हि कथा आहे स्वप्ना आणि स्वप्नीलची (नावं काल्पनिक आहेत पण कथा खरी आहे.)
दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा फक्त तोंड ओळख होती. हाय हेल्लो पुरतेच बोलायचे. यथावकाश कॉलेज संपले आणि ते वेगवेगळ्या मार्गाला गेले.
अचानक १-२ वर्षांनी त्यांची गाठ पडते. पुन्हा तेच हाय हेलो. मग असाच एक दोनदा भेट झाल्यावर फोन नंबर एक्स्चेंज होतात. मग ते फोन वर बोलन…. एकमेकांची आवड निवड जाणन. हे सगळ सुरु होत. मग डेटिंग सुरु होत. तिला तो मनापासून आवडतो. मनोमनीच ठरवते कि लग्न करेन तर याच्याशिच.
पण तो… तो फक्त टाईमपास करत असतो. ती बिचारी सगळ खर समजून त्याला भरभरून प्रेम देते.
आणि अचानक एक दिवस तो तिला काहीही न सांगता सोडून जातो. ती बिचारी रडरड रडते. सगळीकडे चौकशी करते. तेव्हा तिला कळत कि त्याच तिच्यावर कधी प्रेमच नव्हत. खूप वाईट वाटत तिला. कारण तिच्या आयुष्यातलं ते पहिलच प्रेम असत आणि तेही असं फसवं निघत. दिवस जातात, महीने जातात. हळूहळू तिची गाडी रुळावर यायला सुरुवात होते. मग सगळ विसरायचा प्रयत्न करते. पण ते तिच्यासाठी अशक्य असत कारण तो कसाही वागला तरीही तीच प्रेम खरच असतं.
पुन्हा एकदा तिचं आयुष्य एक वेगळ वळण घेत. २ वर्षांनतर तो तिच्या समोर उभा राहतो. अगदी परिस्थितीने गंजून गेलेला असा. हात जोडून तिची माफी मागतो मला एकदा माफ कर म्हणतो. स्वत: पासून वेगळ करू नकोस म्हणतो. हि तर प्रेमच करत असते त्याच्यावर. चूक समजून घेऊन माफ करते त्याला. तो तिला सगळ समजाउन सांगतो. ती पुन्हा त्याला तिच्या आयुष्यात स्थान देते. आता हा हि तिच्यावर मनापसून प्रेम करू लागतो. तिला कुठे ठेऊ अन कुठे नको अस होऊ लागत. जगातली सगळी सुख द्यायचा प्रयत्न करतो. सगळ सुखासुखी सुरु असतं.
आता ती त्याला लग्नाची गळ घालते. आपण लग्न करूया म्हणते. तो हि 'हो' म्हणतो. पण इतक्यात नको, थोड सेटल होऊ दे म्हणतो. ती हि मग जास्त आढेवेढे न घेता समजून घेते. आता ते एकमेकांच्या 'जास्तच' जवळ येतात. तीही त्याच्यावर 'विश्वास' ठेवते. त्याच्या प्रेमात आकंठ बुडते.
एक दिवस तो तिला म्हणतो 'मी गावी जात आहे कामासाठी पूर्ण कुटुंबाबरोबर' असं सांगतो. ती हि जास्त काही विचारत नाही. तो गाडीत बसतो तोच त्याचा शेवटचा 'कॉल' असतो. त्यानंतर त्याचा एकही कॉल येत नाही आणि हि कॉल करते तर फोन बंद येतो. हिच्या मनात नको नको ते विचार यायला लागतात. काय झाल असेल? तो ठीक तर असेल न? त्याच्या वडिलांना बर नव्हत, ते तर ठीक असतील न? एक न दोन हज्जार शंकांनी तीच मन ढवळून निघत. दिवस पुढे जात असतात.
बरोबर १५ दिवसांनी तो तिला न सांगता न कळवता तिच्यासमोर येउन उभा राहतो. (तसंही त्याला तिला सर्प्राईजेस द्यायला आवडायचं) तिला काय करू अन काय नको अस होऊन जात. तश्याही परिस्थितीत भर रस्त्यात ती त्याला मिठी मारते. मग स्वतः ला सावरून घेते. मग तो तिला घरी सोडतो. पूर्ण वेळ ती त्याच्या बाईक वर मागे बसून रडत असते. तो मात्र शांत असतो. घर जवळ येत तास तो तिला शांत करतो आणि 'सगळ ठीक होईल' अस म्हणतो.
'सगळ ठीक होईल' हे एकाच वाक्य तिच्या मनात गुंजी घालत असतं. तसाही आल्यापासून त्याच्यात पडलेला बदल तिला जाणवत होता. खूप शांत शांत वाटत होता तिला तो. तिला समुद्रकिनारे फार आवडतात हे त्याला माहित असत. एक दिवस तो तिला अचानक फिरायला घेऊन जातो. समोर तो शांत समुद्र आणि त्याच्या समोर बसलेले हे दोघे जण. ती नेहमीच्या मस्करीच्या मूड मध्ये असते आणि हा मात्र शांतच. आणि मग तो बोलू लागतो, 'स्वप्ना मला तुला काहीतरी सांगायचं……. मी तुझ्यापासून काहीच लपऊ शकत नाही. माझा साखरपुडा झाला' ……… मी गावी गेलो होतो ते त्याचसाठी. माझ्या आई वडिलांनी परस्पर सगळ ठरवलं. मला काहीही न सांगता हे सगळ झाल. वडिलांनी आत्महत्येची धमकी दिली मला आणि त्यामुळे मला त्यांच्या मनाप्रमाणे करावच लागल… स्वप्ना मला माफ कर……. मला दूर नको लोटू तुझ्यापासून'…. तो रडत होता. माफी मागत होता.
पण ती ……… 'माझा साखरपुडा झाला' …… हे एवढेच शब्द ऐकले तिने आणि ती कोसळली. ते शब्द जणू कानात कोणीतरी गरम शिसे ओतावे तसे भासले तिला… पुढच काही ऐकूच आल नाही. तिचं त्याच्याबरोबर एकत्र राहाण्याच स्वप्न पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं. धरणीमाय पोटात घेईल तर बर अस वाटत होत तिला. डोळ्यापुढे फक्त आणि फक्त अंधार येत होता. सावरण्याच्या मनस्थितीतच नव्हती ती. कशी बशी घरी गेली.
तिच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ तरळू लागला. खूप खचली ती. तो तिला परोपरीने समजावत होता पण आता तिच्या अंगात चंडी संचारली होती. खऱ्या प्रेमाचा असा दगा व्हावा हेच तिला पटलं नाही. तिने त्याला सांगून टाकल कि ती जे काही त्या दोघांमध्ये झालं ते त्याच्या आई वडिलांना सांगून टाकेल. तो तिच्या हाती - पाई पडू लागला. आई वडील काहीतरी करून घेतील असं सांगू लागला. पण ती त्याच काहीच ऐकून घेत नव्हती. शेवटी ती शांत झाली. शांत डोक्याने विचार करू लागली. आई वडिलांना शिक्षा का द्यायची? म्हणून ती शांत बसली.
आता तिचा प्रेमावरून विश्वास उडाला होता. एकीकडे तिच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात झाली होती. लग्न करण्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नव्हता पण केवळ जन्मादात्यांकडे बघून ती सगळ्याला तयार झाली. इथेही तिच्या नशिबात सुख नव्हतच. पुन्हा त्याने फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली होती. तू काहीही झाल तरी माझ्याबरोबर राहा… अस त्याच म्हणन होत तर ती आत्ता ह्या जबरदस्तीच्या नात्याला तयार नव्हती. ती तर लग्नाला तयार होती त्याच्याबरोबर. पण त्याला तिच्याबरोबर लग्न न करता राहायचं होत. ती कॉलला उत्तर देत नाही म्हणून तो तिला मेसेजेस करू लागला. 'तू कधी हि सुखी राहणार नाही, तुला नवरा मिळेल पण फक्त नावापुरता, तू स्वार्थी आहेस, तुला फक्त लग्न हवाय मी नको' … अस आणि आजून बराच काही.
हीच कामात लक्ष नाही लागत आहे. सततच्या ह्या टोर्चरमुळे ती वैतागली आहे. काय करावं? कुणाशी बोलावं काळात नाही आहे.
तर हि तिची व्यथा आहे. तुम्हाला काय वाटत यात चूक कोणाची? आणि तिने आत्ता आयुष्याच्या अश्या वळणावर काय निर्णय घायला हवा?
प्रतिक्रिया
7 May 2016 - 1:16 pm | कविता१९७८
त्याच्या बायको आणी आईवडीलाना या प्रकाराची माहीती द्यायला सान्गा तिला. तिला एस एम एस प्रुफ म्हणुन दाखवता येतील.
7 May 2016 - 1:20 pm | तर्राट जोकर
सहमत.
7 May 2016 - 1:49 pm | चिनार
आंधळेपणाने अती विश्वास ठेवला ही त्या मुलीची चूक आहे. पण ही चूक भावनेच्या भरात झालेली आहे.
खरी चूक त्या मुलाने केली आणि अजूनही करतोय. तिने न घाबरता पोलीसात तक्रार द्यावी. दोन फटक्यात सरळ होईल तो.
7 May 2016 - 2:25 pm | मानसी१
शिवाय स्वताच्या आई वडीलांना सांगुन टाका. पुढे जाउन पोलीस कंम्प्लेंट करावी लागली तर तेच पाठी उभे राहतील.असल्या फालतु मुलाला घाबरायची काही गरज नाही
7 May 2016 - 3:02 pm | उगा काहितरीच
माझे मत... त्या मुलाला स्पष्ट शब्दात सांगायला हवे की बाबारे जे झालं ते झालं , आता यापुढे मला फोन करण्याचा, भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस. तु तुझ्या आईवडीलांसाठी दुसऱ्या कुण्या मुलीशी लग्न करू शकतोस तसेच मलाही माझ्या आईवडीलांसाठी दुसऱ्या मुलाशी लग्न करावे लागेल. आणि या प्रकारामुळे तुझे, माझे स्वतंत्र वैवाहिक आयुष्य धोक्यात येऊ शकते तस्मात तु तुझ्या रस्त्यावर अन् मी माझ्या रस्त्यावर . नंतर आईवडीलांना विश्वासात घेऊन सर्व प्रकरण सांगावे , आईवडील सांगतील त्या मुलाशी लग्न करावे(अर्थातच नवीन मुलालाही विश्वासात घेऊन सर्व सांगावे) . मधल्या काळात जर स्वप्निल त्रास देत असेल तर मात्र पोलिसांना कळवावे.
7 May 2016 - 3:10 pm | बोका-ए-आझम
पण केस झालीच तर तो जो मानसिक त्रास देतोय (stalking) त्याबद्दल होईल, कारण त्याचे पुरावे आहेत. याआधी जो मानसिक त्रास झालाय त्याबद्दल दुर्दैवाने तिला न्याय मिळू शकत नाही.
7 May 2016 - 7:30 pm | झेन
चूक कोणाची - याच्या ऊत्तरानी काही फरक पडत नाही. सदर मुलीने स्वप्नांच्या दुनियेतून लवकरात लवकर बाहेर यावे आणि स्वतःचा अंदाज घ्यावा. जर निभावून नेण्याचा दम असेल तर पोलिस आणि माध्यमांचा उपयोग करावा अन्यथा फक्त त्रास टाळायचा असेल तर मुलाला स्पष्ट सांगावे इथून पुढे संपर्क केलास तर तूझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन. जबाबदारी न घेणारे फट्टू असतात तो नक्की घाबरेल. परिवार आणि तूमच्यासारख्या मित्रपरीवाराने मुलिला सकारात्मक रहायला मदत करायची.
7 May 2016 - 7:52 pm | चांदणे संदीप
पोलीस स्टेशन गाठा!
7 May 2016 - 8:26 pm | स्वप्क००७
त्याने त्याचे आई बाबा आत्महत्या करतील असे सांगितलाय ना. तिनेही असाच सांगावे आणि तरीही जर नाही आईकलं तर पोलिसात तक्रार करेन असे सांगावे. पुरावे म्हणून त्याचे फोन कॉल्स आणि मेसेज रेकॉर्ड करून ठेवावे.
7 May 2016 - 8:37 pm | कानडाऊ योगेशु
थोडक्यात त्याला ती रखेल म्हणुन हवी आहे आणि चीड येणारी गोष्ट ही आहे कि त्या मुलीला हे कळत असून वळ्त नाही आहे.एक दोनदा तंबी द्यावे आणि त्यानेही जर तो नाही लाईनीवर आला तर मग कायद्याची मदत घ्यावी.तिने त्याला पूर्ण संधी दोनदा दिलेली आहे आता तिने स्वतःच्या आयुष्याचा व पर्यायाने स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायला हवा.
7 May 2016 - 9:41 pm | स्वीट टॉकरीणबाई
माझं मत - सर्वप्रथम स्वतःच्या आईवडिलांना पहिल्या दिवशीपासूनची सर्व हकीकत सांगितली पाहिजे. (हे खरं तर ह्याच्या खूपच आधी करायला हवं होतं.)
त्या मुलाला वठणीवर आणायला फार त्रास पडू नये. त्यानी एस एम एस वगैरे पाठवून भरपूर पुरावे हिच्याकडे दिलेले आहेत. पोलीस स्टेशन गाठावे.
मला मात्र मुख्य समस्या 'ह्या मुलीचं कमकुवत मन' ही दिसते आहे. एकदा त्याच्याकडून व्यवस्थित फटका खाऊनदेखील त्याच्या प्रेमात दुसर्यांदा पडली. जर हिच्याशी त्यानी लग्न केलं तर त्याचे आईवडील आत्महत्या करतील (असं त्यानी सांगितलं! खरं खोटं तिलाही माहीत नाही आणि तिनी ते शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही.) अशी परिस्थिती असताना सुद्धा "शांत डोक्याने विचार करू लागली. आई वडिलांना शिक्षा का द्यायची? म्हणून ती शांत बसली."
आता तिला स्वतःला लग्न करण्यात रस नाही. पण "लग्न करण्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नव्हता पण केवळ जन्मादात्यांकडे बघून ती सगळ्याला तयार झाली."
रडू लागली! शांत बसली! तयार झाली! अरे काय चाललय काय? प्रत्येक ठिकाणी त्याग करण्यातच ती धन्यता मानत असेल तर आयुष्यभर अश्रूंशिवाय तिच्या भाळी काहीही येणार नाही हे तिला कृपया पटवा. (अर्थात तुम्हाला पटलं असल्यास.)
7 May 2016 - 10:13 pm | यशोधरा
अगदी, अगदी.
7 May 2016 - 11:18 pm | पुणेकर भामटा
+१
7 May 2016 - 10:30 pm | एस
ही महामूर्ख मुलगी आहे आणि कुणी कितीही सांगितलं तरी अशीच कुढत राहणार आहे. त्यामुळे तिला काही सांगत बसण्यापेक्षा जर ती माझ्या ओळखीतली वगैरे असती तर त्या गाढवीच्याला बेदम झोडला असता आधी आणि तिच्याशी लग्न करायला लावलं असतं. अर्थात दोघांनाही व्यवस्थित तंबीबिंबी देऊन.
7 May 2016 - 10:38 pm | mugdhagode
तीघानीही धर्म बदलुन लग्न करा... गणपती बप्पा की जय !
....
तीन घरे बांधुन एकात बायको , एकात गर्ल फ्रेंड व एकात बॉय फ्रेंड ठेवण्याचे स्वप्न पहाणारा.
7 May 2016 - 10:55 pm | तर्राट जोकर
काही मिपाकर एकच अॅक्सेस डीनायड नावाचं घर बांधुन तुमचे सगळे आयडी तिथेच ठेवायचे स्वप्न कायम पाहतात.
7 May 2016 - 10:59 pm | mugdhagode
बिच्चारे !
7 May 2016 - 11:05 pm | एस
बॉयफ्रेंडपण? नाही, चालूद्या तुमचं. =))
8 May 2016 - 6:35 am | उगा काहितरीच
मीच चूकीचं वाचलं का काय अशी शंका आली होती. ;-)
8 May 2016 - 6:49 am | mugdhagode
आपल्याव्यतिरिक्त अजुन दोन ऑप्शन उपलब्ध आहेत याची जाणीव असली की बायकांची न्यूसन्स वॅल्यू कमी होते.
12 May 2016 - 4:54 pm | मृत्युन्जय
आपल्याव्यतिरिक्त अजुन दोन ऑप्शन उपलब्ध आहेत याची जाणीव असली की बायकांची न्यूसन्स वॅल्यू कमी होते.
तुमच्या अध्ये ४ लग्ने करायची परवानगी असते ना खरे. मग इतर २ ऑप्शन्स म्हणुन २ बायका पण चालतीलच की. पण बॉयफ्रेंड म्हणजे अवघड. नवाबी शौक आहेत तुमचे एकदम.
8 May 2016 - 8:23 am | हरकाम्या
प्रेमाची फार भूक असली की असे होते.
8 May 2016 - 10:52 am | हेमन्त वाघे
http://m.mid-day.com/articles/mumbai-man-held-for-forcing-ex-girlfriend-...
8 May 2016 - 1:11 pm | ज्ञानोबाचे पैजार
खरच महामूर्ख मुलगी आहे ती. तिला समजत नाहीये तिच्या मुर्खपणाचा हा नरपूंगव गैरफायदा घेतो आहे. हरामखोर ब्लेकमेल करतो आहे तिला आणि ती बावळट ते सगळे सहन करते आहे.
अंगाला चिकटलेली गोचीड मारूनच टाकावी लागते तिच्यावर दया दाखवुन उपयोग नसतो.
आपल्या आई वडिलांना तिने पहिल्यांदा सगळे सांगितले पाहिजे तसेच होणार्या नवर्यालाही फसवता कामा नये.
आणि च्यायला त्या कुत्र्याच्या ...त्याच्या घरी जाउन एकदा जबरदस्त तमाशा करायचा. (जे ती अजूनही करू शकते.) त्या अप्पलपोट्या आणि स्वार्थी कार्ट्याला चांगला तुडवुन काढायचा अगदी रस्त्यावर ओढून बडवायचा साल्याला. आणि मग तसाच फरपटत पोलिस स्टेशनला न्यायचा.
त्याच्या होणार्या बायकोला आणि तिच्या घरच्यांना पण याचे प्रताप सांगायचे. याचे लग्न मोडेल किंवा याच्या आईबापाला काय वाटेल याचा विचार न करता. त्यानंतर त्याने आणि त्याच्या आईबापांनी आत्महत्या केली तर काय करायचे? असले फालतू विचार करू नयेत.
हे सगळे अर्थात तुम्ही जी माहिती सांगितली आहे ते सर्व बाजूंनी पारखुन घेतली आहे असे गृहीत धरुन लिहिलेले आहे.
अजून एका आत्महत्येची धमकी देउन आत्महत्या करणारे लोक माझ्या तरी पहाण्यात नाहीत. मध्ये एकदा एकाने असेच अंगावर रोकेल ओतुन घेतले होते. मी त्याच्या जवळ जाउन काडी पेटवली, म्हटल तू कशाला कष्ट घेतोस मीच पेटवतो तुला, तर जागेवरच पेण्ट ओली केली होती लेकाने. "साहेब चुकलो" असे म्हणत माझ्याच पाया पडला होता. अजूनही दिसला तरी नजर चुकवुन जातो समोरुन.
तेव्हा त्या पोरीने असल्या धमक्यांना अजिबात भिक घालू नये.
आणि हो हे तुमच्या साठी...... नंतर काय झाले ते इथे सगळ्यांना आठवणीने सांगायला विसरू नये.
पैजारबुवा,
12 May 2016 - 4:32 pm | गौतमी
सर्वप्रथम सगळ्यांचे मनापासुन आभार. (आपापल्यापरीने उत्तरं दिल्याबद्दल).
मी हा धागा स्वप्नाच्या परवानगीनेच काढला होता. जशी मी ईथली उत्तरे वाचली तशीच तिनेही वाचली आहेत. त्यातली उत्तरं काही अंशी पट्ली तर काही अंशी नाही. (त्याचे कारण तिलाच माहीत आणी तसंही तिने असे मिश्र प्रतिसाद मिळतील यासाठी मनाची तयारीहि केली होती.)
तर महत्वाची गोष्ट ही की स्वप्निल आता तिला कधिच त्रास देनार नाही. कारण कालचं ती त्याला कोणतीही पुर्वसुचना न देता अचानक त्याच्या घरी गेली होती. सकाळी ऑफीसला न जाता थेट ती त्याच्या घरी उभी राहीली. ती कधी अचानक अशी थड्केल याची त्याला जराही कल्पना नव्हती. सगळच अनपेक्षित होत त्याला. जवळ्जवळ एक तास फक्त तिच बोलत होति आणी तो तसेच त्याचे आई वडील सगळ खालमानेने ऐकत होते.
जे झालं ते सगळ तिने त्याच्या आईवडीलांना सांगितल. त्याचबरोबर सोबत असलेले सगळे पुरावे (फोटोज आणि मॅसेजेस) दाखवले. त्यामुळे त्याच्याकडे ते स्विकारण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. सगळ कबुल केलं त्याने तसेच हे ही सांगितल की त्याच्यामुळे आता तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. (तसंही तिने पोलिस केसचं पिल्लू सोडलं आहे.)
आणि तिने हि सगळी घटना अगदी स्टर्ट टू एन्ड मोबाइल मध्ये रेकॉर्ड केली आहे. तिने जेव्हा मला हे सगळ सांगितलं तेव्हा खरंच माझा विश्वास बसला नाही पण जेव्हा ते रेकॉर्डींग ऐकलं तेव्हा मला खरं वाट्ल.
आज ती खरच खुप खुश दिसत होती. अगदी मनावरचं मण भर ओझ कमी झाल्यासारखी. (यालाच म्हणतात 'देर आये, दुरुस्त आये'.
12 May 2016 - 4:41 pm | नाखु
आपण समस्या मांडलीत आणि त्याचा झालेला थेट परिणाम-प्रवास-शेवटही दिलात. अन्यथा इथे जुने आणि जाणतेही(?) मिपाकर हक्काने समस्या/शंका/मदत मागतात आणि नंतर कधीही त्याबद्दल धाग्यावर येत नाहीत की नक्की काय केले ते अवाक्षर्ही सांगत नाहीत.
अश्या विदुषकांमुळे खरेच समस्या होती का लांडगा आला रे आला असे होऊ नये म्हणून हा प्रतिसाद.
त्या मुलीचा खंबीरपणा असाच राहो आणि तुम्हा दोघींमधील स्नेहही.
मिपा वाचक चिल्लर नाखु
12 May 2016 - 4:44 pm | गौतमी
ज्यांनी सल्ले दिले भलेही कसेहि असोत (तिच्या बाजूने किंवा तिच्या विरुद्ध).........आभार मानना तो बनता है;):)
12 May 2016 - 4:56 pm | मृत्युन्जय
सद्य केस मध्ये त्या मुलावर बलात्काराचा आरोप करता येइल हे तुमच्या मैत्रिणीला सांगा. "लग्नाचे आमिष दाखवुन बलात्कार"
12 May 2016 - 9:54 pm | mugdhagode
असा आरोप कोर्टात टिकत नाही.
लग्नाचे आमिष जरी दाखवले तरी संबंध ठेवणे हे थोडेफार तिच्याही मर्जीने व परवानगीने घडते.
फसवणुकीचा आरोप स्टँड होइइल , बलात्काराचा नाही.
13 May 2016 - 5:41 pm | अप्पा जोगळेकर
हो की ग मुग्धे. तू माझ्यावर लावलेले आरोप कुठे टिकले कोर्टात ? तरी सांगत होतो चार चवन्न्या घे अन सगळ सेट करुन टाक. पण तू ऐकल नाहीस. आता इतरांना कशाला सल्ले ?
13 May 2016 - 6:56 pm | टवाळ कार्टा
हा प्रतिसाद पातळी सोडलेला आहे असे मला एकट्यालाच वाटते आहे काय?
13 May 2016 - 7:14 pm | प्रसाद१९७१
मला नाही वाटत. मुग... ह्या आयडीला कोणी कीतीही वाईट प्रतिसाद लिहीला तरी तो पातळी सोडलेला नसेल.
14 May 2016 - 11:46 pm | टवाळ कार्टा
समोरचा पातळी सोडत असेल तर आपण त्याच्याही खालच्या पातळीला जावे का?
12 May 2016 - 8:52 pm | तर्राट जोकर
काम झाले. आवडले. पोरीला पुढच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा!!!
13 May 2016 - 11:06 am | गौतमी
सगळ्यांना खुप खुप धन्यवाद.........
13 May 2016 - 11:19 am | ज्ञानोबाचे पैजार
अपडेट शेअर केल्याबद्दल धन्यवाद गौतमी,
स्वप्नाने जे काही केले ते अतिशय योग्य होते. त्या बद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन....
तिला म्हणाव आता खंबीर रहा, जे काही झाल ते विसरुन नव्याने आयुष्य जगायला सुरुवात कर.
तिला अनेक अनेक शुभेच्छा...
पैजारबुवा,
13 May 2016 - 4:01 pm | रायनची आई
हो..आणि पुन्हा आयुष्यात कधीही त्या मुलाला इंटेरटेन करू नको म्हणून पण सांगा..अगदी तो आणि त्याचे आई वडील पण लग्नाला तयार झाले तरीही..कारण असला मुलगा परत लग्नाच्या बोह्ल्यावरुन पळुन जायला कमी करणार नाही. अजून एक----भविष्यात दुसर्या कोणाही बरोबर लग्न ठरल्यास नवर्यामुलाला आणि त्याच्या घरच्याना ह्या प्रकरणाची कल्पना देउन ठेवावी म्ह्णजे उगाच टेन्शन नको ब्लॅकमेलिंगचे वगैरे..
13 May 2016 - 5:03 pm | एकनाथ जाधव
गौतमी जी समस्या आणि अपडेट दिल्या बद्दल धन्यवाद!
स्वप्नाली ला शुभेच्छा.
13 May 2016 - 6:53 pm | एस
गुड. शुभेच्छा!
14 May 2016 - 11:04 pm | सुंड्या
स्वप्नालि तु स्वत:ला जिवनात सेट्ट्ल कर, उगाच स्वतःचा आणि परिवाराचा काथ्याकुट नको करु. आणि स्वप्निलचि जिरवायचि असेल उपाय आहे.
---स्वप्निलला स्थिर होउ दे.....२-३ वर्ष होउ दे...विसरु दे तुला....तुहि सेट्टल हो....'बाजारात भरपुर सुन्दर मुली/बाया' आहेत ज्या पैश्याच्या ऐवजात तुला तुझे इप्सित साध्य करण्यात 'मदत' करु शकतील....काय करायचे ते ठरव.
"Revenge is the purest emotion of all"