विवाह जुळवताना पत्रिकेला किती महत्व देता?

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
25 May 2016 - 10:00 am
गाभा: 

कुणाच्याही आयुष्यात विवाह ही मोठी घटना असते. एखादे स्थळ आल्यावर हा निर्णय घेताना ती व्यक्ती व कुटुंब अनेक बाबी विचारात घेते. त्यापैकी पत्रिका जुळणे हा एक मुद्दा असतो. आपण स्वत:च्या किंवा मुलामुलीच्या नातेवाईकांच्या लग्नात पत्रिकेला किती महत्व देतो हे जाणुन घेणे हा उद्देश या कौलाचा आहे.पोल ची सुविधा इथे आता अस्तित्वात नाही. पण खालील पर्याय निवडू शकता
१) पत्रिका पहायचीच आहे
२) आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही
३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे.
४) आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2016 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनीही पहायची नाही, असे स्थळ हवे आहे.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

25 May 2016 - 10:10 am | सतिश गावडे

या पर्यायावर ठाम राहणार असाल तर पस्तावाल. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2016 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पत्रिका पाहुन खुशच असलेल्या पालकांचा पत्ता हवा आहे.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

25 May 2016 - 11:13 am | सतिश गावडे

हाहा.

माझा एक मित्र म्हणतो, "लोक बाकी सारे जुळत असूनही फक्त पत्रिका जुळत नसेल तर नकार देतात. मग फक्त पत्रिका जुळत असेल तर बाकीच्या गोष्टी न पाहता होकार का देत नाहीत?"

मुक्त विहारि's picture

27 Feb 2021 - 4:09 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

टवाळ कार्टा's picture

25 May 2016 - 10:44 am | टवाळ कार्टा

अता या वयात??? =))

सतिश गावडे's picture

25 May 2016 - 11:09 am | सतिश गावडे

त्यांनी त्यांच्यासाठी असं कुठं लिहिलं आहे?

साहेब..'s picture

25 May 2016 - 10:13 am | साहेब..

१) पत्रिका पहायचीच आहे

सुबोध खरे's picture

25 May 2016 - 10:27 am | सुबोध खरे

पत्रिका"च" पहायची आहे
मुलगा /मुलगी पाहिली नाही तरी चालेल
);):):):):

असंका's picture

25 May 2016 - 10:29 am | असंका

मुलगा आमचा असेल तर 2.

मुलगी आमची असेल तर शक्यतो 3.

पत्रिका तयार करणे आणि जुळवणे यासाठी ज्योतिषशास्त्रात काही basic eligibility criteria असतो का ?

माझ्या लग्नाच्या वेळी आमच मत दुसऱ्या क्रमांकाच होतं. गंमत अशी की माझी जी पत्रिका बायकोच्या पत्रिकेशी जुळली ती पत्रिकाच आमच्या ज्योतिषाने चुकीची बनवली होती असे नंतर दुसऱ्या ज्योतिषाकडून कळाले.
आता कोण खरं बोलतोय देवाला माहिती.

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2016 - 10:47 am | प्रकाश घाटपांडे

जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख या बाबी ज्योतिषाला पुरवल्या तर त्यावरुन तो पत्रिका तयार करतो. तो या गोष्टी व्हेरीफाय करु शकत नाही.

जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख याविषयी एकाच माहिती दोन्ही ज्योतिषांना पुरवली होती. एकाच माहितीवरून दोन वेगळ्या पत्रिका बनल्या.

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2016 - 12:01 pm | प्रकाश घाटपांडे

सायन व निरयन पद्धतीच्या पत्रिका वेगळ्या येतात. पण एकाच अयनांशाच्या पत्रिका वेगळ्या येउ नये.

उपयोजक's picture

25 May 2016 - 8:21 pm | उपयोजक

क्रुष्नमुर्ति पध्दतित आयुष्यातल्या घडुन गेलेल्या काहि घटनांवरुन
अचुक जन्मवेळ काढता येते.(Birth time rectification)

खटपट्या's picture

25 May 2016 - 10:33 am | खटपट्या

"पत्रिका" ते काय असतं?

शाम भागवत's picture

25 May 2016 - 12:36 pm | शाम भागवत

लग्नपत्रिका असते ना? तर ती बनवण्यासाठी जो कच्चा मसुदा बनवला जातो त्या कच्या मसुद्याला कदाचित "पत्रिका" म्हणत असावेत.
:-))

खटपट्या's picture

25 May 2016 - 8:07 pm | खटपट्या

नाय ओ शाम काका, लग्नपत्रिकादेखील बनवली नाही कधी...

शाम भागवत's picture

25 May 2016 - 8:21 pm | शाम भागवत

:-))

मी हरलो ब्बॉ.

टवाळ कार्टा's picture

25 May 2016 - 10:45 am | टवाळ कार्टा

३/२

सुनील's picture

25 May 2016 - 10:59 am | सुनील

स्वतःच्या लग्नात पत्रिका बघितली नव्हती. (कै वाईट झालं नै, अद्यापतरी!!)

अपत्याची पत्रिकाच बनवलेली नाही!!

मृत्युन्जय's picture

25 May 2016 - 11:13 am | मृत्युन्जय

आम्हाला लाख बघायच्या असतील हो पत्रिका आणि मुली पण बायको बघु देइल तर ना

जेपी's picture

25 May 2016 - 11:21 am | जेपी

1)पत्रिका पाहयचीच आहे.
अर्थात हे जोडीदार निवडीपुरत.पत्रिका जुळलीच पायजे अस कै नै.
कोणी माझी पत्रिका मागतली तर देत नै जा सांगेन..

प्राची अश्विनी's picture

25 May 2016 - 11:24 am | प्राची अश्विनी

पर्याय 3
पत्रिका न बघता झालेले आमचे तिसऱ्या पिढीतील लग्न. आजीआजोबा, आई बाबा यांनी सुद्धापत्रिका न पहाता लग्न केले होते.

आणि घटस्फोट झाला तर काय करावं? ज्योतिषांविरुद्ध malpractice चा दावा करता येतो का? यायला पाहिजे.

किसन शिंदे's picture

25 May 2016 - 11:30 am | किसन शिंदे

=))

वर्षभरामागे मावशीच्या मुलाचं लग्न झालं. लग्न जुळवताना पत्रिका पाह्यली तेव्हा ३२ कि कायसे गुण जुळत होते. पण वर्षभरातच एकमेकांचे स्वभाव न पटल्यामुळे घटस्फोट घ्यावा लागला.

चिनार's picture

25 May 2016 - 11:32 am | चिनार

नाही !! त्यासाठी एक standard उत्तर ठरलेलं आहे.
"आम्ही फक्त अंदाज वर्तवतो. बाकी तुमच्या पूर्वजन्माचे संचित !"

अभ्या..'s picture

25 May 2016 - 11:32 am | अभ्या..

ज्योतिषी इन्पुटसकडे बोट दाखवून मोकळे होतील. लै चाब्रे.

बाबा योगिराज's picture

25 May 2016 - 11:33 am | बाबा योगिराज

आम्ही पत्रिका बघितली नव्हती. आणि पाहणार हि नाही.

अत्रन्गि पाउस's picture

25 May 2016 - 11:36 am | अत्रन्गि पाउस

काहीहि करतांना काहीच बघू नये ...
हवामान बघतांना वेधशाळेचा अंदाज बघू नये
गुंतवणूक करतांना कम्पनीचा ताळेबंद बघू नये
मत देतांना उमेदवार किंवा पक्षाचा जाहीरनामा बघू नये
निवडणुकीचे एग्झीट पोलचे अंदाज बघू नये ...मांडू हि नये

प्रकाश घाटपांडे's picture

25 May 2016 - 12:03 pm | प्रकाश घाटपांडे

समाजातले किती टक्के लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात व त्यावर अवलंबून निर्णय घेतात असे आपले मत आहे?

१) पत्रिका पहायचीच आहे -- ४० %
२) आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही -- २५%
३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे.-- १५%
४) आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे. -- २०%

सांगायचा मुद्दा असा की, इच्छा असो वा नसो ८५ % टक्के लग्न पत्रिका पाहून होतात.
हा माझा अंदाज आहे. कुठलाही विदा उपलब्ध नाही.

सतिश गावडे's picture

25 May 2016 - 12:46 pm | सतिश गावडे

हे अंदाज तुम्ही कसे बांधलेत? :)

चिनार's picture

25 May 2016 - 1:44 pm | चिनार

स्वत: चे लग्न जुळवताना आलेल्या अनुभवावरून !!

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2016 - 12:47 pm | प्रसाद गोडबोले

समाजातले किती टक्के लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात व त्यावर अवलंबून निर्णय घेतात असे आपले मत आहे?

हा प्रश्न फारच गोलमोल आहे ! समाज म्हणजे काय ? अहो इथे प्रत्येक जात अन धर्म स्वतःला समाज म्हणते , ब्राह्मण समाज , मराठा समाज , जैन समाज, मारवाडी समाज , बौध्द समाज . बौध्द समाज तर लग्नाला लग्न देखील म्हणत नाही म्हणे !

मी काय म्हणतो आपण असे करुयात का की सर्वे मंकी https://www.surveymonkey.com/ वरुन एक क्वश्चनेयर काढु आणि मते घेवु ?

खालील प्रश्न मी सुचवतो :

१) आपला धर्म काय ?
२) आपली जात काय ?
३) आपले लिंग काय?
४) आपले वय काय ?
५) आपली सध्याची वैवाहिक स्थिती काय ?
६) आपले सिक्षण काय ?
७) आपली आर्थिक परिस्थीती काय ?
८) लग्न करताना पत्रिका पहाणे आपल्याला किती महत्वाचे वाटते ?
९) फक्त पत्रिका जुळत नाही ह्या कारणावरुन आपण आपल्याला मनापासुन आवडलेले स्थळ नाकाराल का ?
१०) पत्रिका जुळतच नसली तर किती वर्षे लग्नासाठी वाट पहायची आपली तयारी आहे ?

वगैरे वगैरे !

यमगर्निकर's picture

25 May 2016 - 12:59 pm | यमगर्निकर

पर्याय क्र: १, बाकि शादि का लड्डु खाये वो पछताये और ना खाये वो भी पछतये.

यमगर्निकर's picture

25 May 2016 - 1:01 pm | यमगर्निकर

पर्याय क्र: १, बाकि शादि का लड्डु खाये वो पछताये और ना खाये वो भी पछतये.

ज्योतिषी लोकांचाच स्वत:च्याच शास्त्रावर विश्वास नसल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पत्रिका जुळवण्याचा खटाटोप करणे. अरे तुझ्या कुंडलीत जसे योग असतील तशीच मुलगी /मुलगा मिळणार असं ठामपणे का नाही सांगत?

IT hamal's picture

25 May 2016 - 3:42 pm | IT hamal

आधी मुलगी पटवायची ...तितका दम नसेल तर ठरवून पटवायची...नंतर पत्रिका जुळवून देणारे हजारो भेटतात !!! जसे कुठल्याही ऋतू /महिन्यात मुहूर्त काढून देणारे आहेत....कुठल्याही ग्रहाचा/ताऱ्याचा अस्त आहे असे आधी declare करून नंतर त्या काळात ही लग्नमुहूर्त काढून मिळतात ....अगदी तस्सेच कुठल्याही २ पत्रिका जुळवून ही देणारे हजारो आहेत....दक्षिणा जास्त मोजा...सगळी कामं होतात !!!

हा विदा गोळा करून काय करणार आहात?

नाखु's picture

25 May 2016 - 3:51 pm | नाखु

आधी पाडलेल्या विदा प्र्श्नभेंडोळ्यांच निदान्/वाळवण काय झालं याची ज्याम उत्सुकता आहे.

मला आठवलेले असे दोन एक.धार्मीकतेबाबत होता दुस्रा विवक्षीत क्ष्क्ष्क्ष्क्ष बघतात का त्यावर होता.

ना विदा वाळव्ण दिसले ना विदाकार.

मिपा बंदा (वारकरी) नाखुस चिल्लर

पत्रिका, ज्योतिष, मुहुर्त इत्यादीवर अजिबात विश्वास नाही. कधीच कुठलाही निर्णय घेताना या पैकी कशावरच विसंबून राहीले नाही.
या विषयाच्या अभ्यासकांचा उपमर्द करायचा हेतु नाही. पण हे माझे मत आहे.
माझी पत्रिका आहे . माझ्या मुलाची पण केलेली आहे (वडिलांनी करून घेतली आहे). पण त्याचा उपयोग करायची वेळ कधी आलेली नाही .

लग्नं जुळवताना एखादा मुलगा/मुलगी पसंत नसेल, तर पत्रिका जुळत नाही असे कारण सांगणे सोयीस्कर असते असा अनुभव आहे.,:)

शाम भागवत's picture

25 May 2016 - 5:14 pm | शाम भागवत

लग्नं जुळवताना एखादा मुलगा/मुलगी पसंत नसेल, तर पत्रिका जुळत नाही असे कारण सांगणे सोयीस्कर असते असा अनुभव आहे.,:)

:-))

नाईकांचा बहिर्जी's picture

25 May 2016 - 6:07 pm | नाईकांचा बहिर्जी

मला वाटते ज्योतिषी भावनाशी खेळतात अन त्यात भूगोलाचा मोठा भाग असतो उदा

मुंबई (पोरगे रोज बेलापुर ते बोरोली अपडाउन करुन पिचलेले)

"थोड़ा जरा हा अमुक ग्रह त्या घरात शिफ्ट होऊ दे जबरदस्त ग्रहयोग होईल अगदी प्रॉपर वेस्टर्नला किफायतशीर डील मिळेल अन स्वतःचे घर होऊन जाईल

पुणे (हा अनुभव आहे आतेभावाच्यावेळचा)

"थोड़ा ज़रा हा ग्रह ब्ला ब्ला ब्ला पोरगा ऑनसाइट जातोय बघा"

"अहो पण....."

"नाय नाय चुकले तर हा पठ्ठा पत्रिका पाहणार नाही"

"पोरगे स्वतःचा वर्कशॉप चालवते हो मांजरीत ....IIT नाही तो ITI आहे"

"........."

ज्या गावात जी चलती आहे तो दिलासा दिल्या जातो असे वाटते तरी मी पत्रिका दाखवतो! सालं दुनिया शिव्याच देते अन तुझं काही होणार नाही म्हणते कोणीतरी (पैसे देऊन का होईना) तुमच्या बद्दलच चांगले तरी बोलतोय न ! घ्या ऐकून हूँ हूँ करत. असो.

श्रीगुरुजी's picture

25 May 2016 - 7:17 pm | श्रीगुरुजी

पत्रिकेवर थोडासा विश्वास आहे. म्हणजे लग्न जमविताना मी गुणांवर भर न देता जन्मराशीवर भर देतो. आक्रमक असलेल्या मेष व सिंह राशीचे नवराबायको असतील तर कायम खटके उडतात. अत्यंत पॅसिव्ह असलेल्या मीन/कर्क राशींचे नवराबायको असतील तर दोघेही पॅसिव्ह असल्याने कोणत्याही प्रसंगात निर्णय घेणे कठीण जाते. मीन राशीच्या व्यक्तीला मेष सारख्या खमक्या राशीचा जोडीदार मिळाला तर दोघांचे व्यवस्थित जमते. वृषभ व तूळ राशीसारख्या रसिक, कलाप्रिय राशींच्या व्यक्तीचा जोडीदार मकर सारख्या कठोर, मेहनती, अरसिक राशीचा असेल तर त्यांचे जमत नाही.

अवांतर -

ज्योतिषांचे अंदाज बरोबर येण्याचे प्रमाण हवामान खात्याचे अंदाज बरोबर येण्याच्या तुलनेत खूपच जास्त आहे. परंतु ज्योतिषाला "शास्त्र" म्हणायला विरोधकांचा तीव्र विरोध असतो तर हवामानाचे अंदाज व्यक्त करणार्‍या कृतीला "हवामानशास्त्र" असे संबोधिले जाते.

राशी-स्वभावा बद्दल नेहमीच ( वुईथ ड्यु रिस्पेक्ट ) गंमत वाटत आली आहे. दोन मीन राशीतले नवरा बायको चांगलेच खमके पाहिले आहेत. निर्णय प्रक्रिया पण दोघांची सारखी आणि थेट असते. मीन राशीतील एक मुलगी मकर राशीच्या तिच्या नवर्‍यापेक्षा भरपूर धडाडीची आहे. एक मकर आणि तूळ कपल पण माहिती आहे आणि मकर जास्त रसिक आहे तूळ नवर्‍यापेक्षा.

बाकी ज्योतिषी आणि पत्रिकेबाबत मी नेहमी तळ्यात मळ्यात असते पण राशीस्वभाव मात्र अजिबात पटत नाहीत.

उगा काहितरीच's picture

25 May 2016 - 7:17 pm | उगा काहितरीच

क्रमांक 2 . रच्याकने अस्मादिकांची जन्मवेळ वगैरे कुठूनतरी मिळवून, परस्पर पत्रिका बनवून , त्यांच्या मुलीशी जुळवून मग फोन केलेले पण महाभाग पाहिलेत. असे असेल तर काय करणार ? ;-)

विवेकपटाईत's picture

25 May 2016 - 7:54 pm | विवेकपटाईत

माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी न मी पत्रिका मागितली न दाखविली. नवर्या मुलाला एकच प्रश्न विचारला होता. मला निर्व्यसनी जवाई पाहिजे. पान, बीडी, तम्बाकू, दारू न पिणारा. पगार सुद्धा विचारला नाही. (काहींनी कटकट केली पण कुणाला दाद दिली नाही).

चौकटराजा's picture

27 May 2016 - 9:28 am | चौकटराजा

विज्ञानात दोन वेगगेगळ्या पद्धती वापरल्या तर हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वेगवेगळे येते का ....? नाही असे येत असेल तर पर्यावरण वाद्यांच्या तोण्डावर ती पद्धत फेकू ज्यात हवेतील ऑक्सीजनचे प्रमाण ४० टक्के असेल.

ज्या त्या गोष्टी ह्या ज्या त्या विषयातील तज्ञांकडून करून तपासून पारखून घ्याव्या लागतात...प्रत्येकाने असा माणूस शोधला पाहिजे...पन्नास पाट्या, रोज पानभर जाहिराती करणारे किती ज्ञानी असतील कोणास माहिती??? मला मात्र असा माणूस भेटला ज्याचे ना नाव माहिती होते नाही कोठे जाहिरात...माझी पत्रिका पाहून त्या माणसाने ज्या गोष्टी फक्त मलाच माहिती आहेत त्या सर्व गोष्टी मला सांगितल्या फक्त पत्रिकेचा अभ्यास करून...त्यासाठी त्यांनी बरेच दिवस मेहनत घेतली होती...माझाही आधी यावर विश्वास नव्हता पण ..ज्या गोष्टी फक्त मलाच माहिती आहेत त्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्या त्यावरून मग मला विश्वास ठेवावाच लागला.. पन्नास रिपोर्ट पाहून पण डॉक्टरांना रोगाचे निदान करता येत नाही...प्रत्येक वेळी सगळ्या नवीन तपासण्या करा...मग बघतो मला काय कळतंय का...त्या पेक्षा हे बरं... आणखी एक माणूस जर योग्य असेल तर तुम्हाला तो सर्व काही सांगू शकतो...आयुष्यात येणारे प्रसंग घडून गेलेल्या गोष्टी..सर्वकाही...फक्त तसा माणूस शोधायला हवा...पत्रिकेचा अभ्यास करणे हे ज्याचे आवडते काम आहे अशा माणसाकडे जावे...वेळ जात नाही म्हणून फावल्या वेळेत पत्रिका पाहतो खी खी खी.. अशा माणसांकडे किंवा 1 प्रश्न 100 रुपये आधी पैसे मग प्रश्न असल्या लोकांकडे न गेलेले बरे...खरी ज्ञानी मंडळी कधीच पैशाची अट अथवा अपेक्षा ठेवत नाहीत...पण ज्योतिष विद्या फुकट घेऊन नये म्हणून तुम्ही जे द्याल ते ती मंडळी घेतात...निदान मला जो माणूस भेटला तो तरी असाच आहे...म्हणून पत्रिक पाहणे हे कधीही उत्तमच...जरुरीच्या वेळीच...लग्नासाठी...गाडी घेताना...घर घेताना...ठीक आहे...रोज उठून आज मी कामावर जाऊ कि नको...अंघोळ करू कि नको...असल्या कारणासाठी पत्रिका बघत बसणे मूर्खपणाच होय....

शाम भागवत's picture

31 May 2016 - 10:16 am | शाम भागवत

@mandarbsnl

अशी माणस भेटण दुर्मीळ झालेय. बर ती माणसे स्वतःची जाहिरातही करत नाहीत. त्यांचे नाव त्यांना न विचारता कोणाला सुचवले तर त्यांना ते आवडतही नाही. शिवाय अशा माणसांमुळे आपल्याला जे अनुभव येतात त्यामुळे आपला जरी ज्योतिष शास्त्रावर विश्वास बसला तरी ते चारचौघात बोलूनही दाखवता येत नाही. अन्यथा आपली टिंगल ठरलेलीच. असो.

पण जर असा माणूस भेटला व फलज्योतिषा बरोबरच त्याचा ज्योतिषशास्त्रातील अध्यात्मिक संकल्पनाचाही अभ्यास असेल तर मात्र येणार्‍या अडचणींसाठी सातत्याने मार्गदर्शन घेण्याऐवजी त्याच्याकडून कायमस्वरूपाची उपासना घेणे ईष्ट असे आपले मला वाटते. अशी अधिकारी माणसे ज्योतिषशास्त्राच्या द्वारे मार्गदर्शन करताना ज्योतिषशास्त्रातील एक महत्वाचा नियम पाळतात. तो म्हणजे
"काय करायचे ते सांगायचे. का ते सांगायचे नाही."

.पण ज्योतिष विद्या फुकट घेऊन नये म्हणून तुम्ही जे द्याल ते ती मंडळी घेतात

हे मात्र पटलेले नाही. अजिबात नाही म्हणणारे मी पाहिलेले आहेत. इतकेच काय इतरांकडचे जेवण किंवा पेढे बर्फी कोणी आणले तर लागलीच तिथल्या तिथे वाटून टाकतात पण स्वतः काही घेत नाहीत.