देशाच्या पंतप्रधान, खासदार, सार्वजनिक पदांसाठी नागरीकत्वाच्या अटीची गरज असते का?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
15 Mar 2016 - 8:53 am
गाभा: 

नेहमी सारखे लेख शीर्षक लांब झाले आहे त्याबद्दल क्षमस्व, निमीत्त राहुल गांधींच्या दस्तएवजांमधील तथाकथित गफलत. काँग्रेस भक्त आणि काँग्रेस विरोधक दोघेही हात सरसावून परस्पर विरोधी प्रतिसाद लिहिण्यास घेतील त्या पुर्वीच हे स्प्ष्ट केली बरे की कायद्याच्या दृष्टीकोणातून दुवा कच्चा असावा राहुल गांधींवर शेकावे असे मोठे काही यात नसावे. ज्यांना काहीच माहित नाही त्यांच्यासाठी लोकसभेच्या नैतीकता समिती (एथीक्स कमिटी- लालकृष्ण अडवाणी या समितीचे अध्यक्ष आहेत) ने राहुल गांधींच्या दुहेरी नागरीकत्वाच्या शक्यते विषयी त्यांच्या कडून स्पष्टीकरण मागितले आहे. (संदर्भ)

इस्वीसन २००३ च्या सुमारास मा. राहुल गांधी यांनी Backops नावाची सॉफ्टवेअर कंपनी पार्टनरशीप मध्ये इंग्लंडात चालू केली होती - होती हा भूतकाळच त्यांनी ती भागीदारी नंतर बहुधा बहिणीकडे प्रियांकाकडे सुपूर्त केली आणि नंतर कदाचित ती कंपनी बंद सुद्धा झाली नेमके माहित नाही- सुब्रमण्यम स्वामींनी सादर केलेले दस्तएवज बरोबर असतीलतर (दस्तएवज बरोबर नसते तर राहुल आणि काँग्रेसने लगोलग खोडले असते तसे अद्याप झालेले नाही) - या Backops कंपनीच्या दस्तएवजांवर राहुल गांधींचे नागरीकत्व की राष्ट्रीयत्व पैकी एक ब्रिटीश दाखवले गेले. म्हणजे राहुल गांधींकडे दुहेरी नागरीकत्व आहे का ? अशी हाकाटी पिटणार्‍यांची सोय झाली. राहुल गांधींचा दावा हे नजरचुकीने झाले असा असेल तर त्यात यासाठी तथ्य असू शकते की ब्रिटनचे नागरीकत्व पि हळद आणि हो गोरी असे मिळावे असे सहज नाही. दस्तएवज काँप्युटरवर कॉपीपेस्ट मारताना बारकाव्यांकडे बर्‍याचदा लक्ष जात नाही नजरचुक होऊ शकते अगदी मान्य - हे समजून घेतले तरीही या संबंधाने एक वेगळा प्रश्न.

Backops कंपनीचा पार्टनर आमेरीकन आहे त्याच्या कडून चुक होऊ शकते असेही कुणाला वाटू शकेल पण त्याचे आमेरीकन असणे ही माध्यमांनी दिलेली अर्धीच ओळख झाली, (आंजावरील माहिती बरोबर असेल तर) तो आमेरीकन गोव्यातील ज्येष्ठ काँग्रेसी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एदुआर्दो फालेरो यांचा जावई आहे आणि एदुआर्दो फालेरो यांची मुलगी राहुलजी वयात सात वर्षांचे अंतर असले तरी दिल्लीच्या एकाच महाविद्यालयातून काही काळ गेलेले म्हणजे किमानपक्षी एदुआर्दो फालेरो यांच्या मुलीला आणि जावयाला राहुल भारतीय नागरीक आहे हे माहित नसण्याचे कारण नसावे. म्हणजे ही शक्यता बाजूला पडते.

आता जी गोष्ट नजरचुकीने झाली आहे प्रत्यक्षात दुसर्‍या देशाचे नागरीकत्व घेतलेच नाही तर दुहेरी नागरीकत्व घेतले असे होत नाही. आणि समजा राहुलजी किंवा इतर कुणी २००३ मध्ये ब्रिटनचा नागरीक असेल पण त्यानंतर पाच वर्षे भारतात राहीला तरीही भारताचे नागरीकत्व पुन्हाही मिळवू शकतो.

हा दुवा एवढा कच्चा असताना हा चर्चा धागा का काढला ? जेव्हा देशप्रेमाची गरज नाही, राष्ट्रीय एकात्मतेची गरज नाही, भारताचे वेगवेगळे भाग भारतात असण्याची गरज नाही, देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय ऐक्याचा सन्मान हे फक्त संघ आणि भाजपाचे थोतांड आहे असे कम्युनीस्ट आणि काँग्रेसी समर्थकांना जर वाटत असेल आणि देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय ऐक्याचा सन्मान या गोष्टी लागणारच नसतील तर देशाच्या पंतप्रधान, खासदार, सार्वजनिक पदांसाठी नागरीकत्वाच्या अटीची गरज असते का ? याचा उलट्या दिशेनी शोध घ्यावा असा या धागा चर्चेचा उद्देश आहे. अ‍ॅनी बेझंट आणि विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदीता भारतीय नव्हत्या तरीही भारताच्या एकते बाबत भारतप्रेमा बाबत त्यांचा हात भारतीयही धरु शकले नसते त्या भारताच्या नागरीक नसतानाही भारताच्या पंतप्रधान झाल्या असत्या तर चालल्या नसत्या का ? भारताचे कितीतरी गव्हर्नर जनरल अभारतीय होते, बाबर अभारतीय होता, गझनिचा महमुद, घोरी, अलेक्झांडर आणि त्याचे नंतरचे पित्ते कितीतरी अभारतीय लोकांनी भारत चालवून दाखवलेला आहे; त्या शिवाय जग जवळ येत चाललेले आहे लोकांच्या आमेरीकेसारख्या देशाचे नागरीकत्व मिळवण्याच्या आकांक्षा असतात, आपल्या मिपावरही काहीजण आमेरीकेचे नागरीक असतील अथवा लवकर पात्रता मिळवू शकतील तेव्हा त्यांनी आमेरीकेचे अथवा दुबईचे नागरीकत्व घेतले म्हणून भारतातले नागरीकत्व काढून घेणे अथवा देवयानी खोब्रागडे यांचे पती आमेरीकन नागरीक आहेत म्हणून त्यांना परराष्ट्र सेवेत कामावर आक्षेप घेणे बरोबर आहे का ? या नागरीकत्वाच्या अटींमुळेच नजरचुक चुकीने झाली असे म्हणण्याची कुणावर पाळीच का यावी ? किंवा अगदी इंदर कुमार गुजराल भारतात जन्म न होता ही भारताचे पंतप्रधान म्हणून चालू शकतात तर सोनीया गांधींचा जन्माने इटालियन असल्याने काय बिघडते ?

मी काँग्रेसी कम्युनीस्टांशी या विषयावर सहमत नसलो तरीही मनाचा खुलेपणा ठेऊन प्रत्येक विचाराची शहानिशा करावी आणि खरेच देशाच्या पंतप्रधान, खासदार, सार्वजनिक पदांसाठी नागरीकत्वाच्या अटीची गरज आहे का याची मिपाकरांसमवेत खात्री करून घ्यावी, नागरीकत्वाच्या मुद्याच्या अवघड बाजूंची चर्चा व्हावी हा या धागा चर्चेचा उद्देश.

अवांतर: मी सुद्धा नजरचुका करतो हे माझ्या अशुद्धलेखनावरुन सर्वांनी कैकवेळा पाहीले असेल म्हणून मी काय चांगला पंतप्रधान होऊ शकणार नाही का? किंवा उलटपक्षी नजरचुका करणार्‍या व्यक्ति पंतप्रधानपदाच्या अधिक चांगल्या दावेदार असू शकतील का ?

चर्चेत सहभागासाठी आभार

संदर्भ आणि अधिक वाचन
* राहुल गांधी (इंग्रजी विकिपीडिया लेख)
* मागील व्यावसायिक भागीदार ? उलरीक मॅकनाईट १ उलरीक मॅकनाईट २ या दुव्यांवरील माहिती बाबत दुजोरा असल्या शिवाय खात्रीशीर सांगणे कठीण

* सोनिया एदुआर्दो फलेरो - विवाह पूर्व नाव (इंग्रजी विकिपीडिया लेख) विवाहोत्तर सोनिया उलरीक मॅकनाईट ?
* एदुआर्दो फलेरो (इंग्रजी विकिपीडिया लेख) हे केंद्रात मंत्रि आधी झाले का मुलीचे नाव सोनीया आधी ठेवले गोव्याच्या लोकांसाठी हा अभ्यासाचा विषय असल्यास हि सोनीया फलेरोंची मुलाखत दुवा .
* सुब्रमण्यम स्वामींचे दावे या सुब्रमण्यम स्वामींच्या दाव्यांमध्ये प्रसिद्धी लोलूपता, अतीरंजन विरोधाभासी एवढे असते की दारी पण यांना कोणी गंभिरपणे घेत नाही आणि कदाचित त्यांच्या घरीही. सुब्रमण्यम स्वामी कितीही हिंदुत्ववाद्यांसोबत राहीले तरी त्यांचे स्वतःचे कुटूंब आंतरजातीय आंतरधर्मीय सर्वप्रकारच्या वैवाहिक नात्यांनी संपन्न आहे.

* Multiple_citizenship#Citizenship_of_multiple_countries (इंग्रजी विकिपीडिया दुवा)
* British_nationality_law(इंग्रजी विकिपीडिया दुवा)
* Citizenship (इंग्रजी विकिपीडिया दुवा)