क्रिकेटच्या २० षटकांच्या सामन्यांची ६ वी विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे. स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, अफगाणिस्तान
गट २) भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश किंवा ओमान (बहुतेक बांगलादेश पात्र ठरेल असे वाटते)
गट २ हा गट १ च्या तुलनेत जास्त चुरशीचा वाटतो.
२००७ मध्ये प्रथमच या स्पर्धेला सुरूवात झाली. त्या स्पर्धेत अनपेक्षितपणे भारत विजेता ठरला. आतापर्यंत खालील देश विजेते व उपविजेते ठरले आहेत.
१) २००७ - भारत विजेता, पाकिस्तान उपविजेता
२) २००९- पाकिस्तान विजेता, श्रीलंका उपविजेता
३) २०१० - इंग्लंड विजेता, ऑस्ट्रेलिया उपविजेता
४) २०१२ - वेस्ट इंडिज विजेता, श्रीलंक उपविजेता
५) २०१४ - श्रीलंका विजेता, भारत उपविजेता
६) २०१४ - ?
आतापर्यंत श्रीलंकेने १ विजेतेपद व २ वेळा उपविजेतेपद मिळविले आहे. भारत व पाकिस्तान या दोघांनीही एकदा विजेतेपद व एकदा उपविजेतेपद मिळविले आहे. परंतु या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी भारताच्या तुलनेत जास्त चांगली आहे कारण पहिल्या ४ स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचला होता, तर भारत आजतगायत फक्त दोन वेळा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आश्चर्य म्हणजे ५ वेळा एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळविणार्या ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा आजवर एकदाही जिंकता आलेली नाही. तसेच एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेप्रमाणे दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांना आजवर कधीही अंतिम फेरीत प्रवेश मिळालेला नाही, मग विजेतेपद लांबच राहिले (एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत २०१५ मध्ये न्यूझीलंड प्रथमच अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु तिथे त्यांचा पराभव झाला).
एकंदरीत या स्पर्धेवर आजतगायत भारत, श्रीलंका व पाकिस्तान या आशियायी संघांचेच वर्चस्व राहिलेले दिसते. तसेच प्रत्येक वेळी नवीन संघ विजेता होताना दिसतो, त्यामुळे आजतगायत कोणत्याही संघाला २ वेळा विजेतेपद जिंकता आलेले नाही.
एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान ६ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ६ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले. ट-२० सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतही भारत व पाकिस्तान ३ वेळा एकमेकांविरूद्ध खेळले आहेत व सर्व ३ वेळा भारताने पाकिस्तानला हरविले आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत भारताने न्यूझीलंडला एकदाही पराभूत केलेले नाही.
यावेळी श्रीलंकेचा संघ अगदीच नवखा आहे. पाकिस्तानचा संघ फारसा चांगला नाही व त्यांचे क्षेत्ररक्षण अत्यंत वाईट आहे. वेस्ट इंडिज संघात अनेक तगडे खेळाडू असले तरी एकत्रित संघ असे ते खेळताना फारसे दिसत नाहीत. न्यूझीलंडकडे देखील तगडे खेळाडू असले तरी त्यांची गोलंदाजी फारशी चांगली नाही व विजिगीषू वृत्तीचा अभाव दिसतो. इंग्लंडकडे ट-२० प्रकारातले फारसे नावाजलेले खेळाडू नाहीत. याउलट दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया या ३ संघांकडे कसलेले खेळाडू आहेत.
माझ्या अंदाजानुसार यावेळी दक्षिण आफ्रिका, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यापैकीच एखादा विजेता असेल.
स्पर्धेचे वेळापत्रक असे आहे.
१) मंगळवार १५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. न्यूझीलंड
२) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, पाकिस्तान वि. बांगलादेश/ओमान
३) बुधवार १६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. वेस्ट इंडिज
४) गुरूवार १७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, अफगाणिस्तान वि. श्रीलंका
५) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड
६) शुक्रवार १८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. द. आफ्रिका
७) शनिवार १९ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. पाकिस्तान
८) रविवार २० मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. आफ्रिका
९) रविवार २० मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, श्रीलंका वि. वेस्ट इंडिज
१०) सोमवार २१ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश/ओमान
११) मंगळवार २२ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, न्यूझीलंड वि. पाकिस्तान
१२) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. इंग्लंड
१३) बुधवार २३ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. बांगलादेश/ओमान
१४) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान
१५) शुक्रवार २५ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज
१६) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, न्यूझीलंड वि. बांगलादेश/ओमान
१७) शनिवार २६ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, इंग्लंड वि. श्रीलंका
१८) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ३:०० वाजता, अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडिज
१९) रविवार २७ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, भारत वि. ऑस्ट्रेलिया
२०) सोमवार २८ मार्च, संध्याकाळी ७:३० वाजता, दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका
______________________________________________________________________
२१) बुधवार ३० मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, पहिला उपांत्य फेरीचा सामना
२२) गुरूवार ३१ मार्च, संध्याकाळी ७:०० वाजता, दुसरा उपांत्य फेरीचा सामना
______________________________________________________________________
२३) रविवार ३ एप्रिल, संध्याकाळी ७:०० वाजता, अंतिम फेरीचा सामना
______________________________________________________________________
प्रतिक्रिया
31 Mar 2016 - 10:09 pm | जव्हेरगंज
गेली तिच्या मारी !
31 Mar 2016 - 10:13 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
चला चला मित्रांनो गाशा गुंडाळा:-D
गुड नाईट!!!
तटस्थ मनाने इंजाॅय करा! लई मारत्यात
31 Mar 2016 - 10:20 pm | दिग्विजय भोसले
च्यामारी पोपट झाला कि!!
मोठमोठी लोकं वानखेडेवर आली आहेत अन् सगळीगडेच निराशा(टेंशन आलेली स्मायली)
31 Mar 2016 - 10:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१२ चेंडू आणि २० धावा लागतात. आता इथून जिंकणे शक्य नाही
31 Mar 2016 - 10:28 pm | जव्हेरगंज
भेंडी
31 Mar 2016 - 10:33 pm | दिग्विजय भोसले
ऐसा क्या गुनाह किया जो लूट गए
1 Apr 2016 - 11:42 am | पक्षी
खिक्क...
31 Mar 2016 - 10:35 pm | viraj thale
नी मॅच घालवली
31 Mar 2016 - 10:35 pm | उगा काहितरीच
हारले रे हारले... बिस्कीट पारले... :-( :'( :'(
31 Mar 2016 - 10:36 pm | जव्हेरगंज
चला गवारी, पडवळ, दुध्या ...
बाजार उठला..
31 Mar 2016 - 10:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विकेटा नै काढता आल्या साल्यांना. इतका चांगला स्कोर होता खरं तर दोनशेच्या पुढे जायला हवे होते. विंडीजच्या ऐन वेळी दोन विकेटा घेतल्या ते नो बॉल निघाले. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. झोपा आता शांत. उद्याचं क्रिकेटचं दैनिकामधील पान वाचनार नाही. च्यायला, खेळ म्हणून एन्जॉय करता आला नाही. ख्रिस गेल गेला तेव्हा वाट्लं म्याच लीलया जिंकलो. चार्ल्स आणि सीमेन्स ने सर्व गोलन्दाज धु धु धुतले. आज धोनी कर्णधार म्हणून कोणतेच नवे डावपेच दिसले नाहीत हतबल कर्णधार आज दिसला.
जाऊ द्या झोपा आता. मला खूप शिव्या द्याव्या वाटताहेत पण आवरतो. :(
-दिलीप बिरुटे
(प्रचंड चिडलेला)
31 Mar 2016 - 10:57 pm | प्रचेतस
विंडीज खेळाडूंचे फटके पाहून मजा आली. भारत हरत असतानाही खऱ्या अर्थाने आज खेळ एन्जॉय केला.
ब्राव्हो विंडीज. इंग्रजांना मात्र हरवाच.
31 Mar 2016 - 10:58 pm | दिग्विजय भोसले
जस्ट चिल... ,चालायचचं
खर तर बांग्लादेशबरोबर हरता हरता जिंकलो तिथेच आपण बाहेर पडलो असतो,कारण ऑसीला हरवूनसुद्धा ते रनरेटवर सेमीफायनला गेले असते.
आता इंग्लंड फायनल जिंकू नये असे वाटते.
31 Mar 2016 - 11:15 pm | मार्मिक गोडसे
तरी बरं झेल पकडल्यावरच नो बॉल लक्षात यायचा , नाहीतर मॅदच वे.इं.ने १५ओव्हर्स धध्यचसंपवली असती
1 Apr 2016 - 12:01 am | नन्द्या
अरारा, वाईट झाले!
असो. निदान श्रीगुरुजी यांची एक काळजी दूर झाली.(आपण अंतिम फेरीत आलो तर इंग्लंड आपल्याला नक्कीच जड जाईल.) आता ती काळजी वेस्ट इंडीजला. आपण सुखाने झोपू.
1 Apr 2016 - 12:09 am | भाऊंचे भाऊ
काहीही असो मैच विंडीज जिंकला नाही तर भारत हरला.
1 Apr 2016 - 3:00 pm | श्रीगुरुजी
हरल्याचे दु:ख झाले, पण विंडीजबरोबर हरलो म्हणून फारसे वाईट वाटलेले नाही. जर ऑस्ट्रेलिया, पाकडे, बांगला किंवा इंग्लंड विरूद्ध हरलो असतो तर खूप वाईट वाटले असते. एका चांगल्या संघाबरोबर चांगला सामना झाला. न्यूझीलंड वि. ईंग्लंड असा अगदीच एकतर्फी सामना झाला नाही. १९२ ही चांगली धावसंख्या होती, पण ती जिंकण्यासाठी पुरेशी ठरली नाही.
(१) धोनी नाणेफेक हरला व प्रथम फलंदाजी करावी लागली तिथेच सामन्याचा निर्णय स्पष्ट झाला होता. याच खेळपट्टीवर विंडीजने इंग्लंडच्या १८३ धावांचा व इंग्लंडने आफ्रिकेच्या २२९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. अशा पाटा खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणारा संघच जिंकणार होता आणि विंडीजला ती संधी मिळाली. त्यात भर म्हणून विंडीजकडे अत्यंत तगडे फलंदाज होते. त्यामुळे पाठलाग करणे खूप सोपे होते. सॅमी, ब्राव्हो, ब्रेथवेट, रामदीन इ. फलंदाजांवर खेळण्याची वेळच आली नाही. वरच्या फलंदाजांनीच काम केले.
(२) नशीब भारताच्या विरूद्ध होते. सामनावीर सिमन्स तब्बल ३ वेळा बाद होऊन नशीबाने वाचला. दोन वेळा नोबॉल व एकदा झेल घेताना सीमारेषेला पाय लागल्याने तो सुदैवी ठरला. तसा कोहलीही दोन वेळा धावबाद होताहोता वाचला होता.
(३) नेहरा व बुमराहला लवकर संपविणे भारताला महागात गेले. त्यामुळे शेवटची २ षटके जडेजा व कोहली या कामचलाऊ गोलंदाजांना टाकावी लागली. ही दोन षटके नेहरा व बुमराहने टाकली असती तर थोडासा फरक दिसला असता. १८ वे षटक अश्विन, १९ वे बुमराह व २० वे नेहराने टाकायला हवे होते.
(४) अश्विनला फक्त २ षटकेच दिली व त्यात त्याने २० धावा दिल्या. जडेजाला मात्र पूर्ण ४ षटके दिली गेली ज्यात त्याने ४८ धावा दिल्या. जडेजाची षटके कमी करून अश्विनला अजून १-२ षटके द्यायला हवी होती.
एकंदरीत विंडीजने उत्तम खेळ केल्याने ते जिंकले. भारत वाईट खेळला असे म्हणता येणार नाही.
आता रविवारी इंग्लंड वि. विंडीज हा अंतिम सामना आहे. कलकत्त्याची खेळपट्टी गोलंदाजांना बर्यापैकी साथ देते. त्यामुळे इंग्लंडचे पारडे जड वाटते.
ट-२० विश्वचषक स्पर्धा यजमान देश जिंकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
1 Apr 2016 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नशीब भारताच्या विरूद्ध होते. एवढाच मुद्दा पटला.
आणि प्लस असं की कर्णधाराला निर्णय घेता आले नाहीत. सिमन्स आणि चार्ल्स पुढे हतबल झाला. ऑन साइडला फटके मारतोय डीप मीडॉन एकच. कशा धावा आवरतील.
दुसरं असं की जर विंडिजने १९२ केले असते तरी ते आपल्याला चेस करता आले असते ? मला वाटत नाही.
एक विराट सोडला तर कोणी धावा करु शकेल असे वाटलं नाही.
अजिंक्य राहणेला घेणं एक जुगार होता. अजिंक्य मोठे फटके मारु शकत नाही. सिंगल डबल अशा धावा घेतो. काल फटकेबाजी आवश्यक होती त्याच्याबरोबर आपला स्कोर तिथे कमी झाला असं माझं मत आहे. कदाचित कमी चेंडूत जास्त धावा आवश्यक होत्या. दोनशेचा टप्पा पार करायलाच हवा होता.
बाकी ज्योतिशाचार्य नंदकिशोर यांचा पत्ता कोणाला मिळाला तर कळवा. मला विचारायचं की, काय रे बाबा आमच्या कर्णधाराच्या आणि खेळाडुंच्या लग्नस्थानात , लग्नेश राशी स्वामीत, आणि चंद्र यांच्या मार्गात सिमेन्स आणि चार्ल्स ग्रहाशिवाय कोण कोण आडवं येणार ते का नाय सांगितलं ? जरा अभ्यास वाढवा म्हणावं. :)
-दिलीप बिरुटे
1 Apr 2016 - 8:53 pm | श्रीगुरुजी
अजिंक्य रहाणेबद्दल सहमत नाही. आधीच्या सर्व सामन्यात आपले पहिले ३ फलंदाज लवकर बाद व्हायचे (धवन, रोहीत व रैना) व नंतर कोहलीला साथ द्यायला युवराज, धोनी वगैरेंना नांगर टाकून खेळायला लागायचे. रहाणेने एक बाजू धरून ठेवल्यामुळे कोहलीला मुक्त खेळता आले.
विंडीजने १९२ केल्या असत्या तर आपण त्या नक्कीच चेस केल्या असत्या. दुसरी फलंदाजी करताना चेंडू ओला असल्याने फारसा स्विंग किंवा स्पिन होत नाही. त्याचा फलंदाजांना फायदा होतो. याच मैदानावर काही दिवसांपूर्वी १८३ व २२९ अशा मोठ्या धावसंख्यांचा यशस्वी पाठलाग झाला होता. याच मैदानावर २०११ मध्ये भारताने श्रीलंकेच्या २७४ धावांच्या यशस्वी पाठलाग केला होता. यावेळीही ते शक्य झाले असते. दोन्ही संघांची गोलंदाजी कमकुवत आहे. फलंदाजी तगडी आहे. त्यामुळे पाठलाग करणारा संघ जिंकणार हे नक्की होते.
ते ज्योतिषी सोडून द्या. फक्त व्यक्तींचे भविष्य सांगता येऊ शकते. देश, सामने, शेअर बाजार, निवडणुक इ. चे भविष्य हमखास चुकते.
माझ्याकडे १९८९ च्या भाग्यसंकेत मासिकाचा दिवाळी अंक आहे. त्यात भट (म. दा. भट किंवा व. दा. भट हे आठवत नाही) यांचे सविस्तर भविष्यकथन आहे. त्यांनी त्यातील लेखात असा दावा केला होता की १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस २७०-२८५ जागा मिळवून नाट्यमयरित्या सत्तेवर येईल. प्रत्यक्षात त्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त १९३ जागा मिळवून सत्ता गमवावी लागली होती व वि. प्र. सिंग पंतप्रधान झाले होते.
एकंदरीत असली भविष्ये वाचून विसरून जायची असतात.
2 Apr 2016 - 3:52 pm | असंका
सहमत...! रोहित शर्मानंतर कुणी सिक्स मारतंय की नाही असं वाटायला लागलेलं. तरी म्हणे अगदी लहान मैदान होतं.
2 Apr 2016 - 5:22 pm | DEADPOOL
मस्त!
दुकान बंद करा म्हणा आता!
2 Apr 2016 - 5:25 pm | DEADPOOL
आणि हा प्रतिसाद जकातदार यांना उद्देशून होता!
3 Apr 2016 - 7:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विंडीज वि. इग्लंड. सामना सुरु झालाय. आज आपल्याला काय घेणं नाय कोण जिंकेल आणि कोण हरेल. आज आपण तटस्थ इंजॉय करणार. दुसर्याच चेंडुवर गडी बाद करुन विंडीजने हवा केली आहे. बघु या काय काय होतं ते.
मी जो चांगला खेळेल त्याच्या बाजून. विषय संपला. :)
-दिलीप बिरुटे
3 Apr 2016 - 7:23 pm | असंका
+1
3 Apr 2016 - 7:27 pm | जव्हेरगंज
वेस्ट इंडीज जिंकणार...!!!
नावातच इंडिज असल्याचा आनंद आहे!!!
इंग्लंडने नांगी टाकल्याचं दिसतंय.
34/3 6.2 over
3 Apr 2016 - 8:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज ऑस्ट्रेलिया आणि विंडीज सामन्यात विंडीज महिला जिंकल्या, अंडर नाइटीन पोरं जिंकली. आता ही विंडीज टीमही जिंकेल असे वाटते. विंडीज मध्ये क्रिकेट वर लक्ष देऊ लागलं की काय त्यांचं सरकार ?
माझा आवडता खेळाडू पोलार्ड पाहिजे होता संघात !
3 Apr 2016 - 10:44 pm | जव्हेरगंज
शेवटची ओव्हर म्हणजे 'आ बैल मुझे मार' छापाची टाकली राव इंग्लंडनं!!
glad to see WI wins...!!!
3 Apr 2016 - 11:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चार चेंडूत चार षटकार जरा जास्तच झालं. :(
-दिलीप बिरुटे
4 Apr 2016 - 2:05 pm | श्रीगुरुजी
विंडीज १५ षटकात ४ बाद १०४ होते. पण १६ व्या षटकात विलीने रसेल आणि सॅमीला बाद करून सामना परत बरोबरीत आणला. शेवटच्या २ षटकात २७ धावा हव्या होत्या. जॉर्डनच्या १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चैकार बसल्याने ११ चेंडूत २३ धावा असे समीकरण झाले. नंतरच्या ४ चेंडूत ४ धावाच निघाल्या. शेवटच्या चेंडूवर सॅम्युअल्सला धाव घेता न आल्याने पुढच्या षटकासाठी स्ट्राईक मिळाला नाही व समीकरण ६ चेंडूत १९ धावा इतके अवघड झाले. अशा प्रसंगी फक्त अचूक गोलंदाजी करण्याची गरज होती. इंग्लंडने सामना जवळपास खेचला होता. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू स्टोक्सने मूर्खासारखा फुलपीच ब्रेथवाईटच्या पायावर टाकला आणि पायावर आलेला चेंडू त्याने सरळ स्टेडियममध्ये भिरकावला. दुसरा चेंडूही पहिल्याचीच कॉपी होती. त्यावरही षटकार बसला. आता ४ चेंडूत ७ धावा इतके सोपे समीकरण झाले. तिसरा चेंडू मधल्या यष्टीवर होता. पण तो इतका योग्य टप्प्यावर आला की त्याही चेंडूवर सहज षटकार बसला. चौथा चेंडू पहिल्याचीच कॉपी होता. त्यावरही षटकार बसला आणि सामना संपला. स्टोक्सच्या अत्यंत खराब गोलंदाजीने सामना हातचा घालविला.
एकंदरीत चुरशीचा सामना झाला. विंडीजने दुसर्यांदा स्पर्धा जिंकली. यावर्षी १९ वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धा, महिलांची ट-२० विश्वचषक स्पर्धा आणि पुरूषांची ट-२० विश्वचषक स्पर्धा असे ३ मोठे विजय विंडीजने मिळविले.
आतापर्यंत ६ विश्वचषक स्पर्धा झाल्या. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्या संघाने १३१ ते १५७ या दरम्याच धावा केल्या आहेत. एकंदरीत अंतिम सामना कमी धावसंख्येचा होतो. याही सामन्यात तीच परंपरा कायम राहिली.
4 Apr 2016 - 2:30 pm | राजकुमार१२३४५६
नेट वरील एका मुलाचे मनोगत,
"काल मस्त मैच झाली. बेडरूम मध्ये असलेल्या जुन्या ब्लैक एण्ड व्हाईट टीवी वर पहिली. मैच पाहताना वेगळीच गम्मत घडायची. टीवीचा ब्राईटनेस वाढवला तर इंग्लंड चे प्लेयर दिसत नव्हते आणि ब्राईटनेस कमी केला तर वेस्टइंडीज चे प्लेयर दिसत नव्हते."