी "Definitely male" अशी टॅग लाईन वापरून त्यावर शिक्कामोर्तब केले.

आणि बायकांमध्ये ऑटोमॅटिक स्कूटर लोकप्रिय असण्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे साडी / ड्रेस घालूनसुध्धा चालवता येते :)

आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि भारतात ऑटोमॅटिक स्कूटर इतक्या लोकप्रिय झाल्यात की जवळपास प्रत्येक बाईक बनवणार्या कंपनीने ऑटोमॅटिक स्कूटर मार्केटसाठी कमीतकमी १ स्कूटर बनवली आहे. भारतात आत्ता बाकी कोणत्याही टू-व्हिलर सेगमेंटपेक्षा ऑटोमॅटिक स्कूटर साठी सगळ्यात जास्त पर्याय उपलब्ध आहेत. या स्कूटर लोकप्रिय होण्याची काही महत्वाची कारणे म्हणजे...

  • काही लोकांना क्लच दाबून ठेवा + गिअर बदला + क्लच हळूहळू सोडा ही प्रोसेस किचकट वाटते
  • काही जणांना गीअर बदलणे नीट जमत नै
  • आणि काही आळशी असतात :D

अश्या सगळ्या लोकांसाठी ऑटोमॅटिक स्कूटर ही चालवायला अतिशय सोपी आहे...ना गीअर्सची कटकट ना क्लचची भानगड...फक्त बटण दाबा आणि भुर्रर्र :)

  • सर्वसाधारण भारतीय उंचीच्या लोकांसाठी पर्फ़ेक्ट
  • बाईकच्या तुलनेत डिकीची जागा भरपूर...ऑफिसातून घरी येताना भाजी / सामान / काही वेळेला जड ग्यास सिलिंडर "खरा आणि साहेब म्हणायचे तो सुध्धा" :D आणताना हा मोठा फायदा असतो

या पासून ते अगदी

  • घरातली पहिली दुचाकी अशी असावी की घरातल्या बायकांसकट सगळ्यांना चालवता यावी
  • जवळच्या जवळ जायला म्हणून घरात बाईक / कारबरोबर सेकंड दुचाकी म्हणून

अगदी माझ्या काही मित्रांनी लग्न झाल्या झाल्या जवळपास २-३ महिन्यांच्या आतच "लग्न झाल्यावर घरात ऑटोमॅटिक स्कूटर असलेली बरी असते" असे म्हणत ऑटोमॅटिक स्कूटर बुक केल्यासुध्धा (बिच्चारे लग्नाआधी ते सगळे बुलेट घ्यायचे प्लान बन्वत होते हा भाग अलहिदा :D)

परंतू या सर्व फायदयांबरोबरच बाईकच्या तुलनेत काही उणीवा सुध्धा आहेत

  • व्हेस्पाचा अपवाद वगळता बर्याच ऑटोमॅटिक स्कूटर जवळपास १००cc च्या असूनसुध्धा मायलेज फार कमी असते (३०-४० kmpl), १५०-२००cc च्या बाईक सुध्धा इतकेच मायलेज देतात
  • बाईकच्या तुलनेत फार लहान चाके असल्यामुळे स्थिरता (balance) कमी असतो, तोल गेल्यावर पटकन सावरणे कठिण असते
  • low ground clearance असल्यामुळे कच्च्या अथवा दगडधोंड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून / उंच स्पीडब्रेकरवरून जाताना स्कूटरचा खालचा भाग घासला जाण्याची शक्यता जास्त असते
  • ऑटोमॅटिक स्कूटर शक्यतो फक्त छोट्या (१५ कि.मी. अथवा त्यापेक्षा कमी) अंतरासाठी चांगल्या आहेत, त्यापेक्षा जास्त अंतरासाठी वरचेवर वापरल्यास स्कूटर (आणि चालवणार्याची पाठसुध्धा) फार लवकर खिळखिळी होऊ शकते, कारण यांचे सस्पेंशन बाईकसारखे जास्त दणके सोसवण्यासाठी नसते
  • ऑटोमॅटिक स्कूटर शक्यतो कमी (४५-५० कि.मी.प्र.ता. अथवा त्यापेक्षा कमी) वेगातच चालवाव्या, त्यापेक्षा जास्त वेगात वरचेवर वापरल्यास इंजीनावर ताण येतो तसेच छोट्या चाकांमुळे स्थिरता (balance) कमी होते...मात्र मी बर्याचदा हायवेला या स्कूटर ७०+ च्या स्पीडने पळवताना बघितल्यात
  • धक्का स्टार्ट नाही करता येत, त्यामुळे किक लिव्हर नसेल तर पावसाळ्यात अथवा थंडीत बॅटरी डाऊन झाल्यावर मेकॅनिकला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही (विना किक लिव्हरची ऑटोमॅटिक स्कूटर आहे की नाही ते म्हैत नै पण जर असलीच आणि कोणी घ्यायचा विचार करत असेल तर हा मुद्दा ध्यानात ठेवा)

या भागात मुद्दामच इलेक्ट्रिक स्कूटर्स विचारात घेतल्या नाहीत कारण भारतात दुर्दैवाने अजूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी पुरेसे infrastructure नाहीये :(

काही स्कूटर सोडल्यास बाकी स्कूटरबद्दल मला फार थोडी माहिती आहे कारण मला स्वत:ला स्कूटर आवडत नाहीत त्यामुळे बर्याचश्या स्कूटरबद्दल माहिती थोडक्यात गुंडाळलेली आहे :D

Honda Activa i / Activa 3G / Activa 125 - (तिच ती गुर्जींची उडनमांडी फेम)

honda activa

२००१ साली होंडाने हिरो-होंडा सोबत पार्टनरशीपमध्ये असतानाच स्वत:सुध्धा भारतीय मार्केटमध्ये सेपरेट उतरण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांचे आडाखे चुकवून बाईकऐवजी "Activa" ही ऑटोमॅटिक स्कूटर आणली. ज्या वेळेस भारतातून गीअर्ड स्कूटर नामशेष झालेल्या आणि नवीन जास्त मायलेजवाल्या ४-स्ट्रोक बाईकचा जमाना होता त्या वेळेस ऑटोमॅटिक स्कूटर मार्केटमध्ये आणणे आणि ते सुध्धा पहिले प्रोडक्ट म्हणून हा फार धाडसाचा निर्णय होता. But Activa proved it's mettle and initiated a new era in Indian bike market.

Activa भारतात कैच्याकै लोकप्रिय झाली...आणि त्याची मुख्य कारणे वर दिलेली आहेत ती आहेतच पण त्याबरोबरच होंडाला first mover's advantage सुध्धा मिळाला.

Activa is sole anchor for Honda's success in India and this is true even now. Activa ही भारतात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त विकली गेलेली दुचाकी आहे...हिरो स्प्लेंडर आणि बजाज डिस्कव्हरपेक्षा सुध्धा जास्त
सध्ध्या Activa i / Activa 3G / Activa 125 असे ३ पर्याय उपलब्ध आहेत...यातल्या Activa 125 साठी मोठे १२५cc इंजिन, telescopic front suspension, front disk break असे खूप चांगले फायदे आहेत...१२५cc इंजिनमुळे मायलेज थोडे आणखी कमी होते पण बजाज पल्सरला (१५०cc वाली) पिकपमध्ये बरोबरीची टक्कर देते :)

Honda Dio (काजूतैंच्या भाषेत झुरळ...ख.व.उ.पा.मंडळाकडून साभार :D)

honda dio

होंडाची कॉलेजमध्ये जाणार्यांना डोळ्यासमोर ठेउन डिझाईन केलेली स्कूटर...काहीजणांना हिचे डिझाईन थोडे ढिंच्याक वाटू शकेल...अश्यांनी "आपण आता काका/काकू कॅटेगरीमध्ये गेलो" असे खुशाल समजावे :)
टेक्निकली हिच्यात आणि Activa मध्ये तसा काहीच फरक नाहीये...यात Activa चेच ११०cc चे इंजिन आहे

Honda Aviator

honda aviator

हि होंडाची अजून एक स्कूटर...Activa चे यश बघून होंडाने ही आणलेली पण हि Activa इतकी लोकप्रिय नाही झाली...टेक्निकली हिच्यात आणि Activa मध्ये तसा काहीच फरक नाहीये...यात Activa चेच ११०cc चे इंजिन आहे पण हिच्यात Activa 125 सारखे telescopic front suspension, front disk break असे खूप चांगले फायदे आहेत

Honda Navi (with USD Suspension??)

honda navi

हि होंडाने नुकतीच आणलेली नवीन स्कूटर...व्यक्तीश: मला याचे लुक्स अज्जीबात आवडलेले नाहीत...ना धड स्कूटर ना धड बाईक...लुक्स किती जणांना आवडेल माहीत नाही...यात Activa चेच ११०cc चे इंजिन आहे पण "नवी"न डिझाईन मध्ये टाकीखाली सामान ठेवायला जागा आहे...पण हि स्कूटर मुळात ज्या बाईकवरून inspired आहे ती बघितली तर नवीचे डिझाईन हे ताजमहाल समोर बीबीका मकबरा वाटेल...जरा होंडाच्याच MSX-१२५ या बाईककडे बघा :)

honda mcx 125

Hero Motocorp

Pleasure

hero pleasure

हिरो होंडापासून विभक्त झाल्यानंतरसुध्धा आत्ताआत्तापर्यंत होंडाचीच इंजिने वापरते आहे...Pleasure ही खास कॉलेजमध्ये जाणार्या मुलींना डोळ्यासमोर ठेवून मार्केटिंग केलेली स्कूटर आहे त्यामुळे डुएल टोन कलर्स आहेत

Maestro Edge

hero maestro

हिरोची ही स्कूटर हिरोने Engines Engineering बरोबर बनवलेले नवीन ११०cc चे इंजिन वापरते... features च्या बाबतीत मात्र ही होंडाच्या Activa ला टक्कर देऊ शकते...यात telescopic front suspension, digital instrumental console, mobile charger, engine immobilizer (anti-theft system) असे काही फायदे आहेत जे बाकी स्कूटर्स मध्ये नाहीत...आकाराने सुध्धा ही स्कूटर बर्यापैकी मोठी आहे

Duet

hero duet

हिरोची ही स्कूटरसुध्धा हिरोने Engines Engineering बरोबर बनवलेले नवीन ११०cc चे इंजिन वापरते...ही जवळपास हिरो Pleasure सारखीच आहे पण यातसुध्धा mettle body, telescopic front suspension, external fuel filling, digital instrumental console, mobile charger, tubeless tires असे चांगले features आहेत

Yamaha

Ray Z

yamaha ray z

ऑटोमॅटिक स्कूटरची वाढती मागणी पाहून यामाहानेसुध्धा त्यात उडी घेताना रे स्कूटर आणली...दिसायला साधारण होंडाच्या डिओ सारखी आहे पण यात आकर्षक स्टिकर्स असल्याने डिओपेक्षा जास्त उठून दिसते
features जवळपास बाकी स्कूटरसारखेच आहेत

Alpha

yamaha alpha

यामाहाची अजून एक स्कूटर...यापलीकडे मला अजून काही इंट्रेस्ट नाही :D

Fascino

yamaha fascino

बर्याचश्या स्कूटर एका ठराविक प्रमाणानंतर जवळपास सारख्याच दिसतात त्यामुळे यामाहाच्या फॅसिनोचे कर्वज् उठून दिसतात :)
यामाहाने हि स्कूटर मुख्यत्वे बायकांना नजरेसमोर ठेउन डिझाईन केलीये आणि वेगळेपण दिसते सुध्धा. बस्स इतकेच...बाकी जवळपास इतर स्कूटरसारखेच

Suzuki

Let's

suzuki lets

सुझुकीला बाईक्स मध्ये यश मिळत नसताना त्यांना त्यांच्या स्कूटर्सने बर्यापैकी हात दिला...Let's ही सुझुकी कडून आणलेली ११०cc ची स्कूटर

Access १२५

suzuki access

सुझुकीला बाईक्स मध्ये मार्केट मिळत नसताना Access १२५ ला मात्र ठिकठाक विकल्या गेल्या...त्याचे मुख्य कारण म्हणजे बर्याच वेळेपर्यंत १२५cc च्या स्कूटर प्रकारात फक्त सुझुकीच होती...बाकी सगळ्या स्कूटर्स ११०cc च्या होत्या

Swish १२५

suzuki swish

सुझुकीला बाईक्स मध्ये मार्केट मिळत नसताना Swish १२५ सुध्धा ठिकठाक विकल्या गेल्या...बर्याच वेळेपर्यंत त्याची प्रतिस्पर्धी सुझुकीचीच Access १२५ होती

TVS

Jupiter

tvs jupiter

जेव्हा TVS च्या बाईक्स पॉपुलर होत नव्हत्या (एक अपाचे सोडली तर) त्यावेळेस स्कूटर्सनी मात्र बर्यापैकी लोकप्रियता मिळवली...बहुतेक Activa नंतर TVS च्याच स्कूटर जास्त दिसतात.
Jupiter हि सध्ध्यातरी Honda Activa ला मुख्य प्रतिस्पर्धी आहे...कारण एक इंजिन सोडल्यास TVS हि Honda पेक्षा जास्त features देते...ते सुध्धा कमी किंमतीत...सध्ध्या हि स्कूटर TVS ची सगळ्यात बेस्ट स्कूटर आहे...आणि नुकताच यात डिस्क ब्रेकसुध्धा आणला आहे

Vego

tvs vego

हि Jupiter च्या आधी आलेली...Jupiter हि high end स्कूटर तर हि थोडी स्वस्त...वजनाला थोडी हलकी सुध्धा

Scooty Zest ११० / Streak / Pep+

tvs scooty

भारतात ऑटोमेटीक स्कूटर मधल्या सुरवातीच्या काही काळातली Scooty हि एक आहे...काळानुरुप TVS ने थोडे थोडे बदल केलेत पण आजसुध्धा Scooty हि वजनाला हलकी असल्याने नाजूक पाखरांमध्ये लोकप्रिय आहे ;)

Mahindra

Gusto

mahindra gusto

महिंद्रा बाईक / स्कूटर मार्केटमध्ये उशीराच आले...त्यांची सुरुवातच Kinetic च्या बाईक विभागाला विकत घेऊन झालीये. पहिल्यांदी १०० cc इंजिन असणारे मॉडेल होते पण नंतर १२५ cc इंजिन असणारे मॉडेल आणले आहे

Rodeo

mahindra rodeo

हिच्यात काडीचाही इंट्रेस्ट नाही त्यामुळे मला काहीही माहित नाही पण १२५ cc चे इंजिन आहे आणि महिंद्रा नवीन असूनसुध्धा बर्यापैकी खपली गेली आहे

Duro

mahindra duro

हिच्यात काडीचाही इंट्रेस्ट नाही त्यामुळे मला काहीही माहित नाही पण १२५ cc चे इंजिन आहे आणि महिंद्रा नवीन असूनसुध्धा बर्यापैकी खपली गेली आहे

Bajaj

Nothing

बाकी कंपन्या वाढणार्या स्कूटर सेगमेंटकडे वळत असताना बजाज मात्र त्यापासून ४ हात लांबच आहे...अगदी अधिकृतरीत्या सांगितले की आम्हाला स्कूटरमध्ये इंट्रेस्ट नाही...कदाचित एकेकाळी क्रिस्टल नावाने आणलेली स्कूटर फ्लॉप गेली त्यामुळे असेल

एकेकाळी "...बुलंद भारत की बुलंद तस्वीर...हमारा बजाज...हमारा बजाज" म्हणत "बजाज चेतक" घराघरात पोचलेली (आमच्याकडे २० वर्षे वापरली)...या जाहिरातीचे गाणे आजही नोस्टेल्जिक करून जाते :(

Vespa - इतालिअन ब्युती

Vespa १५० / १२५ / Elegante

vespa

स्कूटरमधला सध्ध्याचा माझा सगळ्यात आवडता ब्रँड :)

  • भारतीय कंपन्या किंमत कमी ठेवायला थोडे स्वस्तातले मटेरिअल वापरतात त्यामुळे देशी स्कूटर थोड्या गरीब दिसतात
  • जॅपनीज भन्नाट इंजिन क्वालिटी ठेवतात पण डिझाईन मात्र ठोकळे नाहीतर टोकदार काहीतरी बनवतात...काहीच नाही तर नाव कैच्याकै ठेवतात (आठवतेय सुझुकी "हयाते" बाईक??)
  • ईटालिअन...त्यांच्यासारखे तेच...सुंदरता देखणेपण ठसठशीतपणे उठुन दिसले पाहिजे...भले क्वालिटी जॅपनीज प्रॉडक्टसारखी नसेल पण लोकांनी यांच्याकडेच यायला हवे

एकेकाळी बजाज चेतकला तोडीसतोड टक्कर देणारी वेस्पा स्कूटर नंतर मात्र भारतातून निघून गेली...त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी भारतीय लोकांचा बाईक्सकडे वळणारा कल समजून घेतला नाही आणि फक्त स्कूटरवरच लक्ष दिले...पण सुदैवाने ती परत आली :)

सध्ध्या १५०cc च्या स्कूटर्स फक्त वेस्पा बनवते...दिसण्याच्या बाबतीत मात्र there is Vespa and then there are others :) ...गीअरवाले इंजिन जाउन ओटोमॅटिक इंजिन आले तरी बाह्यरुप तसेच "रेट्रो" ठेवले आहे...वळणदार डिझाईन आणि उठावदार रंग यामुळे बाकी स्कूटरसमोर वेस्पा उठुन दिसते...ठिकठाक दिसणारी पाखरेपण वेस्पावर भाव खावून जातात ;)

आणि हि फक्त दिसण्यातच नाही तर खालील बाबतीतही बाकी स्कूटरपेक्शा उजवी आहे

  • १५० cc चे ३ व्हॉल्व्ह इंजिन
  • मायलेज बाकी स्कूटरपेक्शा जास्त
  • इंजिन पॉवर बाकी स्कूटरपेक्शा जास्त
  • सगळ्यात मोठी पेट्रोल टाकी
  • सगळ्यात मोठे ट्युबलेस टायर्स
  • सगळ्यात जास्त रंगांत उपलब्ध...पाखरांना मॅचिंग रंग शोधायला सोपे =))

बाकी डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील्स आहेतच...आणि शेवटचे म्हणजे वेस्पा आणखी एका बाबतीत बाकी सगळ्या स्कूटरच्या पुढे आहे...किंमत :D ...but it's worth it ;)

मिरवायचे असेल / हौस असेल / नीट वापरणार असाल / परवडत असेल तर वेस्पा सोडून दुसरीकडे बघूच नका...अशी दुसरी नाहीच सापडणार :)

यात telescopic front suspension असते तर हि आखुडशिंगी बहुगुणी भरपूर दूध देणारी गाय याचे उत्तम उदाहरण ठरली असती :)

स्कूटर कशी निवडावी

औटोमटिक स्कूटरमध्ये शक्यतो खालील गोष्टी असाव्यात...वेस्पा घेणार असाल तर पुढे वाचू नका ;)

  • telescopic front suspension
  • tubeless tires
  • वजन चालवणार्याला झेपले पाहिजे
  • kick lever

स्कूटर घेताना ध्यानात ठेवावे की स्कूटर्सना re-sell value नसल्यात जमा असते...त्यामुळे घ्यायच्या आधीच पूर्ण विचार करावा

क्रमशः

Disclaimers -
या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत
सर्व फ़ोटो इंटरनेटवरून साभार

प्रतिक्रिया

छान लेख रे टक्कू.आवडत्या स्कुटीवरचा म्हणून विशेष लक्ष देऊन वाचला!
चार पिढ्यांच्या स्कूटर वापरून झाल्यात माझ्या.कायनेटिक होंडावर शिकले.मग छोटी स्कुटी, नंतर अतिशय आवडती स्कुटी पेप आणि आता वेगो.तिन्ही गाड्या आपापल्या परीने चांगल्या वाईट.पण टिव्हिएसची सच्ची कस्टमर मीच!
माझी स्कुटी कायम सामानाने भरलेली असते.ग्रोसरीने भरलेली डिकीस्पेस,हुकला पर्स,भाजीची पिशवी,मधल्या जागेत कधीकधी आंब्याची पेटी पण! जवळच्या जवळ फिरायला ,कामाला जायला आॅटो स्कुटरसारखे सुलभ वाहन दुसरे नाही.
नुकतीच आॅस्ट्रियाला मजेशीर दुचाकी पाहिली.तिला वरुन पारदर्शक कव्हर होते. पावसात वर घेतले की चारी बाजूने बंद करुन न भिजता गाडी चालवा.अशी गाडी मिळवणे माझे स्वप्न आहे आता!!

शाम भागवत's picture

11 Jun 2016 - 12:23 pm | शाम भागवत

तेवढा फोटो टाका की त्या पारदर्शक स्कूटरचा.
तुम्ही स्वप्न पहा. मी फक्त फोटोच पाहीन म्हणतो. तेवढेच जमणार आहे मला या जन्मात. :))

असा काढलेला फोटो नाहीये.पण इतर फोटोत कुठे आलीये की बघते.

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 1:54 pm | टवाळ कार्टा

माझी स्कुटी कायम सामानाने भरलेली असते.ग्रोसरीने भरलेली डिकीस्पेस,हुकला पर्स,भाजीची पिशवी,मधल्या जागेत कधीकधी आंब्याची पेटी पण!

namaskaar

बाकी ती छप्परवाली बाईक अशी असेल दिसायला

bike with roof

अजया's picture

13 Jun 2016 - 5:12 pm | अजया

अशीच अशीच.

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 5:15 pm | टवाळ कार्टा

ब्यामडब्लूची आहे ती...कारपेक्षा महाग अस्ते :)

त्यापेक्षा आपल्या बजाजने कीती भारी मॉडेल काढलेय ३०-४० वर्षापूर्वी. एफइ, आरई नावाने विकतात. जास्त पावरचे डिझेल व्हर्शन पाहिजे असल्यास पिआज्योचे पण मिळते. ;)

jp_pankaj's picture

10 Jun 2016 - 6:58 pm | jp_pankaj

चांगला लेख.
बाकी व्हेस्पा लैच महाग पडली..
(टका च्या सल्यावरुन हिरो कॅफे रेसर सोबत आता vespa बाळगणारा) जेपी

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 1:55 pm | टवाळ कार्टा

वेस्पा आहेच महाग...बाकी हिरो कॅफेरेसरवर लैच शायनिंग मारत असशील....जास्त दिसत नै ती ;)

शब्दबम्बाळ's picture

15 Jun 2016 - 4:13 pm | शब्दबम्बाळ

म्हणजे ती "१०० CC" वाली splendor का? खूपच बोअर आहे राव ती....
तिच्यापेक्षा बजाज V15 विक्रांत च design खूपच भारी आहे!

टवाळ कार्टा's picture

16 Jun 2016 - 11:21 am | टवाळ कार्टा

V15 ची हेडलाईट कैच्याकै वाईट्ट दिसते :( त्यापेक्शा थंडरबर्ड टैप प्रोजेक्टर असलेला गोल हेडलाईट जब्राट दिसला अस्ता

शब्दबम्बाळ's picture

16 Jun 2016 - 11:30 am | शब्दबम्बाळ

पण कोणी नजर लाऊ नये म्हणून तिथे जरा आळशीपणा केला असेल!! :P

पगला गजोधर's picture

10 Jun 2016 - 7:21 pm | पगला गजोधर

पण बजाज ची सनी होती

आणि 'चल मेरी लुना' ? व टिवीएस ५० बद्दल काहीच लिहिलं नैय्ये

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 1:56 pm | टवाळ कार्टा

त्या अता मिळतात?

पगला गजोधर's picture

13 Jun 2016 - 6:09 pm | पगला गजोधर

नै आता मिळत नैत (पोलूषण नॉर्म बदललेत २१ व्या शतकात म्हणून), पन लैच आटवन आलेली त्यांची हा लेख वाचताना
:(..

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 6:25 pm | टवाळ कार्टा

:)

टीव्हीएस मिळते बे अजून. एक्स एल हेवी ड्युटी नावाचे मॉडेल आहे. फक्त ती ५० सीसी नसते आता. १०० सीसी पण मिळते आता.
tvs
दूधवाले, पेपरवाले, फुटकळ किराणा माल विकणारे आणि डीलीव्हरी/ऑफीसबॉयना आदर्श गाडी.

आनंदी गोपाळ's picture

13 Jun 2016 - 8:27 pm | आनंदी गोपाळ

पण, ही सिटी बाईक नव्हे. रूरल एरियात मात्र राज्य करते. ट्रू वर्क-हॉर्स. ३-४ मॉडेल्स आहेत तिच्यातही.

चाकं मोठी आहेत.
अ‍ॅवरेज भारी आहे. (७० किमी प्रतिलिटर पर्यंत)
किंमत कमी आहे. (२८-२९ हजार फक्त)
१०० किलोचं पोतं वाहून नेता येतं, मोठ्या चाकांमुळे कच्च्या रस्त्यावर नीट चालते.

भुमी's picture

10 Jun 2016 - 7:23 pm | भुमी

ई ईईईईईई....कायपण चॉईस आहे. ना दळणाचा डबा ठेवता येत,ना ऐसपैस बसता येत.बाकी मी पण टिव्हीएसची सच्ची कस्टमर. आजच्या घडीला जुपीटर सारखी उत्तम गाडी नाही.

रमेश भिडे's picture

10 Jun 2016 - 7:49 pm | रमेश भिडे

85 च्या गाडीवर दळणाचा डबा???
उद्या शालू नेसुन केर काढायला लावाल कुणाला! ;)

भुमी's picture

10 Jun 2016 - 7:59 pm | भुमी

आखूडशिंगी बहुगुणी काय असतं विकटून सांगता का जरा...

भुमी's picture

10 Jun 2016 - 7:59 pm | भुमी

.

रमेश भिडे's picture

10 Jun 2016 - 8:05 pm | रमेश भिडे

बहुगुणात दळणाचा डबा ठेवता येणं कुठं लिहिलंय सांगतेस का बाळ???
बाकी गिरणीची कामं करण्यासाठी वेस्पा आहे हे ठाऊक नव्हतंच! भूमी बाळ जमिनीवर ये हो! ;)

भुमी's picture

10 Jun 2016 - 8:24 pm | भुमी

कुणीतरी वाचवा.
तुम्हाला काय अपेक्षीत आहे हो काका?शालू नेसलेल्या बैने घराचा उकिरडा करावा?

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 2:43 pm | टवाळ कार्टा

ओ...भिडेकाकांना म्हणायचे होते की ब्युटीक्वीन घरात सून म्हणून आली तर तिला झाडलोट करायला लावणार का?

वेस्पा चांगली दिसते स्कूटरींमध्ये.

आदूबाळ's picture

10 Jun 2016 - 7:54 pm | आदूबाळ

काके - सनी बजाजची होती.

x

प्रचेतस's picture

10 Jun 2016 - 7:57 pm | प्रचेतस

उत्तम माहितीपूर्ण लेख.

त्रिवेणी's picture

10 Jun 2016 - 8:50 pm | त्रिवेणी

माझी आवड स्कूटी पेप प्लस.
पाचवीत असताना पहिली गाड़ी शिकले होते आईची लूना.अजुन आठवण येते.
पहिली लूना मग सनी आणि आता बरीच वर्ष स्कूटी.

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 2:44 pm | टवाळ कार्टा

पाचवीत असताना पहिली गाड़ी शिकले होते आईची लूना

पाचवीत???? तुम्ही दुसर्यांना नियम पाळायला सांग्ता का हो??? =))

सस्नेह's picture

11 Jun 2016 - 7:12 am | सस्नेह

टका सर्व गाड्यांची cc capacity आणि अंदाजे किंमत द्यायला हवी. तर अजून अॅक्युरेट होईल.

आधी अर्धवट माहिती असे लिहून नंतर चांगली माहिती असे मतपरिवर्तन कसे झाले ब्वा? रात्रीत काही साक्षात्कार घडला का?
प्रतिसादातील भूमिका संपादनाच्या आपल्या कृतीचा निषेध.

रमेश भिडे's picture

11 Jun 2016 - 11:40 am | रमेश भिडे

हाहाहाहा!

माजी आमदारांना पेंशन आणि सगळे भत्ते सुरु अस्तेत माहिती नाही का?

चांगली पण अर्धवट माहिती असे आधी मोबल्यावरून टायपले होते. नंतर वाचले तर पूर्वार्ध गायबला होता. गडबडीत जमले तेवढे दुरुस्त केले नरसोबावाडीतून. ऑल्टाइम मिपावर पडीक नसल्याने डोळ्यात तेल घालून सर्व प्रतिसाद तपासणे जमत नाही.

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 2:54 pm | टवाळ कार्टा

:)
त्या निमित्ताने स्वतःचा प्रतिसाद स्वतःच संपादित करता येउ नये असे उप्दते कर्ता येईल का?

सस्नेह's picture

13 Jun 2016 - 5:00 pm | सस्नेह

तुम्हाला इनो हवाय का ?

सस्नेह's picture

13 Jun 2016 - 5:03 pm | सस्नेह

हा नाही करणार संपादित बरं ;)

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 5:08 pm | टवाळ कार्टा

अर्र...तसे नाही

when there are multiple moderators for a system and if moderators can also act as normal user for same system
then it's logical that changes introduced by any moderator (as a normal user) should not be authorized/corrected by same moderator

हा साधा नियम आहे

सस्नेह's picture

13 Jun 2016 - 5:20 pm | सस्नेह

१. मी मॉडरेटर नाही.
२. या संस्थळाच्या नियमांबद्दल जे काही म्हणणे असेल ते कृपया संपादक/मालक/संचालक यांच्याकडे सांगावे.

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 5:29 pm | टवाळ कार्टा

१. मग हे कसे केले ?? :)
२. ईतक्या मोठ्या/जाणकार लोकांनी सांगितलेले ऐकत नैत...मी सांगून काय फरक पडणार :)

सस्नेह's picture

13 Jun 2016 - 5:34 pm | सस्नेह

याला मॉडरेशन नव्हे, स्व-संपादन म्हणतात.

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 5:36 pm | टवाळ कार्टा

हा तेच ते...जे काही अम्हा साध्यासुध्या मिपाकरांना मिळत नाही ते सगळे एकाच कॅटेगरीमध्ये :)

सस्नेह's picture

13 Jun 2016 - 5:38 pm | सस्नेह

तुम्ही साधेसुधे का ? चान चान .

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 5:43 pm | टवाळ कार्टा

तर तर...अग्दी तुम्च्या इतकाच =))

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 2:52 pm | टवाळ कार्टा

टका सर्व गाड्यांची cc capacity आणि अंदाजे किंमत द्यायला हवी. तर अजून अॅक्युरेट होईल.

मलाच इंट्रेस्ट नाही स्कूटरमध्ये म्हणून लक्षातपण नाही ठेवत...पण वेस्पा सोडली तर बहुतेक सगळ्या १००-११० cc वाल्या आहेत....महिंद्रा आणि सुझुकी १२५ cc वाल्या आहेत...आणि किंमत म्हणाल तर खरा बायकर किंमत बघताना फक्त "परवडते" अथवा "परवडत नाही" इतक्याच गोष्टीसाठी बघतो...त्यानंतर मात्र फक्त बाईक कशी आहे हेच बघितले जाते

सस्नेह's picture

13 Jun 2016 - 5:01 pm | सस्नेह

इंट्रेस्ट नाही स्कूटरमध्ये तर धागा कशाला काढावा ?
आणि कम्पेअर करायचं तर किंमत मस्ट आहे ओ.

टवाळ कार्टा's picture

13 Jun 2016 - 5:10 pm | टवाळ कार्टा

ऑटोमॅटिक स्कूटरची सेगमेंट टाळून पुढेचे लेख लिहिणे मनाला पटले नाही त्यामुळे हा लेख लिहिलाय
किंमती जागेनुसार बदलत अस्तात आणि तुलना करताना किंमत हा मुद्दा सगळ्यात शेवटी विचारात घ्यावा

रंगासेठ's picture

10 Jun 2016 - 10:23 pm | रंगासेठ

बजाजने पण स्पिरिट ही ऑटोमॅटिक स्कूटर आणून काही काळाकरता मार्केटमध्ये जम बसवलेला. पण नंतर पल्सर कडे जास्त लक्ष द्यायचे असेल की काय पण दुसरी नंतर स्कूटर आणली नाही.

bajaj

पैसा's picture

11 Jun 2016 - 12:19 pm | पैसा

मेहनतीने लिहिलास. पण काही माहिती ऐतिहासिक आहे ती जरा तपासून घ्यायला हवी होती.

१) कायनेटिक होंडा आधीपासून मिळत होती. (१००सीसी च्या गिअर्स नसलेल्या स्कूटरची किंमत खरे तर कायच्या काय होती. पण तिला ६ महिन्यांचे वेटिंग असायचे.) मुली आणि कॉलेजच्या पोरांना लुनाला पर्याय म्हणून त्यानंतर बजाज सनी आली.

२) सनीचे बरोबर क्लासिफिकेशन स्कूटरेट असे आहे. तशी होर्डिंग्ज आणि जाहिराती पाहिलेल्या आहेत. स्कूटी हे टीव्हीएस चे ब्रँड नेम आहे. सनी यशस्वी ठरली, त्यानंतर थोडी जास्त कपॅसिटी असलेली 'स्पिरिट' बजाजने आणली होती. पण नंतर त्यानी स्कूटर उत्पादन हळूहळू बंद केले आणि मोटारसायकल वर लक्ष केंद्रित केले.

३) ना स्कूटर , ना मोटारसायकल या धेडगुजरी प्रकारात बजाजच्या एम५० आणि एम८० चांगल्याच लोकप्रिय होत्या. एम८० अजून कुठे कुठे गावात दिसतील.

४) बजाजचीच १०० सीसी वाली प्रिया ही गिअर्सवाली स्कूटर आणि एफ ई या दोन छोट्या स्कूटर्स होत्या, ज्या नंतर बंद झाल्या. एफ ई फार चाललीही नाही.

या सगळ्या स्कूटर्स येण्यापूर्वी 'चल मेरी लुना', सुवेगा आणि टीव्हीएस च्या मोपेड मुलींमधे लोकप्रिय होत्या.

शाम भागवत's picture

11 Jun 2016 - 12:47 pm | शाम भागवत

१०० सीसी वाली बजाज कब.
प्रिया म्हणजे ३ गिअरवाली दोन सीटवाली मूळची वेस्पा. करार संपल्यामुळे नाव बदलले.
एफ इ १२५ सीसी व ४ गिअरवाली व एकच सीट असलेली. खूप खपली. पण सगळ्या टू स्टोक इंजीनवाल्या.सगळेच बंद झाले.

पहिली ल्युना १९७४ ची. त्या अगोदर सुवेगा. सायकल एवढी मोठी चाके असायची.