मराठी विकिपीडियावर काठी पूजा नावाने, हिंदी विकिपीडियावर छडी पूजा नावाने तर इंग्रजी विकिपीडियावर Ceremonial pole नावाने लेख मी लिहिला आहे.
काठी पूजा (जसे महाराष्ट्रात गुढी पूजा करतात) हा मानवी संस्कृतीतील जगातल्या सर्व खंडांवर केव्हा न केव्हा होऊन गेलेला तर काही ठिकाणी अद्यापही असलेला बर्यापैकी प्राचीन सांस्कृतीक प्रकार आहे. इंग्रजी भाषिक देश सोडता उर्वरीत बर्याच देशामध्ये स्पॅनिश अथवा फ्रेंच भाषेचा वापर होतो आणि वेगवेगळ्या आफ्रीकन आणि दक्षिण आमेरीकन आदीवासी जमातीतील Ceremonial pole आणि/अथवा काठी पूजा विषयक माहिती मिळत रहावी म्हणून इंग्रजी विकिपीडियावरील Ceremonial pole लेखाचा अथवा किमान पहिल्या परिच्छेदाचा स्पॅनिश आणि फ्रेंच भाषेत अनुवाद करुन हवा आहे.
हि विनंती विकिपीडियावरच्या अनुवादकांना न टाकता मिपावर का टाकतो आहे ? तर याचे अप्रत्यक्ष कारण कदाचित ख्रिश्चनॅटीक पार्श्वभूमीच्या लोकांकडून होणारे सांस्कृतीक दमनाच्या प्रयत्नात आहे(चुभूदेघे), कारण ज्यू /ख्रिश्चन/ इस्लामिक इतिहासात Ceremonial pole आणि/अथवा काठी पूजेच्या दमनाचा ऐतिहासीक आणि सातत्याने चालत आलेला इतिहास आहे त्यामुळे तिकडून साहाय्य मिळणे दूर, मी अनुवादाच्या विनंती करतोय उलटपक्षी इंग्रजी विकिपीडियावरील लेख कसा वगळला जाईल याचेच प्रयत्न अधिक होताना दिसताहेत हे खेदाने नमुद करावे लागते आहे. इंग्रजी विकिवरील लेख मोठ्या कष्टानेच जेवढा आणि जसा आहे तसा टिकवला आहे. त्यामुळे Ceremonial pole या इंग्रजी विकिपीडियावरील लेखाचा किंवा किमानपक्षी पहिल्या परिच्छेदाचा फ्रेंच आणि स्पॅनिश मधील अनुवाद हो न हो आपल्यातीलच कुणी जमवून दिल्यास हवा आहे.
टिप गूगल अथवा इतर मशिनी भाषांतर चालवून घेतले जाण्याची किमान या केस मध्ये शक्यता कमी आहे कारण उणीवा दाखवून लेखन वगळणे सोपे जाऊ शकते म्हणून मानवी भाषांतर हवे आहे.
-इतर भाषांमधले चालू शकेल का ? (स्पॅनीश, फ्रेंच, मँडरीन, कोरीअन, जॅपनीज भाषांतले विशेषत्वाने हवे आहेत, इतर जागतीक अथवा भारतीय भाषातील सुद्धा चालतीलच)
जे अनुवादक धर्म वगैरे मानत नाहीत विरोध करु इच्छितात त्यांनी या विषयाकडे धार्मीक दृष्टीने न पाहता सांस्कृतिक दृष्टीने पाहण्याचा आणि/अथवा अँथ्रॉपॉलॉजी शास्त्रास साहाय्यभूत विषय म्हणून प्रयत्न करावा हि नम्र विनंती.
अवांतर, फाटे फोडणे अथवा नकारात्मक चर्चा टाळण्यासाठी आभार
आपले प्रतिसाद आणि अनुवाद विकिसाठी वापरले जाणारे असल्यामुळे प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
प्रतिक्रिया
11 Apr 2016 - 3:37 am | श्रीरंग_जोशी
माझ्या भावाला स्पॅनिश अनुवादाबाबत विचारले आहे. तो यावर काम करत आहे. जमल्यास उद्यापर्यंत español मधला मजकूर मी इथे डकवू शकेल.
11 Apr 2016 - 12:08 pm | माहितगार
अनुवादाच्या प्रतिक्षेत असेन, आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
16 Apr 2016 - 12:18 am | श्रीरंग_जोशी
माझ्या भावाने पाठवलेले पहिल्या परिच्छेदाचे भाषांतर.
Un poste ceremonial (A ceremonial pole) simboliza una variedad de conceptos en diferentes culturas. Por ejemplo, en la cultura Miao en Yunnan, China.
En el libro “The Evolution of the idea of god” (La evolución de la idea de dios), Grant Allen señala que los samoyedos de Siberia, y Damara de Sudáfrica, estacas de plantas en las tumbas de los antepasados.
De acuerdo con Zelia Nuttall en el libro “The Fundamental Principles Of Old and New World Civilizations” (Los principios fundamentales del viejo y nuevo mundo Civilizaciones), árbol y reverencia polo a Anu en la antigua Babilonia, Asiria, puede haber evolucionado desde la apaga incendios y la viga de la prensa de aceite. Ella dice que es sumamente probable que el empleo primitiva de un palo de fuego por el sacerdocio, para la producción de" fuego celeste, " puede haber jugado un papel importante en la causa de la vara, y de ahí el polo y el árbol, para convertirse en el símbolo de Anu.
तो गेली दीड - दोन वर्षे स्पॅनिश शिकत आहे. त्याला हे भाषांतर करणे अवघड गेले.
17 Apr 2016 - 2:34 pm | माहितगार
खूप खूप धन्यवाद. परदेशी भाषांसाठी आधार कामास नक्कीच येतो. यातील बहुतांश भाग स्पॅनिश विकिपीडियावर Palo ceremonial या लेखात वापरला आहे. (स्पॅनीश विकिपीडिया लेखात अनुवाद त्रुटीबाबतची नोटीस जुनी आहे, आता ती काढली जाईल का याची वाट पहातो आहे.) आपल्या भावास माझ्या वतीने धन्यवाद कळवावेत हि विनंती.
18 Apr 2016 - 7:47 am | श्रीरंग_जोशी
संधी साठी माझ्या भावातर्फे धन्यवाद.
8 May 2016 - 12:04 pm | माहितगार
ज्याची आशंका वाटत होती शेवटी तेच झाले, आपण केलेला अनुवाद अजून एका अनुवादकाकडून अधिक उत्त्म होईल याची खात्री करुन घेतली तरीही स्पॅनीश विकिपीडियावरील संपादक मंडळींनी सबळ कारणा शिवाय लेख -अनुवादेतर कारणाने- वगळला. काठी उत्सव प्रकार आपण सहजपणे घेतो तेवढे ज्युडायिक-ख्रिश्चन मंडळी घेत नाहीत उलट सांस्कृतीक दमनाचे टोक कसे गाठता येईल हे पाहतात.
काठी उत्सवांचे सांस्कृतीक दमन या विषयावर पूर्ण लेख होईल एवढा ससंदर्भ मजकूर आहे. सवडीने मिपावर लेख टाकेन या विषयावर.
8 May 2016 - 2:05 pm | माहितगार
गूगल कॅशमध्ये जुनी आवृत्ती शिल्लक आहे तो पर्यंत मजकुर येथे जतन करुन ठेवतो.
Un palo ceremonial simboliza una variedad de conceptos en varias religiones diferentes. Por ejemplo, en la cultura Miao de Yunnan China.1 En el libro “The Evolution of the Idea of God” (La evolución de la idea de dios), Grant Allen señala que los samoyedos de Siberia, y damara de Sudáfrica plantan estacas en las tumbas de los antepasados.2 Según a Zelia Nuttall en el libro “The Fundamental Principles Of Old and New World Civilizations” (Los principios fundamentales de las civilizaciones del viejo y nuevo mundo), árbol y polo hacen una reverencia hacia Anu en la antigua Babilonia-Asiria, que puede haber evolucionado desde la eslabón y la viga de la prensa de aceite. Ella dice que es sumamente probable que el empleo primitiva de un palo de fuego por el sacerdocio, para la producción de" fuego celeste, " puede haber jugado un papel importante en la causa de la vara, y de ahí el polo y el árbol, para convertirse en el símbolo de Anu
Simbolismo del Palo Ceremonial en Asia
Asia del Sur
Nepal
Indra Jātrā o Yenyā (Nepal Bhasa: येँयाः) es una de las fiestas más importantes del año para la comunidad Newar, tanto buddhista como hinduista. Indra Jātrā tiene lugar a finales de agosto o principios de septiembre. El inicio oficial del festival comienza el con el levantamiento de un palo ceremonial de seis metros de altura, extensivamente adornado y conocido popularmente por Yosin Thanegu (योसिं थनेगु)
Véase también
Festividad de los Mayos
Palo de Mayo
Baile de las cintas
Rito de los voladores
Referencias
* «Huashan Festival of the Miao Minority». People's Daily Online. July 30, 2011. Consultado el 23 October 2015.
*Allen, Grant (1996). The Evolution of the Idea of God. Pomeroy, WA: Health Research Books. p. 42. ISBN 978-0-7873-0022-7.
*Nuttall, Zelia (March 1901). The Fundamental Principles of Old and New World Civilizations (E-Book edición). Cambridge, Mass.: Peabody Museum of American Archaeology and Ethnology. pp. 362, 504. Consultado el 25 September 2015.
*http://www.festes.org/tematics/nepal/indrajatra/indexcas.html