भुतान सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in भटकंती
28 Apr 2016 - 11:20 am

भुतान सहली विषयी माहिती हवी आहे. मे अखेर ते जून असा ११ दिवसांचा कालावधी आहे. भुतानला जाण्यासाठी हा सिझन योग्य आहे का ?
कुणाला या बाबत अधिक माहिती असेल तर सांगा प्लीज.
जुना धागा असेल तर कृपया इथे नमूद करावा.
धन्यवाद in advance.

प्रतिक्रिया

भाते's picture

28 Apr 2016 - 12:10 pm | भाते

या धाग्यावर मिपाकर चीगो भुतानला जाऊन आल्याचे समजले. धाग्यावर भुतानविषयी काही माहिती नसली ते नक्की आपल्याला मदत करतील.

सहलीसाठी शुभेच्छा! नंतर जमल्यास सचित्र प्रवासवर्णन टाका.

राजकुमार१२३४५६'s picture

28 Apr 2016 - 8:28 pm | राजकुमार१२३४५६

पारो विमानतळ हा भूतानमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भूतानला सिक्कीममार्गे रस्त्याने पोहोचता येते. एन.जे.पी ते जयगांव हे अंतर 160 किमी आहे. हा प्रवास खूप खडतर आहे. तुम्हाला एन.जे.पी वरून शेअरिंग टैक्सी मिळेल. पण तुम्हाला हा प्रवास टाळायचा असेल तर एन.जे.पी(NJP) ते न्यू अलीपुर्धुर(NOQ) हा प्रवास ट्रेन ने करावा. तिथून पुढे न्यू अलीपुर्धुर(NOQ) ते जयगांव हे अंतर फक्त ६० किमी राहते. मग ते अंतर शेअरिंग टैक्सी ने पार करावे. पश्चिम बंगालमध्ये जयगाव हे भूतान बॉर्डर जवळ आहे. तिथे एक आकर्षक प्रवेशद्वार ओलांडले कि भूतानचे फुन्शिलिंग हे टेकड्यांच्या पायथ्याशी असलेले गाव लागते. भूतानसाठी एप्रिल ते जून हा उन्हाळ्याचा काळ उत्तम काळ आहे. पावसाळा अतीतीव्र असल्याने भूतान पावसाळ्यात पूर्णपणे बंद असतो. संपूर्ण भूतान फिरायचे असेल तर जास्त दिवस काढून जावा. तिथल्या रस्त्याची अवस्था खूप खराब आहे आणि बरीचशी ठिकाणे हि डोंगर दर्यामधे आहेत. भारतीय लोकांना विसा लागत नाही पण परमिट लागते. ते तुम्हाला Phuentsholing येथे काढून मिळेल. सोबत ओळखपत्र घेऊन जावा. तेथील लोकल टूरिस्त वाले पण काढून देतील. तेथे भारताचे चलन चालते. फक्त ५०० आणि १००० च्या नोटा घेत नाहीत. एखाद दुसर्या दुकानात ५०० च्या नोटा घेतात.

[त्यांची अधिकृत वेबसाईट] . त्यांचे राष्ट्रीय चलन "भूतानी ङुलत्रुम (BTN)" .

प्रेक्षणीय स्थळे:
१. पारो घाटी (खोरे - दोन डोंगरांमधील सपाट प्रदेश)
२. टायगर नेस्ट नावाचा मठ : पारो घाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३२१० मीटर उंच आहे.
३. सिमतोखा जोंग
४. बुद्ध केंद्र
५. प्राणिसंग्रहालय
६. चिमी लखांग मंदिर

पूर्वाविवेक's picture

29 Apr 2016 - 1:36 pm | पूर्वाविवेक

धन्यवाद ! खूपच उपयुक्त माहिती

उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद!

ऋषिकेश's picture

29 Apr 2016 - 4:20 pm | ऋषिकेश

मी गेलो होतो काही वर्षांपूर्वी
इथे तपशीलवार माहिती मिळेल

सलीमच फोन नंबर मिळाला तर बरे होईल. व्यनि करावा.

छान माहिती मिळाली.वाखुसा.
सलिमचा नंबर अजूनही असेल तुमच्याकडे तर प्लिज व्यनि कराल का?

नूतन सावंत's picture

29 Apr 2016 - 6:02 pm | नूतन सावंत

राजकुमार१२३४५६ आणि ॠषिकेश,छान माहिती.