हर्बल टी

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
19 May 2016 - 9:08 am

मी एकदा गांधीभवन कोथरुड ला निसर्गोपचार आश्रमात एक व्याख्यान ऐकायला गेलो होतो. तिथे पाहुणचार म्हणून मला हर्बल टी दिला. मी प्रथमच तो घेतला. प्यायल्यानंतर तो चांगला वाटला. हा हर्बल टी नेमका काय प्रकार आहे? तो कसा करायचा? तो कुठे मिळतो?

जीवनमानचौकशी

प्रतिक्रिया

हर्बल टी चे विविध प्रकार असतात.
दुधासहीत, दुधरहीत
साखरेसकट,साखररहीत
चहापावडर मिक्स असलेले ,चहा पावडर नसलेले
फुलांच्या फ्लेवर चे (मोगरा,जाइ, जुइ,चमेली इ.इ)
ऒषधी वनस्पती टाकलेले,
देशी,विदेशी

थोडक्यात आपण ज्याला काढा म्हणतो, तोच विंग्रजितला हर्बल टी
तुम्ही स्वतःही घरी बनवू शकता.

प्रकाश घाटपांडे's picture

19 May 2016 - 9:24 am | प्रकाश घाटपांडे

मी घेतलेला दुधाशिवाय होता. ग्रीन टी व हर्बल टी एकच का? कि वेगळे?

ग्रीन टी म्हणजे चहाची प्रोसेस न केलेली (ऑक्सिडाईज न केलेली) हिरवी पाने. ती वरचेवर खुडून तशीच पॅक केली जातात.

होय ग्रीन टी आणि हर्बल वेगळे
ग्रीन टी मध्ये चहा असतोच
हर्बल मध्ये नसतो किंवा अगदी नगण्य मात्रेत असतो

प्रकाश घाटपांडे's picture

19 May 2016 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे

कुठे मिळतो?
(अज्ञानी)

प्रचेतस's picture

19 May 2016 - 9:40 am | प्रचेतस

कुठल्याही किराणा दुकानात किंवा डी मार्ट्/बिग बझार अशा सुपरस्टोअर्स मध्ये दोन्ही प्रकार मिळतील.

मात्र प्युअर ग्रीन टी अतिशय कडवट असतो. मध घालूनच प्यावा.

नाखु's picture

19 May 2016 - 2:23 pm | नाखु

रामदेव्बाबा उत्पादन विक्री केंन्द्रात मिळेल त्यांचा किंवा श्री श्री रविशंकर यांचा तरी.

कवितानागेश's picture

20 May 2016 - 7:06 pm | कवितानागेश

गणेशपुरीला मस्त मिळतो. चहा नसलेला आणि भरपूर तुळस घातलेला. थोडा गूळ घालून छान लागतो. मी एकदाच भरपूर आणून पुरवून पुरवून वापरतेय.

फिटनेस चे फॅड बोकाळल्याने हल्ली अगदी वाण्याच्या दुकानात सुद्धा डीप डीप वाले हर्बल / ग्रीन टी मिळतात, शक्यतो चांगल्या कंपनीचे घ्यावेत. आॅनलाइन देखिल मिळतात.
बिगबझार/ डी मार्ट सारख्या ठिकाणी अनेक वरायटि उपलब्ध आहेत

-- कटिंग प्रेमी स्पा

सतिश पाटील's picture

19 May 2016 - 12:53 pm | सतिश पाटील

आमच्या हापिसात ४-५ प्रचंड जाडजूड असलेल्या व्यक्ती दिवसभर हे ग्रीन टी घेऊन नाचत असतात.
एके दिवशी विचारल्यावर त्यांनी मला प्रचंड ज्ञान दिले कि हे प्यायल्याने वजन आटोक्यात येते वेगैरे वेगैरे..
२ वर्ष झाली तरी मला यांच्या दिसण्यावरून तरी त्यांच्या वजनात काही फरक जाणवला नाही.

काढ्याला चहाचे नाव दिले म्हणून या कंपन्यांचा निषेध.

-- हापिसात शी शी डी असून देखील त्याकडे ढुंकून न बघणारा आणि बाहेर जाऊन कटिंग पिणारा आणि रोज acidity च्या गोळ्या खाणारा सतिश पाटील.

असंका's picture

19 May 2016 - 4:27 pm | असंका

=))
प्रचंड ज्ञान!!!

पद्मावति's picture

19 May 2016 - 2:06 pm | पद्मावति

ग्रीन टी च्या टी बॅग्स वापरु नये.
केट्ल मधे ग्रीन टीची पाने ( loose tea) टाकावी त्यावर गरम पाणी ( पाणी उकळायच्या तापमानापर्यंत जाऊ देऊ नये) ओतावे. हलका रंग आल्यावर प्यावा.
ग्रीन टी चे वजन कमी होण्यापेक्षा बाकी फायदे जास्ती आहेत ( anti oxidents). वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पेक्षा ऊलॉंग टी चा फायदा जास्ती होतो.

पद्मावति's picture

19 May 2016 - 2:13 pm | पद्मावति

टी लीफ इनफ्यूज़र टीपॉट्स - ग्रीन टी, ऊलॉंग टी किंवा कुठल्याही हर्बल टी करता हे टीपॉट्स उपयोगी असतात.

हर्बल टी याचे दोनतीन प्रकार धरायला हरकत नाही.एकात फक्त चहाची पानेच वापरतात आणि दुध ,साखर याचे पर्याय वापरतात.दुसय्रात चहापानांशिवाय इतर दालचिनी वगैरे टाकतात.तिसय्रात चहापानेच नसतात त्याऐवजी निरनिराळे हर्बच /औषधी/सुगंधी वनस्पती वापरतात.दुध अधिक साखर वापरणे न वापरणे हे सर्वांतच ऐच्छिक असते.
तिसय्रा पद्धतीत मी बरेच प्रकार करून पाहिले आहेत.

गवती चहा व पेरुची पाने यांचा सुद्धा च्या करतात, पन हा हर्बल मधे काऊंट होतो की नाही माहीत नाय

आपण करु हो काउंट फिकिर नाॅट

प्रचेतस's picture

20 May 2016 - 7:13 pm | प्रचेतस

हर्ब्सजला नेमका मराठी प्रतिशब्द काय? (औषधी वनस्पती)?

पद्मावति's picture

20 May 2016 - 9:27 pm | पद्मावति

बहुदा जड़ीबूटी, वनौषधी??

विकास's picture

20 May 2016 - 9:37 pm | विकास

"वनस्पती चाय पे चर्चा" ;) येकदमच माहितीपूर्ण आहे!

गवती चहा पण हर्बल चहाच असतो की हो!

हर्बल असतो का ते माहीत नाही, पण काश्मिरी चहा पण चांगला असतो! उकळत्या पाण्यात अगदी चिमूटभर टाकावा लागतो नाहीतर कडवट होतो. नंतर त्यात काश्मिरी लोक्स थोडाफार सुकामेवा अथवा तत्सम घालून "शाही" बनवतात...

हर्बल चहा पण उकळत्या पाण्यात थोडाच घालावा.

सुबोध खरे's picture

21 May 2016 - 1:01 pm | सुबोध खरे

काढा म्हणजे कोणत्याही औषधी वनस्पतीची पाने उकळून तयार केलेला अर्क
चहा हे पेय पारंपारिक व्याख्येप्रमाणे Camellia sinensis या चहाच्या झाडाच्या कोवळ्या पानांचा केलेला काढा.
शिवाय चहा (किंवा कॉफी) पिण्याचे मूळ कारण त्यात असलेले कॅफीन हे द्रव्य. या द्रव्यामुळे आपला मेंदू तरतरीत होतो आणी अधिक क्षमतेने काम करू लागतो. https://en.wikipedia.org/wiki/Caffeine
चहाचे अनेक प्रकार आहेत परंतु आपल्याला सर्वात जास्त परिचयाचे म्हणजे पांढरा चहा, ग्रीन किंवा हिरवा चहा, उलॉंग चहा, ब्लैक किंवा काळा हा आपण रोज पितो तो चहा आणी पाचवा म्हणजे हर्बल किंवा वनौषधी चहा.
खरं तर हर्बल टी किंवा वनौषधी चहा म्हणण्याला काहीच अर्थ नाही. कारण यात चहाची पाने नसतातच आणी त्यामुळे यात कॅफीनहि नसतेच. याला खरं तर काढाच म्हणायला हवे. ज्यांना संध्याकाळी/ रात्री "चहा" पिऊन झोप येत नाही अशा लोकांनी हा "चहा" घ्यावा. या "चहा" त गवती चहा पात, आलं, दालचिनी, लवंग, पुदिना, हळद, जास्वंद अशा अनेक वनौषधी वापरल्या जातात
आता आपण प्रत्यक्ष चहा कडे वळू.
पांढरा चहा
चहाची कोवळी पाने तोडली आणी त्यावर जवळ जवळ कोणतीही प्रक्रिया न करता नुसतीच वाळवून घेतली आणी त्याचा चहा बनवला तर यात कॅफीन नसतेच आणी ANTI OXIDANT द्रव्ये भरपूर असतात. पण याला कळत नकळत/ फिकट चहाचा स्वाद असतो.
यानंतर येतो हिरवा/ग्रीन टी
हा थोडीशीच (OXIDATION) प्रक्रिया केलेला असतो आणी त्यामुळे यात कॅफीन १ % इतके कमी असते.
अजून जास्त प्रक्रिया केल्यास तो उ लॉंग चहा होतो ३-४ % कॅफीनचे प्रमाण
आणी पूर्ण प्रक्रिया केल्यास काळा चहा होतो ८-१२ % कॅफिन
जाता जाता
हिरवा चहा किंवा काळा चहा याचे आरोग्यासाठी मिळणारे लाभ हे सारखेच असतात. ग्रीन टी म्हणून त्यात ANTIOXIDANT जास्त असतात असे नाही. ग्रीन किंवा हर्बल चहा मुळे वजन कमी होते हि अंधश्रद्धा आहे.
हा विषय फारच मोठा आहे आणी यासाठी एक पूर्ण लेखच लिहावा लागेल.

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2016 - 1:27 pm | प्रकाश घाटपांडे

मी डॉ जयस्वाल निसर्गोपचार केंद्र गांधीभवन कोथरुड यांना भेटलो व त्यांच्याकडून तो हर्बल टी घेतला. एका कपासाठी पाव चमचा पाण्यात टाकून उकळायचा व त्यात थोडा गूळ टाकायचा. काल प्रयोग केला. चांगला लागला. पण बायकोला फार आवडला नाही. ती अट्टल चहाडी आहे. या लोकांना तो 'नीट' चहाच लागतो.

हर्बल काॅफी मिळते का कुठे ?
किंवा चहाचा स्वाद अगर वास मुळीच नसणारा हर्बल चहा ?
किंवा वजन कमी न करणारे हर्बल पेय ?