गाभा:
ब्रेडमुळे कॅन्सर होऊ शकतो
भारताच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या चौकशीनुसार ब्रेड व इतर बेकरी उत्पादनामध्ये कर्करोगकरक रसायने वापरली जात असल्याचे दिसून आले आहे.
पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेटचा सढळ हस्ते वापर केला जातो
या रसायनावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली
या पुढे मिसळ-पाव न खाता फक्त मि़सळ खावी लागणार
प्रतिक्रिया
24 May 2016 - 10:27 pm | जेपी
नोबेल साठी शिफारस करावा असा लेख!
(नो बल ) जेपी
24 May 2016 - 10:40 pm | रमेश भिडे
संकेत स्थळाचे नाव झुणकाभाकर/ वडाश्याम्पल/ बैदाचपाती वगैरे काही ठेवायचा प्रस्ताव ठेवताय काय? नुसती मिसळ ठेवून उपयोगाची नाही. 'ती' मिसळ च्या जोडीला 'तो' पाव हवा च!
25 May 2016 - 8:24 am | चलत मुसाफिर
चपाती, भाकरी, आंबोळी, पुरी, घावन इ. पर्यायांचाही विचार व्हावा
24 May 2016 - 11:23 pm | फुंटी
पातांजली चा ब्रेड येतोय बहुतेक...
24 May 2016 - 11:43 pm | चित्रगुप्त
हानिकारक रसायने असली किंवा नसली तरी मुळात ब्रेडच अत्यंत हानिकारक असतो. अगदी कॅन्सर होत असेल तरच एकादा पदार्थ हानिकारक, असे नसून मलावरोध, आतड्यांमधे घाण साठत जाणे, असे अनेक रोगांचे मूळ असणारे त्रास ब्रेड (व मैद्याचे अन्य पदार्थ-)मुळे होत असतात.
25 May 2016 - 12:14 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
आपल्या रोजच्या वापरातले बरेचसे पदार्थ कार्सिओजेनिक आहेत ,फक्त ब्रेडलाच का दोष द्यायचा ,पण तरीही बेकरी प्रॉडक्ट्स टाळावेत.
25 May 2016 - 12:16 am | खटपट्या
जॉन्सन अँड जॉन्सन ची पावडर वापरल्यामुळे ओवरीज चा कॅन्सर होतो हे ऐकले होते. खालील लिंकवर अधिक माहीती..
https://www.drugwatch.com/talcum-powder/lawsuits/
बाकी ब्रेड खाल्ल्यामुळे कॅन्सर होत असता तर मी आतापर्यंत मरायला पाहीजे होतो...
25 May 2016 - 6:43 am | उगा काहितरीच
सिगारेट मुळे कर्करोग होतो पण प्रत्येक सिगारेट पिणार्याला कर्करोग होतोच असे नाही. बाकी ब्रेड/पाव नसेल तर ब्याचलर लोकांचे किती हाल होतील ? पहिले मॕगी आता ब्रेड स्वयंपाक शिकावा लागेल बहुतेक :-(
25 May 2016 - 7:35 am | नाईकांचा बहिर्जी
पोटैशियम ब्रोमेट बॅन करण्याबद्दल सरकार ने पावले उचलली आहेत आता पुढे बघायचे काय काय होते.
त्वरीत एक्शनचा विचार केल्या बद्दल FSSAI अन केंद्र सरकारचे हार्दिक अभिनंदन
25 May 2016 - 10:03 am | तिमा
एका वार्ताहराने काल, आयोडेट स्पेलिंग मधल्या 'I' "L" समजून पोटॅशियम लोडेट असं लिहिलं होतं!
पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडेटचा सढळ हस्ते वापर केला जातो
हे वाक्य गैरसमज वाढवणारे आहे. ही रसायने प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरली जातात आणि ती % मधे न वापरता पार्टस पर मिलियन इतक्या कमी मात्रेत वापरतात. जास्त वापरली तर बेकरीवाल्यांनाच परवडणार नाही.
माझी स्वतःची बेकरी नाही.
25 May 2016 - 10:30 am | मार्मिक गोडसे
प्रिझर्व्हेटिव्ह नव्हे, पावाला अधिक फुगिरता व एकसमानता येण्यासाठी वापरले जाते.
25 May 2016 - 11:02 am | सुबोध खरे
हि रसायने प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरली जात नाहीत तर ऑक्सिडायझिंग एजंटस म्हणून वापरली जातात. ब्रोमेट किंवा आयोडेट जेंव्हा तापवले जातात तेंव्हा त्यातून ऑक्सिजन वायुरूपात बाहेर पडतो आणि त्यामुळे पाव फुगून येतो. हि रसायने पाव पूर्ण भाजला गेला तर विघटन पावून ब्रोमाईड किंवा आयोडाइड या स्वरुपात राहतात याचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही पण पाव नीट भाजला गेला नाही तर हीच रसायने ब्रोमेट/ आयोडेट स्वरुपात पावात शिल्लक राहतात आणि ती आपल्या सेवनात आल्यामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
हि रसायने भारतात आणि अमेरिकेत वापरणे अजून हि कायदेशीर आहे. युरोपात किंवा इतर काही देशात यांच्या वापरावर बंदी आहे. आता सरकार या रसायनांच्या वापरावर बंदी आणण्याच्या विचारात आहे.
25 May 2016 - 11:38 am | तिमा
अचूक माहितीबद्दल आभार.