पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!!

यशोधन वाळिंबे's picture
यशोधन वाळिंबे in जनातलं, मनातलं
29 Mar 2016 - 9:04 am

पुणे परिसरातील चित्रपट रसिकांसाठी महत्त्वाचे..!!

पुण्याच्या 'राष्ट्रीय फिल्म संग्रहालयातर्फे देशोदेशीचे उत्तम चित्रपट दाखवणारा फिल्म क्लब चालवला जातो. दर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता संग्रहालयाच्या प्रभात रोड येथील इमारतीमधील थिएटरमधे हे चित्रपट दाखवले जातात. या फिल्म क्लबची वार्षिक वर्गणी रु. १,५००/- आहे. हा खर्च आपल्या मल्टिप्लेक्स संस्कृतीत सुमारे तीन ते चार चित्रपट पाहण्याइतका आहे. यात वर्षभरात देशोदेशीचे निवडक असे किमान ५२ चित्रपट पाहता येतात. याशिवाय जानेवारीमधे पुण्यात होणार्‍या इंटरनॅशनल फेस्टिवलच्या पासाच्या किंमतीत सवलत मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध देशांच्या वकिलाती, सांस्कृतिक संस्थांतर्फे वेळोवेळी भरवल्या जाणार्‍या चित्रपट महोत्सवांची माहिती इमेलद्वारे घरबसल्या मिळते. हे महोत्सवही बहुधा विनामूल्य असल्याने आणखी चित्रपट पाहता येतात. इतकेच नव्हे तर उपयुक्त पुस्तकांनी भरलेल्या त्यांच्या ग्रंथालयालाही अ‍ॅक्सेस मिळतो.

 

NFAI

 गेली काही वर्षे या फिल्म क्लबची सदस्य संख्या सातत्याने घटते आहे. इतका चांगला उपक्रम पुरेशा सहभागाविना बंद होईल का अशी भीती उत्पन्न झाली आहे. (अधूनमधून त्याला पुष्टी मिळेल असे काही घडताना दिसते.)

तेव्हा पुणे परिसरातील सर्व चित्रपटप्रेमींना कळकळीची विनंती की या वर्षी चार बॉलिवूड चित्रपट पाहू नका, त्याऐवजी निदान एक वर्ष या फिल्म क्लबला येऊन पहा. आपल्या सर्व चित्रपटप्रेमी मित्रांनाही सदस्य होण्यासाठी उद्युक्त करा. नाहीच रुचले तर मग पुढच्या वर्षीपासून पुन्हा बाहुबली नि दबंग आहेतच.

सदस्यता घेण्यासाठी खालील लिंकवरून फॉर्म डाउनलोड करा. आवश्यक ती सर्व माहिती त्यात दिलेली आहे.

 http://www.nfaipune.gov.in/pdf/FCM%20Form%20Final.pdf 

 दरवर्षी मार्चमधे मी हे आवाहन करत असतो. चित्रपटांबद्दल बरेच बोलणारे अनेक लोक माझ्या आसपास मला दिसतात. तरीही गेल्या चार वर्षांत एकच नवा सदस्य नोंदवू शकलो हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

 सौजन्य : मंदार काळे

 (कृपया हा संदेश फेसबुक, Whats App आणी इतरही माध्यमांद्वारे पुढे पाठवा)

कलाशिफारस

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

29 Mar 2016 - 9:13 am | महासंग्राम

विद्यार्थ्यांसाठी काही सवलत असते का ???

Address : National Film Archive of India, P.O. Box No. - 810, Law College Road, Pune – 411 004

Telephone -91-20-25652259 | Fax - 91-20-25670027 | Email nfaipune[at]gmail[dot]com

चौकटराजा's picture

29 Mar 2016 - 9:43 am | चौकटराजा

वेगळा विषय म्हणजे उत्त्म चित्रपट असे मी मानत नाही. जो चित्रपट कोणत्याच प्रकारे मनोरंजन करीत नाही तो वाईट चित्रपट असे मी मानतो. प्रबोधन करणारा चित्रपट म्हण्जे उत्तम चित्रपट असेही मी मानत नाही.उत्तम तांत्रिक अंगे म्हन्जे चांगला चित्रपट असेही मी मानत नाही. मग चांगला चित्रपट म्हणजे काय ? तर काहीशी पटणारी वेधक कथा. ती रंगवणारी पात्रे, बर्‍यापैकी अभिनय करणारे नट , उत्तम ओघवती पटकथा व उत्तम पार्शवसंगीत या मौलांचा सुरेख मेळ म्हणजे उत्तम चित्रपट.

असे चित्रपट त्यात दाखविले जातात का ? माझ्या मते गन्स ऑफ नॅव्हरॉन हा चित्रपट उत्तम आहे." बेबी" हा उत्तम आहे .वेडनेस डे हा उत्तम आहे . जगाच्या पाठीवर उत्तम आहे. इत्तफाक हा उत्तम आहे. आनंद हा उत्तम आहे.

नाखु's picture

29 Mar 2016 - 10:16 am | नाखु

कधी एकदाचा संपेल असे वाटणे आणि त्यात हा नक्की आपण का पाहिला असे (विनाकारण ओशाळे,खंत वाटणे) ज्या सिनेमाबद्दल घडते तो सिनेमाच नाही. अगदी "भारतीय समाचार चित्रे" ही रोचक आणि माहीतीपुर्ण असत तरी त्यातली काही तद्दन रटाळ आणि वेळकाढू होती.

भारतीय समाचार चित्रांच्या निवेदनांचा(आवाजाचा) बेहद्द पंखा नाखु

रंगासेठ's picture

29 Mar 2016 - 5:26 pm | रंगासेठ

असेच म्हणतो.

बोका-ए-आझम's picture

29 Mar 2016 - 9:47 am | बोका-ए-आझम

Form file open होत नाहीये.

यशोधन वाळिंबे's picture

29 Mar 2016 - 2:18 pm | यशोधन वाळिंबे

ब्राउझर बदलून पहा किंवा cache क्लीन करून पहा..

सामान्य वाचक's picture

29 Mar 2016 - 10:11 am | सामान्य वाचक

दाखवलेल्या चित्रपटांची यादी कुठे मिळू शकेल का
त्यावरून अंदाज येईल आपल्याला हे आवडेल का याचा

उगा काहितरीच's picture

29 Mar 2016 - 11:49 am | उगा काहितरीच

हेच म्हणतो.

नाखु's picture

29 Mar 2016 - 2:11 pm | नाखु

मिळाली तर बरे होईल (विकतची डोक्याची मंडई ) करण्यासाठी का पुण्यात जाउन शीणेमा बघावा.
त्या पेक्षा मिपाचे (निवडक)काथ्याकुट काय वाईट आहे !

कॉलेजमध्ये असताना यासंबंधी NFAI मध्ये चौकशी करायला गेलो होतो. एक मध्यमवयीन बाईंनी फॉर्म वगैरे दिला. त्यांना पूर्वी दाखवलेल्या चित्रपटांसंबंधी विचारल्यावर त्यांनी एक सायक्लोस्टाईल यादी दिली. अमुक एक चित्रपट का निवडला हे मात्र त्या सांगू शकल्या नव्हत्या. एकंदर अनुभव युजरफ्रेंडली नव्हता.

मराठी कथालेखक's picture

29 Mar 2016 - 2:24 pm | मराठी कथालेखक

एकंदर अनुभव युजरफ्रेंडली नव्हता

असंच वाटतंय.. हेच बघाना १५०० रु च्या रकमेसाठी DD/Pay Order काढायला सांगत आहेत. (Online payment, cash payment, credit card ई काहीच पर्याय नाही)
थिएटरमध्ये बूट घालून जाण्यास परवानगी नाही !!
२० एप्रिल ते २० मार्च हा एक वर्ष कसा काय ?

असंका's picture

29 Mar 2016 - 3:16 pm | असंका

२० एप्रिल ते २० मार्च

=)) =))

(रच्याकने, फॉर्मवर एप्रिल २०__ ते मार्च २०__ असंय हो)

मराठी कथालेखक's picture

29 Mar 2016 - 2:15 pm | मराठी कथालेखक

English सोडून इतर भाषेतील चित्रपट असतील तर Sub titles असतात का ?

रंगासेठ's picture

29 Mar 2016 - 5:26 pm | रंगासेठ

सदस्यत्व घेण्यासाठी अजूनही फॉर्म भरून पाठवावा लागतोय. ऑनलाइन पेमेंटची सोय नाही. :-(
या संग्रहालयाची अशी अवस्था का झाली? अन्यथा पुण्यात चांगला प्रतिसाद मिळतो अशा उपक्रमांना.

मराठी कथालेखक's picture

29 Mar 2016 - 5:32 pm | मराठी कथालेखक

आजकाल जगभरातले अनेक उत्तम चित्रपट ऑनलाईन मिळतात (युट्युब, टोरंट्स) , असे असताना माहित नसलेल्या चित्रपटांसाठी कोण १५०० घालणार ?

-----
माझा नवीन धागा

कलंत्री's picture

30 Mar 2016 - 2:22 pm | कलंत्री

मी चित्रपट रसास्वाद असा कार्यक्रम पाहिलेला आहे. संस्था नावलौकिक प्राप्त असलेली आहे.

काही त्रुटी असतील तर त्या काळाच्या ओघात दुर होतीलच.

जमत असेल तर नक्की सभासद व्हा अशी विनंती.