नक्की कोण कुणाशी स्पर्धा करतेय?

नाखु's picture
नाखु in काथ्याकूट
23 May 2016 - 9:48 am
गाभा: 

या काथ्याकुटाचा संदर्भ नुकतेच वाचनात आलेले दोन लेख:

पहिला

आणि दुसरा सैराट लोकसत्ता

दोन्ही लेखात आधीच लक्ष्य (निषाण) ठरवून बाण मारलाय आणि मग त्या भेवती वर्तुळ काढलयं हे स्पष्ट दिसतेय.

लेख क्रमांक एक मध्ये प्रस्तावनेत स्थंभलेखिका म्हणते हा लेख दोन वर्षांचा लेखाजोखा आहे म्हणजे आधिक उणे या दोन्हींचा परामर्ष घेणे अपेक्षीत आहे. नेमकी हीच बाब अखंड शब्द फापट पसार्यामध्ये सापडत नाही.शिवाय जे काही चुकले असेल त्याचे परिणाम किंवा बरोबर्/उचीत असे काही घडलेच नाही असा दुजाभाव लेखात ठाईठाई दिसतो. मी म्हणत नाही या सरकारकडून चुका झाल्या नाहीत अगदी घोडचुकाही झाल्या पण कारर्कीर्दीचा ताळेबंद मांडताना जमा पण दाखवावीच खर्चाबरोबर.

दुस्र्या लेखात मध्ये मध्ये विनाकारण ब्राह्मण्य असा शब्दच्छल करून मूळ लेखा (विषया)लाच हरताळ फासला आहे. आणि तो सिनेमात कुठले पात्र कुठल्या जातीचे प्रतिनिधीत्व करते यात आपले शहाणपण वाया घालवले आहे.

काही मौक्तीके

तर शहरी मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व प्राप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीशी ‘कनेक्ट’ न होऊ शकलेल्या (म्हणून फेंगडय़ा पायाचा दाखविलेल्या) विजयने प्रेमभंग पचविला आहे

फॅण्ड्री’मध्ये नागराज मंजुळे यांनी भटक्या जब्या व बौद्ध पिराजी यांची दोस्ती दाखविली आहे. ‘सैराट’मध्ये त्यात मुस्लीम सलीम व गरीब मराठा मंग्याची भर पडली आहे. मात्र अजूनही त्यात गावकुसाच्या आत असणारा साळी, तेली, कुंभार, धोबी, सुतार, लोहार या ५२ टक्के ओबीसींची भर पडलेली नाही. ही भर पडल्याशिवाय भौतिक मुक्ती टिकविता येणार नाही.

अता मूळ विषय:

लोकसत्ता मिपा(विचारजंती लेखका/प्रतिसादकांना) शी किंवा उलटपक्षी मिपाच लोक्सत्ताशी अश्या शब्द बुडब्बूडे आणि मोरपिसारा लिखाण्/प्रतिसाद देऊन स्पर्धा करतेय?

मिपाकरांना काय वाटते. वरील लेखांअध्ये लेखकांना नक्की काय म्हणायचे हे मज पामर वाचकांस संक्षीप्तपणे आणि समजेल अश्या भाषेत साम्गीतले तर मज अजाण बालकास(आणि सर्वच वाचनमात्र मिपाकरांसही) आनंद होइल.

बहुपोयोगी लेंग्याच्या नाड्या,दणकट पायपुसणे,चांगली कानकोरणी यासाठीही सुजाण मिपाकर सल्ला देतात तेव्हा अश्या विष्यावर नक्कीच मदत करतील या आशेपोटी हा धागा काढला आहे.

मिपा वाचक नाखु

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

23 May 2016 - 9:52 am | आनन्दा

सध्या पर्याय नाही म्हणून लोक्सत्ता घरात येतो.. म्हणजे काय बाकीच्यांचा स्टँड ते तेव्हढे शहाणे असा असतो, तर लोकसत्ताची भूमिका मी तेव्हढा शहाणा अशी असते.
बाकी तेरेसा नाटकापासून एकंदरीतच वर्तमानपत्र वाअचणे कमी केले आहे.

नाखु's picture

23 May 2016 - 5:10 pm | नाखु

हा लेख जास्त व्यवस्थीत आणि नेमका आहे.

अविनाश धर्माधिकारी (माजी सनदी अधिकारी)

(शब्दांकन : हेमचंद्र फडके)

देशातील सद्यस्थितीचे वर्णन करताना दोन संज्ञा मांडता येतील. एक म्हणजे, कोर्स करेक्शन. स्वातंत्र्यानंतर 67 वर्षे देश एका वाटेवरून पुढे गेला. ती मुख्यतः डावी किंवा लेफ्ट ऑफ दी सेंटर होती. सत्तांतर होऊन मोदी सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये आता ‘कोर्स करेक्शन’ होत आहे. आर्थिक धोरणे, विकासविषयक धोरणे यामध्ये मूलभूत बदल होत आहेत. ते करताना गेल्या 67 वर्षांत साचलेला गाळ, नकारात्मकता किंवा मी त्याला हँगओव्हर म्हणेन तो दूर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही दोन वर्षे म्हणजे देशाचे कोर्स करेक्शन सुरू आहे, असे मी म्हणेन. दुसरी संज्ञा म्हणजे, पॅराडीजम शिफ्ट. स्वातंत्र्यानंतर या देशात काँग्रेस आणि समाजवादी सरकारे सत्तेत राहिली. अपवाद मधील सहा वर्षे अटलजींचे सरकार होते. मात्र, तेव्हाही त्या सरकारने अशी पॅराडाईंग शिफ्टसारखी पावले उचलली नाहीत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांच्याकडे स्वतःचे बहुमत नव्हते. सहकारी पक्षांना सोबत घेऊन जाणे ही त्यांची अपरिहार्यता होती. अटलजींच्या सरकारमधील शिवसेना आणि अकाली दल वगळता इतर सहकारी पक्ष हे डावे किंवा लेफ्ट ऑफ दी सेंटर किंवा कळत-नकळत समाजवादी आर्थिक धोरणे मानणारेच होते. त्यामुळे अटलजींच्या सरकारच्या काळात राज्यकारभार चांगला चालला, आर्थिक सुधारणा आणल्या गेल्या; पण त्याचे वर्णन कोर्स करेक्शन किंवा पॅराडीजम शिफ्ट असे येत नाही. आताच्या सरकारचे वर्णन मात्र तसे करता येईल. कारण, मोदी सरकारकडे स्वतःचे बहुमत आहे. 583 पैकी 282 जागा भारतीय जनता पक्षाच्या आहेत. हल्ली काळ लवकर जातो. सगळे जुने वाटायला लागते; पण दोन वर्षांपूर्वी जे घडले ते ऐतिहासिक होते. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा काँग्रेसेतर सरकारला लोकांनी स्पष्ट बहुमत दिले. हे स्पष्ट बहुमतच ‘कोर्स करेक्शन’ आहे आणि तसेच ते ‘पॅराडाईंग शिफ्ट’चे निदर्शकही किंवा त्याला जनतेने दिलेली परवानगी आहे. म्हणूनच मोदी सरकारच्या दोन वर्षाच्या कार्यकाळाचे मूल्यमापन हे या दोनांच्या संदर्भातच व्हायला हवे.

सरकारच्या कामगिरीचे मोजमाप करताना दोन निकष पाहिले पाहिजेत. एक आहे, सत्तेत येताना सरकारने दिलेली वचने, नेत्यांनी मुख्यतः नरेंद्र मोदींनी वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून दिलेली आश्‍वासने आणि भाजपने दिलेला वचननामा. दुसरा निकष आहे, काळाची गरज आणि लोकांच्या अपेक्षा. यापैकी वचननामा ताडून पाहिला, तर सरकारची वाटचाल तो खरा करण्याकडे सुरू असल्याचे दिसते. ज्याच्याकडे निःपक्षपाती बुद्धी आहे त्याने भाजपचा लोकसभा निवडणुकीच्या वेळचा वचननामा आणि गेल्या दोन वर्षामध्ये सरकार टाकत असलेली पावले ताडून पाहावीत. ती पाहिल्यास हा वचननामा सत्यात उतरवण्याच्या वाटेवरून सरकार पुढे जात असल्याचे दिसेल. त्यातील काही गोष्टी साध्य झाल्या असतील, काही नसतील; पण सरकारची पावले त्या वाटेवरून भरकटलेली नाहीत. उरतो दुसरा, जो माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे- तो म्हणजे लोकांपेक्षा आणि काळाची गरज. जनतेच्या अपेक्षा प्रचंड आहेत. त्या निकषावर मोजायला गेले, तर पाच वर्षांपैकी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. उरलेल्या काळात अपेक्षांनुसार कार्यवाही होते का याला माझे उत्तर आहे, सो फार सो गुड. मात्र, एका ठाम दिशेने, निश्‍चित नेतृत्वाखाली आणि सुनिश्‍चित कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही दोन वर्षे पूर्ण झाली आहेत, हे नक्की. सर्वच अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, असे म्हणणे प्रीमॅच्युअर ठरेल; पण दोन वर्षानंतर पुढची तीन वर्षे या सरकारला असावीत की नसावीत, असा प्रश्‍न विचारल्यास ती असावीत, असेच त्याचे उत्तर असेल. पाच वर्षांच्या पूर्ततेनंतर हे सरकार सत्तेत येताना दिलेली आश्‍वासने पूर्ण करेल किंवा त्याच्या जवळपास पोहोचेल याचा भरोसा बाळगावा, अशी या सरकारची कामगिरी आहे.

गेल्या दोन वर्षांच्या काळात तथाकथित जातीय तणाव, मुस्लिमांवर अन्याय होतोय, धर्मांतराचा दबाव येतोय यासारखे आरोप, काही नेत्यांची अपरिपक्व विधाने, दुःखद असलेली रोहित वेेमुलाची आत्महत्या, जेएनयूतला नॉनसेन्स प्रकार, दिल्लीतला पराभव, बिहारमधला पराभव, पक्षांतर्गत कुजबुज किंवा अरुण शौरींसारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेली टीका ही इतकी सगळी प्रोव्होकेशन्स असूनही सरकारने आपला फोकस विकासावर ठेवलेला आहे. त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ दिला नाही. त्या विकासाची उदाहरणे पाहायची झाल्यास रेल्वेच्या कारभारातील गतिमान बदल पाहता येतील. पायाभूत सुविधांचा विकास पाहता येईल. थेट परदेशी गुंतवणुकीबाबत चीनला मागे टाकून भारत जगात पहिल्या क्रमांकाचे ठिकाण बनला आहे. आर्थिक विकास दरातही चीनला भारताने मागे टाकले आहे आणि आज भारत वेगाने विकास करणारी मोठी आर्थिक व्यवस्था बनला आहे. जगभरातील तज्ज्ञही सांगतील की, हे सर्व आता कायम राहणार आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच व्यवसाय सुरळीतपणे चालण्यासाठी उद्योगाभिमुख वातावरणनिर्मिती असणार्‍या देशांच्या यादीत भारत सातत्याने वर सरकत आहे. हे सर्व एकदम होणारे नाही. त्यासाठी व्यवस्थेत मुळातून बदल करणे गरजेचे आहे; पण आता ते होताहेत. सर्व जाणकार सांगताहेत की, प्रशासकीय पातळीवरचा भ्रष्टाचार कमी झाला आहे. भ्रष्टाचार्‍यांना वचक बसला आहे. पूर्णपणाने भ्रष्टाचार दूर झालेला नाही, अजून खूप लांबची वाटचाल करायची आहे. सामान्य माणसांचे भ्रष्टाचार्‍यांकडून होणारे शोषण पूर्णपणाने थांबलेले नाही; पण एकप्रकारचा धाक बसला आहे, हे निश्‍चित. याला मी सिस्टिम करेक्शन म्हणेन. याबाबत वरिष्ठ पातळीवर निश्‍चितपणाने बदल झाला आहे. आजवरच्या कोणत्याही सरकारने 500 वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाया केलेल्या नाहीत. या सरकारने दोन वर्षात त्या केल्या आहेत. अर्थातच, यामुळे काही अधिकार्‍यांमध्ये सरकारविषयी नाराजी आहे. दिल्लीतले काही सनदी अधिकारी आम्हाला केंद्रात काम करायचे नाही, राज्यात परत जाऊ द्या म्हणत आहेत. कारण, त्यांची ‘कुरणे’ बंद झाली आहेत. त्यांना शिस्त पाळावी लागत आहे. स्वतः पंतप्रधान सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत काम करताहेत आणि पाठपुरावा करताहेत. नोकरशाहीला अशाप्रकारे काम करायला लावणे दीर्घकाळात कोणत्याही सरकारला जमलेले नाही. त्यामुळेच प्रशासनात नाराजी आहे. याला कोणी अतिकेंद्रीकरण म्हणत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. मोदी ठामपणे नेतृत्व करताहेत, सूत्रसंचालन करताहेत, त्याला केंद्रीकरण म्हणता येणार नाही. कारण, इतर सर्वांना कार्यक्रम आखून दिलेले आहेत आणि ते झाले पाहिजेत, याकडे पीएमओ लक्ष देत असेल, तर त्यांचे ते कामच आहे. याला केंद्रीकरण म्हणता येणार नाही.

सरकारच्या कार्यकाळाचे मोजमाप करताना आणखी एक मुद्दा आवर्जून नमूद केला पाहिजे, तो म्हणजे गेल्या दोन वर्षाच्या काळात जगामध्ये भारताचे स्थान निश्‍चितच उंचावले आहे. भारताकडे जग आता गांभीर्याने पाहत आहे. आज देशाचे पंतप्रधान जागतिक पातळीवरचे नेते बनले आहेत. याचे श्रेय त्यांच्यातील वैयक्तिक गुण हे दुसर्‍या स्थानावर असतील. पहिल्या स्थानावर आहे ते लोकांनी दिलेला जनादेश. तो मिळण्यामध्येही मोदी यांचे गुण, त्यांचे नेतृत्व यांचा वाटा आहे; पण संधी मिळाल्यानंतर मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे, असा या दोन वर्षाचा संदेश आहे. याची कितीतरी उदाहरणे देता येतील. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे उदाहरण घ्या. 21 जून 2015 रोजी हा दिन 140 देशांत साजरा झाला, हे भारताचे खूप मोठे यश आहे. दुसरी गोष्ट, पॅरिसमधील पर्यावरण परिषदेमध्ये झालेला करार. हा करार होण्यामध्ये भारताचा मोलाचा वाटा आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. गेली सहा वर्षे हा करार प्रलंबित होता. तो होईल की नाही याची धाकधूक होती. अशावेळी भारताने दिलेल्या कार्यक्रमामुळे हा करार घडला. जगाला काही सांगण्यापूर्वी भारताने स्वतःचा पर्यावरणविषयक कार्यक्रम मांडला आणि त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि त्यामुळेच भारताच्या म्हणण्याला पॅरिसमध्ये वजन प्राप्त झाले. हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. आपण अशक्यप्राय वाटणारे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. 2022 पर्यंत 100 गीगावॅट सौरऊर्जेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यादृष्टीने पावले टाकली आहेत. वास्तविक, जागतिक व्यापार संघटनेने यामध्ये बरेच अडथळे निर्माण केले आहेत. या उद्दिष्टांसंदर्भातील एक निकाल आपल्या विरोधात गेला. याबाबतचा खटला अमेरिकेेनेच आपल्या विरोधात दाखल केला होता. त्यामुळे आपण प्रचंड गतीने ऊर्जानिर्मितीसाठी जी सौरपॅनेलची निर्मिती करत होतो त्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी असूनही दोन वर्षात आपण प्रगती केली आहे. भारताने यासंदर्भातील कार्यक्रम मांडून आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्सच्या स्थापनेची संकल्पना पॅरिस परिषदेमध्ये मांडली. कर्कवृत्त आणि विषुववृत्त यामधील 122 देशांनी एकत्र येऊन सौरऊर्जा निर्मितीचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी ती योजना आहे. विशेष म्हणजे, सर्वच देशांनी त्याला मान्यता दिली आणि आयएसएची स्थापना झाली.

पुढचा मुद्दा आहे भ्रष्टाचाराचा. निवडणुकीपूर्वी टू-जी घोटाळ्यासह अनेक घोटाळे गाजले. मात्र, या सरकारने योग्य पारदर्शक धोरणे राबवली. कार्यपद्धतीत बदल केल्यामुळे आणि भ्रष्टाचाराला आळा घातल्यामुळे शासकीय तिजोरीत काही हजार कोटी अतिरिक्त जमा झाले. मात्र, माध्यमांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले.

या सर्व उपलब्धी लक्षात घेतल्यानंतर आणखी काही राहिले का, असा प्रश्‍न केल्यास मी म्हणेन खूप काही राहिले आहे; पण मागील काळातील देशाची स्थिती लक्षात घेता कोणत्याही सरकारला दोन वर्षामध्ये सर्वच परिस्थिती आमूलाग्र बदलणे शक्य होणार नाही. खुद्द नरेंद्र मोदी यांनीच यासंदर्भात एक वाक्य म्हटले होते की, आधीच्या सरकारने करून ठेवलेला कचरा उपसण्यात आमची सगळी शक्ती वाया जातेय. माझ्या मते, हे राजकीय विधान नाही, हे सत्यकथन आहे. मागील दहा वर्षांतल्या भारताचे वर्णन सर्वांनीच

‘पॉलिसी पॅरालिसिस असलेला देश’ असेच केले होते. धोरण लकवा होताच. कामे पडून होती. फायली पुढे सरकत नव्हत्या. हा सर्व गाळ उपसण्यात पहिली वर्षे जाणे स्वाभाविक आहे. मात्र, तरीही आर्थिक सुधारणांबाबत खूप अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. त्या न होण्यास राजकीय विरोध कारणीभूत असेलही; पण तरीही अंतिम जबाबदारी सरकारची असते. कारण, जनतेने सरकारच्या हाती सत्ता सोपवली आहे. त्यामुळे सरकारने यातून कसा मार्ग काढायचा ते पाहणे आवश्यक आहे. आजघडीला तरी आर्थिक सुधारणांची गती कमी पडते आहे. आधीचे सरकार हँडीकॅप होते ते या सरकारला नाही. असे असूनही भारतीय अर्थव्यवस्थेभोवतीच्या साखळ्या दूर करून ती वेगाने धावेल, असे पुरेसे काम या दोन वर्षात झालेले नाही.

यातील सर्वात ठळक उदाहरण म्हणजे जीएसटी. हे मान्य आहे की, हे मनी बिल नाही. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. त्यामुळे तिला राज्यसभेने मान्यता द्यावी लागणार आहे. राज्यसभेत काँग्रेसने अडवणुकीचे धोरण स्वीकारले आहे. असे असले तरी पुन्हा मी म्हणेन की, शेवटी जबाबदारी सरकारची आहे. याबाबत सरकारला यश येताना दिसत नाहीये. याच वाटेवरचा मागील काळातील एक मुद्दा म्हणजे भूमिअधिग्रहण विधेयक. या कायद्याचा विषय ज्या पद्धतीने हाताळला गेला ते धक्कादायक होते. त्यामुळेच सरकारला माघार घ्यावी लागली. अलीकडच्या काळातील उत्तराखंडमधील सरकार बरखास्त करणे, राष्ट्रपती राजवट लागू करणे या घटनाही धक्कादायकच म्हणाव्या लागतील. राजकारणात सरकार पाडण्यासाठीचे राजकारण सर्रास चालते; पण राज्यपालांच्या अहवालानुसार कलम 356 नुसार सरकार बरखास्त करायचे असेल तर एक साधा संकेत आहे की, बहुमत सिद्ध करण्याची संधी देणे. ती संधी देणे गरजेचे होते. ती न दिल्यामुळे पुढील सर्व प्रकार घडले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल योग्यच आहे. काँग्रेसचे नऊ आमदार फुटणार होते, त्यांना मतदानाला बंदी केली, हे पक्षांतर बंदी कायद्याला धरूनच होते. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली मतदान झाले, त्यात हरिष रावत सरकार जिंकले. याला मी म्हणेन की, राजकीय व्यवस्थापनेतला सरकारला मिळालेला हा सेटबॅकच आहे. ज्याप्रमाणे जीएसटीसाठी संसदेतली ‘ग्राऊंड मॅनेजमेंट’ कमी पडतेय तसेच उत्तराखंडमध्ये राजकीय व्यवस्थापन कमी पडताना दिसले. या काही पडत्या बाजूही विचारात घ्याव्याच लागतील.

सारांश रूपाने सांगायचे झाल्यास, 2014 मध्ये भाजप सरकार जेव्हा सत्तेत आले तेव्हाही आधीच्या सरकारवर टीका करून येऊ शकले असते; पण मोदींनी तसे नाही केले. टीकेवर निवडून आलेले सरकार नाही; पण 2019 च्या निवडणुकीत कोणावरही टीका करायला मोदी सरकारला जागा नाही. आपल्या कामगिरीच्या जोरावर या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी या सरकारकडे आणखी तीनच वर्षे आहेत. या तीन वर्षांत हे सरकार कसे काम करेल त्यावर 2019 च्या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

23 May 2016 - 7:38 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

व्वा नाखुराव,
मस्तच विश्लेषण!!
बादवे या धाग्याऐवजी वरील प्रतिसादच लेख म्हणून टाकला असतात तर अजून भारी झाले असते.

या धाग्याचा उद्देश न कळाल्याने आपला पास ! ( आपली अल्पमति दुसरे काय ?)

नाखु's picture

24 May 2016 - 8:23 am | नाखु

मिपावरील लांबलचक दीर्घ काथ्याकुट (विशेषतः वेमुला वगैरे संदर्भातील) आणि वरील दोन प्रातिनिधीक लेख यांचा साम्य शोधून मी प्रश्न केला नक्की कोण कुणाशी स्पर्ध करतेय लोक्सत्त मिपाशी का मिपा लोकसत्ताशी?

  • माधव गडकरीसार्ख्या प्रभुती संपादक असे पर्यंत लेख परखड व दोन्ही बाजू दाखविणारे समतोल्,तटस्थ नजरेने(कुठलाही पुर्वग्रह ने ठेवता) लिहिलेले असत.
  • मिपावरही संपादकीय म्हणून एक सदर चाल्वून अगदी वेगळ्या आणि चाकोरीबाह्य विषयांवर लिहिले गेले होते.
  • सध्या अश्या शब्दबुड्या आणि निव्वळ प्रतिमांचा मोरपिसारा फुलवून नक्की काय सांगायचे (का नाही सांगायचे) तेच न कळणारे ले़ख लोकसत्तात आहेत (ते वाचल्यावर जर काही कळाले तर) इथे मिपा भाषेत माडावेत म्हणून मिपा साक्षेपींना हे साकडे आहे.
  • मिपावर सध्या आशयहीन आणि तर्कदुष्ट चर्चा प्रस्तावांचे पेव फुटले आहे,कुठलाही विषय आधीच ध्येय निश्चीत केल्यासारखा शब्दच्छल करून्,फाफट पसारा करून चर्चा इप्सीत स्थळापर्यंत पोहोचवण्याचा चंगच काही आयडींनी मांडला आहे.(सल्लागार त्यांना काही कानपिचक्या देत असतील असे त्यांच्या सध्याच्या वर्तनावरून तरी वाटत नाही).
  • इथेच आणि हेच साम्य आहे म्हणून कोण कुणाशी स्पर्धा करतेय हा मुद्दा मांडला? आधिक उणे क्षमा, कारण मी मिपा नामवंत साहित्यीक्/काथ्याकुटकार्/विश्लेषक तर नाहीच पण एक सामान्य मिपा वाचकाच्या भूमीकेतून हे लिहिले आहे

.

मिपा वारकरी नाखु

दुर्गविहारी's picture

23 May 2016 - 7:49 pm | दुर्गविहारी

सध्या आम्हीच काय ते शहाणे असा लोकसत्ता वाल्यान्चा समज झालेला दिसतो. आधीचे 'सुमार' सम्पादक गेल्याने सुट्केचा निश्वास टाकला. पण नन्तर आलेल्या कुबेराने बरेच धन उधळायला सुरवात केली आहे. मेमनच्या फाशीच्या अग्रलेखात हिरवी लाळ गाळून झाल्यानन्तर, मदर टेरेसावरचा अग्रलेख मागे घ्यायची नामुष्की आली.त्यावर मात्र कोणतीही पुरस्कार वापसी नाही कि असहिष्णुतेच्या गप्पा नाहीत. विषय कोणताही असो,जाता जाता फक्त मोदिना टोमणा मारला कि यान्चा दिवक भरला. उदा. चिन-ता हा अग्रलेख असो कि परराष्ट्र धोरणावर भाष्य करणारा , वास्तवीक एखादा राष्ट्रप्रमुख दुसर्याला मित्र म्ह्णाला म्हणुन लगेच ती दोन राष्टे एकमेकाच्या गळ्यात गळे घालत नाहीत, कि त्यान्चे प्रश्न चुटकीसारखे सुटत नाहीत, हे गिरीष कुबेराना सान्गावे लागेल काय? लोकसत्ताच्या पुरवण्या चान्गल्या असतात, अग्रलेखही वेगळा द्रुष्टीकोन देतात म्हणुन तो वाचायचा ( किम्बहूणा मोदी सरकारचे काय चुकतेय याठिच मी लोकसता वाचतो. पण परवाचे हे दोन्ही ले़ख वाचले आणि लोकसताचा दर्जा घसरतोय याची खात्री पटली.

वैभव पवार's picture

23 May 2016 - 7:50 pm | वैभव पवार

मला जर काहि लिहयच तर कुथे लिहु ?? काहि कलत नहिये इथे

कुथे पण लिहा. फक्त कु वर टिंब काढून लिहू नका म्हणजे झाले.

ह. घ्या.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

23 May 2016 - 7:55 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

काय लिहायचं आहे??
तुम्ही घाई करू नका,कारण तुमचं टायपिंग अजून सुधारायला पाहिजे,
उजव्या बाजूला ऑप्शन्स आहेत,त्यामध्ये "लेखन करा" म्हणून पर्याय आहे.
तळाला नवीन सदस्यांसाठी म्हणून माहिती आहे तिथे जा,आणि व्यवस्थित समजावून घ्या.
असंबद्धित धाग्यावर असे प्रश्न विचारू नये.

वैभव पवार's picture

25 May 2016 - 5:21 pm | वैभव पवार

Thanks

मी तर इतरत्र टाईप करुन इथे चोप्य पस्ते (copy paste) करतो. फक्त प्रतिक्रिया इथे टाईप करतो. तसंही करु शकता. जस्ट मराठी किंवा त्यासारख्या अॅपने टाईप करुन इथे paste करु शकता.

नाईकांचा बहिर्जी's picture

25 May 2016 - 5:50 pm | नाईकांचा बहिर्जी

धागाकर्ते सर ह्यांचा मिपावर राग आहे, लोकसत्तावर राग आहे, लोकसत्ता अन मिपा दोन्हीवर राग आहे, लोकसत्ता संपादक अन मिपा संपादक ह्यांच्यावर राग आहे, मिपाच्या काही आयडी वर राग आहे, एकंदरित एकांगी लेखनावर राग आहे का अजुन काही म्हणायचे आहे ते काही कळले नाही , पाल्हाळ लांबलेले वाटले त्यामुळे मुद्देसुद नेमका प्रॉब्लम काय आहे ते कळलेस पुढे काही बोलायला सोपे पडेल.

-बहिर्जी

टवाळ कार्टा's picture

26 May 2016 - 1:51 am | टवाळ कार्टा

ghanta

प्रसाद गोडबोले's picture

25 May 2016 - 7:22 pm | प्रसाद गोडबोले

आर्ची हे भौतिक मुक्तीचे प्रतीक असेल तर ही भौतिक मुक्ती मिळविण्यात हे त्रिकूट यशस्वी ठरले आहे, हे निर्वविाद.

मेलो मेलो =))))

गणेश उमाजी पाजवे's picture

26 May 2016 - 1:05 am | गणेश उमाजी पाजवे

माजी राज्यकत्रे असल्याच्या अहंगंडातील पोकळपणा मुस्लीम सलीमला कळून चुकला आहे. तर शहरी मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व प्राप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीशी ‘कनेक्ट’ न होऊ शकलेल्या (म्हणून फेंगडय़ा पायाचा दाखविलेल्या) विजयने प्रेमभंग पचविला आहे. सलीम-विजय हे ‘ट्रबल शूटर्स’ जीवाचा धोका पत्करून पश्र्याला साथ देतात, तर मंगेश जिवाचा धोका न पत्करता! साथ देण्यातील हा फरक लक्षणीय आहे व ‘जात’ विचारात घेतल्याशिवाय त्याचे आकलन होऊ शकणार नाही. तथापि मंगेश, सलीम व विजय यांच्यामुळेच आर्ची व पश्र्या आपल्या प्रेमाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार करतात. आर्ची हे भौतिक मुक्तीचे प्रतीक असेल तर ही भौतिक मुक्ती मिळविण्यात हे त्रिकूट यशस्वी ठरले आहे, हे निर्वविाद. मात्र, कळीचा मुद्दा भौतिक मुक्ती मिळविण्याचा नसून ती टिकवून ठेवण्याचा आहे. ‘फॅण्ड्री’मध्ये नागराज मंजुळे यांनी भटक्या जब्या व बौद्ध पिराजी यांची दोस्ती दाखविली आहे. ‘सैराट’मध्ये त्यात मुस्लीम सलीम व गरीब मराठा मंग्याची भर पडली आहे. मात्र अजूनही त्यात गावकुसाच्या आत असणारा साळी, तेली, कुंभार, धोबी, सुतार, लोहार या ५२ टक्के ओबीसींची भर पडलेली नाही. ही भर पडल्याशिवाय भौतिक मुक्ती टिकविता येणार नाही. डॉ.आंबेडकर यांनी पाचव्या खंडात वर्णन केलेल्या जातिसंस्था निर्मूलनाच्या व्यूहरचनेप्रमाणे ओबीसींची साथसंगत अत्यावश्यक आहे. ‘सैराट’मध्ये ही साथसंगत दिसत नाही. म्हणूनही आर्ची-पश्र्याचे बंड अपयशी ठरले.

दुसर्या लेखातला हा परिच्छेद वाचून स्वताच्याच डोक्यात दगड हाणून घ्यावासा वाटला.

प्रचेतस's picture

26 May 2016 - 8:43 am | प्रचेतस

:)

नाईकांचा बहिर्जी - Wed, 25/05/2016 - 17:50 नवीन
धागाकर्ते सर ह्यांचा मिपावर राग आहे, लोकसत्तावर राग आहे, लोकसत्ता अन मिपा दोन्हीवर राग आहे, लोकसत्ता संपादक अन मिपा संपादक ह्यांच्यावर राग आहे, मिपाच्या काही आयडी वर राग आहे, एकंदरित एकांगी लेखनावर राग आहे का अजुन काही म्हणायचे आहे ते काही कळले नाही , पाल्हाळ लांबलेले वाटले त्यामुळे मुद्देसुद नेमका प्रॉब्लम काय आहे ते कळलेस पुढे काही बोलायला सोपे पडेल.

नाही माझा कुणावर राग नाही आणि लोभ आहेच तर मिपावरच आहे लोक्सत्तावर नक्कीच नाही (गिरिश कुबेर यांच्या शेपुटघालू प्रकरणानंतर तर नाहीच नाही)

दुसरी गोष्ट मी मिपावर दर्जेदार आणि मुद्देसूद चर्चा/विश्लेषण वाचले आहे आणि अभ्यासू प्रतिसादही वाचले आहेत तेंव्हा सध्याच्या नुसत्याच एकांगी /हेकेखोर दुराग्रही वातावरण कसे (लोक्सत्तेतील दोन्ही लेखांसमान) आहे ते वाचकांसमोर मांडले.

फाफट विदापिसारा आणि शब्दबुडबुडे न करता नेमकं काय मांडायच हे वरील अविनाश धर्माधीकारी यांच्या लेखातून कळेल.

मिपावरील अलिकडच्या किमान ४-६ महिन्यातील राजकीय-सामाजीक-धार्मीक धागे पहा लेखकाला जे वाटते तेच अनुमान्+मत वाचकाचे असले पाहिजे असा अट्टाहास ठाईठाई दिसतो.

आहे तसं वस्तुस्थीती मांडणारे विरळा होत चालले आहेत. (उदा.विकास्,ई एक्का काका,ईत्यादी).

नुसते मिपावर असे लिखाण्/प्रतिसाद होत आहेत असे लिहिले असते तर कदाचीत वाचकांना सांगण्यात्/सम्जवण्यात कमी पडलो असतो पण लोकसत्तच्या वरील दोन लेखांनी मला नेमके कसले लिखाण हा सांगण्याची संधी दिली.या उपल्ब्धीसाठी मी लोकसत्ताचे आभार मानतो.

धन्य्वाद
आप्लाच मिपा नियमीत वाचक्+सहभागी मिपाकर नाखु
मटाची वार्षीक वर्गणी भरलेला पण सध्या फक्त लोकसत्ता वाचणारा नाखु