मंडळी नमस्कार
माझ्या एका मित्राला करविषयक सल्ला हवा आहे ,आपण सुज्ञ जाणकार मिपाकर्स नक्की मदत कराल अशी अपेक्षा ...
मित्र परदेशी असताना काही रक्कम भारतात NRE अकाऊंट वर पाठवले होते . नंतर भारतात येवून ती रक्कम अन्य बँक मध्ये FD मध्ये गुंतवली ,कारण एनआरई बँक पेक्षा दुसरी बँक जास्त व्याज देत होती .
त्यातच निम्मी रक्कम त्याने आईच्या नावाने गुंतवली कारण सीनियर सिटीजन एफडी व्याजदर जास्त आहेत.
अशा सर्व परिस्थितीत आज तो टेंशन मध्ये आहे कारण एनआरई एफडी वरील व्याज करमुक्त असले तरी त्याने ती रक्कम तिथून काढून अन्य बँक मध्ये गुंतवली आहे कारण जास्त व्याजासाठी . तर आता नवीन बँक मधील एफडी वरील व्याज करपात्र असेल की करमुक्त ? याबाबत बँकेत चौकशी केल्यास समाधानकारक उत्तर मिळाले नाही .
*उत्पन्नाचा स्रोत NRE Money आहे , यास्तव काय करावे? विवरणपत्र भरून व्याज भरावे लागेल का? याबद्दल शक्य असल्यास मार्गदर्शन करावे ,ही नम्र विनंती !
धन्यवाद
प्रतिक्रिया
1 Apr 2016 - 8:57 pm | श्रीरंग_जोशी
आपला मित्र कोणत्या देशात राहतो?
त्याचा प्रश्न भारतातल्या कराविषयी आहे असे दिसते.
अमेरिकेत राहत असल्यास भारतात व्याजाद्वारे मिळणार्या उत्पन्नावर भारतात भरावा लागलेला कर वजा करून ती रक्कम अमेरिकेतली आयकर रिटर्न भरताना मूळ उत्पन्नात जोडावी लागते. हे मी दर वर्षी करत असतो.
तो अमेरिकेत राहत नसल्यास वरील माहिती या ठिकाणी गैरलागू.
1 Apr 2016 - 9:00 pm | रमेश भिडे
दोन वर्षापूर्वी सौदी मध्ये होता, सध्या भारतात आहे
1 Apr 2016 - 9:19 pm | श्रीरंग_जोशी
ओके.
1 Apr 2016 - 9:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
१. अनिवासी भारतियाने जवळच्या (पहिल्या स्तराच्या) नातेवाईकाला एन आर ई खात्यातून दिलेली पैशांची भेट करमुक्त होऊ शकते. सी ए ला विचारून खात्री करावी.
२. एन आर ई खात्यातून पैसे काढून ते रेसिडेंट भारतियाच्या नावे/खात्यात टाकले तर ते पैसे त्या रेसिडेंट भारतियाचे त्या वर्षीचे उत्पन्न समजले जाईल.
३. अनिवासी भारतियाने आपल्या एन आर ई खात्यातून पैसे काढून ते इतर कोणत्याही नॉन-एन आर ई पद्धतिने स्वतःच्या नावावरच गुंतवले तर ते त्या अनिवासी भारतियाचे निवासी भारतिय उत्पन्न होते.
४. वरील दोन्ही प्रकारांत मुद्दल एन आर ई खात्यातून आल्यामुळे ते करपात्र नसते. मात्र, त्यावर मिळणार्या सर्व उत्पन्नाला (व्याज, इ) रेसिडेंट भारतिय उत्पन्न समजले जाईल व त्याप्रमाणे करआकारणी केली जाईल.
1 Apr 2016 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे
दोन वर्षापूर्वी सौदी मध्ये होता, सध्या भारतात आहे
म्हणजे तुमचा मित्र सद्या अनिवासी भारतिय (एनआरआय) नाही असेच दिसत आहे.
अनिवासी भारतीय व्यक्ती भारतात कायमची परत आल्यावर, तिचे शेवटचे अनिवासी (एनआरआय-पात्र) आर्थिक वर्ष संपले की, पुढची दोन आर्थिक वर्षे तिचे "रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट (RNOR)" असे स्टेटस असते... या दोन वर्षांत बँकेतले एनआरई खाते चालू ठेवता येते. ही सुविधा परदेशातून येणे असलेले पैसे (फायनल बेनेफिट्स, इ), परदेशातील गुंतवणूक भारतात आणणे, इ साठी असते.
या दोन वर्षांच्या शेवटी (अ) सर्व एनआरई खाती बंद करावी लागतात (याला एफसीएनआरई फिक्स्ड डिपॉझिट्स अपवाद असतात व ती त्यांची मुदत पूर्ण होईपर्यंत चालू ठेवता येतात) , (आ) एनआरओ खाते ऑर्डिनरी एसबी मधे परावर्तित करावे लागते. यानंतर, सद्य नियमांप्रमाणे आयकर विभागाला न कळविलेली भारताबाहेरील सर्व संपत्ती अवैध ठरते.
RNOR ची दोन वर्षे संपल्यानंतर, अर्थातच, ती व्यक्ती सर्वसाधारण निवासी भारतिय बनते व तिला सर्वसाधारण भारतियाचे सर्व करनियम लागू होतात.
अजूनही बरेच परिस्थिती/व्यक्ती-सापेक्ष बारकावे आहेत, पण ते इथे लिहिणे क्लिष्ट होईल.
मात्र, तुमचे वरचे विधान पाहता, तुमच्या मित्राला एनआरई नियमांसंबंधी अनुभवी सीए च्या सल्ल्याची गरज आहे असे वाटते आहे.
1 Apr 2016 - 10:53 pm | रमेश भिडे
धन्यवाद एक्का साहेब
पण तो कायमस्वरुपी परत आलेला नसून पुन्हा सन्धी मिळताच परत जाणार आहे , अशा परिस्थितीत काय ?
(त्याचा जॉब कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा असतो )
1 Apr 2016 - 11:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
१. सद्य आर्थिक वर्ष :
जी व्यक्ती कोणत्याही एका आर्थिक वर्षात भारतात (एक किंवा अनेक सुट्ट्या मिळून एकूण) १८१ पेक्षा जास्त दिवस राहिली आहे (या हिशेबात भारत सोडण्याचा व परतीचा दिवस भारतातल्या वास्तव्याचा दिवस म्हणून धरायचा असतो) ती व्यक्ती त्या वर्षासाठी "निवासी भारतीय" असते.
२. भविष्यातली आर्थिक वर्षे :
परत परदेशात नोकरी/व्यवसायासाठी जाण्याच्या शक्यतेचा विचार आताच्या आर्थिक वर्षातील स्टेटस ठरविण्यासाठी करता येत नाही. भविष्यातल्या प्रत्येक वर्षात, व्यक्ती किती दिवस भारतात असेल, यावर तो निर्णय अवलंबून असेल.
३. RNOR स्टेटस :
भारतात परतणार्या एनआरआय ला आरएनओआर (RNOR) स्टेटसचा फायदा मिळण्यासंबंधीचा नियम असा आहे :
A person is an RNOR if he meets either of these two conditions:
(1) He/she has been non-resident in India, that is, an NRI, in nine out of the ten previous years preceding that year,
or
(2)He/she has, during the seven previous years preceding that year, been in India for a period of 729 days or less.
2 Apr 2016 - 8:30 am | खेडूत
उत्तम माहिती डॉक्टर् साहेब!
माझीही एक शंका.
मलाही भारतात येऊन दोन वर्षे होतील, त्यामुळे हे खाते बंद करणे आले.. कारण सध्या मी करत असलेले बिझ्नेस विसावरील वास्तव्य यात येत नसावे.(?)
पण बंद केल्यावर पुनः एक-दोन वर्षांसाठी कंपनीने कुठे जायला सांगितले तर पुनः एनारई खाते उघडायचे का?
2 Apr 2016 - 2:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
बिझनेस व्हिसावर (एकदा अथवा अनेकदा) परदेशी जात असाल व त्यामुळे आर्थिक वर्षात भारतातले वास्तव्य १८१ दिवसांपेक्षा कमी होत असेल, तर त्या वर्षी तुम्ही एनआरआय असू शकता. एनआरआयसंबंधी कायद्यांत जाणकार असलेल्या सीएशी चर्चा करून खात्री करून घ्या.
2 Apr 2016 - 8:36 am | रेवती
वाचतिये.
2 Apr 2016 - 2:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
अधिक माहितीसाठी खालील दुवा उपयोगी आहे :
http://www.incometaxindia.gov.in/Pages/non-resident-indian.aspx