नास्तीकांसाठी हिंदू जिवनपद्धती

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
30 Mar 2016 - 2:26 pm
गाभा: 

महाभारतातील यक्षप्रश्नचर्चेत एकेक्षणी युधिष्ठीर धर्मविचारांमध्ये विद्वदजनांमध्ये सहमती नसल्याचे सुचवताना दिसतो (संदर्भ) आस्तीकता आणि नास्तीकता या सब्जेक्टीव्ह गोष्टी आहेत विवीध दृष्टीकोणांच्या आस्तीक आणि नास्तीकांमध्ये परस्पर वाद-विवाद होत असतात. जोपर्यंत विवाद आणि शास्त्रार्थ तर्कसुसंगत नसेल किमान सभ्यता पाळून असतात तो पर्यंत चिंतेची बाब नसावी. मागे एका चर्चेत कुणि एक भक्त मनोविकाराच्या जवळ कसा आहे या बद्दल चर्चा चालू होती, कदाचित अशाच कोणत्यातरी चर्चेच्या प्रत्यूत्तराने असेल नास्तीकांना मनोविकृत ठरवण्याची स्पर्धा लागल्याचे एका हिंदूधर्मावलंबी मिपाचर्चा धाग्यावर दिसते आहे. विश्वास आणि श्रद्धा असंख्य प्रकारच्या असू शकतात खरेतर जेवढ्या व्यक्ती तेवढे विश्वास श्रद्धा आणि मतांतरे आढळू शकतात, आपला विश्वास आणि श्रद्धा तेवढी बरोबर म्हणजे आस्तीक बाकी सर्व नास्तीक या न्यायाने केवळ विश्वासांच्या वेगळेपणामुळे व्यक्ती किंवा समुहास मनोविकृत ठरवण्याची घाई अनाकलनीय आहे.

भारतीय तत्वज्ञान आणि हिंदू जिवनपद्धतीत नास्तीकांना स्थान आहे का ? कोणत्यास्वरुपाचे आहे आणि त्यांना त्याज्य असलेल्या गोष्टी नाकारुन उर्वरीत बाबींसाठी हिंदू जिवनपद्धतीचा स्विकार करु शकतात का ? मार्कंडेय काटजू -ते कोण आहेत महत्वाचे नाही त्यांचा संदर्भ हाताशी असल्यामुळे उधृत केला- यांच्या मतानुसार भारतातील नऊ दर्शनशास्त्रा पैकी आठ दर्शनशास्त्रे नास्तीक आहेत. एकाने दुसर्‍यास नास्तीक ठरवण्याच्या न्यायाने नववे दर्शनात सुद्धा इतरांच्या नजरेतून काहीना काही नास्तीकता असू शकेल का हा विचार तुर्तास बाजूला ठेऊ.

हिंदू जिवन पद्धती/संस्कृती कोणत्या गोष्टीत विश्वास ठेवावा याचे बरेच स्वातंत्र्य देते, एका मतानुसार भारतीय-हिंदू आस्तीकता हेनोथेईझम एकैकापि देववाद आहे म्हणजे थोडक्यात मी मला ज्यात देव दिसतो त्याला मानतो बाकीच्यांनी कशात देव मानावा याचे ज्याला त्याला स्वातंत्र्य असेल. (हिंदू तत्वज्ञान, जिवनपद्धती आणि संस्कृतीत एकेश्वरवादी, अनेकेश्वरवादी, निरीश्वरवादी श्रद्धांना सुद्धा स्थान असावे). आम्ही केवळ आईलाच किंवा शक्तीलाच सर्वोच्चस्थान देणार्‍या तत्वज्ञानाचाही आदर करतो आणि पितृआज्ञा सर्वोच्च मानतो एकदा मातृदेवोभव पितृदेवोभव म्हटले आणि त्यांच्याच आद्न्या सर्वोच्च म्हटले त्यांच्यातच इश्वर पाहीला की प्रॅक्टीकली व्यक्तीबाह्य इश्वराचे स्थानकाय शिल्लक राहते ? गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु ... हा विश्वास गुरुत ठेवला की अल्टीमेट रिझल्ट काय असतो ? कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर मुलेतु गोविन्दा म्हटले की अल्टीमेट रिझल्ट काय असतो ? व्यक्तीबाह्य इश्वराचे स्थान काय आहे ?

विवेकानंदांचे एक वचन आहे

"As certain religions of the world say that a man who does not believe in a Personal God outside of himself is an atheist, so the Vedanta says, a man who does not believe in himself is an atheist. Not believing in the glory of our own soul is what the Vedanta calls atheism." संदर्भ

तुम्ही तुमच्या आयुष्याची इतिकर्तव्यता टाळू शकत नाही, पंढपूरच्या वारकर्‍यांसाठी इश्वर आहे पण त्या इश्वराचे खरे स्थान काय आहे ? कर्म आधी आहे - फळाची आशा न ठेवता - नंतर इश्वर आहे, इश्वर आणि इश्वराकडून फल प्राप्ती या सुद्धा जर आशा आहेत आणि एक निरीश्वरवादी अथवा नास्तीक फळांची आशा न ठेवता निहीत कर्तव्य करत असेल तर कुठे बिघडले ?

विवेकानंदांची आणखी वचने पहा

There is no real difference between the highest ecclesiastical giant who can talk by the volume, and the lowest, most ignorant materialist. We are all atheists; let us confess it. Mere intellectual assent does not make us religious.

The vast majority of men are atheists. I am glad that, in modern times, another class of atheists has come into existence in the Western world — I mean the materialists. They are sincere atheists. They are better than the religious atheists, who are insincere, who fight and talk about religion, and yet do not want it, never try to realise it, never try to understand it.

Religion can be realised. Are you ready? Do you want it? You will get the realisation if you do, and then you will be truly religious. Until you have attained realisation there is no difference between you and atheists. The atheists are sincere, but the man who says that he believes in religion and never attempts to realise it is not sincere.

विवेकानंदांची आणखीही वचने आहेत ती इथे आणि इथे आणि आंतरजालावर अजून इतर ठिकाणी मिळतील

आपण मुद्याच्या गोष्टीकडे वापस येऊ, विश्वास आणि श्रद्धा या दुकानात विकत घेऊन वाटता येतील अशा गोष्टी नाहीत, हिंदू विचारात लादून मिळवलेल्या -मनातून नसलेल्या- श्रद्धेला कितपत महत्व आहे ? नास्तीक व्यक्ती जो पर्यंत त्याची निहीत कर्तव्ये पार पाडते आहे समाजाच्या धारणेत व्यत्यय नाही तो पर्यंत त्यांना कमी लेखणारे तुम्ही आम्ही कोण ? -मान्य आहे की त्यांनीही इतरांना कमी लेखण्याचे कारण नसावे. नास्तीकातील एक मोठा वर्ग हा रॅशनलीस्ट असतो विवेकवादी असतो त्यांच्या विवेकाला पटत नाही तो पर्यंत एखादी गोष्ट ते स्विकारत नाहीत या बाबत ते प्रामाणिक असतात. अशा विवीध प्रकारच्या नास्तिकांना मनोविकृत ठरवण्याची घाई करणे खरेच गरजेचे आहे का ?

आता उर्वरीत हिंदू जिवन पद्धतीत नास्तीकांना काय करता येऊ शकते, त्यांच्या विश्वासेतर गोष्टीत ते हिंदू संस्कृतीत सहभागी राहू शकतात, त्यांचा सहभाग सुलभ रहाण्यासाठी त्यांनी आणि आस्तीकांनी धर्म आणि संस्कृती यांची गल्लत टाळली तर जिवन सुलभ होऊ शकते, भारतातील विवीध निरीश्वरवादी तत्वज्ञाने सुचवतात त्यापैकी एखादी किंवा अगदी स्वतःच्या नव्या स्वतंत्र जिवनपद्धतीचाही अवलंब करता येऊ शकेल. किमानपक्षी समाजाचेही काही ऋण असते त्यास उतराई नाही होता आले तरी किमान कृतघ्नपणा घडू नये अशी इतर समाज बांधवांची अपेक्षा असेल तर ती मात्र रास्त समजावयास हवी.

अर्थात विचारप्रणालींच्या विवीधतेस गुंफून ठेवण्यासाठी, एकात्मता राखण्यासाठी विवीध विचारप्रणालीच्या आस्तीकांनी अधिकतम लवचिकता दाखवावयास हवी की नको खास करुन इतर धर्मतत्वज्ञानांना नास्तीकांना सांभाळणे कठीण जात असेल आणि हिंदू तत्वज्ञानास ते अधिक सोपे असेल तर हिंदू तत्वज्ञानाने त्याची जमेची बाजू सांभाळून बेरजेचे धर्मकारण करावयाचे का वजाबाकीचे संकुचित धर्मकारण करावयाचे ? जर तुम्हाला बेरजेचे धर्मकारण करावयाचे असेल तर कुपमंडूकता बाजुस ठेऊन लवचिकता बाळहगून इतर विचारांशी सहमत झाले नाही तरी व्यक्तीगत टिका न करता हिंदू सम्स्कृतीतील त्यांचे स्थान मान्य करावयास नको काय?

प्रतिक्रिया

पॉइंट ब्लँक's picture

30 Mar 2016 - 2:51 pm | पॉइंट ब्लँक

अब आया उट पहाड के निचे. आधी विज्ञान विज्ञान करत धर्माचा द्वेष करायचा. आणि विज्ञानानं चपराक ( मिपावर फाट्यावार मारणे असं काही तरी म्ह्णतात) दिली मग "धर्मात स्थान" वगैरे गप्पा मारयाच्या.

नास्तीकांना मनोविकृत ठरवण्याची स्पर्धा लागल्याचे एका हिंदूधर्मावलंबी मिपाचर्चा धाग्यावर

डोक्याचं माहिती नाही पण डोळ्यात दोष नक्कीच आहे. एक स्पर्धा ह्या शब्दाला तीव्र आक्षेप. एका वैज्ञानिक जरनल मध्ये प्रसिद्ध झालेले शास्र्तोक्त अभ्यासाचे निष्कर्ष दिले आहेत. नास्तिकांच वि़ज्ञानावर प्रेम नाही हे तुम्ही परत एकदा सिद्ध केलतं. त्या धाग्यात हिंदू हा शब्द एकदाही आलेला नाही. तुम्हाला तसा भास होण्याचे कारण काय असावे बर? ;)

असो हिंदू धर्माची दोन सोपी तत्वे आहेत
१. दुसर्यांच्या मताचा आदर तोपर्यंत करा जोपर्यंत ते तुमच्या मताचा आदर करतात
२. धर्माच्या नावाने उगाचा कुणी शिमगा करत असेल तर त्याला बदडून ( हातापायी करायची गरज नाही. तर्कनिष्ट वाद करून ही बदडता येते) काढा.

बघा कुठं बसता येतयं का तुम्हाला ह्या दोन तत्वांच्यामध्ये. हुडका स्वतःच स्थान. उगाचा लोकांना प्रश्न विचारून तुम्हाला स्थान मिळणार नाही.

माहितगार's picture

30 Mar 2016 - 2:56 pm | माहितगार

आपल्या उत्तरातच उत्तर सामावलेले असावे.

प्रोब्लेम असा झालाय की तुम्ही तुमच्या धाग्यात नास्तिक, बुद्धीवादी आणि अज्ञेयवादी या तिघांनाही एकाच तागडीत तोललेय. त्यामुळे बर्‍याच लोकांच्या शेपटाव्र पाय पडलाय.

नास्तिक, अज्ञेयवादी आणि बुद्धीवादी या तीन वेगळ्या जाती आहेत. आणि तुम्ही जे निष्कर्ष मांडलेत ते मिथ्याबुद्धीवाद्यांना लागू होतात.. त्यामुळे प्रामाणिक लोक रागावणे साहजिक आहे. असो.

+१११११११११११ टू पॉईंट ब्लँक

शिंगणापूर ही एक फालतूगिरी आहे. या दुसर्‍या धाग्यावरील चर्चा प्रतिसादास उत्तरे देताना मी आस्तीकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी प्रतिवाद केलेला दिसेल.

तिथे मी खालील प्रमाणे उत्तर दिले आहे तेच बहुधा इथेही असेल.

एका असहिष्णुतेला दुसर्‍या असहिष्णुतेकडून असहीष्णु उत्तर येते तेव्हा एका चुकीने दुसर्‍या चुकीचे परिमार्जन होते असे नव्हे, पण दुसर्‍याबाजुच्या असहिष्णुते विरुद्ध तक्रार करण्याचा 'आपला' नैतीक अधिकार संपतो. मुख्य म्हणजे असहीष्णूतेने तर्क जिंकत नसतो तो हरत असण्याची शक्यता अधिक असते का हे कदाचित रिव्हीजीट करुन पहाणे गरजेचे असावे.

बाजार श्रद्धेचे असोत अथवा अश्रद्धेचे ते सहिष्णू असलेले चांगले पण असतातच असे नाही हे दुर्दैवाने वास्तव असावे. ज्यांना या बाजुने अथवा त्या बाजुने हाणामारीतच रस आहे त्यांचा विश्वास तत्वावर नव्हे हाणामारीवर आहे असे म्हणावे लागते हे खरे नाही का ?

lgodbole's picture

4 Apr 2016 - 6:21 pm | lgodbole

नास्तिक झाले तरी कडुलिंबाच्या काडीने दात घासता येतात. मोदक खाता येतात... दिवाळीची सुट्टी घेता येते.

चौकटराजा's picture

4 Apr 2016 - 7:25 pm | चौकटराजा

प्रथम मी नास्तिक आहे म्हणजे काय याची भूमिका स्प्ष्ट करतो.. नास्तिक म्हणजे कोणी विश्व हेतूपूर्वक चालवतो. तो त्रयस्थ असून त्याला निर्णय करण्याची मुभा॑ असून तो काहीतरीच्या बदल्यात विश्वातील एखाद्या घटकाची परिस्थीति बदलतो असे न मानणारा" . म्हणजेज काय मानणारा तर हे विश्व परस्परावलंबी व परस्परांवर परिंणाम घडवून आणणार्या घटकांचे बनले आहे .त्यातील सर्वच घटकांचे सामर्थ्य सारखे नाही तरीही आपल्या सामर्थ्याच्या परिघात सर्वच घट्क एकमेकाना काही तरी करीत असतात.

वरील आमच्या संकल्पना म्हण्जे आम्हाला विश्वाचे पूर्ण ज्ञान झाले असा दावा नाही पण सत्याच्या दिशेत पडलेले ते पहिले वहिले पाउल ही असू शकेल. आम्हाला अस्तिकांच्या कोणत्याही शिफारसीची गरज नाही व त्यांच्या आमच्या विषयीच्या असल्याचे तर कलुषित द्रुष्टीकोनाला आपण फाट्यावर मारतो.

अ-मॅन's picture

12 Apr 2016 - 9:37 am | अ-मॅन

आम्हाला अस्तिकांच्या कोणत्याही शिफारसीची गरज नाही असे म्हणने म्हणजे पोपने, "आमच्या सिध्दांताना विज्ञानाच्या समर्थनाची गरज नाही त्यांच्या आमच्या विषयीच्या असल्याचे तर कलुषित द्रुष्टीकोनाला आपण फाट्यावर मारतो" असे म्हणने होय. मग काय पोप नास्तिक झाला काय ? नास्तिकता अशी जर तर वर तुम्ही कशी काय अवलंबुन ठेवता ? हे तर निव्वळ स्वतःभोवतीचे आखलेले रिंगण झाले जे आस्तिक अंध्श्रध्दाळु देखील स्वतःभोवती आखतात मग तुमच्या अन त्यांच्या कृतीत फरक काय ते स्पश्ट कराल काय ?

अ-मॅन's picture

12 Apr 2016 - 9:43 am | अ-मॅन

माझा वरील प्रतिसाद सुलभ आकलन न होणे आपणास शक्य आहे, म्हणून सोप्या शब्दात बोलायचे तर ज्या क्षणी तुम्ही एखादी गोष्ट मानता पण ती तसेच असेलच याबद्दल ठामपणा व्यक्त करत नाही तेंवबनतोते निव्वळ धारणा वा श्रध्दा ठरते

उदा. तुमचे वरील मानणे सत्याच्या दिशेने पहिले पाउल असेल, आहेच असे न्हवे. म्हणून तौलनीक द्रुश्ट्या आपण व पोपनाण्यामाळेचे मणी ठरत आहात हे आपणास लक्षात आले काय ? परीणामी एकप्रकारे आपण स्वतःलाच फाट्यावर मारले आहे ही बाब ध्यानात घ्यावी.

पैसा's picture

12 Apr 2016 - 8:42 pm | पैसा

धर्माची व्याख्या 'धारयति इति धर्मः' कोणाच्या फार लक्षात नसते. विविध कर्मकांड म्हणजे बहुतांश परंपरेतून चालत आलेली संस्कृती, तिचे अनेक घटक असू शकतात. मात्र बहुसंख्य लोक संस्कृती आणि धर्म यात प्रचंड गल्लत करतात. हिंदु जीवनपद्धती खरे तर अतिशय सहिष्णु आहे. चार्वाकापासून मधुराभक्तीपर्यंत इथे सगळ्यांना आपापले स्थान आहे आणि वेगळे झालेल्या बौद्ध आणि जैन विचारांनाही मत म्हणून सामावून घेण्याची ताकद आहे. पण याचा फायदा करून घ्यावा या विचाराने फार कोणी वागताना दिसत नाही. "मला वाटते तोच देव आणि तोच धर्म" असे मानणारे हिंदु लोक हिंदु जीवनपद्धतीचे रक्षण करतात की नुकसान करतात याचा सगळ्यांनी विचार करणे आवश्यक आहे.

बाळ सप्रे's picture

13 Apr 2016 - 11:35 am | बाळ सप्रे

'धारयति इति धर्मः' किंवा हिंदु ही जीवनपद्धती आहे वगैरे व्याख्या फारच open to interpretation आहेत. सोयीस्कररीत्या तू असं म्ह्णतोस तर तू हिंदू, असं म्हणतोस तर हिंदूविरोधी वगैरे कशाही फिरवता येतात. म्हटलं तर सगळं जग हिंदू ठरतं (बाकी सगळे पंथ-- आठवतय ना?) .. जसं बर्‍याच गोष्टी नजरेआड करून "relegion of peace" म्हणता येतं तसच..

त्यामुळे कुठल्याही धर्माला अशा व्याख्या करून उगाच व्यापकता /उदात्तता देणे मला अजिबात पटत नाही.

रुढार्थाने प्रत्येकाच्या देवाच्या कल्पना आणी उपासना पद्धती हीच काय ती धर्माची खरी ओळख असते..

इथे नेमकी उलटी परिस्थिती आहे.

आत्मविश्वास कमी असणारी माणसं तो गरजेहून जितका कमी असतो तेवढा देवावर विश्वास जास्त ठेवतात.

ज्यांना देवावर विश्वास ठेवायचाय त्यांनी तो खुशाल ठेवावा. पण त्याला खुश करण्यासाठी इतरांना त्रास होईल असा काहीतरी अचाट गाढवपणा करायचा हे एक, त्याच देवावर विश्वास ठेवा म्हणून इतरांवर (यात कुटुंबीयही आले) बळजबरी करायची हे दुसरं, आणि देवाच्या नावाने इतरांना लुबाडून पैसे कमवायचे हे तिसरं अशा प्रमुख कारणांनी आस्तिकांसोबत समाजात गोडीगुलाबीने राहणं कठीण होऊन बसतं.

तर्राट जोकर's picture

13 Apr 2016 - 10:14 am | तर्राट जोकर

मनोविकारतज्ञांनी ठरवले तर मनुष्याची प्रत्येक भावना हा एक मनोविकार आहे असे सिद्ध करतील. ह्याविषयावरच पॉइंट ब्लँक ह्यांचा धागा येऊन गेलाय मिपावर.