मला पडलेले काही प्रश्न ....

आपला आभि's picture
आपला आभि in काथ्याकूट
18 Sep 2008 - 4:18 pm
गाभा: 

काल पासुन काही प्रश्नांनी माझ्या डोक्याची मंडई करून टाकली होती. स्वस्थ बसवेना.. मग मिपा वर येऊन ही मनाची उबळ काढली.............

१.सलमान खानला शिक्षा झाली होती तिचे पुढे काय झाले ? कोणत्या न्यायालयात तो खटला चालु आहे?

२.फरदीन खानने ९ ग्राम कोकेन बाळगले म्हणुन त्याला अटक झाली होती, त्याचे पुढे काय झाले ?

३.संजय दत्त बाँबस्फोट खटल्यात दोषी ठरूनदेखिल समाजात उजळ माथ्याने कसा वावरू शकतो?

४.राहुल महाजन ने अमली पदार्थाचे सेवन केल्याचे सार्‍या जगासमोर टिव्ही वर झळकले असताना त्याच्यावर कारवाई का होत नाही ?

५.अफजल गुरु ला कोणता पाहुणचार चालु आहे ?

६.खुनाच्या आरोपाखाली शिक्षा होऊनसुध्दा सिध्दु अजून मुर्खासारखा एका शो मध्ये रोज हसताना का दिसतो ?

७.राज ठाकरे यांची महाराष्ट्राची blue print कधी तयार होणार ?

८.अणुकराराविषयी गुप्त पत्राची बातमी व्रुत्तपत्राच्या पहिल्या पानावरून आतल्या पानावर कशी सरकली आणि नंतर गायब का झाली? कोणत्याच पक्षाला त्याचा पाठपुरावा का करावा वाटला नाही ?

९.आरुशी हत्याकांड म्हणजे देशाचा ज्वलंत प्रश्न आहे असे रान माजवणार्‍या व्रुत्तवाहिन्यांनी त्याबद्दल बातमी देणे का बंद केले ?

१०. खासदार पैसे वाटप प्रकरणाचे पुढे काय झाले ?

११. खैरलांजी प्रकरणावरून सरकार उलटवण्याची भाषा करणार्‍या दलित नेत्यांनी त्यातील काही आरोपींना परवा न्यायालयाने दोषमुक्त सोडल्यानंतर साधी प्रति़क्रिया सुध्दा का देऊ नये ?
१२...१३....

तुमच्याही मनात असेच काही प्रश्न येत असतील ????

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

18 Sep 2008 - 4:42 pm | प्रियाली

पब्लिक मेमरी शॉर्ट असते किंवा दुसर्‍या शब्दांत आपल्या देशात इतक्या सनसनाटी घटना घडतात की वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे, नेते, समाज आणि खुद्द गुन्हा करणारी व्यक्ती यांना चघळण्यासाठी, रवंथ करण्यासाठी, पचवण्यासाठी दररोज नवनवा खुराक तयार होतो आणि जनता मागचे विसरून नव्या बातम्यांकडे लक्ष पुरवते.

छोटा डॉन's picture

18 Sep 2008 - 4:45 pm | छोटा डॉन

आता सध्या जरा गडबडीत आहे.
"संध्या"काळी चांगली सविस्तर " सिरीअस व वात्रट" अशी दोन्हीही प्रकारची उत्तरे देतो ...

मजा येणार आहे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

tushar_raje's picture

18 Sep 2008 - 4:50 pm | tushar_raje

Though hundred times bomb exploded in India not for single time guilty people get strict punishment
Though india has talent in every field.... several entertainment channels bought Pakistani talent in India who even do not respect Indian Anthem....
Though every day formers are doing sucide Indai's Aggriculture Minister concetrate on Cricket

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 4:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि भारतात एवढं भाषावैविध्य आहे, मिपावर आपण मराठी भाषिक या झेंड्याखाली एकत्र आलोत, आपली मराठी भाषा एवढी समृद्ध आणि तेवढीच रांगडीपण आहे तरी आपण सायबाच्या भासंत लिवता राव!

छोटा डॉन's picture

18 Sep 2008 - 5:03 pm | छोटा डॉन

विंग्रजांणी आपड्यावर एवदे अत्याचार केले तडी आपन त्यांची भासा वापरतो हे काय आम्हाला पटट नाय ...
असो. णिवेदण शंपले ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मराठी_माणूस's picture

18 Sep 2008 - 5:03 pm | मराठी_माणूस

ह्या प्रश्नावरुन आमच्या एका मित्राने भुतमान पत्र असावे असे मत व्यक्त केले होते त्याचि आठवण झालि. त्या वर्तमान पत्रात कायम जुन्या घटनांचि माहिति असावि, पाठपुरावा आवश्यक असलेल्या गोष्टिंचा आढावा, ई. असावे. असावे

आपला आभि's picture

18 Sep 2008 - 5:23 pm | आपला आभि

आता सध्या जरा गडबडीत आहे.

----डॉन कोणाचा गेम वाजवता आहत......

विसोबा खेचर's picture

19 Sep 2008 - 5:15 pm | विसोबा खेचर

सर्व प्रश्न वाजवी!

आमच्यासारख्या सामान्य नागरीकाला मात्र मोटरवाहन कायदा कलम १८५ अंतर्गत अटक करून कायद्याचा बडगा दाखवायला पोलिस तत्पर असतात तीच तत्परता इतरत्र का दाखवत नाहीत हा एक प्रश्नच आहे!

असो...

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 5:36 pm | भडकमकर मास्तर

मलाही पोलीस हल्ली सारखे पकडतात असा मला संशय यायला लागलेला आहे....
सिग्नल, झेब्रा कॉसिंग, पार्किंग, पी यू सी विसरणे वगैरे वगैरे....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अभिजीत मोटे's picture

19 Sep 2008 - 6:13 pm | अभिजीत मोटे

हा धागा ही दोन दिवसांत सर्वजन विसरून जातील. नवीन गोश्टीचे आकर्शन, दूसरे काय!

...........अभिजीत मोटे.

आपला आभि's picture

19 Sep 2008 - 11:22 pm | आपला आभि

आपला आभि's picture

19 Sep 2008 - 11:24 pm | आपला आभि

आणि उत्तर कशाचेच नाही मिळत..
जनतेलाही वेळ आहे कुठे अशा प्रश्नांची उत्तरे शोधायला. जो तो "जाऊदे.. मला काय त्याचं, मी माझं काम करतो" असे म्हणून शांत बसतो.
मीही तेच करते...
कालाय तस्मै नमः
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/