शेतकर्या साठी सरकारने तरी करावे असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. माझ्या डोक्यांत हा प्लान होता आणि ह्यावर समुदायाचे काय म्हणणे आहे जे जाणून घेण्यास मला उत्स्तुकता आहे. (सदर काथ्याकुट असंसदीय भाषेंत सागायचे झाले तर मेंटल mast****tion असून प्रत्यक्षांत यायची शक्यता शून्य आहे)
१. जे लोक स्वताला शेतकरी समजतात आणि ज्यांची जमीन आहे त्यांनी स्वतःला "राज्य त्रस्त शेतकरी डेटाबेस" मध्ये नोंदून घ्यावे. जमिनीची मालकी आणि मागील १० वर्षांतील अंदाजे उत्पन्न (निव्वळ नफा किंवा नुकसान) सांगावे आणि शेतजमिनीची एकूण किमंत सांगावी. हि नोंदणी स्वखुशीने करावी. फक्त त्रस्त आणि गरीब शेतकर्या साठीच हि योजना असल्याने कमाल नफा ला एक सिलिंग ठेवावे. कुठल्याही पुराव्याची वगैरे गरज नाही. वाट्टेल तो नफा नुकसान किंवा जमिनीची किमत सांगितली तरी चालेल.
२. ह्या नंतर दर वर्षी ह्या डेटाबेस मधील काही शेतकर्यांना खालील ऑफर द्यावी
- शेतकर्याने जो वार्षिक नफा दाखवला आहे इतकी रक्कम सरकार त्याला दर महा भागून देयील (adjusted to inflation) आणि किमान ५ वर्षं जमीन सरकारी त्याब्यात राहील. पावूस इत्यादी गोष्टीची चिंता करायची गरज नाही. ५ वर्षांनी जर शेतकऱ्याला जमीन परत हवी असेल तर ती त्याला परत भेटेल. ह्यामुळे शेतकऱ्याला हे मासिक उत्पन्न दाखवून लोन वगैरे घेता येयील. त्या शिवाय आपला वेळ इतर काही काम करून शेतकरी आणखीन पैसे कमवू शकेल. समजा शेतकऱ्याला ५ वर्षांनी तीच ऑफर पुढे चालवायची असेल तर ते सुद्धा शक्य आहे. शेतकरी मेला तर वारसा हक्काने ती रक्कम त्याच्या बायका मुलांना भेटेल.
- अथवा शेतकर्याने आपल्या शेतजमिनीची एकूण किमत जी आधी सांगितली आहे त्याच्या १० पट रक्कम किंवा जास्त सरकार तत्काळ देवून जमीन विकत घेवू शकेल. सरकारने असे करायचे ठरवले तर तो निर्णय शेतकऱ्यावर बाध्य असेल. (एका प्रकारचे अधिग्रहण)
३. वर सांगितल्या प्रमाणे ऑफर फक्त काहीच शेतकरी बंधूना भेटेल. त्या साठी खालील criteria वापरले जातील.
- सर्व त्रस्त शेतकऱ्यांची नावे आधी त्यांच्या नफ्याच्या ascending order मध्ये टाकली जातील.
- त्यानंतर सरकार उपलब्ध निधी नुसार सर्वांत वर असलेली X नावे निवडून त्यांना हि ऑफर देयील.
- ज्या शेतकऱ्यांचा नफा ० पेक्षां कमी आहे त्यांना एक ठराविक रक्कमेची ऑफर देण्यात येयील किंवा त्या शेतकर्यांनी आपल्याला अपेक्षित रकमेची मागणी केल्यास सुद्धा चालेल. दोन्ही रकमे पैकी कमी वाली रक्कम त्यांना दर महा देण्यात येयील आणि त्यांनी अपेक्षित रक्कम जितकी कमी तितका त्यांचा नंबर वर.
- काही शेतकरी ज्यांना शिक्षण आहे त्यांना सरकरी नोकरीचे आरक्षण सुद्धा देण्यात येयील. रकमेच्या बदल्यांत जर त्यांना सरकारी नोकरी पाहिजे असेल (क वर्ग) तर त्यांचा नंबर आणखीन वर लागेल.
४. ह्या साठी जो फंड लागेल त्याचसाठी सरकार "मुख्यमंत्री शेतकरी मदत फंड" उभारेल. नाना पाटेकर वगैरे मंडळी किंवा आमच्या सारखे लोग जे फावल्या वेळांत शेतकर्याची तरफदारी करतात ते सुद्धा लोक ह्या फंड ला पैसे देवू शकतील.
पण जमीन सरकारी ताब्यांत येतंच सरकार त्याचा दरवर्षी (highest bidder first) लिलाव करेल. म्हणजे कोणी चतुर शेतकरी आधुनीक पद्धत वापरून वगैरे फायदेशीर पद्धतीने शेती करू इच्छितो तर त्याला हि नुकसानदायी शेती घेवून आणखीन पैसा कमवायला संधी आहे. एखादी रिलायन्स सारखी कंपनी सुद्धा मोठी जमीन भाडे तत्वावर घेवू इच्छिते तर ते सुद्धा चांगले आहे.
५. हा फंड दरवर्षी जितका वाढेल तितक्या अधिक त्रस्त शेतकर्यांना मदत होईल. त्या शिवाय अधिकाधिक जमीन फायदेशीर शेती करत असल्याने शेतीचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
६. लिलावांत गेलेल्या जमिनीवर शेतीच केले पाहिजे असे नाही. समजा ह्या वर मॉल बांधले गेले तर ५ वर्षांनी त्या मॉल सकट शेतजमीन शेतकर्याची होईल. अर्थांत ५ वर्षांच्या जमिनीवर करोडो खर्च करून कुणी मॉल बांधणार नाही हे खरे आहे पण कुणी कॅपिटल investment केली तर शेतकऱ्याचा फायदाच आहे.
समजा कुणी तरी त्या जमिनीवर मॉल बांधायचे ठरवेलच तर ती पार्टी सरकार द्वारे १० पट रक्कम देवून शेतजमीन विकत घेवू शकेल. सध्या मोठे बिल्डर लोक सरकारशी संगनमत करून क्षुल्लक भावाने जमिनीचे अधिग्रहण करवतात. ह्याला आळा बसेल.
७. सर्व रकम दर वर्षी inflation adjust केल्या जातील.
काही फायदे:
१. एखाद्या वर्षी दुष्काळ आला तर अनेक शेतकरी तोट्यांत जातील आणि अनेक श्रीमंत लोक future investment म्हणून आपला खिसा हलका करून कमी किमतीत शेत जमिनी घेतील. ह्यामुळे त्रस्त शेतकरी माणसाला गरजेच्या वेळी पैश्यांची मदत होईल.
२. समजा रिलायन्स ने मोठी जमीन घेतली आणि आपला धाक दाखवून सिंचार योजना वगैरे सरकार कडून करवून घेतली तर पाच वर्षांनी शेतकर्याची शेतजमीन जास्त उत्पन्न देण्याची शक्यता आहे. अश्या वेळी शेतकरी जमीन परत घेवून स्वतः शेती करू शकतो.
३. अनेक शेतकरी दर महा उत्पन्न घेवून आपल्याच शेतांत इतर लोकासाठी नोकरी करू शकतात.
४. "मुख्यमंत्री शेतकरी फंड" मध्ये किती पैसा आहे ह्यावरून राज्यांतील शेतीची परिस्थती काय आहे हे तत्काळ समजेल.
५. सध्या अनेक चांगले शेतकरी उगंच स्वतःला गरीब दाखवून सरकारी योजनाची मलई खातात आणि गरीब शेतकर्यांना त्या लाभा पासून वंचित करतात. उपरोल्लेखित डेटाबेस मध्ये आपले उत्पन्न फार कमी दाखवणे किंवा आपले उत्पन्न फार जास्त दाखवणे ह्या दोन्ही मुळे नुकसान होते आणि आहे तेच उत्पन्न दाखवल्यामुळे सर्वांत अधिक फायदा होतो.
६. सदर योजनेने शेतकऱ्यांचे हक्क न मारता अतिशय उद्योगी लोक आणि कंपन्यांना शेती व्यवसायांत आणायला मदत होयील.
७. शेती शिवाय इतर काही उद्योग धंदे करण्याची शेतकर्यांना सवय होयील आणि शिक्षणाचे महत्व सुद्धा कळेल.
८. विधवा, स्त्री शेतकरी, अतिशय वृद्ध आणि निराधार शेतकरी ह्यांना वरील लिस्ट मध्ये प्राथमिकता दिली जावू शकते.
९. जी जमीन वापरात नाही अशी जमीन लोक सरकारकडे तत्काळ भाडे तत्वाने सुपूर्द करतील आणि म्हणून त्यातून आणखीन शेत मालाचे निर्माण होयील.
प्रतिक्रिया
19 Mar 2016 - 11:53 am | दा विन्ची
थोडा वेगळा विचार आहे. पण तूर्तास अभ्यास नाही. सविस्तर प्रतिसाद तज्ञांचे मत ऐकल्यावर देईन.
19 Mar 2016 - 1:49 pm | अत्रुप्त आत्मा
मी दहा विंचू कोड यांचेशी सहमत आहे!
19 Mar 2016 - 12:15 pm | प्राची अश्विनी
प्रथम दर्शनी चांगला प्लॅन वाटतो. पण असे अनेक चांगले प्लॅनस् अंमलात आणताना प्रत्येक पायरीवर जो भ्रष्टाचार होतो तिथे मूळ समस्या आहे.
19 Mar 2016 - 1:30 pm | तर्राट जोकर
ते गांजा पिणारे तुम्हीच का?
19 Mar 2016 - 3:21 pm | आनन्दा
याचा संदर्भ लागला नाही...
बाकी - योजना आवडली, म्हणजे प्रथमदर्शनी चांगली वाटते.. विचार करावयास हरकत नसावी. एखादी एनजीओ टाका की -
19 Mar 2016 - 3:45 pm | तर्राट जोकर
वास्तवाचे काहीही ज्ञान नसतांना केलेले मुक्त कल्पनारंजन ज्या अवस्थेत प्रकटते त्या अवस्थेचा गांजाशी निकटचा संबंध आहे. एनजीओ आवश्यक आहे पण व्यसनमुक्तीसाठी. ;-)
19 Mar 2016 - 3:49 pm | अभ्या..
मला वाटले बीएसनेलचा कृषि प्लान अपडेट झाला काय? ;)
चांगलाय त्यो प्लान फक्त कव्हरेज नसते. ;)
19 Mar 2016 - 4:14 pm | मार्मिक गोडसे
तुम्ही सोडून बाकी कोणालाही ही योजना समजण्याची शक्यता शून्य आहे.
ह्या योजनेमुळे शेतकर्यांच्या आत्महत्या कमी होतील की नाही हे सांगता येत नाही, परंतू मुख्यमंत्र्यांच्या नक्कीच वाढतील.
21 Mar 2016 - 12:36 pm | मराठी कथालेखक
[तुम्ही हतबल शेतकर्यांबद्दल विचार करत आहात या बद्दल अभिनंदन. विचारमंथन केल्यानेच अधिकाधिक पर्याय समोर येतील. त्यामुळे तुम्ही नाउमेद होवू नका.पण विचारमंथनाची हस्त****शी तुलना अयोग्य वाटली. असो.]
अगदीच दुष्काळी भागातली जमीन दुसरा कुणी लवकर विकत/भाड्याने घ्यावयास पुढे येईल हे कठीण वाटते.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही चतुर , प्रयोगशील शेतकर्यांना अगदी तोट्यातली शेतजमीन (वा शेती म्हणू) विकत घेवून नफ्यात आणणं खरंच शक्य असेल तर असे शेतकरी अशा योजनेश्वाय आताही ते करु शकतात. म्हणजे आताही पश्चिम महाराष्ट्रातील एखादा श्रीमंत शेतकरी विदर्भ /मराठवाड्यातील आत्महत्येच्या उंबरठ्यावर असणार्या शेतकर्याकडून जमीन विकत घेवू शकतोच ना...तीच गोष्ट रिलायन्ससारख्या कंपनीबाबतही. अशी खरेदी -विक्री वा भाडेतत्वावर वापर ई सरकारच्या सहभागाशिवायही होवु शकते मग सरकारने निधी का वापरावा ?
झालेच तर प्रयोगशील शेतकरी वा रिलायन्स सारखी कंपनी आली म्हणून सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील अस नाही. मुळात प्रश्न नेमके काय आहेत हेच आपल्याला माहित नाही. (निदान शहरातच जन्मलेल्या/वाढलेल्या आणि शेती प्रत्यक्ष असा कोणताही संबंध नसलेल्या मला तरी नक्कीच माहित नाही. वृत्तपत्र/मासिके यातील लेख वाचून मी 'अभ्यास' केलाय असं नक्कीच म्हणणार नाही)
नाना पाटेकर यांच्याबद्दल मी नकारात्मक काही बोलत नाही , पण अशी अर्थिक मदत करण्यापेक्षा (वा करण्याबरोबरच) त्यांनी दुष्काळी भागात काही एकर शेती स्वतः खरेदी केली, तिथले प्रश्न सोडवून ती नफ्यात चालवली, आजूबाजूच्या शेतकर्यांनाही त्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत केली तर जास्त चांगले होईल असे वाटते.
21 Mar 2016 - 1:10 pm | गरिब चिमणा
अश्याच पद्धतीची योजन १९३० सालापासून चालू आहे,काही साखर कारखान्यांनी शेतकर्यांना त्यांची अतिरीक्त जमीन लीज वर द्यायला सांगितली ,शेतकर्यांनी ती दिली ,महाराष्ट्रात तब्बल ३००००० एकर जमिन वेगवेगळ्या कारखाण्यांनी लीजवर घेऊन तिथे उसशेती सुरु करुन प्रचंड नफा कमावला व शेतकर्याच्या हातात फक्त चार कवड्या टिकवल्या ,१९६० साली शेतकर्यांनी जमीनि परत मागायला सुरवात केल्यावर यशवंतराव चव्हाणाने काडी केली,व महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची स्थापणा करुन या जमीनी सरकारकडे वर्ग केल्या ,यात शेतकर्यांना विश्वासात घेतले गेले नाही ,स्थापणनंतर लगेचच भ्रष्टाचारामुळे हे महामंडळ तोटयात गेले व शेतकर्यांना मिळणारा खंड बंद पडला.खंडकरी शेतकर्यांनी कोर्टात धाव घेतली,काही जमीनी ७२ साली परत केल्या पण आंशिक पद्धतीने, लगेच चोर सरकारने लँड सिलिंग ॲक्ट करुन २ लाख एकर जागा दाबली व बाकीची २०११ ला परत केली,यात अनेक शेतकर्यांच्या जमीनी गेल्या व हातात तुकडे पडले .आम्ची ४० एकर पैकी फक्त १४ एकर मिळाली
आताही सरकारने लँड सिलिंग ॲक्ट खाली ढापलेली दोन लाख एकर जागा राजकारण्यांच्या ताब्यात आहे ,असल्या योजनांमुळे सरकारला शेतकर्याण्ना थुका लावायची आयतीच संधी मिळत असल्याने आता पुन्हा सरकारच्या ताब्यात कुणी शेतकरी जमीन देणार नाहि ,त्यांमुले तुमचा प्लान फक्त कागदावरच् योग्य राहील ,प्रत्यक्षात तो अस्तित्वात येणार नाहि.
21 Mar 2016 - 1:19 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रथमच स्पष्ट सांगतो की मला शेतीविषयी फक्त वाचुन ऐकुन शहरी माणसाला जितकी माहिती असेल तेव्ह्ढीच आहे. त्यामुळे माझे मत बरोबरच असेल असे नाही.
शेती हा आपण बिझिनेस मानत नाही त्यामुळे व शेतकरी करपात्र नसल्याने बँका त्यांना कर्ज देत नाहीत त्यातुन सावकारी फोफावते आणि मग पुढे नापिकी,कर्जाचा विळखा आणि त्यातुन आत्महत्या वगैरे चक्र सुरु होते.
परदेशात काही कंपन्या कॉर्पोरेट शेतीचा पर्याय देतात ज्यात कंपन्या शेतकर्याशी करार करतात.त्या कंपनीकडुनच बियाणे,खते वगैरे पुरवले जाते आणि त्यांच्या निकषानुसार शेतकरी आपल्या जमिनीत पीक लागवड करुन येणारे उत्पादन त्याच कंपनीला विकतात. कंपनीच्या डेपोत पीक पोचवले की तिथेच शेतकर्यांना त्यांचे चेक दिले जातात.
आता या पद्धतीत कंपनीची मोनोपॉली, त्यांना हवे तेच पीक घेणे बंधनकारक, संकरीत बियाणे जे पुढील वर्षी लागवडीसाठी ठेवता येणार नाही वगैरे वादाचे मुद्देही आहेतच पण समजा एखाद्या शेतकर्याची २ एकर जमीन आहे त्यातील अर्ध्या भागात त्याने करारावर शेती केली आणि अर्धी आपल्या मर्जीने तर निदान पुर्ण नुकसान होणार नाही असे वाटते.
बाकी तज्ञ मंडळी काय म्हणतात बघुया.
21 Mar 2016 - 1:39 pm | तर्राट जोकर
संकटात असणारे शेतकरी हे अल्पभूधारक व कोरडवाहू जमीनी असणारे आहेत. बागायती व भरपूर शेती असलेल्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. दहा एकरापेक्षा कमी शेती असणारांकडून अर्धी शेती घेणे कंपनीला फायदेशीर ठरनार नाही. एकॉनॉमिज ऑफ स्केल.
21 Mar 2016 - 1:45 pm | Ram ram
मी संपूर्ण पणे गरीब चिं च्या बाजूने आहे,सरकार म्हणजे आमदार लाेकं, ही सर्व माेठमोठी धेंडं असून यांच्या शेकडाे एकर जमीनी आहेत, यांना जनतेची काही पडलेली नसते. कसाबने खरेतर यांनाच खतम करायला पाहीजे होते.
21 Mar 2016 - 4:06 pm | कपिलमुनी
शेतकरी ही जमात या देशातून नष्ट होउन सर्वत्र उद्योग धंदे उभारल्याशिवाय तरणोपाय नाही
21 Mar 2016 - 4:10 pm | अभ्या..
हा. शेतीउद्योगात छान करीयर होते आणि शेतीचा धंदा सर्वात फायदेशीर असे लोक म्हणायला लागेपर्यंत आपल्याला तरणोपाय नाही.
21 Mar 2016 - 4:18 pm | तर्राट जोकर
उद्योगधंदे नाही. मॉल, मॉल. कोणत्याही मोठ्या शहरापासून किमान शंभर किमी दूर असलेल्या, विज पाण्याची कोणतीही सोय नसलेल्या भागात १०० परसेंट एफडीआय वर वॉलमार्ट ला मॉल टाकण्यासाठी आमंत्रण दिले पाहिजे. ;-)
21 Mar 2016 - 4:13 pm | होबासराव
"राज्य त्रस्त शेतकरी डेटाबेस" मध्ये नोंदून घ्यावे. जमिनीची मालकी आणि मागील १० वर्षांतील अंदाजे उत्पन्न (निव्वळ नफा किंवा नुकसान) सांगावे आणि शेतजमिनीची एकूण किमंत सांगावी.
बाकि पुढिल काळजि घ्यायला वाट लावायला नेते आणि गुंठा मंत्रि समर्थ आहेत. त्यामुळे तुमचा प्लॅन पुढे वाचवला नाहि क्षमस्व.
21 Mar 2016 - 6:48 pm | आनन्दा
हेच्च म्हण्तो.
21 Mar 2016 - 5:13 pm | नाखु
एका टोकावर शहरी अर्थात अंतिम ग्राहक ( हो तोच तो शहरी अकृषक) ज्याच बजेट कोलमडू शकतं महागाई वाढली की आणि त्यात मजूरापासून मॅनेजरपर्यंत सगळे येतात
आणी
दुसर्या टोकावर शेतकरी अर्थात स्वतः शेत कसणारा आणि बागायती १० एकरचे खाली आणि जिरायती ३० एकरचे खाली असलेला अस्सल शेतकरी (कागदोपत्री नाही)
ते हात एक्मेकांपर्यत पोहचू नयेत याकरीता नेतेमंडळी /राजकारणी/नोकरशहा आणि गब्बर शेतकरी कटीबद्ध आहेत आणि आपण अजाणतेपणे त्यांना साथ देतोय ये वरील दोघांनाही "लक्ष्यात" घ्यायचेच नाही.
वास्तव या दोन्हींच्या मध्ये आहे आणि त्याचा पूल कुणी बांधायचा हीच ग्यानबाची मेख आहे.
शेतकरी नसलेला पण शेतकरी नेत्यांच्या अप्प्लपोटेपणा आणि टाळूवरचे लो०णी खाण्याचे प्रकार जवळून पाहिलेला शहरी भुस्काट नाखु