मुलांच्या पूर्व जन्माच्या आठवणींबद्दल एक उत्तम नमुना म्हणजे शांती देवी. महात्मा गांधीनी नियुक्त केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या एका समितीने त्यांची तपासणी केली होती. ते शान्तिदेविन्सोबत त्यांच्या पूर्वजन्मीच्या गावीही गेले आणि तेथील घटनांचा आढावा घेतला.
१८ जानेवारी १९०२ रोजी मथुरा येथे राहणाऱ्या चतुर्भुज च्या घरी एका मुलीचा जन्म झाला. तिचं नाव लुगडी ठेवण्यात आल. जेव्हा ती १० वर्षांची झाली तेव्हा जवळचा एक दुकानदार केदारनाथ चौबेसोबत तिचा विवाह करण्यात आला. हे केदारनाथ चं दुसरं लग्न होतं. त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. केदारनाथची मथुरा आणि हरिद्वार इथे कपड्याची दुकानं होती. लुगडी अत्यंत धार्मिक होती आणि अतिशय कमी वयात अनेक धार्मिक स्थळांना तिने भेटी दिल्या होत्या. अशाच एका तीर्थयात्रेदरम्यान तिच्या पायाला जखम झाली जिचा इलाज आधी मथुरा आणि नंतर आग्रा इथे करण्यात आला.
जेव्हा लुगडी पहिल्यांदा गर्भवती राहिली तेव्हा ऑपरेशन नंतरही तिने मृत अर्भकाला जन्म दिलं. दुसऱ्या खेपेला तिच्या पतीने तिला आग्र्यातील सरकारी इस्पितळात दाखल केले, जिथे तिने २५ सप्टेंबर १९२५ रोजी ऑपरेशन नंतर एका मुलाला जन्म दिला. परंतु ९ दिवसानंतरच लुगडीची प्रकृती बिघडली आणि ४ ऑक्टोबरला तिचा मृत्यू झाला.
लुगडीच्या मृत्युनंतर १ वर्ष १० महिने आणि ७ दिवसानंतर म्हणजे ११ डिसेंबर १९२६ रोजी दिल्लीतील चिरावाला भागात बाबू रंग बहादुर माथुरच्या घरी मुलगी जन्माला आली जिच नाव त्याने शांतिदेवी ठेवलं. ती सर्वसाधारण मुलींसारखीच होती परंतु ४ वर्षाची होईपर्यंत तिला नीट बोलता येत नसे. आणि जेव्हा ती बोलायला लागली, तेव्हा ती कोणी वेगळीच मुलगी बनली होती, ती आपल्या पती आणि मुलाबद्दल बोलू लागली. तिने सांगितलं की तिचा पती मथुरेत आहे जिथे त्याचं कपड्याच दुकान आहे आणि त्यांना एक मुलगाही आहे. ती स्वतःला चौबाइन (चौबेची पत्नी) म्हणवून घेऊ लागली. आई-वडिलांनी ती लहान असल्यामुळे तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण पुढे त्यानाही चिंता वाटू लागली जेव्हा ती पुनःपुन्हा आपल्या पतीसोबातच्या आपल्या मथुरेतील आयुष्याबद्दल बोलू लागली. अनेकवेळा जेवताना ती बोलत असे, "मथुरेत माझ्या घरात मी वेगळ्या प्रकारची मिठाई खात होते". तिने आपल्या पतीच्या ३ खुणा सांगितल्या, तो गोरा होता, त्याच्या डाव्या गालावर एक मोठा मस होता आणि तो चष्मा लावायचा. तिने हेही सांगितलं की तिच्या पतीच दुकान द्वारकाधीश मंदिराच्या समोरच होतं.
शांतिदेवी आता ६ वर्षांची झाली होती. तिच्या अशा बोलण्याने तिचे आई-वडील काळजीत पडले होते. मुलीने तर आपल्या मृत्यूची सविस्तर हकीगतही सर्वाना सांगितली होती. त्यांनी जेव्हा आपल्या चिकित्सकाला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यानाही आश्चर्य वाटलं की एवढ्या छोट्या मुलीला इतक्या गुंतागुंतीच्या ऑपरेशन च्या प्रक्रीयान्बद्दल एवढी माहिती कशी? रहस्य आणखीनच गहन होत चाललं. जसजसा वेळ जात होता तसतशी ती आपल्या आई-वडिलांना मथुरेला जाऊया म्हणून विनवण्या करू लागली. पण जवळ जवळ ८ ते ९ वर्षापर्यंत तिने आपल्या पतीच नाव सांगितलं नाही कारण तेव्हा भारतात स्त्रिया आपल्या पतीच नाव उच्चारत नसत. कोणी विचारलं तर ती लाजून फक्त एवढंच सांगायची की तिथे चला, मी त्यांना ओळखेन. एक दिवस त्यांचे एक नातेवाईक बाबू बिशनचंद जे दिल्लीच्या विद्यालयात शिक्षक होते, यांनी तिला सांगितलं की जर तू आपल्या पतीच नाव सांगितलस, तर तुला मथुरेला घेऊन जाऊ. या मोहात पडून तिने त्यांच्या कानात पंडित केदारनाथ चौबे याचं नाव सांगितलं. त्यांनी तिला सांगितलं की ते याबद्दल माहिती मिळवून मगच मथुरेला जाण्याची तयारी करतील. त्यांनी केदारनाथ चौबेना पत्र लिहून दिल्लीला येण्यास सांगितले. केदारनाथ यांनी सर्व गोष्टीना दुजोरा दिला आणि त्यांना दिल्लीतील आपल्या नात्यातील कांजीमल शांती यांना अगोदर भेटण्यास सांगितले.
कांजीमल यांच्याबरोबर एक बैठक झाली ज्यात शान्तिदेवीने त्यांना आपल्या पतीचे बंधू म्हणून ओळखले. तिने आपले मथुरेतील घर आणि त्यात पुरून ठेवलेल्या पैशांच्या बाबतीतही माहिती दिली. तिने असंही सांगितलं की तिला मथुरेला नेलं तर ती स्वतः रेल्वे स्टेशनपासून घरी जाऊ शकेल. कांजीमल यांच्या सांगण्यावरून केदारनाथ लुगडीचा मुलगा नवनीत लाल आणि आपली सध्याची पत्नी यांच्याबरोबर १२ नोव्हेंबर १९३५ ला दिल्लीला आले. शान्तिदेवीने त्याना लगेचच ओळखले आणि आपल्या आईला म्हणाली, "मी तुला म्हटले नव्हते की माझे पती गोरे आहेत आणि त्यांच्या डाव्या गालावर मस आहे?" तिने आपल्या आईला आपल्या पतीच्या आवडीची भाजी करायला सांगितले. मग केदारनाथानी अनेक प्रश्न विचारल्यावर तिने आपल्या मथुरेतील घराच्या आवारातील विहिरीचा संदर्भ दिला जिथे ती रोज अंघोळ करत असे. तिने आपल्या मुलालाही लगेचच ओळखलं, जरी ती त्याला खूपच लहान असताना सोडून गेली होती. तिने तिच्या पतीला प्रश्न विचारला की वाचन देऊनही तुम्ही दुसरं लग्न का केलं?
केदारनाथ निघून गेल्यावर शांती देवी खूप उदास झाली आणि मथुरेला जाण्यासाठी हट्ट करू लागली. गांधीजीनी नेमलेली समिती तिला मथुरेला घेऊन गेली जिथे तिने रिक्षावाल्याला सहजपणे आपल्या घराचा पत्ता सांगितला. तिथे पोचल्यावर तिने तिथल्या सर्व लोकांना ओळखलं आणि घरातील सर्व खोल्यांचा रस्ताही सांगितला. शांतीने तिथल्या सर्व जागा ओळखल्या आणि त्या जागेबद्दलही सांगितलं जिथे तिने पैसे लपवून ठेवले होते. आपल्या वडिलांच्या घरी गेल्यावर तिने आई-वडिलांना लगेच ओळखलं आणि आईला मिठी मारून खूप रडली. हे बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
आपल्या तपासणी दरम्यान केदारनाथाचा एक मित्र पंडित रामनाथ याने एक महत्त्वाची माहिती सांगितली ज्याची आम्ही बाकी माहितीशी पडताळणी करून खात्री केली. जेव्हा केदारनाथ दिल्लीला होते तेव्हा एक रात्र पंडित रामनाथांकडे राहिले होते. सगळे झोपले होते, आणि केदारनाथ, त्यांची पत्नी, नवनीत आणि शांतिदेवी एवढेच एका खोलीत होते. नवनीत गाढ झोपेत असताना केदारनाथानी शांतीला विचारलं की तिला संधिवात होता आणि ती उठू शकत नव्हती तर तिला दिवस कसे गेले होते? यावर शांतीने त्यादिवशी केदारानाथांबरोबर झालेल्या संभोगाची इत्यंभूत प्रक्रिया वर्णन केली आणि केदारनाथांची खात्री पटली की शांतीच त्याची पत्नी लुगडी आहे.
याबाबत शान्तिदेविला विचारलं असता ती म्हणाली की "याच गोष्टीमुळे त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसला."
प्रतिक्रिया
7 Apr 2016 - 12:05 pm | मृत्युन्जय
आयला कुठे लिहिली आहे ही कथा म्हणे.
7 Apr 2016 - 1:33 pm | साहना
"आयला" - कृपया असले शब्द वापरू नका.
आपल्या मातेला इथे आठविण्याचे कारण नाही.
7 Apr 2016 - 2:15 pm | फर्स्टमॉन्क
तुम्ही तर लैच शिरीयस होऊन राहिले …
लिएमभौ ना इथे आठविण्याचे कारण नाही.
7 Apr 2016 - 2:24 pm | DEADPOOL
या प्रतिसादावर गंभीर व्हावे की हसून हसून पुरेवाट करून घ्यावी हे सांगशील का परमेश्वरा?
7 Apr 2016 - 2:47 pm | जव्हेरगंज
7 Apr 2016 - 3:23 pm | टवाळ कार्टा
7 Apr 2016 - 3:54 pm | तर्राट जोकर
हायला, भारीच =))
( हाय अल्ला >> हायला >> आयला ;) )
7 Apr 2016 - 10:23 pm | साहना
8 Apr 2016 - 12:20 am | तर्राट जोकर
हा आमचा अपमान आहे. आम्ही कॅटेगरिकली झोपडपट्टी क्लास आहोत. कोई शक?
7 Apr 2016 - 5:20 pm | मृत्युन्जय
च्यायला काहिही हा साहनाश्री.
7 Apr 2016 - 5:47 pm | अजया
=)))))
7 Apr 2016 - 9:28 pm | बोका-ए-आझम
नव-याचं साडीचं दुकान असलं की बायकांना पुढच्या जन्मी पण आठवतं.
7 Apr 2016 - 10:05 pm | स्रुजा
महालोल प्रतिसाद !!
7 Apr 2016 - 2:32 pm | राजेंद्र मेहेंदळे
अतिशय अभ्यासपुर्ण लेख!!
7 Apr 2016 - 4:02 pm | शान्तिप्रिय
अवांतर प्रतिसाद
टवाळ्खोर प्रतिसाद
असले प्रतिसाद देण्यापेक्षा
प्रतिसाद देण्याची तसदी घेऊ नका.
नम्र विनंती
____/\______
7 Apr 2016 - 4:11 pm | तर्राट जोकर
धागालेखकाला सांगताय?
8 Apr 2016 - 8:10 pm | नाना स्कॉच
"शांति"प्रिय
तुमचा आयडी ष्टुरीला कनेक्ट होतोय हो देवा!
कृ ह घ्या
7 Apr 2016 - 4:08 pm | नाखु
एखाद्या पुनर्जन्मा झालेल्या डू****डु***** आय्डीची कथा सांगीतली तर आम्हा वाचाकांच्या सामान्य(?) ज्ञानात भर पडेल.
अखिल मिपा चटपट,पटपट,खटपट,सटपट,नटखट, वाचक महासंघ व नैमत्तीक पारायण समीती कडून वाचक हितार्थ जारी.
7 Apr 2016 - 4:11 pm | विजय पुरोहित
@साहना अद्भुत कथा आहे. याप्रकारच्या काही कथा वाचलेल्या आहेत. यावर काही शास्त्रीय संशोधन व्हावे अशी एकंदरीतच इच्छा कमी दिसते. असो.
7 Apr 2016 - 4:14 pm | तर्राट जोकर
कथा नै हो. सत्यकथा आहे.
7 Apr 2016 - 4:15 pm | विजय पुरोहित
अहो मला तेच म्हणायचे होते. फक्त सत्य टाईप करायला विसरलो.
:)
7 Apr 2016 - 4:21 pm | अत्रे
कथा रोचक आहे.
मूळ लेखक कोण आहेत?
सत्य घटना असेल तर यावर एखादा विकिपीडिया आर्टिकल असेलच. (आहे का?)
7 Apr 2016 - 5:27 pm | आनन्दा
संदर्भ द्यावेत ही विनंती..
8 Apr 2016 - 9:57 am | साहना
हा शोध निबंध नाही. निव्वळ मनोरंजनासाठी दिलेली त्रिविआ आहे.
8 Apr 2016 - 10:11 am | आनन्दा
ते खरेच आहे. पण काल्पनिक आहे की सत्य? सत्य असेल तर तुम्ही कुठे वाचली?वगैरे माहिती मिळाली तर बरे.
8 Apr 2016 - 4:02 pm | सतिश गावडे
नक्की का? की जनमत आपल्या विरोधात गेले हे पाहून तुम्ही ही पळवाट शोधून काढलीत?
7 Apr 2016 - 5:32 pm | होबासराव
महात्मा गांधीनी नियुक्त केलेल्या प्रसिद्ध व्यक्तींच्या एका समितीने त्यांची तपासणी केली होती.
हा संदर्भ पुरेसा नाहि का ? त्या नंतरहि कोणि हे कसे विचारु शकते कि हि सत्य घटना आहे कि नाहि. कमाल आहे ब्वॉ !
7 Apr 2016 - 5:34 pm | तर्राट जोकर
https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=U...
7 Apr 2016 - 8:01 pm | आनन्दा
शांतीदेवी जर विंग्रजी विकि वस असतील तर मराठी विकीवर पण असावयास हरकत नसावी..
@साहनाजी तुम्ही परवानगी दिलेत तर कदाचित @माहितगारसाहेब हे त्यांच्या प्रोजेक्टमध्ये घेऊ शकतील.
7 Apr 2016 - 5:41 pm | होबासराव
वाह तजो त्वाडा जवाब नहि ;)
The case was brought to the attention of Mahatma Gandhi who set up a commission to investigate; a report was published in 1936
7 Apr 2016 - 5:46 pm | तर्राट जोकर
होबासराव, महात्मागांधींवर विषेष फोकसचे कारण?
7 Apr 2016 - 8:30 pm | होबासराव
तजो
मला माहित नाहि तुम्हि काय अर्थ काढलात तो, पण ते हायलाईट फक्त एव्हढ्या करताच केलय कि माझा जो पहिला प्रतिसाद होता कि जर गांधिजिनि ह्यात लक्ष घातलय म्हणजे ते विश्वसनिय नक्किच आहे.
महात्मा गांधि चा फोटो असलेलि नोट ज्याच्या खिशात असते ना ति त्याचिच असते म्ह्णजे त्याचि मक्तेदारि असते.
पण महात्मा गांधि हे काहि सिलेक्टेड पक्ष किंवा त्यांचे भाट ह्यांचि मक्तेदारि नाहि असे नेहमिच मानणारा
होबासराव
8 Apr 2016 - 11:30 am | तर्राट जोकर
धन्यवाद. तुमची भूमिका समजली. पक्ष वा भाट जाऊ दे निव्वळ गांधीही कैकांना खटकतो म्हणून आपलं..
8 Apr 2016 - 8:19 pm | नाना स्कॉच
अरे काय सुतकताई चालवल्ये दोघांनी?? :D :D
7 Apr 2016 - 5:51 pm | जगप्रवासी
अशीच एक कथा रत्नाकर मतकरींनी लिहिली आहे
7 Apr 2016 - 7:36 pm | 'पिंक' पॅंथर्न
7 Apr 2016 - 8:17 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सदर प्रतिसाद मी कॅजॅस्पॅ ह्यांच्या सांगण्यावरुन टंकत आहे. त्यांच्या दोन्ही हाताची बोटं अचंब्याने तोंडात आहेत.
7 Apr 2016 - 8:24 pm | पैसा
तू त्याचा पुनर्जन्म का? यादे पिछले जनमकी मधे जा की रे!
8 Apr 2016 - 8:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ते भुत आहे. तेला कस्ला पुनर्जन्म.
7 Apr 2016 - 10:00 pm | टवाळ कार्टा
कोणाच्या???
रच्याकने ही खरी गोष्ट आहे
7 Apr 2016 - 9:25 pm | बोका-ए-आझम
त्यात एकाला पुढचा जन्म आठवत असतो.
7 Apr 2016 - 10:01 pm | टवाळ कार्टा
ठ्ठो......
7 Apr 2016 - 10:16 pm | lgodbole
छान
7 Apr 2016 - 10:30 pm | lgodbole
गंमतच की !
हिंदु धोबी पुढच्या जन्मात मुसलमान राजा झाला , असा धागा कुणी काढला होता , तर तो धागाच उडाला.
आता हा धागा मात्र तेच लोक चवीचवीने वाचत बसलेत.
8 Apr 2016 - 10:09 am | आनन्दा
अहो तुम्हीच काढला होतात ना?
7 Apr 2016 - 10:32 pm | ट्रेड मार्क
तुम्ही अंधश्रद्धा पसरवत आहात म्हणून अंनिसवाले तुमच्या विरुद्ध कारवाई करू शकतील. यनावालांचा पूर्वजन्म नसतोच असे सांगणारा अजून एक लेख येईल.
वैज्ञानिक दृष्ट्या तुम्ही ही कथा सत्य आहे हे सिद्ध करू शकाल का?
8 Apr 2016 - 12:35 am | आरोह
"Apprenticed to Himalayan master" हे श्री एम यांचे जीवनचरित्र वाचण्याचा योग आला, पुनर्जन्म या विषयावर त्यांचे स्वानुभव त्यात त्यांनी सांगितले आहेत.
8 Apr 2016 - 10:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मेनी मास्टर्स मेनी लाईव्ज वाचा. उत्तम पुस्तक.
8 Apr 2016 - 4:06 pm | सतिश गावडे
मी पहिल्यांदा जेव्हा मेलामेमा वाचले तेव्हा मी ही भारावून गेलो होतो. नंतर पुस्तकाचे क्रिटीक्स वाचले. क्रिटीक्सचे दावे पुस्तकाशी पडताळून पाहीले. आणि लक्षात आलं पुस्तक पार गंडलेलं आहे.
पुनर्जन्मावर शास्त्रीय दृष्टिकोनातून काही वाचावयाचे असल्यास डॉ. इयान स्टिव्हन्सन वाचावे. या क्षेत्रातील ते शेवटचे नाव आहे.
8 Apr 2016 - 8:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अरे एक फँटसी म्हणुनच वाचलं. केस स्टडी म्हणुन नाही =))
8 Apr 2016 - 12:42 am | आरोह
सांगायचे राहिले, श्री एम म्हणजे ह्या जन्मीचे मुमताज अली
8 Apr 2016 - 10:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
lgodbole पण पुनर्जन्म आहेत म्हणे मोगाखानाचा.
8 Apr 2016 - 9:56 pm | आरोह
आजून कोणाकोणाचे पुनर्जन्म आहेत
8 Apr 2016 - 10:10 pm | आरोह
तर्राट जोकर हि कोणाचे तरी पुनर्जन्म खरे खोटे डांगे साहेबांना माहित..
8 Apr 2016 - 10:33 pm | तर्राट जोकर
तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?
जेवण जात नाही? सतत उलट्या होतायत? डॉक्टरांनी प्रीस्क्रीप्शन दिलंय का तर्राट जोकर हाच संदिप डांगे आहे का हे चेक करुन घ्या नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल?