आशावाद - काही प्रश्न

अमृता_जोशी's picture
अमृता_जोशी in काथ्याकूट
30 Mar 2016 - 11:16 pm
गाभा: 

दररोज किमान एकदा तरी आशावाद आयुष्यात किती महत्वाचा आहे, याविषयी काहीतरी वाचायला मिळतेच. अर्ध्या भरलेल्या पेल्याचे उदाहरण तर किमान दोन-चार हजार वेळा ऐकले असेल. काही प्रश्न आहेत, बघा जमले तर:

  • आशावाद म्हणजे नेमके काय? नेहमी सकारात्मक विचार करणे का? मग 'Wishful Thinking' आणि 'Positive Thinking' यात काय फरक?
  • एखादी व्यक्ती जर "मी पाठीला पतंग बांधून आठव्या मजल्यावरून उडी मारून उडण्याचा प्रयत्न करणार" असे म्हणत असेल तर त्याला "हा मूर्खपणा आहे" असे म्हणणे म्हणजे निराशावाद का?
  • "Hope for the best, prepare for the worst" असे असेल तर आशावादाचा नेमका फायदा काय?
  • नेहमी आशावादी राहणे घातक आहे काय? आशावादा इतकाच निराशावाद महत्वाचा आहे काय?

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

31 Mar 2016 - 12:29 am | तर्राट जोकर

Hope for the best, prepare for the worst

हाच आशावाद आहे. दोन्ही. वर्स्ट साठी प्रीपेअर राहा म्हणणे म्हणजेच दुर्दम्य आशावाद. वर्स्टम्धूनही मार्ग काढण्यासाठी तयार राहा.

काही चुकीचे होणारच नाही असे मानणे म्हणजे मूर्खपणा.

स्रुजा's picture

31 Mar 2016 - 12:33 am | स्रुजा

निराशा वाद आणि वास्तव वाद मधला फरक आहे हे वाक्य : Hope for the best, prepare for the worst

वास्तववादी माणुस प्लान ए आणि बी तयार ठेवेल. निराशावादी आधीच शस्त्रं ठेवेल.

भाऊंचे भाऊ's picture

31 Mar 2016 - 12:38 am | भाऊंचे भाऊ

कसलाच वाद नको म्हणून आपला पास

तर्राट जोकर's picture

31 Mar 2016 - 12:54 am | तर्राट जोकर

नेहमी आशावादी राहण्यासारखं सुख दुसरं काही नाही. आशावाद काही देणार असे नाही पण निराशावाद नुकसान नक्कीच करेल.

श्रीरंग_जोशी's picture

31 Mar 2016 - 1:15 am | श्रीरंग_जोशी

'आल इज वेल' वाला थ्री इडियट्स मधला संवाद आठवला.

विद्यार्थी's picture

31 Mar 2016 - 1:25 am | विद्यार्थी

आशावादी किंवा निराशावादी असणे या दोन्ही मनाच्या स्थिती आहेत. एखाद्याला ठरवून आशावादी किंवा निराशावादी होता येत असेल असे मला वाटत नाही. सभोवतालची परिस्थिती आणि घडणाऱ्या घटना माणसाच्या मानसिक स्थितीवर परिणाम करत असतात.

एखाद्या माणसाला सतत आणि खूप प्रयत्न करूनही यश येत नसेल तर तो निराशावादी होऊ शकतो, आणि मोजक्या प्रयत्नात सातत्याने यश मिळाले तर माणूस आशावादी बनणे अगदी साहजिक आहे.

माणसाचे मन प्रत्येक गोष्टीबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही पद्धतीने विचार करत असते. मला वाटते, मन नकारात्मक विचार जरा जास्तच करते. तसे नसते तर "सकारात्मक विचार करावा" असे सांगायची वेळ आली नसती.आणि
माणसाने फक्त सकारात्मकच विचार करावा इतक्या सकारात्मक परिस्थितीत किंवा जगात आपण राहतोय असेही मला वाटत नाही.

"Wishful Thinking" म्हणजे स्वप्न पाहणे. जी गोष्ट किंवा परिस्थिती अस्तित्वात नाही त्याबद्दल विचार करून तसेच होईल असा विचार करणे म्हणजेच Wishful Thinking असावे.

सस्नेह's picture

31 Mar 2016 - 2:39 pm | सस्नेह

वास्तव प्रतिसाद !
खरोखर ज्याला यश मिळत गेले तो आशावादी होतोच आणि ज्याला दुर्दैवाने अपयशच मिळत जाते तो साहजिकच निराशावादी होणार. सुरुवातीला सर्वचजण सकारात्मक विचार करतात पण विपरीत अनुभव आल्यानंतर मन नकारात्मक विचार करायला शिकते. जन्मत: निराशावादी कुणी असेल असे वाटत नाही.
आशावाद किंवा निराशावाद ठेवण्यापेक्षा जीवन जसे आहे तसे स्वीकारणे हेच उत्तम. जेव्हा जसे परिणाम मिळतील तेव्हा तसे धोरण.

विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रयत्न केल्याने यश प्राप्त होईल असा विचार म्हणजे आशावाद म्हणता येईल। ही मर्यादा प्रत्येकाची वेगवेगळी असेल।

मराठी कथालेखक's picture

31 Mar 2016 - 2:29 pm | मराठी कथालेखक

एखादी व्यक्ती जर "मी पाठीला पतंग बांधून आठव्या मजल्यावरून उडी मारून उडण्याचा प्रयत्न करणार" असे म्हणत असेल तर त्याला "हा मूर्खपणा आहे" असे म्हणणे म्हणजे निराशावाद का?

उडी मारणे इतकेच धेय्य असेल तर तो माणूस नक्कीच यशस्वी होईल अगदी पाठीला पतंग न बांधताही :)

राजू's picture

3 Apr 2016 - 10:34 am | राजू

जसे कि मराठी माणूस धंद्यात उडी मारतो.

मराठी कथालेखक's picture

31 Mar 2016 - 2:37 pm | मराठी कथालेखक

"Hope for the best, prepare for the worst" असे असेल तर आशावादाचा नेमका फायदा काय?

आशावादाचा हा फायदा की अगदी प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही 'बघुयात तरी एक प्रयत्न करुन' म्हणून प्रयत्न करता, यशस्वी होण्याची २-५% जरी शक्यता असली तरी ती सोडत नाही.
उदा: एखाद्या नोकरीसाठी तुम्ही मुलाखातीस गेला तिथे एका जागेसाठी ही भली मोठी रांग बघून निराशावादी माणूस म्हणेल की "जावू दे आपल्याला काय मिळणार नाही ही नोकरी." असं म्हणून तो निघून जाईल. वास्तववादी विचार करेल "यातले अनेक लोक कदाचित माझ्यापेक्षा जास्त लायक असतील, असे असताना मला ही नोकरी मिळणे कठीणच. या नोकरीसाठी वेळ न घालवलेलाच बरा" तर आशावादी म्हणेल "आता आलोच आहे इथे तर मुलाखत तर देतो, कुणी सांगावे मिळेलही मला नोकरी" खरे तर 'नोकरी आपल्यालाच मिळेल' अशी खात्री त्यालाही नसतेच, पण ती शक्यता तो पुर्ण नाकारत नाही.

विवेक ठाकूर's picture

31 Mar 2016 - 2:41 pm | विवेक ठाकूर

आशावाद म्हणजे नेमके काय? नेहमी सकारात्मक विचार करणे का? मग 'Wishful Thinking' आणि 'Positive Thinking' यात काय फरक?

आशावाद म्हणजे निराशा येऊ नये म्हणून मनाची काढलेली समजूत. विधानातल्या इतर गोष्टीही त्याच प्रकारात मोडतात.

एखादी व्यक्ती जर "मी पाठीला पतंग बांधून आठव्या मजल्यावरून उडी मारून उडण्याचा प्रयत्न करणार" असे म्हणत असेल तर त्याला "हा मूर्खपणा आहे" असे म्हणणे म्हणजे निराशावाद का?

दिलेल्या उदाहरणाला मूर्खपणा म्हणावे लागेल, त्याचा आशा-निराशावादाशी संबंध नाही.

"Hope for the best, prepare for the worst" असे असेल तर आशावादाचा नेमका फायदा काय?

यातून दुहेरी मानसिकता तयार होते. एकाच वेळी, आपण यशस्वी होऊ आणि अपयशाला सामोरे जाण्याची तयारी ठेवू असं मनाला सांगणं म्हणजे पाऊस येणार नाही पण छत्री असू दे अशातला प्रकार आहे.

नेहमी आशावादी राहणे घातक आहे काय? आशावादा इतकाच निराशावाद महत्वाचा आहे काय?

आशावाद आणि निराशावाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. निराशावादाला हटवण्यासाठी आशावादाचा जोर लावला जातो पण तो ओसरला तर निराशा ठरलेली असते. तद्वत, निराशा कितीही असली आणि जरा परिस्थिती बदलली की मन आशावादी होऊ लागतं. अशा प्रकारे तुम्ही या दोन मानसिकतेत झुलत राहाता.

सम्यकत्व असलेली व्यक्ती या कोणत्याच वादात पडत नाही. जी परिस्थिती असेल ती तिच्यासाठी कायम वस्तुस्थिती असते. त्यामुळे परिस्थितीचा मनावर परिणाम होत नाही आणि कोणत्याही परिस्थितीतून योग्य मार्ग निघू शकतो.

वेल्लाभट's picture

31 Mar 2016 - 2:46 pm | वेल्लाभट

काय मग बाकी? मजेत?

अमृता_जोशी's picture

31 Mar 2016 - 2:55 pm | अमृता_जोशी

हो..एक्दम्म. :-D

टीप: काही सांगण्याचा प्रयत्न करत असाल तर फोड करून सांगा..

दिग्विजय भोसले's picture

31 Mar 2016 - 2:59 pm | दिग्विजय भोसले

आशावाद म्हणजे नेमके काय? नेहमी सकारात्मक विचार करणे का? मग 'Wishful Thinking' आणि 'Positive Thinking' यात काय फरक?

आशावाद म्हणजे एखाद्या वस्तूची/गोष्टीची/घटनेची/परिस्थीतीची आशा बाळगणे.
सकारात्मक विचार आणि आशावाद यामध्ये फरक आहे.
सकारात्मक विचारांना प्रयत्नांची जोड असते,आशावाद म्हणजे काही न करता आयती अपेक्षा करणे,आणि हाच wishful अन् positive thinking मधला फरक आहे.

एखादी व्यक्ती जर "मी पाठीला पतंग बांधून आठव्या मजल्यावरून उडी मारून उडण्याचा प्रयत्न करणार" असे म्हणत असेल तर त्याला "हा मूर्खपणा आहे" असे म्हणणे म्हणजे निराशावाद का?

नाही,
साधा कागदी पतंग बांधून उडी मारणे हा मूर्खपणाच आहे.त्यामुळे आशावादास ही गोष्ट लागू होत नाही.

"Hope for the best, prepare for the worst" असे असेल तर आशावादाचा नेमका फायदा काय?

आशावादाचा नेमका फायदा हा फक्त मनाला गंडवण्याच्या आहे.नेहमी चांगलच होईल असा आशावाद बाळगून मनाला गंडवायचं.[all is well]

नेहमी आशावादी राहणे घातक आहे काय? आशावादा इतकाच निराशावाद महत्वाचा आहे काय?

हो,
सतत पावसात भिजलं तर थोडं ऊन खाणं गरजेचे आहे,तसेच निराशावादसुद्धा महत्वाचा आहे.

{हे माझे वैयक्तिक मत आहे,इतरांचे वेगळे असू शकते}

अमृता_जोशी's picture

31 Mar 2016 - 3:02 pm | अमृता_जोशी

एकंदरीत काय तर "Positive thinking is overrated", बरोबर?

दिग्विजय भोसले's picture

31 Mar 2016 - 3:06 pm | दिग्विजय भोसले

आदमी कि सोच ही उसकी पहचान होती है|

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

31 Mar 2016 - 6:29 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

1) पास
2) मूर्खपणा
3) फायदा-तोटा व्यापार्यांनी पहावा
4) हो