प्रीत

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
17 May 2016 - 2:37 pm

1

तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा,
ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी,

तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी,
ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी,

एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण.
दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं,
एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं.

' वाट होते जरी तुझी माझी वेगळी,
सोबतीची तरी आस सांग का लागली,
जीव तुटतो का असा रे.. सांग ना
तुझ्याविना, तुझ्याविना
..'

आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी...
मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली,
मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला.
तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला..

' पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले,
ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले
..'

जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं,
काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा..
तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा.

' जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
..'

आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं.

' कोण होतास तू,
काय झालास तू
अरे वेड्या कसा
वाया गेलास तू
..'

तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती.
इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची.
त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती.

' गडी अंगानं उभा नि आडवा,
त्याच्या रूपात गावरान गोडवा,
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा,
काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला
..'

आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा.

'अंगात माझिया भिनलाय ढोलिया,
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली,
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली
..'

त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती,

' बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग,
बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग
..'

अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले.
मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली,
'प्रचू डार्लिंग !!'

अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली..

क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले.

'बदलुन गेलया सारं,
पिरतीचं सुटलया वारं,
अल्लड भांबावयाला,
बिल्लोरी पाखरू न्यारं,
आलं मनातलं ह्या व्हटामंदी,
अन मनासंगं मन जुळलं जी
..'

.............................................................................................

preet

.............................................................................................

क्रमश:

* कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती.

** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल,
कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही.
मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात.
अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात.

.............................................................................................

मौजमजासद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

17 May 2016 - 2:42 pm | अभ्या..

प्रचू डर्लिंग वाचले आन फाट्ट्ट्टकन फुटलो
अगागागागागागा.
ही स्टोरी सैराट ला मागे पाडणार. मागे पाडण्यात आम्ही सोता हातभार लावणार हे सातवाहनकालीन लेण्याच्या काळ्या दगडावर राजेश चुन्याने काढलेले बदामी डिझाइन समजा.

तुषार काळभोर's picture

17 May 2016 - 4:47 pm | तुषार काळभोर

बघतोय्स काय, मुजरा कर!!

-आबा पैलवान

सस्नेह's picture

17 May 2016 - 4:51 pm | सस्नेह

अभ्या 'प्रिन्स' ???
मेले मेले =))

अग्गाअग्ग्ग्गाआग्ग्ग मेले वाचुन मेले बुवा ननतर आता वल्ली चा नम्बेर का ;)
काय चुपा रुस्तुम निघालस बे तु ;) मला तर दर्या खोर्या तुन जोडीने विर ग ळ शोधनारा वल्ली समोर आला ;)
सैराट पार्ट - २ ;)
असो आमच्या दादाच्या लगनाला यायच ह ! (पळ ते आता )

सतिश गावडे's picture

17 May 2016 - 2:44 pm | सतिश गावडे

>>तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी,

इथेच अंदाज आला होता.
रच्याकने, ती फुले स्ट्रॉबेरीचे क्रॉस सेक्शन आहे का?

रमेश भिडे's picture

17 May 2016 - 2:54 pm | रमेश भिडे

क्रमश: का? छान छान!

सस्नेह's picture

17 May 2016 - 2:59 pm | सस्नेह

=))

किसन शिंदे's picture

17 May 2016 - 3:02 pm | किसन शिंदे

नक्की कुणाचा आहे ब्वाॅ आयडी?

गपे उगी. स्टोरीत किसनू जानू बी येईल.
वाच कि लिवलय तेवढं.

गणामास्तर's picture

17 May 2016 - 3:15 pm | गणामास्तर

'प्रचू डार्लिंग !!' =)) =)) =))

दर्पणसुंदरीचे मनोगत म्हणायचे काय हे ? ;)

मी-सौरभ's picture

18 May 2016 - 7:13 pm | मी-सौरभ

जिवंत सुंदर्‍या आपल्या कथानायकाला भाव देत नाहीत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ??

गणामास्तर's picture

19 May 2016 - 10:32 am | गणामास्तर

अजिबात तसे काही म्हणायचे नाहीये. एक डाव त्यांचे चाहत्यांचे जग बघा किती मोठे आहे ते.
राजा ला राण्या कितीही असल्या तरी पट्टराणी ती पट्टराणीचं हो शेवटी ;)

चांदणे संदीप's picture

17 May 2016 - 3:18 pm | चांदणे संदीप

ते 'सारी कायनात' का काय भेटवायला शर्थीचे प्रयत्न करते म्हणतात....ते....त्यातल्या कायनात नामे कंपनीचे येमप्लॉयी आहात काय तुम्ही?? ;)

Sandy

बोका-ए-आझम's picture

17 May 2016 - 3:57 pm | बोका-ए-आझम

या ' मुग्ध ' बालिकेच्या आयचा घो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2016 - 4:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) तरी म्हणत होतो, या आयडीपासून, सॉरी, डु आयडीपासून सावध राहा.
या लेखिकेचं लेखन इतर महिला लेखिकांपेक्षा वेगळंच होतं, आणि ते वाचक म्हणून आवडतही होतं. छान, कसं जमतं हो तुम्हाला हे ?

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

17 May 2016 - 4:12 pm | सस्नेह

पण कथानायक कुठे आहे ?

एस's picture

17 May 2016 - 4:14 pm | एस

आप महान हो!

पिलीयन रायडर's picture

17 May 2016 - 4:16 pm | पिलीयन रायडर

आपल्याला नीमोवर कधीच भरोसा नव्हता. आज आपला डौट जाहीर करते.

कोण बरं गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रचु डार्लिंग??!! आम्हाला पण समजावुन सांगा की. खोदकाम कुठं करायचं हे तरी सांगा.

हेमन्त वाघे's picture

18 May 2016 - 8:40 am | हेमन्त वाघे

द्वर्थि प्रतिसाद नकोत !

यशोधरा's picture

17 May 2016 - 4:20 pm | यशोधरा

=))

प्रचेतस's picture

17 May 2016 - 4:20 pm | प्रचेतस

मेलो मेलो =))

कसं काय सुचतं हो तुम्हाला हे असं?

नीमो, कळेल न कळेल अशी हलकेच तक्रार करत असाव्यात बरं! लक्षात घ्या जरा..

प्रचेतस's picture

17 May 2016 - 5:06 pm | प्रचेतस

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2016 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) दृष्टीकोन आवडला.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

17 May 2016 - 5:32 pm | प्रचेतस

धागालेखिका धागा टाकून कुठे गायब झाल्या?

तुम्ही पण निघायच्या बेतात आहात का? ;)

प्रचेतस's picture

17 May 2016 - 5:36 pm | प्रचेतस

आम्ही इथेच हौत.

प्रचेतस तुम्ही धीराने घ्या. काय नसतं इशेष.
म्हणजे कसय ना ते. की भिडायचे डायरेक्ट ओ.
कोण चिडवले तर चिडवू दे. काय भोके पडत नसतात अंगाला.
आपण टिच्चून राह्यचं.
.
(अजून काय राह्यलं का?) ;)

प्रचेतस's picture

17 May 2016 - 5:40 pm | प्रचेतस

ख्याक....=))

शोधायला गेल्या असतील अजून कोणी काय म्हणते का तुम्हांला ते! =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2016 - 5:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या आयडीतुन दुस-या आयडीत प्रवेश घ्यायला सॉरी आपल्या वास्तव जीवनातून मिपावरील आभासी जीवनात यायचं म्हटलं तर वेळच लागतो ना !

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

17 May 2016 - 5:44 pm | यशोधरा

आपकू कयसे पता?

भागोऽऽऽ!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2016 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो, असं करू नका. आत्ता पर्यन्त ५० लोकांना वाट्सपवर वीचारुन झालं "आपण प्रीत धाग्याचे लेखक आहात का म्हणून ?" उत्तरात कोणी ' लोल ' म्हटलं, 'कोणी चपला हाना सर आता' 'असं काय करताय सर, असे मह्नलं ! कोणी म्हणलं, ' डोक्यावर गार पाणी ओता सर' पण, लेखकाचा काय पत्ता नाय लागला ?

-दिलीप बिरुटे

पण तुम्हाला का म्हणे उत्सुकता? =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2016 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुसरं काय ? :)

(आपलं ठरलंय ना, अडचणीत आणनारे प्रश्न मुख्य धाग्यावर विचारायचे नाहीत म्हणून...)

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

17 May 2016 - 6:51 pm | सतिश गावडे

म्हणजे तुम्ही "मज्यशी मयतरी कर्नर क?" असा प्रश्न विचारला आणि तोंडघशी पडलात का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2016 - 7:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा इतिहासात आणि जाल इतिहासात माझी मैत्री कोणी नाकारली नाही, आमचं प्रपोजल कधीच फेल गेलं नाही.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2016 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निमोने सुद्धा माझ्या मैत्रीचा रिस्पेक्ट केला आहे. :)

--दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

17 May 2016 - 8:06 pm | यशोधरा

म्हंजी काय केलय?

स्रुजा's picture

17 May 2016 - 8:11 pm | स्रुजा

खिक्क !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2016 - 8:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा, आपली मैत्री संपली. मी आत्ता थेट हिमालयात जात आहे, तिथे हिमालयाच्या प्रेमात पडतो पण ही माणसं नको बस.

प्रशांत/ निलकांत माझा आयडी डिलीट करावा ही नम्र विनंती. ;)

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

17 May 2016 - 8:51 pm | अभ्या..

सर जरा धमकी तरी बदला, किती दिवस ती दोस्ती संपल्याची धमकी वापरनारेत? ;)
विडंबन टाकेन, खव मध्ये छळेन, खफवर मापं काढेन, प्रतिसाद उडवेन्/देणार नाही असल्या तरी प्रॅक्टीकल धमक्या द्या.

प्यार में गिरो नहीं प्रा डॉ, उठो, ऋसे इन लोवे!!

~कुठल्या तरी सिनेमात होतं.

नीलमोहर's picture

18 May 2016 - 12:18 pm | नीलमोहर

'मी आत्ता थेट हिमालयात जात आहे'

- हे वाचून आर्चीचं 'मी हितनं थेट शेतात जाणार आहे, एकटीच जाणार आहे' इइ. आठवलं ;)

तुषार काळभोर's picture

18 May 2016 - 1:05 pm | तुषार काळभोर

< >

यशोधरा's picture

18 May 2016 - 1:07 pm | यशोधरा

आग्गाग्गा!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2016 - 1:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

-दिलीप बिरुटे

मृत्युन्जय's picture

19 May 2016 - 11:45 am | मृत्युन्जय

प्रचू तुच सांग आता कसे सुचते ते

नाखु's picture

17 May 2016 - 4:25 pm | नाखु

भागात ही दोन गाणी स्माविष्ट असावीत असावे अशी आग्रही मागणी पिंचि भाव विश्व चक्री पारायणी संघातर्फे करण्यात येत आहे.

मागणी एक
मागणी दोन

पुढच्या भागाच्य प्रतिक्षेत्,या धाग्यास अभ्याच्या चितरांची जोड मिळाली तर आवडेल.

नितवाचक नाखु पिंचिवाला आणि सदस्य हिरवे-पारवे कंपनी

किसन शिंदे's picture

17 May 2016 - 5:43 pm | किसन शिंदे

एवढंच जर असतं तर सरळ प्रचू डार्लिंगचा फोन नंबर मिळवून त्याला व्हाॅट्सअप म्हणा, किंवा फोन करून ”आय लव्ह यू" बोलणं पण जमलं असतं. उगा एवढा मोठा गोग्गोड लेख लिहीण्याचीही गरज नव्हती. दाल में कुछ नही सगळी डाळच काळीये हे आज १००% समोर आले.

असो, पुढील घडामोडींसाठी लेखिकेला शुभेच्छा!

अभ्या..'s picture

17 May 2016 - 5:48 pm | अभ्या..

कोण लेखिका?
ती अवखळ मुग्ध कलिका नाहीच का मग?

टवाळ कार्टा's picture

17 May 2016 - 5:44 pm | टवाळ कार्टा

प्रचू डार्लिंग वाचून फुटलो =))
अता ते तुम्हच्या चाहत्यांच्या लिश्टात स्थाण मागतील

सतिश गावडे's picture

17 May 2016 - 6:52 pm | सतिश गावडे

चाहत्यांच्या लिश्टात नव्हे. यादीत.

आमच बरंच खोड्काम/खोदकाम वाचवल. आता अपडेट पण येऊ दया नियमित. ;)

पैसा's picture

17 May 2016 - 7:26 pm | पैसा

ती काय "पसंत आहे मुलगी" शिरियल आहे का?

सस्नेह's picture

17 May 2016 - 7:29 pm | सस्नेह

पसंत आहे 'मुलगा' :)

पैसा's picture

17 May 2016 - 7:35 pm | पैसा

त्या मुग्धा घोडेला शोधून आणा कोणीतरी. =))

ती तर आलीय की लगेच चेंबूरच्या अनिलाच्या नावाने टिळा लावून.

पैसा's picture

17 May 2016 - 8:01 pm | पैसा

राँग नंबर लागला तर! =))

सुरु व्हायच्या आधीच संपली का कहाणी... :)

स्रुजा's picture

17 May 2016 - 7:42 pm | स्रुजा

लोल .. काय पण निमो चे धागे:) फाइंडिंग निमो खरंच मिशन म्हणायचं की आता ;)

बादवे,

लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला..

एकुटवाण्या राऊळात जास्त फिट्ट होईल ;)

एकुटवाण्या राऊळात जास्त फिट्ट होईल ;)

ह्याला बोलतेत स्टोरीका डिट्टेलिंग!

जेपी's picture

17 May 2016 - 8:34 pm | जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त धागाकर्तीला काहीच न देता सत्कार करण्यात येत आहे.

-शुभेच्छुक-: जेपी आणी तमाम सर्टीफाईड साधेभोळे कार्यकर्ते

गौरी लेले's picture

17 May 2016 - 10:10 pm | गौरी लेले

अहाहा !

कित्ती सुंदर अन भावविभोर लिहिले आहेस निमो !

खूपच सुरेख !!

अवांतर : लोकांना प्रचू डार्लिंग वर हसू आल , पण मला तर ह्यावरून तू डु आयडी असल्याचा संशय ठाम झाला आहे. तरीही / त्यामुळेच पुढील भागाच्या प्रतीक्षेत ...

मारवा's picture

17 May 2016 - 10:55 pm | मारवा

अरे प्रेमात पडण नविन का ते आहे ?
संस्थळावर प्रेमात पडण भले असेल
पण प्रेमात पडण ही तर जुनीच बीमारी आहे ना
मग एवढा गदारोळ कशाला मी म्हणतो?
अशाने निरागसता लाजुन बुजुन जाते
प्रेम कोमेजुन जात
बाकी प्रचु कोण हा प्रश्न शिल्ल्क राहतोच.
सुंदर भावुक निवेदन
आवडल

किसन शिंदे's picture

18 May 2016 - 8:04 am | किसन शिंदे

बाकी प्रचु कोण हा प्रश्न शिल्ल्क राहतोच

प्रचेतस!!

सतिश गावडे's picture

18 May 2016 - 8:07 am | सतिश गावडे

ते लेण्यांवर,मंदिरांवर, गधेगाळावर आणि आंदर मावळातील गर्द हिरवाईवर छान छान लिहीतात ते प्रचेतस का?

किसन शिंदे's picture

18 May 2016 - 8:15 am | किसन शिंदे

बहुदा

विटेकर's picture

18 May 2016 - 9:13 am | विटेकर

...आलं लक्षात ! एकूण असे आहे तर !
असू दे , माझ्या आणि विटुकाकूच्या शुभेच्छा !
बाकी नील , प्रीतला चांगला मोहर आला आहे आता गोमटी फळे लागू देत !
काय ?

पैसा's picture

18 May 2016 - 11:10 am | पैसा

फळं कसली कर्माची! =))

नीलमोहर's picture

18 May 2016 - 11:41 am | नीलमोहर

=))

पण हे अस काही नसेल नुसतीच आपली कल्पना असेल तर मोठा अन्याय होइल.
थोड मॅटर स्पष्ट होइपर्यंत शुभेच्छा देण घाईच होइल कदाचित.
आग दोनो तरफ बराबर लगी है की एकीकडे च लागलीय
की मुळात आग लागलीच नाही व आपली वाचकांची फॅन्टसीच पेटलीय
अजुन कळायला मार्ग नाही सस्पेन्स च आहे.
अस सस्पेन्स मध्ये शुभेछा त्याही थेट फळा पर्यंत म्हणजे जरा घाई होतेय
धुरावरुन अंदाज बाधणारा
धिरोदत्त मारवा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2016 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडं दिवस वाट पाहू...!
प्रचुने काही ख़ास रिप्लाय नै दिला अजून ?

-दिलीप बिरुटे

mahesh d's picture

18 May 2016 - 11:12 am | mahesh d

Congrats on expressing the love, hope your love life begins at the earliest you both enjoy the life to the fullest.

नीलमोहर's picture

18 May 2016 - 11:12 am | नीलमोहर

इथे 'शूट द मेसेंजर' चा खेळ सुरू झालाय का..
म्हणजे एखादा दूत काही वाईट बातमी/संदेश घेऊन आला तर त्या बातमीसाठी त्यास दोषी ठरवून शिक्षा देतात,
पण इथे तर चांगली गोड बातमी होती ;)

स्टोरी एवढीच आहे की मा.प्रचेतस सर यांच्या खवमध्ये आणि इतरत्रही 'प्रचू डार्लिंग'चा उल्लेख पहावयास मिळाला,
एका मेल आयडीने फिमेल डु-आयडीच्या नावाने दुसर्‍या मेल आयडीस असे काही म्हणावे याची फार गंमत वाटली, त्या दोन शब्दांवरून हा एवढा कारभार सुचला, मग त्यावरून प्रचेतस सरांना थोडे छळावे म्हटले.

आधी खरडच लिहायची होती पण लिहीतांना ते मारूतीच्या शेपटीप्रमाणे वाढत गेले, त्यात गाणीही अ‍ॅड झाली. हे सर्व एका गंमतीशीर धाग्याचे मटेरिअल होऊ शकेल असे वाटले म्हणून हा धागाप्रपंच. हा सर्व प्रकार खेळीमेळीतच केला गेला आहे, त्यास जास्त गंभीरपणे न घेता, व्यक्तिगत होऊ न देता त्याच स्पिरीटमध्ये घेतल्यास जास्त बरे होईल.
लेखनविषय-मौजमजा, लेखनविषय-सद्भावना आहेत हे पुन्हा एकदा नमूद करेन :)

प्रचेतस's picture

18 May 2016 - 11:29 am | प्रचेतस

बरं बरं.
पुढचा भाग लिहायला कधी घेताय?

रातराणी's picture

18 May 2016 - 11:37 am | रातराणी

लगेच पुढचा भाग यायला ती काय सिरेल आहे का? (असं मी नाही पैसातै म्हणाल्यात वरती.)

नीलमोहर's picture

18 May 2016 - 11:24 am | नीलमोहर

प्रतिसादांसाठी कोणाचेही आभार मानण्यात येणार नाहीयेत कारण बर्‍याच प्रतिक्रियांतून निव्वळ काड्या टाकणे आणि अर्थाचा अनर्थ करणे या दोनच गोष्टी साध्य झाल्यात :p

लेखामागील उदात्त हेतू आख्ख्या होल मिपामधील एकमेव श्री.संदीपजी चांदणे यांना समजलाय आणि त्यांनी त्यानुसार रेलेव्ह्न्ट प्रतिसाद दिलाय हेही विशेष.
(अजूनही कोणाला कळले नसेल तर वरील लव्स्टोरी प्रचेतस-मुग्धा या जोडीची आहे :)

जोड्या जुळवणे मंडळाच्या सक्रीय कार्यकर्त्यांना आणि माझ्या आयडीबद्दल शंका घेणार्‍या सर्वांना ल्ल्ल्ल्ल्लूलूलूऊऊऊऊ !!!!

रातराणी's picture

18 May 2016 - 11:32 am | रातराणी

बै बै मला तर अगदी भरूनच आलं बाई.

प्रचेतस's picture

18 May 2016 - 11:41 am | प्रचेतस

उगी उगी.
डोळे पुसा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2016 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छ्या, मुड़च गेला. उदात्त हेतू वगैरे असू द्या हो, खेळ तुमचा होतो पण एखादा जीवानीशी जाईल त्याचं काय ? प्रचु कालपासून झोपले नाहीत म्हणतात... (हलकेच घ्या ) :)

एकदा आपण वरिजनल आयडी आहात, याचा शोध लागला पाहिजे, मग आम्ही डोले मिटायला मोकळे.

म्हणजे तुम्ही मला, नाना चेंगट वाटता, कधी प-या तर नसेल असे वाटते, पण तुम्ही निमो आहात हे वाटतच नाही. देवाची शप्पथ :)

-दिलीप बिरुटे

वरील लव्स्टोरी प्रचेतस-मुग्धा या जोडीची आहे

बास, बास !
हा एकच ढिस्क्लेमर धाग्यात टाकला असता तर ?
पण नै, मग शंभर कसे होणार =))

नीलमोहर's picture

18 May 2016 - 12:13 pm | नीलमोहर

थोडं सटल ठेवायचं होतं हो सगळं, असं डायरेक्ट एखादीचं नाव कसं घ्यायचं, उगा लाजरी बुजरी असेल तर बिचारी?
म्हणून तर इतक्या सगळ्या हिंट्स दिल्या होत्या, पण एवढ्या सूज्ञ मिपाकरांसमोर वाटी चमचा घेऊन बसावे लागेल हे मला काय माहिती ;)

सतिश गावडे's picture

18 May 2016 - 11:34 am | सतिश गावडे

लय दुरुन आलोया... लेणी फिरून आलोया...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2016 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हणा....!

-दिलीप बिरुटे

रातराणी's picture

18 May 2016 - 11:48 am | रातराणी

न करून हिम्मत, दर्पणाशी ब्रेकअप केलंया
सम्द्या मिपात, म्या लै हुशार, डार्लिंग बनलूया
झाल झिंग झिंग झिंगाट :)

प्रचेतस's picture

18 May 2016 - 11:50 am | प्रचेतस

दर्पणाशी ब्रेकप?
नो वे.

रातराणी's picture

18 May 2016 - 11:54 am | रातराणी

दोन दोन जीएफ. फसाल हो फसाल. मुग्धाच जौन दया. त्या दर्पणसुंदरीला कळलं तर लेण्यात बोलवून तुम्हाला कोंडून निघून जाईल स्वर्गात. मग बसा हरी हरी करत =))

यशोधरा's picture

18 May 2016 - 11:57 am | यशोधरा

हरी हरी नई काय, दर्पणा दर्पणा!

प्रचेतस's picture

18 May 2016 - 12:00 pm | प्रचेतस

=))