धारासुरचे गुप्तेश्वर मंदिर, जिल्हा परभणी

Parag Purandare's picture
Parag Purandare in भटकंती
9 Apr 2016 - 3:48 pm

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात परभणीशहरापासून अंदाजे ३५/४० कि. मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर हे धारासुर हे छोटेसे गांव आहे. याच गावात गुप्तेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर नदीच्या काठावर असल्याने जवळपास ८ फूट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मुखमंडप, मंडप, दोन अर्धमंडप, अंतराळ व गर्भग्रुह असा मंदिराचा प्लॅन आहे. मंदिराला पिठावरून प्रदक्षिणा मारण्यासाठी मार्ग आहे. मंदिराच्या भिंती काळ्या पाषाणात बांधलेल्या असुन मंदिराचे शिखर महाराष्ट्रात नेहमी आढळणा-या भूमिज या शैलीचे आहे. (गोंदेश्वर (सिन्नर), अम्रुतेश्वर, खिरेश्वर, झोडगे ही महाराष्ट्रातील अजुन काही भूमिज मंदिरे) या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिखर पक्क्या म्हणजेच भाजलेल्या विटांचा वापर करुन बांधलेले आहे. मंदिराच्या शिखराचा काही भाग सध्या ढासळलेला आहे. पुरातत्त्वखात्याने मंदिराच्या डागडुजीकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.

.

मंदिराची दक्षिणेकडील बाजू

.

मंदिराची उत्तरेकडील बाजू

.

मंदिराचे पक्क्या विटांनी बांधलेले शिखर

.

मंदिराचा दर्शनी भाग, मुखमंडप, दक्षिणेकडील अर्धमंडप व कक्षासनाची बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम असलेली भिंत

.

मंदिराच्या कक्षासनाची बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम असलेली भिंत

.

आज जरी मंदिरातील मुख्य देवता शिव म्हणजेच शिवलिंग असले तरी एकेकाळी हे मंदिर नक्कीच विष्णू या देवतेचे असावे. याचे कारण म्हणजे मंदिराच्या बाह्य भिंतीवरील बहुतेक सर्व शिल्पे विष्णूची आहेत. या मताला पुष्टी देणारा अजुन एक पुरावा म्हणजे मंदिराच्या परिसरात अलीकडेच सापडलेली एक अप्रतीम विष्णू मूर्ती. ही विष्णु मूर्ती सध्या मंदिराजवळच्या दुस-या एका मंदिरात ठेवलेली आहे.

.

मंदिराच्या बाह्यभिंतीवरील देवकोष्ठतील बैठ्या विष्णूची प्रतिमा

.

मंदिराजवळ सापडलेली अप्रतिम विष्णुची प्रतिमा

.

मंदिराच्या बाह्य भिंतीवर तीन देवकोष्ठे आहेत व या देवकोष्ठांतही विष्णुचीच तीन रुपे आहेत. या शिवाय मंदिराच्या बाह्यभिंतीवर अनेक सुरसुंदरींची अप्रतिम शिल्पे आहेत. त्यात प्रमुख्याने पत्रलेखिका, पुत्रवल्लभा, दर्पणा, कर्पुरमंजिरी, तिलोत्तमा, मर्दला अश्या विविध सुरसुंदरी आहेत. यांच्या बरोबरच मंदिराच्या बाह्य भिंतीवर मदन, चामुंडा, गणपती अशा काही देवताही आहेत.

.

मंदिराच्या बाह्यभिंतीवरील मदनाची प्रतिमा

.

मंदिराच्या बाह्यभिंतीवरील पत्रलेखिकेची प्रतिमा

.

मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजुन एक विष्णु प्रतिमा

.

मंदिरात पुर्व, उत्तर व दक्षिण असा तीनही दिशांकडून प्रवेश करता येतो. मंदिराच्या मुखमंडप व अर्धमंडपात कक्षासने आहेत. या कक्षासनाच्या भिंतींवर बाहेरुन अप्रतिम कोरीवकाम आहे.
मंदिराची द्वारशाखेवरही अप्रतिम कोरीवकाम असुन द्वारशाखेच्या दोन्ही बाजूंवर वैष्णव द्वारपाल व चामरधरिणी आहेत. ललाटबिंबावर बसलेल्या गणपतीचे शिल्प आहे मात्र त्याला शेंदूर फासल्याने त्याच्या हातातील आयुधे नक्की समजत नाहीत.

.

मंदिराची द्वारशाखा

.

मंदिरातला चालुक्य शैलीचा खांब

.

मंदिराजवळच्या दुस-या मंदिरात असलेली महिषासुरमर्दिनीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

.

मंदिराच्या जवळुन दिसणारे गोदावरी नदीचे विशाल पात्र

.

हे मंदिर १२/१३ व्या शतकात म्हणजे उत्तर चालुक्य यांच्या काळात बांधले गेले असावे.

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

9 Apr 2016 - 3:53 pm | विजय पुरोहित

फोटू का दिसत नाहीयेत!

छायाचित्रे दिसत नाहीयेत पण वर्णनानुसार जबरात दिसत आहे.

खरय नुसत्या वर्णनावरुनही तसे वाटते आहे, त्यांना मिपावर छायाचित्र प्रकाशित करताना नेमकी काय अडचण येत असेल ?

आज जरी मंदिरातील मुख्य देवता शिव म्हणजेच शिवलिंग असले तरी एकेकाळी हे मंदिर नक्कीच विष्णू या देवतेचे असावे. याचे कारण म्हणजे मंदिराच्या बाह्य भिंतीवरील बहुतेक सर्व शिल्पे विष्णूची आहेत. या मताला पुष्टी देणारा अजुन एक पुरावा म्हणजे मंदिराच्या परिसरात अलीकडेच सापडलेली एक अप्रतीम विष्णू मूर्ती. ही विष्णु मूर्ती सध्या मंदिराजवळच्या दुस-या एका मंदिरात ठेवलेली आहे.

अगदीच अशक्य नसावे पण १२ अथवा १३ व्या शतकानंतर मंदिरातील मुख्य देवता बदलण्याचे काय कारण झाले असावे. लोकांचे विश्वास अगदीच पाच पन्नास वर्षातही बदलले नसतील आणि तसे तर शैव वैष्णव वादातील मुर्ती बदलण्याच्या लेव्हलच्या अटीतटीच्या भूमिका आदी शंकराचार्य काळा नंतर किती चालल्या असतील अशी शंका वाटते. मुर्ती बदलली तरीही १४ व्या शतकानंतर केव्हा तरी बदलली जाण्याची शक्यता अधिक म्हणून आपण सुचवत असलेल्या मुर्ती बदलाच्या शक्यते मागचे कारण प्रथम दर्शनी अनाकलनीय वाटते.

प्रचेतस's picture

9 Apr 2016 - 4:49 pm | प्रचेतस

बदलण्याचे कारण म्हणजे मूर्तीभंजकांनी फ़ोडणे.कालांतराने स्थानिकाना मंदिर कोणाचे हेच समजू न शकल्याने त्यांनी त्यांच्या समजूतीनुसार शिवलिंग स्थापित करणे.

मलाही हि शक्यता अधिक पटते आहे.

प्रसाद_१९८२'s picture

9 Apr 2016 - 4:49 pm | प्रसाद_१९८२

छान लेख, फोटो दिसत नाहीत. फोटोच्या दुव्यावर गेल्यास असे दिसतायत.

_MG_0046

_MG_0388

माहितगार's picture

9 Apr 2016 - 5:06 pm | माहितगार

खालच्या ओळीतील मधले आणि उजवीकडील हत्ती काय करताना दाखवले असावेत. एक सिंह आणि कदाचित एक मानवी आकृतीही त्या ओळीत दिसते त्याचे प्रयोजन लक्षात नाही आले

श्रीनिवास टिळक's picture

9 Apr 2016 - 6:59 pm | श्रीनिवास टिळक

‘स्त्रीवाद्यवादिनी’ (साप्ताहिक विवेक, ३ मार्च २०१६) या लेखात डॉ. अरुणचंद्र शं. पाठक लिहितात --धारासूर (जिल्हा परभणी) येथील विष्णू मंदिराच्या बाह्यांगावर बावनहून अधिक (52 +) सूरसुंदरी व स्त्रीवाद्यवादिनी शिल्पित केल्या आहेत. शक्य झाल्यास त्यांची काही छायाचित्रे द्यावीत हि विनंती.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Apr 2016 - 3:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

डॉ. अरुणचंद्र पाठक हे व्यासंगी व्यक्तिमत्व माझ्या परिचयाचे आहेत. कल्याणला आमच्या घराच्या पाठच्या बाजुस असलेल्या ईमारतीत राहत होते. पण सध्या माहित नाही कुठे आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2016 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावर चित्रे टाकण्याची कृती:

१. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळावर चढवा.

२. त्या संस्थळावर चित्र पूर्णपणे (थंबनेल / छोटी आवृत्ती नव्हे) उघडून त्यावर राईट क्लिक करा आणि "Copy image URL" पर्यायावर टिचकी मारा... आता ते चित्र मिपामध्ये टाकायला तयार झाले आहे.

आता मिपावर या आणि...

३. लेखन करण्याच्या चौकोनाच्या (टेक्टबॉक्सच्या) वर असलेल्या बटणांपैकी सर्वात डावीकडच्या सुर्योदयाचे चित्र असलेल्या बटणावर टिचकी मारा. (त्या बटणावर कर्सर ठेवल्यास Insert/edit image असा मेसेज दिसेल)

४. आता दिसू लागलेल्या टेक्ट बॉक्स मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरा:
अ) Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V)
आ) Width X Height: कोरे ठेवा.
इ) Alternate Text: इथे फक्त एकदा स्पेसबार दाबून एक स्पेस टाका.

५. OK बटन दाबल्यावर टेक्ट बॉक्समध्ये त्या चित्राचा कोड दिसू लागेल.

६. प्रत्येक चित्र फक्त "पूर्वपरिक्षण" करुन पहा:
अ) चित्र लेखनाच्या चौकटीत नीट दिसत असले तर कोड तसाच ठेवा.
आ) चित्र चौकटीबाहेर जात असल्यास Width मध्ये ८००, ६८०, ६०० अथवा ३०० असे पर्याय वापरून पहा व योग्य तो पर्याय स्विकारा.
इ) Height नेहमीच कोरी ठेवा. मिपा तुम्ही स्विकारलेल्या Width ला योग्य ती Height वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.

७. पुढच्या प्रत्येक चित्राचा योग्य कोड पायरी क्रमांक १ ते ५ परत वापरून लेखात अंतर्भूत करा.

८. सर्व चित्रे आणि लिखाणाचे शेवटचे मनाजोगते "पूर्वपरिक्षण" झाल्यावरच सर्व चित्रांसह लेख "प्रकाशित करा".

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Apr 2016 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

मंदीराचे स्थापत्य व कोरीवकाम अप्रतिम आहे. सुंदर फोटो.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2016 - 8:41 am | अत्रुप्त आत्मा

+१

Flickr.com वर फोटो अपलोड केले आहेत पण आपण दिलेला पुढील पर्याय दिसत नाहीये. "Copy image URL" पर्यायावर टिचकी मारा..."
फोटो शेअर करण्याचा पर्याय निवडल्यास दिसणारी लिंक " Insert Image मध्ये वर कॉपी केलेली युआर एल पेस्ट करा (Ctrl + V)" पेस्ट केल्यास फोटो "पूर्वपरिक्षण" मधे दिसत नाहीत.
आता पुढे काय करु ?

उगा काहितरीच's picture

10 Apr 2016 - 11:23 pm | उगा काहितरीच

लेख आणि फोटो दोन्हीही छान आहे. रच्याकने जी विष्णूची मूर्ती आहे. तशीच अगदी सेम मूर्ती औंढा नागनाथ इथे आहे. त्या मूर्तीवर ७२ च्या दूष्काळात सापडलेली मूर्ती असा उल्लेख आहे. वरील मूर्ती व ती मूर्ती यात असलेले साम्य याबद्दल जाणकार माहिती देऊ शकतील का ? (कुणाकडे औंढ्याच्या मूर्तीचा फोटो असेल तर टाकावा. )

उगा काहितरीच's picture

11 Apr 2016 - 10:46 am | उगा काहितरीच

.
.

हिच ती औंढ्याची मूर्ती...

विष्णूमूर्ती होयसळ शैलीतील वाटत आहे.

पॉइंट ब्लँक's picture

27 Apr 2016 - 3:25 pm | पॉइंट ब्लँक

+१

मार्गी's picture

11 Apr 2016 - 10:14 am | मार्गी

मस्त लेख आणि फोटोज!! धन्यवाद! आपण ज्यापासून दूर असतो, ते तर समजू शकत नाही, पण जे आपल्या जवळ असतं, तेही आपण नीट बघत नसतो, ह्याची जाणीव झाली! :)

पैसा's picture

12 Apr 2016 - 12:47 pm | पैसा

अत्यंत सुंदर आणि अजिबात माहित नसलेल्या एका मंदिराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Apr 2016 - 3:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुंदर कोरिवकाम आहे.माहितीही उत्तम.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Apr 2016 - 3:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

यामधील विष्णुप्रतिमा दिवेआगरच्या रुपनारायणाशी मिळतीजुळती आहे. वापरलेला दगड्सुद्धा सारखाच आहे.