....असहकाराचे निशाण

अव्यक्त's picture
अव्यक्त in काथ्याकूट
6 Apr 2016 - 12:09 pm
गाभा: 

(मोबाईल कोणता घेऊ ?)
… त्याचे झाले असे माझा भ्रमणध्वनी गेली दोन वर्षं आपल्या धन्याची इमाने इतबारे त्याच्या वकुबाप्रमाणे चाकरी करत होता…पण अचानक गत आठवड्यात असहकाराचे निशाण उगारले… आता झाली का पंचाईत ! आता कसं करायचं आणि काय करायचं असा यक्षप्रश्न अस्मादिकासमोर उपस्थित झाला ? येत्या मराठी नव वर्षाच्या निमित्ताने नवीन भ्रमण ध्वनी घेण्याचे योजत आहे… तरी कोणता भ्रमण ध्वनी घ्यावा हा गहन पेच अस्मादिकांस पडला आहे… तरी मिपाकर हा गुंता सोडवण्यास नेहमी प्रमाणे मदत करतील हीच आशा बाळगतो… माझे budget रु. १००००/- आहे. तरी मिपाकरांनी विविध पर्याय सुचवावे. भ्रमण ध्वनीत प्रगत तंत्रज्ञान असणे अपेक्षित. वरील विषयावर साधक बाधक चर्चा होणे अगत्याचे आहे. जास्तीत जास्त पर्याय सुचवावे आणि ते का योग्य आहेत ह्याचा उहापोह झाल्यास दुधात केशरच…. मिपाकर आणि मिपा व्यासपीठाचा आभारी !

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

6 Apr 2016 - 12:14 pm | कपिलमुनी

तुम्ही काय शोधाशोध केलीत ? ते लिहीलात तर सुचवायला सोपा पडेल

मराठी कथालेखक's picture

6 Apr 2016 - 1:45 pm | मराठी कथालेखक

Flipkart वर filters apply करत जा... काम सोपे होईल :)

उगा काहितरीच's picture

6 Apr 2016 - 2:34 pm | उगा काहितरीच

थोsssडे बजेट वाढवा आणी मोटो जी टर्बो घ्या . SBI चे कार्ड वापरून ११-१२ हजार च्या आसपास येईल. नाहीतर मोटो जी 3 घ्या तुमच्या बजेटमधेच येईल. बाकी कंपेअर करायला gsmarena ही साईट वापरा.

पिलीयन रायडर's picture

6 Apr 2016 - 2:40 pm | पिलीयन रायडर

नवा मोबाईल घ्यायचा आहे ही मिपावरची सर्वात फेमस क्वेरी आहे. त्याचा एकच स्वतंत्र.. कायम स्वरुपी धागा का काढत नाही?

तर्राट जोकर's picture

6 Apr 2016 - 2:52 pm | तर्राट जोकर

धागाशिर्षक दिशाभूल करणारे असून मोबाईल कोणता घेऊ ह्या बिनमहत्त्वाच्या विषयासाठी वाचकांची फसवणूक आहे. कोणता मोबाइल घ्यावा ह्यासाठी मिपावर ढिगाने धागे आहेत. इच्छुकांनी शोध घ्यावा. संपादकांना सांगून शिर्षक बदलून घ्या.

नाखु's picture

6 Apr 2016 - 3:17 pm | नाखु

मटा गिरी आहे मटा नाही का पटापटा बातम्या मधला एखादाच शब्द शीर्षकात देउन तीच बातमी दोन तीन लिंकात डकवते.

पटापटा मटा पेक्षा सटा सटा सकाळ बरा माणनारा नाखु