गुवाहाटी ते कलकत्ता विमानप्रवासात काढलेला फोटो.
कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे.
कॅमेरा सेटिंग्ज सीन वर होती. बाकी काही लक्षात नाही.
प्रतिक्रिया
21 Sep 2008 - 9:02 am | विसोबा खेचर
आपण चुकीचा दुवा दिला आहे. आपले चित्र प्रथम फ्लिकरवर चढवा व नंतर त्याचा दुवा येथील चित्राच्या खिडकीत जोडा म्हणजे आपला सूर्यास्त आम्हालाही पाहता येईल...
किंवा,
हे वाचा...
तात्या.
21 Sep 2008 - 9:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित्रच दिसत नसल्यामुळे....सुर्यास्त, सुर्यबिंब, केशरी किरणे , या वर्णनाने सध्या आम्ही खूश आहोत. :)
चित्र टाकण्यात काही गडबड झालेली दिसते. तेव्हा फ्लीकर/ पिकासावर चित्र अपलोड करुन तो दुवा टाकला पाहिजे, म्हणजे चित्र दिसेल.
21 Sep 2008 - 9:10 am | नीधप
तेच समजून घेण्यासाठी शोधाशोध करत होते. अनायासे उत्तर मिळाले. धन्यवाद. फ्लिकर वरून टाकून बघते.
21 Sep 2008 - 9:18 am | नीधप
फ्लिकर वर फोटो टाकला आणि दुवा इथे दिला. पण तरी जमत नाहीये.
21 Sep 2008 - 9:23 am | विसोबा खेचर
फोटोवर राईट क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीमध्ये दाखवलेला दुवा जोडावा म्हणजे दिसेल. आता तसे केले आहे...
असो,
फोटू बाकी क्लासच आहे! :)
तात्या.
21 Sep 2008 - 9:24 am | नीधप
आता यापुढे लक्षात ठेवीन...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
21 Sep 2008 - 9:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विमानावर पडलेली केशरी किरणे मस्तच आली आहेत. फोट्टो सुरेख काढला आहे.
21 Sep 2008 - 9:31 am | प्रभाकर पेठकर
सूर्यप्रकाश विमानाच्या 'मागून' विमानावर पडलेला वाटतो आहे.
छायाचित्र मस्तच. अभिनंदन.
21 Sep 2008 - 9:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
झकास फोटू हाये!
कलकत्त्याला पोचतानाच सूर्यास्त होत होता. मी पूर्वेकडे होते त्यामुळे मला सूर्यबिंब दिसत नव्हतं. पण ती केशरी किरणे विमानावर पडलेली होती आणि चमकत होती. बाजूला गंगेचा प्रवाह पण आहे.
त्याच्याचबरोबर विमानाचं नाकाडाची प्रतिमा त्या प्रॉपेलरवर दिसत आहे .... लय भारी.
21 Sep 2008 - 9:37 am | प्रभाकर पेठकर
नाकाड नाही वाटत. दुसरेच काहीतरी आहे.
21 Sep 2008 - 9:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
दुसरं काहीतरी काय असू शकणार, तशाच आकाराचं आणि इतक्या जवळ?
मला असं वाटतंय, की सूर्य प्रॉपेलर आणि विमानाचं नाकाड यांना जोडणार्या रेषेत (साधारणतः) होता आणि त्यामुळे नाकाडाचं रेफ्लेक्शन दिसत आहे.
21 Sep 2008 - 10:26 am | प्रभाकर पेठकर
दूसरं काय असणार ह्याचे उत्तर माझ्या जवळ नाही.
पण गुवाहाटी कडून कलकत्याला येताना लेखिका पूर्वेला बसली होती म्हणते आहे. विमानाची पोझीशन साधारणपणे नॉर्थ-ईस्ट कडून साऊथच्या दिशेने असणार. जिथून फोटो काढला आहे त्याच्या अगदी विरूद्ध दिशेला सूर्य आहे. बसण्याच्या जागेपेक्षा टर्बाईन्स खालच्या लेव्हल वर असल्या मुळे पश्चिमेकडून येणारा प्रकाश विमानाच्या खालून टर्बाईनवर पडला आहे. म्हणून मी नाकाडाच्या 'प्रतिबिंबा'बाबत साशंक आहे. विमानाच्या पोटाशी असणार्या एखाद्या वस्तुची/उपकरणाची सावली असू शकेल.
तसेच, टर्बाईन बाह्यवक्र आहे, अंतर्वक्र नाही. त्यामुळे नाकाडाचे प्रतिबिंब/सावली इतकी लहान येऊ शकणार नाही असे वाटते.
21 Sep 2008 - 11:29 am | ऋषिकेश
फोटू क्लासच!!! नॉन-एस्-एल्-आरच्या मानाने तर अप्रतिम!
बाकी पेठकरकाका,
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की सूर्य २-३ दिवस सोडल्यास कधीही एक्जाक्ट पश्चिमेला मावळत नाहि :) उत्तरायण चालू आहे की दक्षिणायन त्यावरून अनुक्रमे नैऋत्य आणि वायव्य दिशेस सूर्य मावळेल. आता करा गणित ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
21 Sep 2008 - 10:50 am | प्रकाश घाटपांडे
यु एफ ओ च असणार! विक्षिप्त आदितील ते कसे दिसणार? खगोलाची दुर्बिण तिथे उपयोगाला येत नाही कल्पनेच्या दुर्बिणीतुन पहावे लागते. ;)
अवांतर- दिली का काडी लाउन त्या युफओची आन ही कल्पी कोण? कुणी कुजबजुतय वाटत तिकडे कि भास? जाउ द्या !भासच तो.
प्रकाश घाटपांडे
21 Sep 2008 - 11:33 am | नीधप
नाकाडाची प्रतिमा असणं शक्य नाही. नाकाडाची सावली येऊ शकली असते त्या परिस्थितीत कारण नाकाडाच्या पल्याडहून विमानाच्या डाव्या पंख्याच्या भागांवर प्रकाश पडलेला आहे. पण ती सावलीही नाहीये.विमानाच्या डाव्या खिडकीतून काढलेला फोटो आहे. विमानाच्या डायगोनली (मराठी? तिरप्या चालेल?) मागच्या उजव्या बाजूला सूर्यास्त होता.
नाकाडासदृश दिसणारा तो भाग खरंच नाकाडासदृश पण आकाराने खूपच लहान असा विमानाचा भागच आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
21 Sep 2008 - 9:58 am | भाग्यश्री
अज्जुका वेलकम हिअर!!
फोटो खुप आवडला..
21 Sep 2008 - 6:38 pm | चतुरंग
एकदम अनोख्या कोनातून दिसणारे मावळतीचे रंग छान वाटतात.
चतुरंग
21 Sep 2008 - 10:06 pm | प्राजु
अतिशय आवडलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Sep 2008 - 1:09 am | शितल
फोटो केवळ सुंदर काढला आहे.
:)
22 Sep 2008 - 5:41 pm | झकासराव
अरे वा!
अज्जुका आलीस का इथे?? (हा त्या बीरबलाच्या आंधळे मोजण्याच्या कथेतील एक प्रश्न :))
फोटो मस्त आहे. पण ते विमानाचा पन्खा आणि एन्जिन उगाच मधे आलय. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao