मदत हवी आहे, Attestation करणे

अनिकेत वैद्य's picture
अनिकेत वैद्य in काथ्याकूट
12 May 2016 - 3:44 pm
गाभा: 

काही महत्वाच्या कागदपत्रान्चे Attestation(साक्षान्कीत प्रत) करुन हवे आहे.
पुण्यात कोठे मिळू शकेल?

Attestation हे राज्य/केन्द्र शासनाच्या वर्ग १ अधिकार्याकडून करुन हवे आहे. नगरसेवक/नोटरी नको. आमदार्/खासदार चालतील.
सद्ध्या बर्याच शाळाना सुट्ट्या असल्याने मुख्याध्यापक पदावरील व्यक्ती भेटू शकत नाहियेत.
नवीन नियमानुसार self attestation चालते हे सान्गु नये, ministry ला वर्ग १ अधिकार्याने केलेले attestation हवे आहे.

प्रतिक्रिया

स्थितप्रज्ञ's picture

13 May 2016 - 3:08 pm | स्थितप्रज्ञ

कुमठेकर रस्त्यावर D G Copiers म्हणून एक Xerox चे दुकान आहे. तिथे ते attest करून देतात असा बोर्ड बघितल्याचा आठवतो मला. फक्त तो नवीन admissionच्या काळातच असतो का ते माहित नाही.

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 9:45 am | अनिकेत वैद्य

धन्यवाद.
xerox च्या दुकानात attestation हे विशेष कार्यकारी अधिकारी ह्यान्च्या नावाने केले जाते. ते चालणार नाहीये.

पोलीस कमीशनर किंवा IAS समकक्ष अधिकार्‍याला गाठा. त्यांना अधिकार असतात.

पालिकेचे आयुक्त / कलेक्टर प्रभृती पण चालतील.

वरील सर्व लोक्स कुठे सापडतील हे चौकात थांबलेल्या पांढर्‍या वेषातील पोलीसाला (चालत जावून) विचारा.

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 9:48 am | अनिकेत वैद्य

IAS, IPS किन्वा समकक्ष अधिकारी हे असली छोटी कामे करीत नाहीत.
त्यान्चे PA असल्या कामान्साठी साहेबान्ना भेटूच देत नाहीत.

नाईकांचा बहिर्जी's picture

16 May 2016 - 9:55 am | नाईकांचा बहिर्जी

गॅजेटेड अधिकार्यात राज्य सरकार चे अधिकारी चालत नाहीत का??

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 10:03 am | अनिकेत वैद्य

राज्य सरकार चे अधिकारी चालतात

आदूबाळ's picture

13 May 2016 - 9:43 pm | आदूबाळ

इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जा. पाहिजे तितके ग्रेड १ ऑफिसर्स मिळतील.

- स्वारगेट (पीएमटी वर्कशॉपच्या शेजारी)
- बीओ भवन (सिटीप्राईड सातारा रोडच्या समोर)
- प्रभात रोड (इन्कम टॅक्स गल्ली)
- साधू वासवानी चौक

केबिनबाहेर बसणार्‍या इसमाला चिठ्ठी / कार्ड द्या, आणि "साहेबांना भेटायचं आहे" असं सांगा. शक्यतो तुम्हाला अ‍ॅटेस्टेशन पाहिजे आहे हे सांगू नका. थेट ऑफिसरशी बोला.

आधी फोन केलात तर फार उत्तम. (माझ्या माहितीप्रमाणे अपडेटेड) डिरेक्टरी इथे आहे:
http://office.incometaxindia.gov.in/pune/Documents/Directory%20of%20Offi...

पूर्ण डिरेक्टरी वाचा. कदाचित कोणी ओळखीचं निघेल, आणि काम अगदीच सोपं होईल.

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 9:55 am | अनिकेत वैद्य

इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये गेल्यावर साहेबाना कोणत्या केस सन्दर्भात भेटायचय हे आधी विचारतात.
पण वैयक्तिक काम आहे, साहेबान्ना फोन करून आलोय सान्गितल्यावर भेटून काम करून घेतले

mugdhagode's picture

13 May 2016 - 5:16 pm | mugdhagode

मोठ्या सरकारी हस्पिटलातील डीन, सुपरिंडेंंट , सिविल सर्जन इ इ

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 9:56 am | अनिकेत वैद्य

धन्यवाद.
ह्या पदावरील व्यक्ती बरेचदा उपलब्ध होत नाहीत. कामाचा ताण प्रचन्ड असतो त्यान्ना.

प्रसाद१९७१'s picture

13 May 2016 - 5:16 pm | प्रसाद१९७१

त्यापेक्षा नोटरी कडुन अ‍ॅटेस्टेशन करुन घ्या ना. लगेच देतात, थोडी फी घेतात पण एकदम कायदेशीर.

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 9:52 am | अनिकेत वैद्य

नोटरी चालणार नाही असे स्पष्ट लिहिले आहे.

चंद्रनील मुल्हेरकर's picture

13 May 2016 - 5:32 pm | चंद्रनील मुल्हेरकर

नगरसेवक वा नोटरी गाठा

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 9:52 am | अनिकेत वैद्य

नगरसेवक वा नोटरी चालणार नाही असे स्पष्ट लिहिले आहे.

विवेकपटाईत's picture

13 May 2016 - 5:40 pm | विवेकपटाईत

क्लास १ अधिकाऱ्या कडून सत्यापित केल्या नंतर काम पूर्ण होणार नाही. इमानदार माणसाकडून हि सत्यापित करून घ्या. भविष्यात अडचण येऊ शकते.

घराच्या आसपास चौकशी करा (पानपट्टी, किरणा दुकान इत्यादी), जवळच कुठेतरी सापडेल attested वाला . किंवा जवळच्या सेना/मनसे/खान्ग्रेस शाखेत विचारा.

कंजूस's picture

13 May 2016 - 9:34 pm | कंजूस

नोटरी चालणार नाही हे सांगण्याचा अधिकार कोणी दिला?.अफिडेविट करा.

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 9:58 am | अनिकेत वैद्य

नोटरी चालणार नाही हे स्पष्ट लिहील आहे.
attestation कोणाकोणाच चालू शकेल ह्याची यादी दिली आहे, त्यात नोटरी नाही.

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 10:02 am | अनिकेत वैद्य

सर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद

मित्रासोबत जावून एका शाळेतून मुख्याध्यापकाच्या सहीने attestaion करून घेतले.
ह्या शाळेत (पुण्यातल्या बहुतेक सर्व शाळात) केवळ आजी/माजी विद्यार्थानाच attestaion करून दिले जाते.
मित्राच्या ओळखिने काम झाले.

माम्लेदारचा पन्खा's picture

16 May 2016 - 3:12 pm | माम्लेदारचा पन्खा

अटेस्टेशन करायला क्लास एकचे अधिकारी लागतात.... ओळखीच्या माणसाकडून करून घ्या असे कुठेही सांगितले नाहीये.... मात्र बरेच लोक खूप भाव खातात...... याच कारणावरून एकदा मित्रासाठी विश्वास नांगरे पाटलांशी भांडून आलो आहे.....न का ओळखेनास बाबा... ओरिजिनल पाहून सही तर कर !! नाही म्हणाला मनुष्य......

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 4:02 pm | अनिकेत वैद्य

ओळख नसताना बरेच अधिकारी सही करत नाहीत.
अनेक अधिकार्यान्ना हे काम दुय्यम दर्जाचे वाटते. त्यामुळे ते सही करत नाहीत.

बबन ताम्बे's picture

17 May 2016 - 1:07 pm | बबन ताम्बे

मीही एकदा प्राधीकरणातील ऑफीसमधे गेलो होतो. तिथल्या साहेबाने ओळखत नाही म्हणून अटेस्ट करायला नकार दिला.

अनिकेत वैद्य's picture

16 May 2016 - 4:01 pm | अनिकेत वैद्य

ओळख नसताना बरेच अधिकारी सही करत नाहीत.
अनेक अधिकार्यान्ना हे काम दुय्यम दर्जाचे वाटते. त्यामुळे ते सही करत नाहीत.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व (पुर्णवेळ) प्राध्यापक हे वर्ग १ चे गॅझेटेड ऑफिसर असतात. त्यांच्याकडुन attestation करुन घेता येते.

---
कानडा

उगा काहितरीच's picture

17 May 2016 - 7:22 pm | उगा काहितरीच

सही न देण्याचं कारण म्हणजे जर समजा डॉक्युमेंट फेक असेल (ओरीजनल दाखवून दहा -विस बरोबर डॉक्युमेंटमधे १-२ फेक डॉक्युमेंट सहज टाकता येतात. ) तर सही करणारा अधिकारी अडचणीत येऊ शकतो. शिवाय हे अधिकचे काम आहे. त्यामुळे करण्यास सहसा अधिकारी तयार होत नाहीत. मित्राच्या, नातेवाईकाच्या ओळखीचा अधिकारी असेल तर सहसा टाळटाळ करीत नाही.