'रच्याकने' चा अर्थ दिल्याबद्दल सर्वाना धन्यवाद. अवांतर: अर्थातच मला एक ओळीचा धागा काढायचा नव्हता. म्हणून मी 'वर्गीकरण' या रकान्यात 'सदा हरित धागा' असे लिहिले होते. तरीपण धागा योग्य स्थानी आला नाही त्याबद्दल क्षमस्व.
तसेच "विदा" हा शब्दप्रयोग पण वापरला जातो, म्हणजे इतर संदर्भाने त्याचा अर्थ कळला पण त्याचा लोंगफॉर्म काय असे कुतुहला आहे ?
काहितरी "दाखला" असावे .विहीत दाखला का ?
प्रतिक्रिया
4 May 2016 - 6:24 pm | ईश्वरसर्वसाक्षी
म्हणजेच बाय-द-वे
4 May 2016 - 6:24 pm | शान्तिप्रिय
रच्याकने म्हणजे बाय द वे!
रस्त्याच्या कडेने.
२५ ओळीपेक्षा कमी असलेले लेखन खरडायच्या फळ्यावर केले तर बरे होईल.
धन्यवाद!
4 May 2016 - 6:25 pm | मुक्त विहारि
तो "बाय द वे" ह्या इंग्रजी शब्द समुहाचा मराठी अवतार आहे...
4 May 2016 - 6:27 pm | जेपी
रच्याकने एकोळी धाग्याचे धोरण काय सद्या.!
4 May 2016 - 6:54 pm | श्रीनिवास टिळक
'रच्याकने' चा अर्थ दिल्याबद्दल सर्वाना धन्यवाद. अवांतर: अर्थातच मला एक ओळीचा धागा काढायचा नव्हता. म्हणून मी 'वर्गीकरण' या रकान्यात 'सदा हरित धागा' असे लिहिले होते. तरीपण धागा योग्य स्थानी आला नाही त्याबद्दल क्षमस्व.
4 May 2016 - 7:35 pm | शान्तिप्रिय
ठीक आहे.
श्रिनिवासजी आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा! (पुलेशु)
4 May 2016 - 8:03 pm | रमेश आठवले
धन्यवाद टिळक साहेब. मलाही ह्या शब्दाच्या अर्था विषयी बरेच दिवस कुतूहल होते.
5 May 2016 - 10:48 am | राजाभाउ
तसेच "विदा" हा शब्दप्रयोग पण वापरला जातो, म्हणजे इतर संदर्भाने त्याचा अर्थ कळला पण त्याचा लोंगफॉर्म काय असे कुतुहला आहे ?
काहितरी "दाखला" असावे .विहीत दाखला का ?
5 May 2016 - 10:55 am | सुनील
विदा म्हणजे data.
5 May 2016 - 11:02 pm | प्रचेतस
विदा हा संस्कृत शब्द नसून विद हा आहे.
विद = ज्ञान
विदा हे विद शब्दाचे जालिय रूप आहे.
5 May 2016 - 10:56 am | सस्नेह
या स्क्रीनच्या अखेरीस 'आंतरजालीय लघुरूपे' ही लिंक आहे. इच्छुकांनी वाचा.