बरेच वर्ष न्हाव्याकडे केस रंगवतांना एक प्रश्न छळत असे ....इतका रंग हे का लावतात ....
बारकाईने निरीक्षण करतांना एक लक्षात आले कि ते एक ठराविक इतका मुद्देमाल काहीही करून घेतातच ... तो एकावर एक थर असे चढवत जातातच ...उरला तर सावडून सावडून ब्रश वर घेऊन आधीचा रंगच रंगवतात (केस कधीचेच त्या थरांमध्ये लुप्त असतात)..
शेवटी घरीच एक प्रयोग करावा असे ठरवले :
- लोरीय्ल चे रंग, व्हॉल्यूम, अस्त्रीन्जंत, एक बाउल, आणि रबरी ग्लोव्हज असे घेतले.
- अंदाजे कमीत कमी क्वांटटी घेऊन मिसळले
-ग्लोव्हज घालून सरळ केसांना चोपडले ....हळू हळू मुळा पर्यंत जाऊन व्यवस्थित सगळीकडे तो लागला आहे असे पहिले आणि इतरत्र त्वचेला लागलेला रंग अस्त्रीन्जंत ने पुसून काढला ...
हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला .... तथापि अजून काय करता येईल ह्यावर विचार करतांना एक कल्पना सुचली ...
एक अतिशय बारीक कंगवा (किंवा फणी) घेऊन त्यावरच रंग चोपडून केस विंचरून काढले ...अक्षरश: ३- ४ मिनिटात रंगवून झाले आणि तेही अतिशय व्यव्स्थीत, सुटसुटीत आणि सलून पेक्षा जेमतेम १०-२० % रंग वापरून ...तितकेच टिकाऊ ...
अर्थात हे सगळे बेसिक रंगवणे इतपतच मर्यादित ठरावे ...ते हायलाईट वगैरे करता येईल किंवा कसे .... काय कल्पना नाय
प्रतिक्रिया
21 Mar 2016 - 4:49 pm | कंजूस
पेटंट घेणे.
लेख पटला.न्हावी लोक जरा जास्तीच करतात कारण इतर गिय ह्राइक बोंबलते कामापुरताच कमी रंग घेतला की.
21 Mar 2016 - 11:04 pm | सायकलस्वार
आम्राविकन लोकांनी तुमच्यापुढे जाउन कलरच्या ट्युबवरच कंगवा लावला.
इंडियात मिळतो.
http://www.amazon.in/JUST-Autostop-Hair-Color-Black/dp/B006ZR8VWG
21 Mar 2016 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजुन केस रंगवण्याचा अनुभव नाही, पण माझं निरिक्षण असंय की जेवढा वेळ लागेल या कामाला तितके त्याला पैसे ओढ़ता येतात. एक तर या सलून वाल्यांची एक गम्मत आहे, असे पैसे उपसत असतात की विचारू नका. साधी दाढी ३५ रूपये, स्पेशल दाढी ५० रूपये अरे भो क्रीमचा फरकाचे पैसे आमच्याकडूनच वसूल करतो का ? सालं मनात आले तितके पैसे मागतात. बाय द वे सलून वाल्यांची कायदेशीर तक्रार कुठे करता येईल ?
-दिलीप बिरुटे
21 Mar 2016 - 5:06 pm | तर्राट जोकर
मग काय तर. साधारणपणे शे-दिड्शे रंगवण्याचे घेतात. पण एकदा सो कॉल्ड उच्चभ्रू वस्तीतल्या एका टिनपाट सलून मधे केस रंगवण्याचे सहाशे रुपये घेतले. म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी दोन दोन कोटींना घरं घेतली त्याचा भुर्दंड मी द्यायचा. तेव्हापासून घरीच रंगवतो. तीस रुपयात दोन महिने घोर नाही.
21 Mar 2016 - 5:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सालं यांची दुकानं कुठे आहेत म्हणजे श्रीमंत वस्तीत, वर्दळीची मध्यवर्ती ठिकानं, रहदारी नसलेली ठिकानं, यावर यांचे दर अवलंबून असतात, बरं आपल्यालाही फर्नीचर चकचकीत असलेलं दूकान लागतं आणि पैसे देताना मग महाजीवावर येतं. म्हणजे इतरवेळी आपले पैसे नको तिथे खर्च होतात पण मला या अवाजवी पैसे मागणा-याची ज़रा जास्तच चिड येते.
माझा एक सलून वाला दोस्त आहे, दर शिमग्याला माझ्या शिव्या खातो. आहेच त्याचा दोन चार दिवसात योग. :)
-दिलीप बिरुटे
21 Mar 2016 - 5:30 pm | तर्राट जोकर
बिरुटेसर, फर्नीचर चकचकित असनार्या दुकानांमधे पैसे द्यायला जीवावर येते असे नाही. मुद्दा सर्विसचा आहे. मागे काही वर्षांआधी बायकोच्या वाढदिवसाला तिला बांद्र्याच्या एका उच्च्भ्रू सलोन मधे घेउन गेलो. वट्ट अडिच हजार रुपये बिल झालं. फक्त केस धुवुन, कट करुन सेटींग केलं. पण तिथली ट्रीटमेंट, कस्टमरसोबत वागण्याची रित, तो समग्र अनुभव बायकोसाठी अमुल्य होता. आता तेच कोणा एसी नस्लेल्या, सामान्य दर्जाच्या सलुनमधे, सामान्य कलाकौशल्य असलेल्या कामगाराने सामान्य कामगीरी केली वरुन जस्ट स्थळमाहात्म्य म्हणून पैसे घेतले तर वाईट वाटणारच. :(
पैसे द्यायला काही वाटत नाही, सेवेचे मूल्यपण पाहिजे तितके.
21 Mar 2016 - 6:40 pm | अनुप ढेरे
स्पेशल दाढी हा काय प्रकार असतो? पहिल्यांदाच ऐकला...
21 Mar 2016 - 7:01 pm | तर्राट जोकर
साबण लावून दाढी ते साधी. क्रिम लावुन दाढी ती स्पेशल दाढी.
21 Mar 2016 - 7:06 pm | होबासराव
नाय बा ! क्रिम लाउन साधि हजामत आन फ़ोम लाउन पेश्शल
21 Mar 2016 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेगवेगळया क्रीम ही साधी आणि फोम म्हणजे स्पेशल हे बरोबर. आता साबण लावून हजामत मला वाटतं इतिहास जमा झाली असेल. हं आता दररोजच्या दररोज घरी हात मारणा-याना क्रीम/फोम नसेल तर साबण पर्याय निवडला असेल तेवढेच.
-दिलीप बिरुटे
22 Mar 2016 - 10:05 am | अनुप ढेरे
धन्यवाद.
21 Mar 2016 - 5:03 pm | कविता१९७८
हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला .... तथापि अजून काय करता येईल ह्यावर विचार करतांना एक कल्पना सुचली ...
एक अतिशय बारीक कंगवा (किंवा फणी) घेऊन त्यावरच रंग चोपडून केस विंचरून काढले ...अक्षरश: ३- ४ मिनिटात रंगवून झाले आणि तेही अतिशय व्यव्स्थीत, सुटसुटीत आणि सलून पेक्षा जेमतेम १०-२० % रंग वापरून ...तितकेच टिकाऊ ...
बायकांचे केस असेच रंगवायची पद्धत मी लेडीज पार्लर मधे शिकले आहे. आरशासमोर बसुन केसांना मधुन भांग पाडुन घ्या, मग एका बाजुच्या भागाला कलर लावुन त्यावर कंगवा सरळ दिशेने फीरवा, त्यानंतर पुन्हा थोड्या बाजुला भांग पाडुन घ्या आणि आधीचीच कृती पुन्हा करा. या कृतीत भांग पाडण्याआधी स्प्रेने थोड्या पाण्याचा वापर केला तरी चालतो. असे करत करत पुढचे पुर्ण केस रंगवुन घ्या, पुरुषांचे मागचे केस हे बारीकच असतात त्यामुळे त्यांना मागुन भांग पाडायची गरज नसते पण समजा ते मोठे असतील तर मागच्या बाजुनेही केस स्प्रेने ओले करुन भांग पाडुन आधीप्रमाणेच कलर करुन त्यावर सरळ दिशेने कंगवा फीरवावा.
टीप - केस कलर करताना केसाच्या पुर्ण कडेला (पुढुन आणि मागुन्) कानाच्या बाजुला मागे कोल्ड क्रीमचा एक थर लावावा म्हणजे केसाव्यतिरिक्त स्किनचा भाग कलर होत नाही
21 Mar 2016 - 5:06 pm | अत्रन्गि पाउस
झकास हे आता अजूनच सुटसुटीत
21 Mar 2016 - 5:06 pm | जव्हेरगंज
21 Mar 2016 - 5:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
सो क्युट!!
21 Mar 2016 - 5:36 pm | निशांत_खाडे
सही...
एक जोक आठवला.
"जब कोई आदमी ६०० रुपये मे बाल काटता है, तो बाल उसके ५० रुपयेकेही कटते है, ५५० का चुतीयापा कट जाता है!"
21 Mar 2016 - 5:52 pm | तर्राट जोकर
अगदी अगदी.
माझेही दोन पैसे.
"जब कोई आदमी ५५६०० रुपये मे फोन खरिदता है, तो फोनके तो १००० रुपये ही होते ते है, ५४६०० चुतीयापा के नाम जाता है!"
"जब कोई आदमी १००० रुपये मे मुवीटिकीट खरिदता है, तो साराका सारा १००० चुतीयापा के नाम जाता है!"
21 Mar 2016 - 6:00 pm | निशांत_खाडे
मायला.. विनोदही करायचीही सोय राह्यली नाही. अवघअडय!
21 Mar 2016 - 6:04 pm | तर्राट जोकर
=)) =))
खाडे सर, मीही विनोदच केलाय. बर्याच जागा आहेत अशा की लोक चुतीयापाचे बील आनंदाने भरतात.
हमारी प्रतिमापर मत जाईये. सुरजकेभी सात रंग होते है. ;-)
21 Mar 2016 - 5:42 pm | दा विन्ची
नाभिकांची सेवा महाग वाटणाऱ्या सर्व महात्म्यांना एक प्रश्न. तुम्हाला केस रंगवावे असे मुळात का वाटते? एक वेळ स्त्रिया दिसण्याविषयी खूप चोखंदळ असतात, म्हणून त्यांचा हा सोस मान्य.
जैसा भगवानने बनाया वैसाच रहेनेका. हाकानाका
21 Mar 2016 - 5:51 pm | दा विन्ची
आणि जी गोष्ट आपल्या नजरेमागे होते, तेव्हा आपण बिनबोभाट पैसे देतो. उदा. जेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा रेदिओ होतो, तेव्हा बहुतेकदा फ़क़्त एक कंडेन्सर जो २-३ रुपयात मिळतो तो बदलला जातो. आणि पैसे मात्र किमान ३००. शिवाय हे काम जाणून बुजून कधीही गिऱ्हाइकासमोर केले जात नाही. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
21 Mar 2016 - 6:00 pm | तर्राट जोकर
दा विन्ची, ह्या दोन्ही ठिकाणी सारखेच पैसे दिले पाहिजेत. काय म्हंता?
21 Mar 2016 - 6:04 pm | कंजूस
वैयक्तिक सेवा महाग होत जाणारेत.
न्हावी लोक "तुमचे केस बरोबर नाहीत" हे वारंवार ऐकून ठरून टाकले यापुढे न्हाव्यापुढ मान तुकवायची नाही.
वीस वर्षं झाली.निश्चय मोडला नाही.
21 Mar 2016 - 6:08 pm | तर्राट जोकर
निश्चयाबद्दल अभिनंदन.
प्रश्न सेवांच्या महाग वा स्वस्त असण्याचा नाही. वाजवी दर हा आहे. ताजमधे जाऊन कोणी असे म्हणणार नाही अरे बाहेरच्या टपरीवर तर कटींग सहा रुपयाला, तुमच्या कडे का अडिचशे? पण ताजमधे अडिचशे आहे म्हणून बाहेरचा टपरीवालाही अडिचशे रुपये कटींग विकायला लागला तर...
21 Mar 2016 - 6:09 pm | निशांत_खाडे
आता हा 'केस रंगवण्या' विषयीचा धागा हायजाक होऊन 'कन्जुमेरीजम' ला वाचा फोडणार हे नक्की..
21 Mar 2016 - 6:18 pm | तर्राट जोकर
धागा कन्जुमेरीजमवरच आहे. केस रंगवने इज कन्जुमेरीजम ;-)
21 Mar 2016 - 6:53 pm | निशांत_खाडे
डॉमिनोज आणि केएफसी विषयी काय मत? ५० रुपयांना पाण्याची बाटली आणि तीही एका सेल्फ सर्विस रेस्टोरन्ट मध्ये, किती जस्टीफायीड आहे?
21 Mar 2016 - 7:00 pm | तर्राट जोकर
तेच तर तुमच्या पहिल्याच जोक मधे तुम्ही सांगितले ना? तेच मी दुसर्या दोन जोक मधे सांगितले. मलाच केफसीचा तिसरा टकायाचा होता पण टंकाळा केला.
वस्तु वा सेवेचे मुल्य (किंमत नाही) टँजिबल व इन्टँजिबल अॅसेट्सवर ठरते. मर्सिडीज आणि नॅनोत किंमती कशा जस्टीफाय होतात हे तुम्हाला ठावूक असेल.
21 Mar 2016 - 7:04 pm | निशांत_खाडे
वरून रेस्टोरंन्टमध्ये मोफत पिण्याचे पाणी कुठेही ठेवलेले नसते, शासकीय नियमांनुसार मागितल्यावर मिळेलही पण बऱ्याच जणांना हे माहिती नसते आणि जरी माहित झाले तरी त्या जागेच्या 'vibe' मुळे मागायची लाज वाटते. हा सरळ सरळ अडवणूक करून पैसे उकळण्याचा प्रकार नाही का?
मी तर कुठल्याही उच्चभ्रू हाटेलात गेल्यावर पाणी विकत न घेण्याचा निश्चय केलाय.
21 Mar 2016 - 9:22 pm | टवाळ कार्टा
"हूटर्स" बद्दल काय मत आहे मग ;)
21 Mar 2016 - 10:06 pm | निशांत_खाडे
हुटर्स? हे काय आहे? कधी ऐकले नाही.
21 Mar 2016 - 11:41 pm | ट्रेड मार्क
कोणत्या शहरात आणि कुठे आहे?
मुंबई पुण्यात हूटर्स आणि त्यातल्या ललना हे चित्र डोळ्यासमोर चित्र उभं करणं अवघड जातंय ;)
22 Mar 2016 - 8:46 am | क्रेझी
म्हणजे?? तुम्ही गेल्या वीस वर्षात केस कापलेच नाहीत का?? की घरी स्वतः कापता?
21 Mar 2016 - 6:06 pm | दा विन्ची
तजो सर, तुमचा मुद्दा मला अगदी पटलाय. तुम्हीच म्हटल्याप्रमाणे दर्जेदार सेवा प्राप्त होत असेल तर पैसा देणे वाईट नाही वाटत. पण बऱ्याच ठिकाणी, "का रे भुललासी वरलिया रंगा" असाही अनुभव येवू शकतो.
21 Mar 2016 - 6:14 pm | तर्राट जोकर
धन्यवाद. 'का रे भुललासी' हे तर प्रत्येक बाबतीत होऊ शकते. माझ्याबाबतीत उलटेच झाले. स्वस्त सम्जून गेलो, महाग निघाले ;-) :(
पण केस कापणे वारंवार करायला लागायची गोष्ट आहे. एकदा फसल्यावर परत चानस घेत नाही आपण. सुरुवातीला मुंबईत मला नीट केस कापणारा मिळत नव्हता तेव्हा दोन दिवसाचा प्रवास करुन गावी जाउन नेहमीच्या न्हाव्याकडनं केस कापून घ्यायचो. आता त्या न्हाव्याला मिळनार तीस रुपये मला खर्च जाऊन येऊन एक हजार. हां तेवढीच गावाला भेट घडायची म्हणा. ;-)
21 Mar 2016 - 6:26 pm | जेपी
पुरुष केस रंगवतात साधारण पांढरे दिसायलेल्यावर.
एकदा केस रंगवले ती रंग जात नाही.उगवणारे केस पांढरे असतात.
ते कमी प्रमाणात रंग वापरुन पुन्हा रंगवता येतात, पुर्ण केस रंगवायची गरज नसे.
21 Mar 2016 - 6:28 pm | जेपी
वरील प्रतिसाद माझे वैयक्तीक मत आहे..
(कुमारवयीन पांढरकेशी) जेपी ;)
21 Mar 2016 - 7:02 pm | दा विन्ची
(कुमारवयीन पांढरकेशी) -- हे लई म्हंजे लैच आवडल बगा
21 Mar 2016 - 8:03 pm | विद्यार्थी
एक अनुभव म्हणून सांगतो. उघडलेला रंगाचा दाबा जर अर्धवट वापरून उरलेला पुढच्यावेळी वापरण्यासाठी ठेवला तर पुढच्यावेळी रंग नीट चढत नाही. रंग बनवणाऱ्या कंपन्या असा चालूपणा करतात.
बिचारे नाभिकपण काय करणार? रंग नीट लागला नाही म्हणून गिऱ्हाईक परत येण्यापेक्षा चोपडून टाकतात सगळा. अशीही पुरुषांच्या केसांची लांबी ती किती असणार, बोटभर नाहीतर वीतभर :-P
21 Mar 2016 - 9:29 pm | खटपट्या
केस कापायचे पैसे अवाजवी आहेतच. आम्रविकेत केस कापायचे १५ ते २० डॉलर घेतात. यावर उपाय म्हणून काही कंजूष लोक घरी केस कापायची मशीन आणून गवत कापल्यासारखे केस कापतात. केस कापल्यावर खूपच विचित्र वाटतो माणूस, कारण कीतीही झाले तरी स्वत:च्या हाताने कीतीशे व्यवस्थीत कापणार केस.
असो. ज्याचा त्याचा डॉलर...
21 Mar 2016 - 10:03 pm | कंजूस
अबजेक्शन."काही कंजूष लोक घरी केस कापायची मशीन आणून गवत कापल्यासारखे केस कापतात"--
कात्रीनेच करतो कुणाच्या मदती शिवाय.अजून रंगवायचा अनुभव नाही परंतू लेखकास आमची सहानुभुती देण्यासाठी लिहिलंय.
महागड्या आस्थापनाच्या फीचा तीस चाळीस टक्के भाग आंडूपांडू आजुबाजूला येऊ नये म्हणूनही असतो.
22 Mar 2016 - 9:16 am | खटपट्या
नाय वो तुमाला नाय बोललो.
21 Mar 2016 - 10:20 pm | एस
कलप लावण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे मी एक सुखी प्राणी आहे. :-)
22 Mar 2016 - 12:16 am | ट्रेड मार्क
पूर्ण पांढरे नाही पण राखाडी (ग्रे) रंगाचे केस असणे ही पण एक फ्याशन आहे. मला एकदा एका केशकर्तन करणारीने विचारलं होतं की मी केस रंगवतो का खरंच ग्रे केस आहेत. मी खरा रंग आहे सांगितल्यावर म्हणाली की नशीबवान आहेस, इथे लोक्स जास्त पैसे देऊन असा रंग मुद्दाम लावून घेतात.
जरा संशोधन केल्यावर असे कळले की कार्यालयीन कामकाजात ग्रे केस असण्याचा फायदा होतो. बाकीच्यांना (उगाच) वाटते की एवढे केस पांढरे झालेत म्हणजे याचे जरा ऐकायला पाहिजे. दुसरा कुठला उपयोग माहित नाही ;)
22 Mar 2016 - 12:52 am | रेवती
केस रंगवण्यासाठी फक्त काळाच रंग वापरल्याबद्दल अभिनंदन!
मला रंगीत केस आवडत नाहीत. मी नव्हेच पण दुसर्या कोणी रंगवलेलेही आवडत नाहीत. तसं जाऊन त्या डोक्यांना सांगत मात्र नाही. उगीच मार कोण खाणार? एका महिलेचे नाव कामसंदर्भात वाचले. काही कारणाने नकळत भारी इंप्रेषन मनात निर्माण झाले. प्रत्यक्षात तिला पाहिल्यावर जे दिसले ते असे.
अगदी बारीक हेयरकट केला होता. मुंजीत मुलांचा घेरा ठेवतात तेवढेच केस जास्त ठेवले होते (बाकीचे बारीक) व ते ब्राईट लाल गुलाबी रंगवले होते. जास्वंदीचा लुक यावा म्हणून डोक्याच्या भोवर्यामधून एक शेंडी, (म्हणजे गुलाबी केसांमधून) घेर्यातून वाढवली होती. पानांसाठी हिरवा रंग एका बाजूला होता का हे पाहण्याचे सुचले नाही. तसे पाहणे बरेही दिसले नसते. उगाच "काय गं बये, काय हवय? सारखी का निरखून बघतेस?" असं म्हणायला नको तिने.
माझी आई पहिल्यांदा हामेरिकेत आली तेंव्हा एका आफ्रिकन अमेरिकन महिलेने सगळ्या केसांच्या लहान लहान वेण्या घातलेल्या, त्याला मणी लावलेले पहिल्यांदाच पाहिले. त्या बाईने सूचक लुक देऊन झाला पण आईसाहेब आपल्या तिच्या वेण्यांकडे पाहतायत. शेवटी तिने राग लपवत "हाय!" म्हटल्यावर ही भानावर आली. बरं आपलं काय चाललय ते राहू देत, ही तिलाच नावं ठेवायला लागली. "कसा काय बुवा यांना इतक्या वेण्या घालायला वेळ मिळतो? बाकीची काही कामे असतात की नाही?" वगैरे.
एका मुलीने केस केशरी रंगवले होते. कपडेही केशरीच घातले होते. आता ही तो रंग जाईपर्यंत रोज त्याच रंगाचे कपडे घालेल का असा प्रश्न पडला.
22 Mar 2016 - 7:12 am | कविता१९७८
रेवतीताई या प्रकाराला हायलाईटीन्ग म्हणतात, थोडेसे केस किन्वा ५०% केस उठुन दिसतील या प्रकारात रन्गवणे.
बाकी ईथे फक्त एकाच कलरने रन्गवण्याबद्दल चर्चेविषयी एक टीप : कधीही काळी शेड वापरु नये कारण कलर केल्यावर केस प्रमाणापेक्षा जास्त काळे दिसतात जे वयाला शोभुन दिसत नाहीत त्या जागी डार्क ब्राउन शेड वापरावी.