गाभा:
येत्या जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ला अर्थातच १८ जुन दरवर्षीप्रमाणे स्वराज्य राजधानी किल्ले श्री रायगडावर श्रीशिवराज्याभिषेकदिन साजरा होणार आहे. त्यासाठी मी हि जाणार आहे. तर आपल्या मिपाकरांपैकी कोणी येणार आहेत काय? असल्यास भेटता येइल, यासाठी हा लेखन प्रपंच.......
प्रतिक्रिया
2 Jun 2016 - 4:32 pm | प्रचेतस
मला गर्दी सहन होत नसल्याने मी येणार नै.
2 Jun 2016 - 4:52 pm | महासंग्राम
हेच म्हणतो मी
2 Jun 2016 - 7:53 pm | स्वच्छंदी_मनोज
हेच म्हणतो मी.
रायगड गर्दीविना, म्हणजे अगदीच चुकार ५-१० लोक गडावर, असा बघीतला असल्याने भयंकर गर्दीच्या जत्रेला जाववत नाही, तस्मात आमचा पास.
तुम्ही जा आणी आम्हाला फोटो शेअर करा.
3 Jun 2016 - 6:06 pm | वेल्लाभट
मलाही असं वाटतं, पण तो जो माहोल तयार होत असेल, जो ऐकलाय, फोटोतून पाहिलाय, तो विनागर्दीचा मिळायचाच नाही. त्यामुळे एकदा ते वातावरण अनुभवायला का होईना, जायचंय राज्याभिषेकाला.
3 Jun 2016 - 6:53 pm | रमेश भिडे
'सहन न होण्या'कडे कंपू चे लक्ष गेलेलं दिसत नाही.
नेमकं काय होतं ओ गर्दी सहन होत नाही म्हणजे ? ;)
2 Jun 2016 - 4:50 pm | रोहन अजय संसारे
मी आहे ६ जुन व १८ जुन ला पन
3 Jun 2016 - 9:40 am | अनिरुद्ध प्रभू
कुणीतरी येत आहे......रोहनराव भेटु आपण....
3 Jun 2016 - 9:42 am | डॉ सुहास म्हात्रे
जाऊन आल्यावर इथे तुमच्या अनुभवावर लेख आणि मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर टाका !
3 Jun 2016 - 9:45 am | यशोधरा
मुख्य म्हणजे भरपूर फोटो जरूर टाका ! >> गडाचे फोटो.
3 Jun 2016 - 10:10 am | अनिरुद्ध प्रभू
जरुर लेख लिहीन.....गडाच्या फोटोंसह.......
3 Jun 2016 - 7:18 pm | सूड
गडाचे फोटो हे महत्त्वाचं!!
4 Jun 2016 - 8:56 am | नमकिन
योग येतोय.
या वर्षी माझ्या छकुलीसोबत जायचा विचार आहे.
बघू या भेट झाली तर, आम्ही नीलमकडे थांबतो गडावर.
4 Jun 2016 - 9:18 am | अनिरुद्ध प्रभू
अवश्य भेटु आपण...
20 Jun 2016 - 5:04 pm | नमकिन
निर्विघ्न पार पडला .
पावसानेही काही व्यत्यय आणला नाहीं. सहकुटुंब अनुभव घेतला. मुलीचे (४ वर्ष) ९ वारी, फेटा या पेहरावात सर्व शिवभक्तांनी आवर्जुन छायाचित्र घेतली , इतके की शेवटी तिला कडेवर घेऊन फिरावे लागले.
पुढील वर्ष महत्त्वाचे जसे ५०० कोटी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यावर परिस्थिति अजुन सुधारेल.
समितीच्या कार्यकर्ता यांचे अनंत आभार!