उद्या आपल्या लाडया राणीचा वाढादिवस. गेली ८०+वर्षे सेवा देणारी ही राणी अपवादात्मक परिस्थिती वगळता नेहमीच धावली आहे. मधे रेल्वेने हिचा डायनर कार डबा काढल्यावर लोक संतापली पण आता पुन्हा जोडलाय डबा. बाकी राणीची शान हल्ली जरा झाकोळलेली वाटते आता राणीला नव्हे तिच्या मालकांना राणीवर जाहिराती लावुन पैसे कमवायची दुर्बुद्धी झाल्ये.
असो.तर महत्वाच हे की ऊद्या पुणे येथे सकाळी ७ वाजता राणीचा वाढदिवस साजरा होणार आहे.तसाच सोहळा छशिट येथेही आसतो का हे विचारणे हा आहे.जाणकारांच्या मताच्या प्रतिक्षेत.
टिप- हा लेख केवळ जिलबी टाकावी म्हणुन लिहलेला नाही.
प्रतिक्रिया
31 May 2016 - 7:47 pm | मी-सौरभ
आमी कधीच डेक्कन क्विन ने प्रवास केलेला नाही.
आम्च्या लाडक्या गाड्या म्हणजे सह्याद्री आणि कोयना
तळेगावकर,
सौरभ
31 May 2016 - 7:57 pm | प्रणवजोशी
आहो मी पण माझ्या गेल्या २५ ळर्षाच्या आयुष्यात फक्त २ वेळा प्रवास केलाय डेक्कन क्विनने.
31 May 2016 - 8:16 pm | मराठी कथालेखक
गाडी सारखी गाडी.. तिचं काय बरं इतकं कौतूक..
हे वाचा
31 May 2016 - 10:43 pm | खेडूत
लाड्या राणी म्हणजेच डेक्कन क्वीन हे आताच कळले.
आपण मराठी लोकांनी छत्रपति शिवाजी टर्मिनस असा पूर्ण उल्लेख करावा असं आपलं वैयक्तिक मत...
31 May 2016 - 11:22 pm | गामा पैलवान
प्रणवजोशी,
राणीची ऐट बघण्यासारखी असते. मी ठाण्याचा. ठाण्याहून माथेरानला सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येतं. संध्याकाळी पाचला वरून निघालं की साडेसहाच्या सुमारास नेरळच्या जवळ यायला व्हायचं, तेव्हा बरोब्बर राणी कर्जतकडे डौलदारपणे सळसळत जातांना दिसायची.
बाकी राणी म्हणजे रोजच्या प्रवाशांचं दुसरं घरच असल्यासारखं होतं. माझ्या ओळखीतले एक आहेत. ते दररोज पुणे मुंबई करायचे. डेक्कन-टू-डेक्कन काम करायचे. सरकारी कचेरी असल्याने चालून गेले. खाजगी कामकरी एखाददोन रात्री लॉजवर काढायचे.
आ.न.,
-गा.पै.
1 Jun 2016 - 10:11 am | अनिकेत वैद्य
छशिट येथेही आसतो
दुपारी साधारण ४:३० च्या सुमारास छशिट येथे फलाट क्र. ९ किन्वा ११ वर असा सोहाळा असतो.
जरूर जा आणि फोटो काढून येथे लावा.
1 Jun 2016 - 12:37 pm | मराठी_माणूस
प्रतिसादातुन कळले. लेखातुन "लाडया राणी" म्हणजे कोण हे कळले नव्हते.
1 Jun 2016 - 7:00 pm | परिंदा
या डेक्कन क्वीन मधले पासधारक माजोरडे असतात. कितीही लवकर जाऊन जागा पटकवा, हे लोक टोळक्याने येऊन जोरजबरदस्ती करुन उठवतात.