बेडरूम मधील समानतेची गुढी

साहना's picture
साहना in काथ्याकूट
14 Apr 2016 - 6:25 am
गाभा: 

हि एक लेखमाला असून ह्याचे एकूण पांच भाग असतील. लेखन अतिशय संक्षिप्त ठेवण्यात आले आहे पण लोक ज्या प्रकारचा प्रतिसाद देतात ते पाहून पुढील भाग लिहिले जातील. हि लेखमाला फक्त मिपावर सर्वप्रथम प्रकाशित करत आहे.

एका माणसाची पत्नी फ़ेमिनिस्ट होती. स्त्रियांना सगळी कडे समान हक्क मिळावेत म्हणून तिचे दर रोजचे भांडण. बाजूच्या सलून मध्ये न्हाव्याने "इथे फक्त पुरुष आणि लहान मुलांचे केस कापले जातात" अशी पाटी लावली होती त्याला "मिसोगिनिस्ट" म्हणून त्याला स्त्रियांचे केस सुद्धा कापण्यास भाग पाडले गेले.

तर सदर महिला एक दिवस थोड्या लवकर घरी आली. घरी येवून बेडरूम मध्ये जावून पाहते तर काय ? आपली पती मोलकरणी सोबत <इथे आपली कल्पना शक्ती वापरा, त्याला X असे नाव द्या> होता. ते पाहतांच तिच्या पायाची आग मस्तकांत गेली.

"तुझी हिम्मत कशी झाली अविनाश …. " ती.

"अग थांब आधी माझे ऐकून तर घे …. तुझ्या समतेची गुढी मी घरांत सुद्धा उभारायचे ठरवले. मोलकरणी विषयी पूर्वग्रह ठेवून तिला बिचारीला माझ्या बिछान्यात न घेता मी तिझ्यावर अन्याय करत आहे हे तुझे भाषण ऐकून मला वाटले म्हणून मी मनातील तिच्या प्रती असमान व्यवहार करण्या एवजी तिला तुझ्या प्रमाणेच समान वागणूक द्यायचा प्रयत्न करतो होतो… " आपण आपल्या पत्नी बरोबर X १ वर्षा आधी केले होते सोयीस्कर रित्या विसरून अविनाश ने स्पष्टी करण दिले. मोलकारिणीला कदाचित ह्या प्रसंगाची सवय असल्याने तिने कपडे परिधान करून पोबारा केला होता.

"मुर्खा हा आमचा बेडरूम आहे, रस्त्यावरील मंदिर नाही" - तिने म्हटले.

"आमचा बेडरूम आमची मालमत्ता आहे तसे ते देवूळ सुद्धा कुणाची मालमत्ता आहे ना ? तिथे समतेची गुढी उभारली तीच गुढी आम्ही आमच्या घरांत उप्भारायला नको ? समाजसेवा घरापासून सुरु होते असे कुणी तरी म्हटले आहे ना ? " अविनाश.

"मला शिकवू नकोस. मी तुझही लग्न झालेली पत्नी आहे, तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे. लग्न झालेल्या पुरुषाने इतर बायाकाशी संबंध ठेवू नयेत अशी समाज मान्य परंपरा आहे. " ती.

"पण एकाद्या मंदिरांत अमक्याला प्रवेश आहे किंवा नाही हि सुद्धा त्यांचीच परंपरा आहे ना ? तिथे समता पाहिजे तर लग्नात का नाही ? इतर महिलांवर अश्या प्रकारे discriminate करणे अन्याय्य कारक नाही का ?" अविनाश.

"पण तू आणि मी शपथ घेतली होती ना लग्नाच्या वेळी ? ती तिच्या पती कडे जायील माझ्या पतीकडे का ? " ती.

"बरोबर आहे पण त्यामुळे मोलकारिणी वर अन्याय का ? भक्त लोक त्यांची स्वताची देवळे उभारू शकत नाहीत का ? लोकांचा देवळांत घुसल्यानेच त्यांना समता भेटते तर इथे सुद्धा तोच नियंम लागू आहे." . अविनाश

भांडण जास्त वेळ चालले नाही. अविनाशला आपले समान घेवून घरा बाहेर पडावे लागले.

तात्पर्य : असल्या समतेची गुढी उभारताना एक तर पत्नीचे परमिशन घ्यावे नाहीतर कडी तर लावावी.

सूचना: प्रतिसाद टाकताना तारतम्य बाळगण्याचे कारण नाही. वाट्टेल तितका गोंधळ घालावा. प्रतिसाद शक्यतो विनोदी ठेवावे आणि त्याला कारुण्याची किंवा इतर कशाची झालर वगैरे लावली तरी चालेल.

रेफेरेन्स: https://www.youtube.com/watch?v=KKgHc6bWqZ4

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

14 Apr 2016 - 7:00 am | विजय पुरोहित

धुरळाच! जियो साहनाजी!
येऊ दे पुढचा भाग!

कल्पनाशक्तीचे कौतुक वाटले.

भरमसाठ लॉजिकल चूका आहेत पण मनोरंजन म्हणून सोडून देतो.

कंजूस's picture

14 Apr 2016 - 8:10 am | कंजूस

प्रतिसाद शक्यतो विनोदी ठेवावेत-
अथवा सामान घेऊन कटावे.

प्रतिसाद विनोदीच का पाहिजेत?

श्री गावसेना प्रमुख's picture

14 Apr 2016 - 9:34 am | श्री गावसेना प्रमुख

बेडरूम पर्यंत ठीक आहे पण बाथरूम पर्यंत नको।

तिमा's picture

14 Apr 2016 - 10:10 am | तिमा

अगदीच पुळकवणी! वाटलं होतं,
समानतेचा आग्रह करणारी पत्नी, नवर्‍याला विचारेल, " बेडरुममधे कायम मीच रिसिव्हिंग एंडला का ? त्याच्या उलट का नाही ?" तर काही उपाय सुचवले असते.

पिलीयन रायडर's picture

14 Apr 2016 - 10:20 am | पिलीयन रायडर

फार अपेक्षेने धागा उघडला होता... फारच पांचट निघाला.. दंगा करण्याच्याही लायकीचा नाही..
यु कॅन डु बेटर साहनाजी... मला वाटत होतं ट्यार्पी खेचण्याची कला तुम्हाला अवगत झाली आहेच...

तर्राट जोकर's picture

14 Apr 2016 - 10:45 am | तर्राट जोकर

गंभीर सहमती

टवाळ कार्टा's picture

14 Apr 2016 - 11:07 am | टवाळ कार्टा

वाटले नव्हते हा दिवस इतक्या लौकर येईल....पिराशी बाडिस :)

अजया's picture

14 Apr 2016 - 4:27 pm | अजया

:)
सहमतीबद्दल सहमती.

निमिष ध.'s picture

14 Apr 2016 - 9:19 pm | निमिष ध.

दंगा करण्याच्याही लायकीचा नाही.. >> अगदी पुचाट आणि पांचट आहे

मराठी कथालेखक's picture

14 Apr 2016 - 10:57 am | मराठी कथालेखक

कधी काही दर्जेदार लिहण्याकरिता शुभेच्छा :)

वावा वा. दर्जेदार नक्की हवे .........
पण दर्जेदार म्हणजे नक्की कसे हे सांगाल का

मराठी कथालेखक's picture

14 Apr 2016 - 7:11 pm | मराठी कथालेखक

तशी व्याख्या करणं कठीणच. पण जे वाचून वाचकाला काही चांगल वाचल्याचा आनंद होईल असा लेख /कथा चांगली.
मुळात लेखकाने कथा/लेख लिहताना मनापासून चांगले लिहण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या लेखनातून ते जाणवेलच (क्वचित अपवाद) आज एक लेख /कथा पाडूयात असा उद्देश नसावा.
काहीवेळा मिपावरील लोकप्रिय लेखक पहिल्या भागावर फारशा प्रतिक्रिया न आल्याने कथा अर्धवट सोडून देतायत असही दिसलं.. कदाचित ते स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतील ..असो :)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2016 - 11:22 am | अत्रुप्त आत्मा

विषमतेच विष उकळवून कोळून प्यायलेला सनातनी लेख!

खटपट्या's picture

14 Apr 2016 - 11:25 am | खटपट्या

टनाटनी टनाटनी

माहितगार's picture

14 Apr 2016 - 12:28 pm | माहितगार

विषमतेच विष उकळवून कोळून प्यायलेला..

विष ओकणारे= विष पिणारे हे गणित नीट जमतं कै ? विष प्राशन करणार्‍यांना का बदनाम करुन राहीले, बंधु ?

-नीलकंठाचा आदर करणारा माहितगार

खटपट्या's picture

14 Apr 2016 - 11:29 am | खटपट्या

कैच्या कै !!

नाना स्कॉच's picture

14 Apr 2016 - 1:16 pm | नाना स्कॉच

+10000

सुबोध खरे's picture

14 Apr 2016 - 11:35 am | सुबोध खरे

सूचना: प्रतिसाद टाकताना तारतम्य बाळगण्याचे कारण नाही. वाट्टेल तितका गोंधळ घालावा. प्रतिसाद शक्यतो विनोदी ठेवावे आणि त्याला कारुण्याची किंवा इतर कशाची झालर वगैरे लावली तरी चालेल.
हे शेपूट नसतं तरी चाललं असतं.

अख्खा लेख नसता तरी चालला असता, शेपटाच काय घेऊन बसलात!?

धर्मराजमुटके's picture

14 Apr 2016 - 12:24 pm | धर्मराजमुटके

मी रात्री झोपतांना सगळ्यांसाठी बिछाना घालतो आणि सकाळीही मीच सगळे आवरतो. याबदल्यात बायको मला तीन वेळेचे जेवण देते. माझे कपडे धूवून देते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे मोलकरीण येत नाही. त्यामुळे मी मोलकरणीला समानतेने वागवू शकत नाही. :)

विवेकपटाईत's picture

14 Apr 2016 - 2:40 pm | विवेकपटाईत

मानल बुआ. हा लेख तृप्ती देसाई यांनी वाचायला पाहिजे. (बाकी पुढे काय होईल, हे सांगता येत नाही). आता समजल कार्यालयात अधिकारी लोक आपल्या सेक्रेटरीला सोबत समतेची गुढी का उभारतात.

वेल्लाभट's picture

14 Apr 2016 - 2:49 pm | वेल्लाभट

खत्तरनाक! दर्जा!

मिपावरची आजवरची सर्वात पावरबाज लेखमाला.
सुरुवातच एवढी भनाट आहे की पुढे तर याडच लागणारय वाचकांना.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

मला वाटत त्यांना शनी मंदीर कौल्हापूर मंदीर येथे जे चालले
आहे त्याबद्दल बोलायचे आहे

चंद्रनील मुल्हेरकर's picture

14 Apr 2016 - 4:29 pm | चंद्रनील मुल्हेरकर

अहो साहना बै ,पेशवाईत घटकंचुकीचा खेळ फार लोकप्रीय होता,बेडरुम मधली समानतेची गुढी पेशव्यांनीच उभारली होती.

होबासराव's picture

14 Apr 2016 - 5:43 pm | होबासराव

लेखाबद्दल नंतर प्रतिक्रिया पहिले ग्रेटथुंकर ह्यांचे पुन्हा एकदा स्वागत.

तर्राट जोकर's picture

14 Apr 2016 - 5:47 pm | तर्राट जोकर

हा हा, पेशव्यांची घटकंचुकी पेटंट आहे ह्यांचं.. =))

होबासराव's picture

14 Apr 2016 - 5:52 pm | होबासराव

आणि खरडवहित आपल्याच ग्रेटथुंकर आयडिने पाठवलेल्या खरडा आहेत.

नाना स्कॉच's picture

14 Apr 2016 - 7:45 pm | नाना स्कॉच

.