भृगु संहिता हा ज्योतिष विषयक ग्रंथ आपल्या पुर्वजानि लिहून ठेवला आहे..भृगु ऋषीने हा ग्रंथ लिहिले असे कळते..
वर्तमान काळातल्या एखाद्या इसमा प्रमाणे भूतकाळात..त्याच गृह नक्षत्रावर.जो माणूस जन्मला त्याचे व वर्तमान काळातल्या इसमाचे भविष्य एकच असते..हे त्याचे मूळ तत्त्व व गाभा आहे..भूत काळातल्या लिहिलेला त्याचा जीवानं पट व भविष्य जाणून घेऊ इच्छिणारा वर्तमान काळातला इसम यांचे भविष्य ९०% जुळत असे..
पुण्या मध्ये विजय टॉकीज च्या वर घाणेकर गुरुजी हे या विषयातले तज्ज्ञ होते..आता ते हयात नाहीत..पण त्यांच्या कडे खूप गर्दी असायची.
जन्म वेळ व जन्मस्थान सांगितल्यावर ते नेमके भूतकाळातली व्यक्ती व तिचे जीवानं यावरून भविष्य सांगायचे..
७२ साली त्यांची फी सर्वात जास्त म्हणजे १००० रुपये इतकी होती..
आता असे भविष्य सांगणारे गुरुजी आहेत की नाही हे माहीत नाही..
त्या काळात रु १००० हि फी मला परवडणारी नसल्याने मी त्या संधीस मुकलो.
आपणास या विषयी काही माहिती असेल तर शेअर करावी.हाच धागा उद्देश आहे
भृगु संहिता
गाभा:
प्रतिक्रिया
13 May 2016 - 10:23 am | प्रचेतस
भृगुंनी ग्रीकांकडून नक्षत्रं शिकून घेतली का?
13 May 2016 - 10:47 am | स्वामी संकेतानंद
शक्य आहे. आपण बरंच काही ग्रीकांकडून उचललं आहे. राहिला असेल एखादा ग्रीक भृगुच्या आश्रमात. ;)
13 May 2016 - 2:01 pm | प्रचेतस
जम्बुदिपणकस ब्रह्मनस भॄगुमुनिस नखतस ज्ञानमस यवनानि पवजिताम.
13 May 2016 - 10:53 am | खेडूत
चुकून ओकांकडून असं वाचलं!
13 May 2016 - 1:50 pm | mugdhagode
छान
13 May 2016 - 1:58 pm | स्पा
छोटी जीलबी
13 May 2016 - 2:38 pm | आनन्दा
वेलकम ब्याक
13 May 2016 - 5:48 pm | विवेकपटाईत
पुढच्या क्षणात काय होणार आहे, हे सांगणारा व्यक्ती अजून तरी मला सापडला नाही. (कधी हि कुंडली न दाखवणारा). गीतेत हि भगवंताने म्हंटले आहे, भूत, भविष्य आणि वर्तमान याचे ज्ञान भगवंताशिवाय अन्य कुणाला मृत्यू लोकात होणे शक्य नाही. बाकी समोरच्याचा चेहरा, त्याची अवस्था, अडचण इत्यादीचे आकलन करून भविष्य सांगितल्या जाते.
13 May 2016 - 11:45 pm | सतिश गावडे
मुळात भविष्य पाहायचेच कशाला?
माणसाची सारी दु:खे हा प्रारब्धाचा भोग आहे. ती भोगूनच संपतात. मात्र ते होत असताना आपण नविन क्रियमाण कर्म करत नाही ना याची काळजी घ्यावी जे की पुढे प्रारब्धात रुपांतरीत होऊ शकतात. आणि मग ते प्रारब्धाचे भोग चुकते करण्यासाठी पुन्हा जन्म.
यावर नामी उपाय म्हणजे भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे.
एकदा का भगवंताची कृपादृष्टी झाली की आपली सुटका झाली. मग आपल्याला तेच स्थान मिळणार जे ध्रूव बाळाला मिळाले.
14 May 2016 - 1:21 am | nishapari
धोंडोपंत आपटे म्हणून एक ज्योतिषी आहेत . त्यांच्या ब्लॉग वरुन आणि इतर काही बहुश्रुत माणसांच्या त्यांच्याबद्दलच्या अनुभवांवरुन ते या क्षेत्रातले खरेखुरे जाणकार -विद्वान वाटतात . माझीही त्यांच्याकडून कुंडली दाखवून त्यांचं मार्गदर्शन घेण्याची फार इच्छा आहे पण अजुन तो योग आलेला नाही . त्यांच्या फी बद्दल वगैरे काही माहिती नाही . हि त्यांच्या ब्लॉग ची लिंक - http://dhondopant.blogspot.in/?m=1 हे त्यांचे फोन नंबर - ७६६६९६१४०६ /९३२३७६१४०६आपली इच्छा असल्यास आपण त्यांच्याकडे चौकशी करू शकता .
14 May 2016 - 7:19 am | कंजूस
भृगुसंहितातलं पान वाचून दाखवायचे इतके रुपये घेत नसतील ते त्यांचं भविष्य घुसडत असतील.
15 May 2016 - 3:03 pm | माम्लेदारचा पन्खा
ते बघून सांगतात.... फी ५०० रुपये......
15 May 2016 - 4:20 pm | विवेकपटाईत
निर्मल बाबांकडे सर्व समस्यांचे सौपे उपाय आहेत. संकष्ट भृगु देवाचे अवतार आहेत.
19 May 2016 - 2:37 pm | प्रकाश घाटपांडे
४१) भृगुसंहिता हा काय प्रकार आहे? भृगुसंहितेमध्ये जगातल्या सर्वांच्या कुंडल्या सापडतात कशा?
हजारो वर्षांपूर्वी त्रिकालज्ञ ऋषिमुनींनी हिमालयाच्या पायथ्याशी एकत्र येवून आपल्या दिव्य दृष्टीच्या सहायाने पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या मानवजातीचे भविष्य पाहिले व ते भूर्जापत्रावर लोककल्याणार्थ लिहून ठेवले. त्यापैकी भृगु ऋषींनी जे लिहिले आहे ते भृगुसंहिता अशी भृगुसंहितेची कथा सांगितली जाते.
उत्तर भारतात अनेक लोकांकडे वेगवेगळया भृगुसंहिता आहेत. त्यावरुन ते भविष्यकथन करत असतात. आपल्याकडे ढवळे प्रकाशनने सुबोध भृगूसंहिता नावाचा खंड प्रकाशित केला. त्यामुळे भृगूसंहिता मराठी लोकांपर्यंत पोहोचली. यात सन १९०१ ते २००० या शंभर वर्षात जन्माला आलेल्या लोकांच्या कुंडल्या आहेत. खरं तर ती कुंडली नव्हेच तो कुंडलीसदृश आराखडा असतो. कारण तिच्यात चंद्र दाखवलेलाच नसतो. तसेच मेष रास प्रथमस्थानात असे गृहीत धरून तो आराखडा बनविलेला असता.े असे एकूण ४८८६ आराखडे त्या कुंडली खंडात दिलेले आहेत. त्या सर्वांचे भाकित हे ३०० प्रकारच्या वर्णनात बसवून ते फलित खंडात दिलेले आहे. म्हणजे एका प्रकारचे वर्णन हे सरासरी १६ प्रकारच्या विविध आराखडयांना लागू होते. हे १६ आराखडे विविध कालखंडातील असणार हे उघड आहे. या विविध कालखंडात जन्मलेल्या कोटयावधी लोकांना ते भाकीत लागू. स्त्रियांसाठी स्त्री खंड अशाच प्रकारचा आहे. त्यात शंभर प्रकारची भाकिते वर्णन केलेली आहेत. यावरून आपल्या आता लक्षात आले असेल की भृगूसंहितेत कुणाचीही कुंडली सापडते म्हणजे काय प्रकार आहे.
भृगुसंहितेत सरासरी आठ ते दहा दिवसांच्या अवधीत जगात जन्माला येणा या प्रत्येक जातकाच्यासाठी एकच एक कुंडली असते. तसल्या अपु या कुंडलीवरून वर्तवलेले भविष्य हजारो जातकांना बरोबर लागू पडते असे श्रद्धाळू लोक मानतात. जगभरातले लोक जसे बारा राशीत विभागले आहेत तसाच काहीसा हा प्रकार आहे.
चिं.वि. वैद्य १९२१ साली जुलै च्या 'चित्रमय जगत` अंकातील 'फलज्योतिषाचे निष्फळत्व` या लेखात लिहितात - म. गांधींची कुंडली एका राजकीय चळवळीतल्या सुशिक्षिताने भृगूसंहितेतून मिळवून आणली. त्याने असे सांगितले, ''त्यात असे सापडले की हिंदुस्थानास स्वराज्य १९२१ साली जरी मिळाले नाही तरी १९२५ साली मिळेल आणि महात्मा गांधी हे पहिले प्रेसिडेंट होतील, परंतु ते ती जागा पत्करणार नाहीत.`` वगैरे. तेव्हा मला मोठे आश्चर्य वाटले. भृगूसंहिता अमुक वर्षी हिंदुस्थानास स्वातंत्रय मिळणार म्हणून सांगणार आणि त्या प्रोत्साहनाने आमचे लोक स्वराज्याचा प्रयत्न करणार! भृगूसंहिता हे एक प्रचण्ड थोतांड असून त्याचा आमच्या सुशिक्षित आणि कर्तव्यदक्ष मंडळींवर अजून पगडा आहे हे आश्चर्य आहे.
कै. शं.बा.दिक्षित ( इ.स. १८९६ ) आपल्या ' भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास ` या ग्रंथात म्हणतात- भृगुसंहिता हा ग्रंथ प्राचीन नसावा. कारण त्याविषयीचा उल्लेख वराहमिहिर ( ७ वे शतक ) व भटोत्पल ( ९ वे शतक ) यांच्या ग्रंथात नाही. कुठलीही जन्मकुंडली यात सापडते असे मानले तर निरनिराळी लग्नराशी व भिन्न भिन्न स्थानगत ग्रह यांच्या मानाने ७,४६,४९,६०० कुंडल्या पाहिजेत. एकेका कुंडलीचे दहा दहा श्लोक जरी धरले तरी ७५ कोटी श्लेाक पाहिजेत. भृगुसंहितेचा काही भाग ज्यांच्यापाशी असेल ते प्रसंगवशात लबाडी करत असतील. म्हणजे एखाद्या मनुष्याची पत्रिका नवीन करुन ती भृगुसंहितोक्त म्हणून देत असतील.
19 May 2016 - 2:56 pm | आदूबाळ
हा "ब्रूटफोर्सिंग"चा प्रकार वाटतो. याचा अर्थ काही अॅझम्शन्स करून भृगुऋषींनी ४८८६ टेस्ट केसेस बनवल्या.
याचा वापर ज्योतिष खरं की थोतांड हे शोधण्यासाठी करता येईल. अगदी व्यवस्थित स्टॅटिस्टिकल टेस्ट्स ऑफ सिग्निफिकन्स वगैरे लावून.
इंट्रेस्टिंग.
25 May 2016 - 7:17 pm | अविनाशकुलकर्णी
धन्यवाद
19 May 2016 - 5:31 pm | कंजूस
प्रथम या सर्व गोष्टींकडे आपण नोंद घेण्याच्या दृष्टीने पाहायला शिकायला हवे.ग्रहस्थिती जातकाच्या आयुष्यातील घटनांवर परिणाम करते हे धरून निरनिराळे प्रयोग झाले ही एक पुर्वजांची प्राप्तीच आहे.आता नवग्राह बाराराशिंतून फिरल्यवर असंख्य आराखडे निघतीलच.त्यांना एक लसावी/मसावी काढून कुंडल्या आणि भाकितं सांगणे हा अप्रतिम उपक्रम आहे.
मनुष्याच्या आयुष्याची सार्थकता मोजायचे माप नाही परंतू लौकिक अर्थाने भारतात मोक्ष मिळवणारा आणि परदेशांत ऐहिक सुख मिळवणारा यशस्वी मानला जातो.
तर हे हे यशस्विता देणारे गुरू आणि शनि यांच्या६०/८४/१२० वर्षांचा लसावि/मसावि फलवर्णन म्हणजेच भृगुसंहिता असे मी मानतो.
25 May 2016 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अविकाका, भविष्यात काय वाढून ठेवलंय हे कोणीच सांगू शकत नाही, कुठे नादी लागलात तुम्ही अशा गोष्टींच्या !
-दिलीप बिरुटे