छोटुश्शी खारूताई (प्रकाशचित्र)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
21 Sep 2008 - 4:20 pm

उदयपूरच्या 'सहेलीयोंकी बाडी' या उद्यानातुन बाहेर पडत असता अचानक भिंतीच्या वरुन तुरुतुरु पळणारी ही छोटी खारूताई दिसली. सुदैवाने तिकडे कुणाचे लक्ष न गेल्याने तिकडे गजबज नव्हती, खारूताई मस्त बागडत होती. मी दबक्या पावलांनी भिंतीच्या जवळ गेलो आणि पुढे पळणारी खारूताई अचानक मागे वळली. क्षणभर ते गोल डोळे लुकलुकले आणि कान उभे राहीले. तिला काय वाटले कुणास ठाऊक पण ती न पळता अगदी स्तब्ध झाली. मी कॅमेरा सरसावुन चौकट साधली, खार पळत नाही म्हणताना अलगद झाडाच्या पारावर चढलो. कॅमेरा साधारण तिच्याच पातळीला आणला आणि तिचा विचार बदलायच्या आत किरण साधला नि कळ दाबली.

पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्‍या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली आणि शेजारच्या झाडावर गायब झाली.

कलाछायाचित्रण

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

21 Sep 2008 - 4:26 pm | मदनबाण

सर्वसाक्षीजी हा फोटो फारच सुंदर आहे...
आमच्या इथ पण खारुताई पाहिला मिळतात पण इमारतींची संख्या वाढल्या मुळे आता त्यांची संख्या देखील कमी झाली आहे..

मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सुनील's picture

21 Sep 2008 - 4:34 pm | सुनील

पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्‍या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली

खो खो खो!! पण पोझ बाकी छान दिली आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

21 Sep 2008 - 4:46 pm | ऋषिकेश

पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्‍या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली आणि शेजारच्या झाडावर गायब झाली.

मनापासून चित्रीकरण करणार्‍यां साक्षीरावांना नीट पोज दे असे साक्षात श्रीरामांनी सांगितलेले दिसते ;)
मस्त अकृत्रिम पोज मधील फोटो..
इवलीशी खारूताई खूप आवडली.

छोटीशी खारूताई
दगडावर बसली होती
निरागस गोजिरवाण्या
दिसण्याने नटली होती
.
इवल्याश्या अस्तित्वाने
हृदयाचा पीळ गळाला
आडून तिला बघण्याचा
माझा गं उत्सव झाला
.
कवी: तुषार जोशी, नागपूर

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2008 - 5:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

साक्षीजी, ऑन डिमांड तुम्ही मस्त फोटो टाकला आहे. धन्यवाद.
मी आणि एक मित्र एकदा आमच्या जॉड्रलच्या मागच्या बाजूला "आर्बोरीटम" आहे तिथे दबा धरून बसलो होतो खारींचे फोटो काढायला. मला नाही मिळाला हा, पण त्याचं नशीब मेहेरबान होतं. हे बघा:

ऋषिकेश ती कविताही आवडली.

घाटावरचे भट's picture

21 Sep 2008 - 5:35 pm | घाटावरचे भट

मी पण एका खारुताईचा फोटो काढला होता २ महिन्यांपूर्वी...तिने पण अशीच मस्त पोझ दिली होती माझ्यासाठी...
खारुताई

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

चतुरंग's picture

21 Sep 2008 - 6:51 pm | चतुरंग

असलेली ही खार एकदम डौलदार दिसते आहे! सुंदर फोटू. (फोकस अजून थोडा शार्प असता तर अजून खतरनाक दिसला असता.)

चतुरंग

खादाड's picture

21 Sep 2008 - 6:18 pm | खादाड

छान फोटो आहेत सगळ्याचे !

एकदम शार्प फोकस. लुकलुकणारा डोळा आणि अंगावरची फर मस्तच.
(ऋषिकेश कविता सुंदर आहे)

चतुरंग

देवदत्त's picture

21 Sep 2008 - 6:55 pm | देवदत्त

वा वा.....
कलादालनात सुंदर चित्रांची भर पडत चाललीय.

मनापासून चित्रीकरण करणार्‍यां साक्षीरावांना नीट पोज दे असे साक्षात श्रीरामांनी सांगितलेले दिसते
:) सहमत.

यशोधरा's picture

21 Sep 2008 - 8:46 pm | यशोधरा

सुरेख आलाय खारीचा फोटो.

रेवती's picture

21 Sep 2008 - 8:58 pm | रेवती

फोटो आवडला. फारच चपळ असतात खारी. कॅमेर्‍यात पकडणे अवघड!
दिसतातही भोळ्याभाबड्या!

रेवती

गणा मास्तर's picture

21 Sep 2008 - 9:14 pm | गणा मास्तर

मी पुण्यात होतो तेव्हा संगम ब्रिजवर, घाटपांडे काकांच्या हापिससमोर टिपलेली ही खारुताई

तिथे पूल सुरु होतानाच्या चौथर्‍यावर बर्‍याच खारुताया दिसायच्या...बर्‍याच धीट होत्या.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

सर्वसाक्षी's picture

21 Sep 2008 - 11:03 pm | सर्वसाक्षी

या निमित्ताने अदिती (बाई नाही), भट साहेब व गणा मास्तर यांच्याही खारुताया पाहायला मिळाल्या. गणा मास्तरांनी टिपलेली छबी खासच! एकदम श्री सिद्दिविनायकाच्या देवळातल्या मामांचाच पवित्रा घेतलाय खारुताईंनी.
मजा आली

नंदन's picture

21 Sep 2008 - 11:09 pm | नंदन

खारींचे सारे फोटोज मस्त आलेत. भारतीय खारींच्या पाठीवरचे तीन पट्टे (रामाने सेतुबंधनानंतर दिलेली शाबासकी) युनिक असावेत. ते आंग्ल/अमेरिकन खारींच्या पाठीवर दिसत नाहीत. (त्यांना बिन-पट्टेवाल्या म्हणायचा मोह टाळतो :))

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

22 Sep 2008 - 12:13 am | विसोबा खेचर

नंदनसायबाशी सहमत...

साक्षीदेवा, तुझी खारुताई सुरेख..

इतरही खारीं आवडल्या...

आपला,
(पाठीवर रामाची बोटं नाहीत, पण बापाच्या माराचे वळ उठलेला!) तात्या. :)

मृदुला's picture

22 Sep 2008 - 12:07 am | मृदुला

खारूताया एकंदरित धीट दिसतायत. माझीपण एक.

कोण मागे?

प्राजु's picture

22 Sep 2008 - 12:09 am | प्राजु

अशा धीट खारुताया पाहिल्या आहेत.
सगळेच फोटो छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

22 Sep 2008 - 5:44 pm | झकासराव

साक्षीजी मस्त फोटॉ.
गणा मास्तर क्लास आहे तुम्ही टाकलेला फोटो.
घाटावरचे भटा यांच्याकडे खारुताइंपैकी भुत खारुताई आले होती की काय?? :)
ह घ्या.
बाय द वे सरपटणार्‍या प्राण्यांच आणि साक्षीजींच काय साटलोट असेल बर??
त्याना ते भारीच पोज देतात :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

पांथस्थ's picture

24 Sep 2008 - 11:51 am | पांथस्थ

लालबाग बोटॅनिकल गार्डन, बेंगळुरु येथे दिसलेली एक पिल्लु खारुताई...