गाभा:
हल्ली पुण्या मुंबई सारख्या अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. अत्यंत दिमाखात नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. पण जागोजागी 'हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा!' असे फलक लावलेले दिसतात. मला असं वाटतं की आपण जर हिंदूच आहोत तर गुढीपाडव्याच्या दिवसासाठी 'हिंदू' हे नाव वेगळे का वापरावे लागते? नवीन वर्ष म्हंटले की याचा साहजिक अर्थ गुढीपाडवा हा का असू नये? १ जानेवारी च्या दिवशी आपण 'इंग्रजी नव वर्षाच्या शुभेच्छा ' किंवा 'ख्रिस्ती नववर्षाच्या शुभेच्छा'असं म्हणतो का?
प्रतिक्रिया
31 Mar 2016 - 7:09 pm | एस
ही सहा वाक्ये पाडव्याची मिरवणूक निघेल तेव्हा तिच्या संयोजकांना ऐकवा. हाकानाका.
31 Mar 2016 - 7:13 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
आरारा टायटलमध्ये हिंदू शब्द असला कि ट्यार्पी दणकून येतोय नै!!:'(
पण आता लोक कंटाळलेत
31 Mar 2016 - 7:31 pm | अत्रे
सहमत
31 Mar 2016 - 7:34 pm | विजय पुरोहित
1 जानेवारी हे पाश्चात्य नववर्ष असल्याचे अध्याहृतच आहे...
त्यामुळे असेल कदाचित
31 Mar 2016 - 9:20 pm | माहितगार
नववर्षांचे सेलिब्रेशन कोणत्याही कॅलेंडरने असोत खरेतर सांस्कृतिक घटना आहेत धर्मसंस्थांना कोणत्यातरी नववर्षा केवळ आपला अधिकार दाखवण्याने प्रत्यक्षात फारसे नुकसानकारक नाही पण डोळसपणा ठेवला तर धर्म आणि संस्कृती यांची जनमानसातील गल्लत टळून सर्वधर्मीय लोक एकमेकांनी साजर्या केलेल्या नववर्षात सहभागी होऊ शकतील.
गुढी या विषयावर तर मी आतापर्यंत पुरेसा सखोल ऑनलाईन अभ्यास केला आहे आणि काठीपूजा परंपरा विशीष्ट धर्म अथवा विशीष्ट भौगोलीक क्षेत्रापुरत्या मर्यादीत नसून तो एक आदीम मानवा पासून चालत आलेला सांस्कृतीक ठेवा आहे. गुढीला हिंदूंनी स्वतःचे म्हणून एक प्राचीन परंपरा आपलीशी करण्यात गैर नाही, हिंदूंनी ती आपलीशी केली तसे हा मानवी सांस्कृतीक ठेवा इतर धर्मीयांनी संस्कृती आणि धर्म यांची गल्लत न करता आपलासा करण्यास काहीच हरकत नसावी.
1 Apr 2016 - 12:50 am | गामा पैलवान
ह्कु,
तुमचा हा प्रश्न समर्पक आहे :
>> नवीन वर्ष म्हंटले की याचा साहजिक अर्थ गुढीपाडवा हा का असू नये?
मात्र याचं उत्तर मला माहीत नाही.
आ.न.,
-गा.पै.
1 Apr 2016 - 3:01 am | तर्राट जोकर
आपण जर हिंदूच आहोत तर गुढीपाडव्याच्या दिवसासाठी 'हिंदू' हे नाव वेगळे का वापरावे लागते?
>>काय हकु साहेब, किती शतकं मारायची आहेत? दंगा पोटेन्शियल वाक्य टाकताय म्हणून म्हटले.
बाकी हे नववर्ष शोभायात्रा मिरवणुका मुंबई प्रदेशाचे एकमेव सांस्कृतीक केंद्र डोंबोलीतून सुरु झाल्याची दंतकथा आहे. त्या आधी सर्व महाराष्ट्रात गुडीपाडवाच साजरा केला जायचा. वर्षबदल झाल्याचा आंग्लदेशीय आनंद नवे पंचांग आणणार्यांखेरिज बहुतेक कुणाकडे साजरा होत नव्हता. दिवाळीपासून नवा चोपडी लिवायसाठी नयासाल नया धंदा अशी रित होती. आता आ सब फेनेन्सियल यीअरमां गया.
1 Apr 2016 - 6:18 am | प्रचेतस
गुढीपाडवा खरंच 'आपलं' नववर्ष आहे का?
1 Apr 2016 - 7:27 am | संजय पाटिल
जरा आपणच माहिति दिलित तर बर होइल
1 Apr 2016 - 7:33 am | प्रचेतस
टंकाळा.
1 Apr 2016 - 8:34 am | अत्रुप्त आत्मा
+ वण!
आपलं नाही तर कुणाचं? ते तरी सांगा ..
उगीच कशाला खेळायचा तो टांगा!?
1 Apr 2016 - 8:55 am | सुनील
लेख वाचून असे वाटते की फक्त मराठी, कन्नड, तेलुगु आणि सिंधी मंडळीच तेवढी "हिंदू" म्हणवून घेण्यास पात्र आहेत, कारण ही एवढीच मंडळी चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवे वर्ष साजरे करतात!!