बाबु बजरंगी : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in काथ्याकूट
11 Mar 2016 - 10:42 pm
गाभा: 

गुजरात दंगलीमधे केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता मोकळेपणाने, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती सत्य उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.

https://www.youtube.com/embed/OFZBNUnG5pI

त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.

ह्या मुलाखतीचे ट्रान्सस्क्रिप्ट इथे:

http://www.tehelka.com/2007/11/to-get-me-out-on-bail-narendrabhai-change...

http://www.tehelka.com/2007/11/after-killing-them-i-felt-like-maharana-p...

(हे विडंबन नाही. प्रेरणा म्हणावी असे बरेच धागे आणि प्रतिसाद बघितलेत म्हणून हा धागा. आखिर हमारा भी अभिव्यक्ति स्वातंत्र्य है की नही? )

प्रतिक्रिया

विवेक ठाकूर's picture

12 Mar 2016 - 1:03 am | विवेक ठाकूर

हे नरेंद्र भाई कोण ? सध्या ते कुठे असतात आणि काय करतात ?

तर्राट जोकर's picture

12 Mar 2016 - 1:18 am | तर्राट जोकर

कुठल्यातरी ऑफिसमधे झाडू मारतांनाचा फोटो बघितला होता. तेच असतील ते. पण तो फोटोही फेक होता म्हणे त्यांच्यासारखाच.

नाना स्कॉच's picture

12 Mar 2016 - 8:31 am | नाना स्कॉच

Lolllllllllzzzzz

विवेक ठाकूर's picture

12 Mar 2016 - 11:19 am | विवेक ठाकूर

या धाग्यावर दहशत असावी अशी शांतता का आहे ?

दुर्गविहारी's picture

12 Mar 2016 - 1:14 pm | दुर्गविहारी

आपल्याच इथल्या सल्याचे पालन करायचे चालू आहे.
http://www.misalpav.com/comment/814473#comment-814473
धाग्याबद्द्ल आनन्द्च आहे.

तर्राट जोकर's picture

12 Mar 2016 - 9:49 pm | तर्राट जोकर

असे आहे होय. पण ह्या धाग्याचा भाजपाशी काय संबंध? समर्थकांशीतरी काय संबंध?

कोणीतरी मला निष्पाप बळी गेलेल्यांबद्दल जाण ठेवा असा उपदेश करत होतं. त्या उपदेशास्मरनार्थ हा धागा आहे.

गरिब चिमणा's picture

12 Mar 2016 - 1:20 pm | गरिब चिमणा

एक ही मारा लेकीन सॉल्लीड मारा,भक्त हिकडे फिरकणार नाही.

एक छान मराठी सुभाषित आठवले पण राहु देतो ;)

गामा पैलवान's picture

13 Mar 2016 - 1:14 pm | गामा पैलवान

तजो,

एव्हढा सबळ पुरावा (कॉम्पेलिंग एव्हिडन्स) आहे तर न्यायालयाने मोदींवर आरोपपत्र का दाखल होऊ दिलं नाही? खटला तर तिस्ता सेटलवाडच्या इच्छेप्रमाणे गुजरातेच्या बाहेर चालवला गेलेला ना?

आ.न.,
-गा.पै.

Anand More's picture

13 Mar 2016 - 1:27 pm | Anand More

सहमत

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 1:28 pm | तर्राट जोकर

इथे धाग्यात मोदींचे नाव कुणी घेतले?

त्यातील नरेंद्र भाईंचा उल्लेख मला मोदींबद्दल वाटला.... म्हणून मी विचारले.... हा स्टिंग व्हिडिओ आहे का? कारण स्टिंग ची कायद्यासमोरची वैधता हा वेगळा विषय आहे.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 1:50 pm | तर्राट जोकर

शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेले याची जाण न ठेवता केवळ पुरावे मिळाले नाही म्हणून दोषमुक्त केल्या गेलेल्या आरोपीचे मी समर्थन करतो असा माझ्यावर ठप्पा ठेवला गेला. या निमित्ताने गुजरात दंगली बाबत केवळ पुरावा मिळाला नाही म्हणून कुठलेही आरोपपत्र दाखल होऊ न शकलेल्यांबद्दल काय भूमिका घ्यावी असा मला प्रश्न पडला, म्हणून मी हा धागा काढला.

बोका-ए-आझम's picture

13 Mar 2016 - 1:53 pm | बोका-ए-आझम

नावाचा एक फार रोचक शब्द सध्या मिपावर फिरतोय म्हणे.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 2:13 pm | तर्राट जोकर

अगदी अगदी, तसेच त्याच्या मक्तेदारीसाठी एकच पक्ष फार भांडतोय हेही ऐकुन आहे.

बोका-ए-आझम's picture

13 Mar 2016 - 2:27 pm | बोका-ए-आझम

दुस-या पक्षाकडे मुद्देच नाहीयेत. एका पक्षाला राज्य करण्याचा आणि दुस-या पक्षाला विरोधात बसण्याचा फारसा अनुभव नसल्यामुळे असं होणारच.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 2:29 pm | तर्राट जोकर

इथे राजकिय पक्षाचा संबंध कुठून आला ब्वा. मी तर माझ्या प्रतिसादात राजकिय असं काही लिहिलं नाही. पक्ष म्हणजे बाजू.

कायदा आंधळा असतो.... हे राज्य कर्त्यांना व्यवस्थित कळ...सर्व पक्षीय भक्त स्वतःहून आंधळे होतात आणि त्यात धन्यता मानतात.... त्यासाठी इतिहासाची साक्ष काढतात... कधी वाटतं दुर्देव आपल्या देशाचं, तर कधी वाटतं देश आणि समाज म्हणून आपण अजून किशोरावस्थेतच आहोत...

चेक आणि मेट's picture

13 Mar 2016 - 2:43 pm | चेक आणि मेट

तुम्ही जो विडियो दिलाय ना,त्यामध्ये
compelling evidence proves
-narendra modi ordered gujarat roits 2002
असं लिवलयं
तुम्ही मोदींचं नाव घेतलं नसेल पण तो विडियो कुणाबद्दल काय सांगतो याची किमान माहिती तरी तुम्हाला असेलच.
वरून मोदींचं नाव न घेतल्याचा आव आणताय.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 3:03 pm | तर्राट जोकर

विडियो बाबु बजरंगी आणि नरोडापाटिया हत्याकांडाबद्दल त्याने काय बोलले ह्याबद्दल आहे. विडियो टाकणार्‍याने त्या विडियोला काय टायटल दिले याच्याशी काही संबंध नाही.

पण माझ्या आव आणण्याविषयी टिप्पणी करुन तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे?

चेक आणि मेट's picture

13 Mar 2016 - 3:22 pm | चेक आणि मेट

विडियो बाबु बजरंगी आणि नरोडापाटिया हत्याकांडाबद्दल त्याने काय बोलले ह्याबद्दल आहे. विडियो टाकणार्‍याने त्या विडियोला काय टायटल दिले याच्याशी काही संबंध नाही.

ख्याक....
हे तुमचं उत्तर म्हणजे एक मोठा जोक आहे,हे मिपावरील कोणीही सुज्ञ मंडळी सांगू शकतील.

पण माझ्या आव आणण्याविषयी टिप्पणी करुन तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे?

मी कशाला काय सिद्ध करू,मिपावरील सूज्ञांना सर्व माहिती आहे.
मोदी,संघ,भाजप यांना विरोध अवश्य करा,काहीही दुमत नाही,फक्त खोडसाळपणा सोडा एवढचं,अर्थात हे सांगणारा मी कोण?पण बघा एकंदरीत पटतयं का!!नाहितरी तुम्ही अभ्यासू असूनसुद्धा तुम्हाला कोणी सिरीयस घेणार नाही.

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 3:43 pm | तर्राट जोकर

तुमच्यामते, मोदींबद्दल असलं तेव्हाच खोडसाळपणा अन्यथा बाकीच्यांबद्दल सर्व काही क्षम्य असे मिपावरच्या सूज्ञांचे धोरण आहे काय?

काय लिहिले आहे ह्यापेक्षा कोण लिहितो ह्याचीच मिसळपाववर दखल घेतली जाते असे तुम्हाला म्हणायचे असेल तर असू देत. मला शष्प काही फरक पडत नाही. मला सिरियस घ्या असेही माझे म्हणणे नाही. मग तुम्हाला का बोवा एवढी काळजी?

चेक आणि मेट's picture

13 Mar 2016 - 3:55 pm | चेक आणि मेट

अहो तुमचा फोलपणा तुम्हाला मान्य आहे का?
"मोदींचं नाव कोणी घेतलं" हा तुमचा प्रतिसाद
आणि मग
विडियो कोणावर आरोप करतोय?
विडियो मोदींवर आरोप करतोय हे लहान मुलगा सुद्धा सांगेल.आणि विडियो तर तुम्हीच इथे डकवलाय,मग त्यात काय आहे हे माहित नसल्याचं सोंग का करताय?
"विडियोला टायटल काय दिले याच्याशी काय संबंध"
हा तुमचाच प्रतिसाद,
मग मला सांगा उगाच झोपेचे सोंग का घेताय आणि वरून गोल गोल प्रतिसाद देवून शब्दांचे खेळ का करताय?
हा तुमचा फोलपणा तुम्हाला मान्य आहे का?

तर्राट जोकर's picture

13 Mar 2016 - 4:04 pm | तर्राट जोकर

विडियो मोदींचा, मोदींबद्दल आहे? बाबु बजरंगी ह्या क्रूरकर्म्याचा आहे. तो काय म्हणतो, त्याने कसे हत्याकांड घडवले ह्याबद्दल आहे. तुम्हाला तो विडियो मोदींवर आरोप का वाटतो? कोण्या पत्रकाराचा रिपोर्ताज नाही आहे. स्टींग आहे.

चेक आणि मेट's picture

13 Mar 2016 - 4:29 pm | चेक आणि मेट

तुम्हाला तो विडियो मोदींवर आरोप का वाटतो? कोण्या पत्रकाराचा रिपोर्ताज नाही आहे. स्टींग आहे.

आण्णा किती गोलगोल फिरवणार आहात?
जागे व्हा ना!! कि मला वेड्यात काढताय?
आय होप विडियोचं टायटल अन् त्याखालील माहिती तसेच त्याखालील कमेंट्स तुम्ही वाचल्या असतील.आणि मगच विडियो डकवला असेल.
हे स्टिंग आहे हे तुम्हाला माहिती आहे,आणि तिथेच बाकि मोदिंबद्दल काय लिहलयं ते तुम्ही
वाचलय कि नाही?
अर्थात तुम्हाला माहिती आहे सगळं.त्यासाठी सोंग सोडावं लागतं
फोलपणा मान्य करा

आणखी एक विसरलोच......
......
...
तुम्ही कधीच चुकू शकत नाही

विवेक ठाकूर's picture

13 Mar 2016 - 4:47 pm | विवेक ठाकूर

किंवा टू बी स्पेसिफिक, इश्युचा निवाडा करण्यात काय फरक पडतो ?

चेक आणि मेट's picture

13 Mar 2016 - 5:04 pm | चेक आणि मेट

माझा आक्षेप खोडसाळपणावर आहे,
एकेकडी मोदींचं नाव घेतलं नाही म्हणायचं आणि दुसरीकडे
मुख्य अजेंडा तोच राबवायचा हा मोठा विरोधाभास आहे,
आणि वरून चूक न मान्य करणे हे एक मोठं व्ययच्छेदक लक्षण आहे.
मोदी सदोष आहेत कि निर्दोष याबद्दल बोलणे,
किंवा कुठल्याही न्यायालयीन निर्णयावर सयंतपणे चर्चा(घोषणाबाजी नव्हे) करण्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे.
पण त्यासाठी चर्चाकारांनी चढवलेले मुखवटे उतरवून येणं उचित ठरेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Mar 2016 - 5:27 pm | निनाद मुक्काम प...

जाऊन द्या हो
विदुषक म्हणतो माझीच लाल
संधर्भासहित स्पष्टीकरण दिले तरी आपली चूक मान्य न करणाऱ्या पैकी असतात काही लोक
बहुदा हा विडीयो देतांना त्याचे शीर्षक व त्याखालील प्रतिसाद जाणीवपूर्वक वाचून हा विडीयो पूर्ण शुद्धीत येथे पोस्ट केलेला दिसत आहे,

गामा पैलवान's picture

13 Mar 2016 - 3:13 pm | गामा पैलवान

तजो,

>> गुजरात दंगली बाबत केवळ पुरावा मिळाला नाही म्हणून कुठलेही आरोपपत्र दाखल होऊ न शकलेल्यांबद्दल
>> काय भूमिका घ्यावी असा मला प्रश्न पडला,

स्वातंत्र्यानंतर साधारण २०१० सालापावेतो देशात जे ४६००० दंगे झाले त्यातल्या फक्त गुजरात २००२ चीच चौकशी झालेली आहे. तीत तीन वेगवेगळ्या अन्वेषण पथकांनी शोध घेऊनही मोदींवर ठपका ठेवता येणार नाही असा निष्कर्ष काढला आहे.

याउपर तुम्हाला मोदींना दोषी ठरवायची एव्हढी गरज का वाटते आहे? गुजरातेतले १९६९, १९८५, १९९० चे भीषण व (काही) दीर्घकाळ चाललेले दंगे बघितले तर मोदींची केवळ ३ दिवसांत दंगली आटोक्यात आणण्याची कामगिरी दैदिप्यमान आहे. तसेच २००२ नंतर मोदींच्या कार्यकाळाच्या १२ वर्षांत एकही हिंदूमुस्लिम दंगल झाली नाही. तुम्हाला मुस्लीम आणि हिंदू गपपणे बसलेले बघवत नाहीत काय?

इथे एक गुजराती मुसलमान रामराज्य हवंय म्हणून खुलेआम सांगतोय. तो बावळट आहे का?

https://youtu.be/PEmX5e9bDg8?t=18m35s - कृपया चलचित्र एक मिनिटभर पहावे. पूर्ण कार्यक्रमच पाहण्यासारखा आहे.

सांगायचा मुद्दा असा की मोदींना दोषी समजणं सोडून द्या.

आ.न.,
-गा.पै.

विवेक ठाकूर's picture

13 Mar 2016 - 4:01 pm | विवेक ठाकूर

न्यायालयीन प्रक्रियेत सुरुवातीला गुन्हेगाराला आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात

`हे आरोप तुला कबूल आहेत का?'

तो जर `कबूल आहे' म्हणाला तर केस पुढे चालतच नाही, विषयच संपतो.

सरळ शिक्षा सुनावली जाते.

मुलाखत देणार्‍याची माहिती पाहा :

Babubhai Patel, known by his alias Babu Bajrangi,[1] is a leader of the Gujarat-wing of the Bajrang Dal, a Hindu nationalist organization in India. He was a central figure in the organized pogroms directed at Muslims during the 2002 Gujarat violence.[2] He was sentenced to life term imprisonment by a special court for his role in the Naroda Patiya massacre in which ninety-seven Indian Muslims were murdered.[3]

आता पुन्हा विडिओ पाहा! इथे गुन्हेगार स्वतः कबूल करतोयं आणि वर म्हणतोयं पहिल्या जजनं मला चार काय पाच वेळा फाशी द्यायला पाहिजे असं म्हटलं होतं. आणि हाइट बघा, त्याला फक्त जन्मठेप झाली ! इतक्या उघड गोष्टीला अजून काय पुरावा हवा?

यावरनं किमान विचार करु जाता खरं तर सगळंच क्लिअर होतं.

१) पुरावे, साक्षिदार आणि तो म्हणतो तसे डायरेक्ट जजेस बदलून सगळ्या हत्त्याकांडाची एकूणच वाट लावली गेली आहे. सगळी शोध प्रक्रियाच पूर्णपणे डायल्यूट केली आहे. कारण इतक्या नृशंस हत्त्याकांडाला जवाबदार असणार्‍या मुख्य व्यक्तीला फाशीऐवजी जन्मठेप होणं हे सोपं काम नाही.

२) ज्या नरेंद्र भाईंचा उल्लेख होतोयं, तो किती पाताळयंत्री माणूस असेल आणि त्याची काय पहुंच असेल याची कल्पना करवत नाही. जो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडलेल्या हत्त्याकांडातल्या मुख्य गुन्हेगाराला, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत, फाशीपासून वाचवू शकतो, तो स्वतः सुरक्षित राहाण्यासाठी कोणत्या थराला गेला असेल हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे मुख्य गुन्हेगार, जो स्वतः गुन्हा कबूल करतोयं (भले स्टींगमधे का असेना, त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही) त्याला जो हात लावू देत नाही तो स्वतःपर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वशक्तीनिशी काय तयारी ठेवून असेल.

३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.

मोदक's picture

13 Mar 2016 - 4:58 pm | मोदक

३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.

हा मुद्दा थोडा जास्त परिणामकारकरीत्या १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला लागू होतो.

बाळ सप्रे's picture

14 Mar 2016 - 11:12 am | बाळ सप्रे

हा मुद्दा थोडा जास्त परिणामकारकरीत्या १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला लागू होतो

पण इथे लागू होतोय.. हे का मान्य करवत नाहिये??

हो !! १९८४ आणि इतरही दंगल घडवणारे गुन्हेगार आहेतच !!

करेक्ट !

lakhu risbud's picture

14 Mar 2016 - 1:05 pm | lakhu risbud

तुम्हाला "ते" जसे आहेत असे "वाटतंय" ते खरेखुरे "तसेच" असते तर तुमच्या सारखी "विद्वान" मंडळी मिपावरच काय कोणत्याही सार्वजनिक forum वर या अशा प्रकारची चर्चा करू शकली असती काय ?

विवेक ठाकूर's picture

14 Mar 2016 - 1:20 pm | विवेक ठाकूर

तुमच्यासारखी महाविद्वान मंडळी डोळे उघडणार असं दिसतंय!

इतर कोणीतरी प्रतिसादाचा प्रतिवाद केल्यावरच तुम्हाला कंठ का फुटतो?
म्हणजे तुमच्याकडे लै भारी बंदूक असली तरी गोळ्या दुसर्‍याच्या खिशात असल्याने तुम्हाला बंदुकीचा काहीच उपयोग नाही.

छ्या..

lakhu risbud's picture

14 Mar 2016 - 5:23 pm | lakhu risbud

खिक

झाडाचं पान अंगावर पडल्यावर "आभाळ कोसळतेय पळा पळा म्हणाऱ्या सशाची गोष्ट आठवली.

इथे लागू होण्याविषयी मी काहीच बोललो नाहीये. फक्त विठांनी नेहमीप्रमाणे अवास्तव वर्णन करताना दिलेले मुद्दे १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला जास्त परिणामकारकरीत्या लागू होतात इतकेच म्हणत आहे.

बादवे - "झाड पडल्यावर धरणीकंप होणार" वगैरे समर्थने मोदींनी केली आहेत का?

बोका-ए-आझम's picture

14 Mar 2016 - 5:25 pm | बोका-ए-आझम

साधी सरळ गोष्ट आहे. गुजरात दंगल नृशंस आणि अमानुष होती यात दुमत नाही. पण त्याचा विदा आणि १९८४ च्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या शीखविरोधी दंगलीचा विदा बघितला तर कसं राजकारण खेळलं गेलं आणि माध्यमं आणि एनजीओज यांनी त्यात काय भूमिका घेतली तेही कळेल.
२००२ च्या गुजरात दंगलींमध्ये ७९० मुस्लिम आणि २५४ हिंदू मारले गेले. ही माहिती २०१२ मध्ये गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांनी संसदेत दिली.
१९८४ च्या दंगलीत एकट्या दिल्लीत ३००० शीख मारले गेले. एकही हिंदू किंवा मुस्लिम मारला गेला नाही. तरीही या दंगलीचं वर्णन riots असं होतं आणि गुजरात दंगलींबद्दल Pogrom, Ethnic Killing, Genocide असले शब्द वापरले जातात. प्रश्न शब्दांचा नाही, त्याच्यामागच्या हेतूंचा आहे. दंगलीत मारले गेलेले लोक, मग ते कुठल्याही धर्माचे असोत, त्यांना सारखंच महत्व द्यायला पाहिजे. पण तसं होत नाही.

१.

न्यायालयीन प्रक्रियेत सुरुवातीला गुन्हेगाराला आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात

`हे आरोप तुला कबूल आहेत का?'

तो जर `कबूल आहे' म्हणाला तर केस पुढे चालतच नाही, विषयच संपतो.

सरळ शिक्षा सुनावली जाते.

एक शब्द टाकायला सोयीस्कररीत्या विसरलात - In front of competent judicial authority.

ही मुलाखत जर मला नक्की आठवत असेल तर सध्या अाआपमध्ये असलेल्या आणि तेव्हा तहलका मध्ये पत्रकार असलेल्या अाशिष खेतान यांनी घेतली होती. ती २००७ मध्ये अगदी गुजरात विधानसभा निवडणुकींच्या वेळी प्रकाशित झाली होती. हा योगायोग असावा असं आपलं म्हणणं असेल तर मुद्दाच खुंटला. असो.
ही मुलाखत मॅजिस्ट्रेट किंवा इतर कोणत्याही न्यायिक अधिकार असलेल्या व्यक्तीपुढे झालेली नसल्यामुळे त्याला सनसनाटी बातमीचं मूल्य जरुर आहे, पण कायदेशीर पुरावा म्हणून त्याची किंमत शून्य. आणि हे मी म्हणत नाही, Indian Evidence Act म्हणतो, जो भाजप सरकारने बनवलेला नाही, ब्रिटिश काळापासून प्रचलित आहे.

२.

पुरावे, साक्षिदार आणि तो म्हणतो तसे डायरेक्ट जजेस बदलून सगळ्या हत्त्याकांडाची एकूणच वाट लावली गेली आहे. सगळी शोध प्रक्रियाच पूर्णपणे डायल्यूट केली आहे. कारण इतक्या नृशंस हत्त्याकांडाला जवाबदार असणार्‍या मुख्य व्यक्तीला फाशीऐवजी जन्मठेप होणं हे सोपं काम नाही.

म्हणजे तुम्ही सरळसरळ म्हणताय की न्यायाधीशांनी न्यायदानप्रक्रिया बदलली - manipulate केली. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. काही पुरावा आहे आपल्याकडे त्याच्या या मुलाखतीशिवाय? जो आरोप करतो त्याने पुरावा द्यायला हवा हा साधा नियम आहे (The burden of proof lies with the accuser) तो तुमचं कायद्याचं अगाध ज्ञान पाहता तुम्हाला माहित असेलच.
फाशीची शिक्षा द्यायला सरकारी वकिलांनी बाबू बजरंगीचा गुन्हा rarest of the rare आहे हे सिद्ध करायला हवं होतं. तसं ते सिद्ध करु शकले नाहीत. नरोडा पाटिया हत्याकांडाचा सूत्रधार जरी बाबू बजरंगी असला हे सरकारी वकील सिद्ध करु शकले तरी तिथे घडलेला प्रत्येक गुन्हा हा cold-blooded conspiracy आहे आणि त्यामागे बाबू बजरंगीचा हात आहे हे ते सिद्ध करु शकले नाहीत. परिणामी तो rarest of the rare गुन्हा होऊ शकला नाही. त्यामुळे फाशी जरी नाही तरी जन्मठेपेची शिक्षा बाबू बजरंगी आणि मोदींच्या मंत्रिमंडळातल्या माया कोदनानी यांना झाली.

ज्या नरेंद्र भाईंचा उल्लेख होतोयं, तो किती पाताळयंत्री माणूस असेल आणि त्याची काय पहुंच असेल याची कल्पना करवत नाही. जो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडलेल्या हत्त्याकांडातल्या मुख्य गुन्हेगाराला, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत, फाशीपासून वाचवू शकतो, तो स्वतः सुरक्षित राहाण्यासाठी कोणत्या थराला गेला असेल हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे मुख्य गुन्हेगार, जो स्वतः गुन्हा कबूल करतोयं (भले स्टींगमधे का असेना, त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही) त्याला जो हात लावू देत नाही तो स्वतःपर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वशक्तीनिशी काय तयारी ठेवून असेल

स्टिंगमध्ये कोणीही काहीही म्हणू शकतो. त्यात खरं सांगायलाच पाहिजे असं काहीही बंधन नसतं. ही विधानं बाबू बजरंगीने कोर्टासमोर केली का? आपल्याला तो जे बोलला आहे त्याचं अक्षरन् अक्षर खरं वाटतंय. कशावरून? बरं, हे त्याने कोर्टात का नाही सांगितलं? एका अनोळखी पत्रकाराला तो नरेंद्रभाईंबद्दल सांगतोय आणि कोर्टात मात्र त्यांचं नावही घेत नाही हा विरोधाभास वाटत नाही? जर त्याने कोर्टात असं सांगितलं असतं तर मिडियाने मुंबई ते अहमदाबाद हायवेची संपूर्ण लांबी कव्हर करणारी फटाक्यांची माळ लावली असती. पण असं झालं नाही.

अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.

लोकशाहीत सर्वसत्ताधीश हा शब्द चुकीचा आहे. लोकशाहीत सर्वसत्ताधीश लोक असतात. आणि भारतीय जनतेने आपण तसे आहोत हे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या चार निवडणुकांपैकी दोन निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे. काय झालं त्या लोकांचं? संजीव भट्ट यांनी मोदींवर अारोप केले होते, तीस्ता सेटलवाड यांनी तर मोठी आघाडी उघडली होती. यांच्या जिवाला कुठल्याही प्रकारचा धोका असल्याची तक्रार त्यांनी स्वतः केलेली नाही.

तुम्ही जर मधू किश्वर यांचं Modi, Media and Muslims हे पुस्तक वाचलंत तर तुम्हाला कळेल की गुजरात दंगलींमध्ये काँग्रेसच्या आमदारांचाही सहभाग होता. त्यातले काहीजण अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीतल्या हत्याकांडात मारले गेलेले काँग्रेसचे आमदार एहसान जाफरी यांचे विरोधक होते. दंगली भडकावण्यात त्यांचाही (या आमदारांपैकी काहींचा) सहभाग होता. पण तीस्ता सेटलवाड यांनी मिडियापुढे फक्त विहिंप, बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेले फोटो सादर केले. हे त्यांच्याच एका कार्यकर्त्याने मधू किश्वर यांना सांगितल्याचा या पुस्तकात उल्लेख आहे. त्याचं नावही पुस्तकात आहे. मला आत्ता आठवत नाहीये.

आॅक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनेपर्यंत मोदी सक्रीय राजकारणात नव्हते. ते १९९८ मध्ये दिल्लीत गेले. त्यांना गुजरातमधून बाहेर काढणं ही तेव्हा केशुभाई पटेल यांच्याविरूद्ध बंड करुन बाहेर पडलेल्या शंकरसिंह वाघेला यांची मुख्य अट होती. २००१ चा भूकंप हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे केशुभाई पटेलांच्या जागी मोदींची निवड करण्यात आली. त्यांना ६ महिन्यांत निवडणूक लढवून विधानसभेचं सदस्य होणं गरजेचं होतं. त्यांनी ज्या दिवशी त्यांची निवडणूक वडोदरा मतदारसंघातून जिंकली त्याच्या दुस-या दिवशी दंगली सुरु झाल्या. तेव्हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत काँग्रेस सरकारने होती. दोघांनाही मोदींनी त्यांच्या राज्यांत असलेल्या सैन्याच्या राखीव तुकड्या पाठवण्याची लिखित विनंती दंगल भडकल्याच्या दुस-या दिवशी पाठवली होती. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ती नाकारली हेही लिखित स्वरूपात आहे.
दंगल नृशंस होती हे कोणीही अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही पण त्यात मोदींचा सहभाग होता किंवा ते जबाबदार होते याचा कुठलाही पुरावा आजतागायत सापडलेला नाही. याउलट सज्जन कुमार, जगदीश टायटलर आणि दिवंगत हरकिशनलाल भगत हे दिल्लीत १९८४ नंतर झालेल्या दंगलींचे सूत्रधार होते याचे अनेक पुरावे उपलब्ध असूनही त्यांच्यावर राजकीय बहिष्काराशिवाय अजून दुसरी कायदेशीर कारवाई झालेली नाही. या विरोधाभासाला काय म्हणावं? असो.

आपलेच शब्द उधार घेऊन म्हणतो - तुम्हाला विषय समजलेला नाही. अशी कोणावरही त्याच्या मुलाखती बघून विश्वास ठेवण्याची आणि तोही selective विश्वास ठेवण्याची सवय सोडून द्या.

विवेक ठाकूर's picture

13 Mar 2016 - 11:10 pm | विवेक ठाकूर

मुलाखत डोळ्यासमोर आहे. स्वतः गुन्हेगार कबूल करतोयं. यावर त्यानं न्यायालयासमोर हे विधान केलं तरच आम्ही त्याला गुन्हेगार मानू असं फक्त निर्बुद्ध म्हणू शकतो. प्रतिसाद देण्यापूर्वी किमान इतकी तरी समज हवी की असं विधान त्यानं न्यायालयासमोर केलं असतं तर खटलाच संपला असता. त्याला तिथल्या तिथे फाशी झाली असती.

त्यामुळे तो गुन्हेगार आहे हे स्वतःच सांगतोयं आणि नांव घेऊन, केलेल्या गुन्ह्याचं तपशीलवार वर्णन इतक्या बेदिक्कातपणे करतोयं म्हटल्यावर प्रश्नच मिटला.

सो, मुद्दा तो नाही. त्याला वाचवणारा किती पाताळयंत्री असला पाहिजे हा आहे. आणि अशा पाताळयंत्री व्यक्तीविरुद्ध गुन्हा तर सोडाच, या नृशंस हत्त्याकांडाची पूर्ण आखणी केली असं सिद्ध होणं हे त्याहीपेक्षा किती महाकठीण आहे याची कल्पना येण्याचा आहे.

अगदी सुशिक्षित लोकांमध्येसुद्धा कायद्याबद्दल किती अज्ञान आहे हे तुमचा प्रतिसाद बघून समजतं.

त्यानं न्यायालयासमोर हे विधान केलं तरच आम्ही त्याला गुन्हेगार मानू असं फक्त निर्बुद्ध म्हणू शकतो.

सगळ्यांना स्वतःसारखं समजायची वाईट खोड आहे तुम्हाला. शाळेत शिकताना पण असंच करायचात बहुतेक. विषय नाही समजला - शिक्षक निर्बुद्ध!

मुळात गुन्हा सिद्ध होईपर्यंत माणसाला निर्दोष मानावं हा न्यायदानपद्धतीचा, निदान लोकशाही देशांत तरी, सर्वमान्य संकेत आहे. आणि गुन्हा सिद्ध करणं आणि त्याच्या तीव्रतेनुसार शिक्षा देणं हे न्यायालयाचं काम आहे. याचाच अर्थ कोणताही माणूस हा गुन्हेगार आहे हे न्यायालयासमोर सिद्ध होणं आवश्यक आहे. जोपर्यंत न्यायालय तसं मानत नाही तोपर्यंत तो माणूस स्वतः तसं म्हणत असला तरीही तो गुन्हेगार नाही कारण ते न्यायालयात सिद्ध झालेलं नाही. तुम्हाला जर हा निर्बुद्धपणा वाटत असला तर निवडणूक लढवा, विधिमंडळात जा, घटनादुरुस्ती करा आणि हा असा बदल घडवा. मग आम्ही सगळे (निदान मी तरी) ते मान्य करु. तोपर्यंत नाही.

प्रतिसाद देण्यापूर्वी किमान इतकी तरी समज हवी की असं विधान त्यानं न्यायालयासमोर केलं असतं तर खटलाच संपला असता. त्याला तिथल्या तिथे फाशी झाली असती.

आजवर ज्यांना फाशी झाली आहे आणि दिली गेली आहे, त्यांच्यापैकी एकानेही आपला गुन्हा न्यायालयासमोर मान्य केला नसेल. बरं, तसं झालं तरीही खटल्याचं किमान कामकाज चालवावंच लागतं. आपल्या देशात अमेरिकेप्रमाणे Plea Bargain हा प्रकारच नाही. तिथे गुन्हा कबूल करुन गुन्हेगार जी शिक्षा न्यायाधीश देतील ती भोगतो किंवा जर त्याने गुन्हा नाकबूल केला तर खटला होतो. आपल्याकडे सर्वच्यासर्व साक्षीपुरावे न्यायालयासमोर आणावेच लागतात. प्रमोद महाजनांच्या हत्येच्या खटल्यात त्यांची हत्या आपण केल्याचं प्रवीण महाजन यांनी पोलिसांसमोर कबूल केलं होतं, बाबू बजरंगीप्रमाणे स्टिंगमध्ये नाही, तरीही खटला झालाच. आपल्या देशात खटले प्रलंबित राहण्याचं एक कारण हेही आहे की Plea Bargain ही संकल्पनाच नसल्यामुळे गुन्हा झाला, चार्जशीट दाखल झाली की कोर्टासमोर प्रकरण येणारच.
त्याला तिथल्यातिथे फाशी झाली असती असं म्हणणं सोपं आहे. कसाबच्या गुन्ह्याचे अनेक साक्षीदार होते, त्याला खटला न चालवता फासावर लटकवा असं म्हणणारेही अनेक होते पण सरकारने त्याला वकील दिला, त्या वकिलाचं मानधनही सरकारने दिलं, कोर्टात सर्व पुरावे येऊन गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला फाशी झाली, पण मग त्याने अपील केलं. फाशीची शिक्षा हायकोर्टाने मान्य करावी लागते. सगळी कारवाई झाल्यावर मग त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्यावर मग त्याला फाशी झाली. आणि म्हणूनच आज कोणीही त्याबद्दल एक चकार शब्द काढला नाही कारण due process of the law in letter and in spirit पाळली गेली.

बाबू बजरंगीच्या गुन्ह्यांमध्ये तसं झालं नाही. त्याचा गुन्हा न्यायाधीशांना rarest of the rare वाटला नाही. त्यामुळे त्याला फाशी झाली नाही. आणि मुळात फाशी ही सर्वात कठोर शिक्षा आहे असं अजिबात नाही. कित्येक प्रकरणांत फाशी ही फार साधीसरळ शिक्षा आहे असं म्हणता येईल. गुन्हा इतका भयानक आहे की गुन्हेगारांना फाशी न देता पूर्ण आयुष्य तुरूंगात सडत ठेवणं ही कधीही जास्त परिणामकारक शिक्षा असू शकते. अर्थात तो मुद्दा इथे नाहीये आणि मी फाशीच्या विरोधातही नाहीये.

सो, मुद्दा तो नाही. त्याला वाचवणारा किती पाताळयंत्री असला पाहिजे हा आहे. आणि अशा पाताळयंत्री व्यक्तीविरुद्ध गुन्हा तर सोडाच, या नृशंस हत्त्याकांडाची पूर्ण आखणी केली असं सिद्ध होणं हे त्याहीपेक्षा किती महाकठीण आहे याची कल्पना येण्याचा आहे.

हे तुमचं मत आहे. त्याबद्दल काय बोलणार? मत आणि वस्तुस्थिती यात फरक असतो. कायदा फक्त वस्तुस्थिती जाणतो. न्यायदेवता आंधळी असण्याचा अर्थच तो आहे. बाबू बजरंगी पुराव्याअभावी निर्दोष सुटला असता तर तुमच्या या विधानात तथ्य आहे असं म्हणता आलं असतं. पण त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तुमच्या उदाहरणात जो पाताळयंत्री व्यक्तीचा उल्लेख आहे तो म्हणूनच चुकीचा आहे. बजरंगी निर्दोष सुटला असता तर वेगळी गोष्ट असती.आपली न्यायसंस्था इतकी वाकलेली नाही, निदान असल्या प्रकरणांमध्ये, जिथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं २४x७ लक्ष ठेवून आहेत, तिथे तर नाहीच नाही.

विवेक ठाकूर's picture

14 Mar 2016 - 10:18 am | विवेक ठाकूर

कोणताही माणूस हा गुन्हेगार आहे हे न्यायालयासमोर सिद्ध होणं आवश्यक आहे.

पुन्हा तेच ! आपल्याला उघड गोष्ट दिसत नाही ? खरं तर ती इतकी उघड आहे की कबूल करायची लाज वाटते.

....मी फाशीच्या विरोधातही नाहीये.

त्यामुळे सगळा प्रतिवादच बाद.

बाबू बजरंगी पुराव्याअभावी निर्दोष सुटला असता तर तुमच्या या विधानात तथ्य आहे असं म्हणता आलं असतं.

पुन्हा तेच !

विवेक ठाकूर's picture

13 Mar 2016 - 4:10 pm | विवेक ठाकूर

न्यायालयीन प्रक्रियेत सुरुवातीला गुन्हेगाराला आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात

`हे आरोप तुला कबूल आहेत का?'

तो जर `कबूल आहे' म्हणाला तर केस पुढे चालतच नाही, विषयच संपतो.

सरळ शिक्षा सुनावली जाते.

मुलाखत देणार्‍याची माहिती पाहा :

Babubhai Patel, known by his alias Babu Bajrangi,[1] is a leader of the Gujarat-wing of the Bajrang Dal, a Hindu nationalist organization in India. He was a central figure in the organized pogroms directed at Muslims during the 2002 Gujarat violence.[2] He was sentenced to life term imprisonment by a special court for his role in the Naroda Patiya massacre in which ninety-seven Indian Muslims were murdered.[3]

आता पुन्हा विडिओ पाहा! इथे गुन्हेगार स्वतः कबूल करतोयं आणि वर म्हणतोयं पहिल्या जजनं मला चार काय पाच वेळा फाशी द्यायला पाहिजे असं म्हटलं होतं. आणि हाइट बघा, त्याला फक्त जन्मठेप झाली ! इतक्या उघड गोष्टीला अजून काय पुरावा हवा?

यावरनं किमान विचार करु जाता खरं तर सगळंच क्लिअर होतं.

१) पुरावे, साक्षिदार आणि तो म्हणतो तसे डायरेक्ट जजेस बदलून सगळ्या हत्त्याकांडाची एकूणच वाट लावली गेली आहे. सगळी शोध प्रक्रियाच पूर्णपणे डायल्यूट केली आहे. कारण इतक्या नृशंस हत्त्याकांडाला जवाबदार असणार्‍या मुख्य व्यक्तीला फाशीऐवजी जन्मठेप होणं हे सोपं काम नाही.

२) ज्या नरेंद्र भाईंचा उल्लेख होतोयं, तो किती पाताळयंत्री माणूस असेल आणि त्याची काय पहुंच असेल याची कल्पना करवत नाही. जो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडलेल्या हत्त्याकांडातल्या मुख्य गुन्हेगाराला, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत, फाशीपासून वाचवू शकतो, तो स्वतः सुरक्षित राहाण्यासाठी कोणत्या थराला गेला असेल हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे मुख्य गुन्हेगार, जो स्वतः गुन्हा कबूल करतोयं (भले स्टींगमधे का असेना, त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही) त्याला जो हात लावू देत नाही तो स्वतःपर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वशक्तीनिशी काय तयारी ठेवून असेल.

३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.

४) आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पुराव्या अभावी मुक्तता म्हणजे न्याय नाही. ती न्यायाव्यवस्थेची असहाय्यता आहे. जर उघड आणि समोर दिसणार्‍या पुराव्यावरनं आपण निवाडा करु शकत नसू तर त्याचा अर्थ एकच होतो....आपल्याला निवाडा करायचा नाही. आपण ते साहस करु धजत नाही. आपल्याला ती दाहकता मंजूर करण्यापेक्षा पुरावा नाही म्हणजे काही घडलंच नाही हा मानसिक दिलासा बरा वाटतो.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

13 Mar 2016 - 5:22 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

या प्रतिसादाची प्रिंट काढून न्यायालयात एखादी याचिका दाखल करावी म्हणतोय!!!!
किवा तुम्ही करा ना सर??
नै योग्य बाजू मांडू शकाल म्हणून म्हणतोय.

विवेक ठाकूर's picture

13 Mar 2016 - 6:17 pm | विवेक ठाकूर

त्याला न्यायालय कशाला हवं ?

भाऊंचे भाऊ's picture

14 Mar 2016 - 11:12 am | भाऊंचे भाऊ

एकदा विठानी न्याय केला की पुन्हा न्यायालयाची गरजच काय ? हवं तर त्यांचे प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचायचे अन तरीही नाही समजले तर प्रिंटआउट काढून वाचायचे... विठाजी तुमचच चुकलं बघा खरतर प्रतिसादात तुम्ही सादगी, सूफी, तूफ़ान, इश्क ओशो, सत्य, अध्यात्म, अनुभूति असे शब्द पेरले असते ना तर काय टाप होती मिपाकरांची तुमचे म्हनने अमान्य करायची ? ओँ ?

इतक्या उघड गोष्टीबद्दल तुमचं स्वतःच मत काय आहे? आवांतर करुन तुम्ही अज्ञानप्रदर्शन करतायं असं दिसत नाही का?

भाऊंचे भाऊ's picture

14 Mar 2016 - 2:21 pm | भाऊंचे भाऊ

मला वाटतं मुळात गोध्रा हत्याकाण्डच घडायलाच नको होते गुजरात दंगल ही त्यानंतरची बाब आहे ज्या बद्दल ठाम मत व्यक्त करण्या इतपत माझा अभ्यास तोकडा आहे

भाऊंचे भाऊ's picture

14 Mar 2016 - 2:24 pm | भाऊंचे भाऊ

विठांचा प्रश्न:- तुम्हाला स्वतःची निर्णयक्षमता नाही का ?
उत्तर :- प्लिज पकवु नका हो.

खरतर प्रतिसादात तुम्ही सादगी, सूफी, तूफ़ान, इश्क ओशो, सत्य, अध्यात्म, अनुभूति असे शब्द पेरले असते ना तर काय टाप होती मिपाकरांची तुमचे म्हनने अमान्य करायची ? ओँ ?

याला पकवणे म्हणतात.

गोध्रामधे हिंदूंचे अभद्र हत्याकांड घडले इतक्या उघड गोष्टीबद्दल तुमचं स्वतःच मत काय आहे? आवांतर करुन तुम्ही
अज्ञानप्रदर्शन करतायं असं दिसत नाही का?

याबद्दल वरतीच लिहलंय

वाचलं म्हणुन तर...

सांगायचा मुद्दा असा की मोदींना दोषी समजणं सोडून द्या.

या एका वाक्याने तुम्ही किती दुकाने एका फटक्यात बंद करत आहात ते लक्षात आले का..? ;)

लालगरूड's picture

13 Mar 2016 - 6:05 pm | लालगरूड

વંદે માતરમ ||
ૐૐૐૐૐૐૐૐૐ

डँबिस००७'s picture

13 Mar 2016 - 7:28 pm | डँबिस००७

विवेक ठाकुर, र्तराट जोकर,

ह्या नरोडा पाटिया हत्याकांडा बद्दल ईतक घसा फोडुन बोलताय मग जरा गोध्राच्या दोन बोगीना बाहेरुन आग लावुन आतल्या १६० ते २०० लोकाम्ना मारण्यात आले त्या बद्दल किती लोकांना फाशी झाली ?

२००२ च्या गुजरात दंगलींचा फ्लॅश पाँईट हा गोध्राच हत्याकांडच आहे, हे सर्व मान्यच आहे, मग त्या हत्याकांडाला झाकुन ठेवायचा अट्टाहास काँग्रेसच्या पक्षाने केलेला तुम्हाला दिसला का ?

२०० हिंदुना मारण्याचा अधिकार आहे पण मुसलमानांना हातपण लावायचा नाही ?

भर मुंबईच्या मध्यावर असलेल्या भेंडि बाजारमध्ये अगदी शिवसेनेच्या चढ्या काळातही पाकिस्तानच्या विजयावर फटाके फोडले जात असत, मुंबईतले सराईत गुन्हेगार तिथेच जाउन लपत, दंगलीच्या वेळेला तिथे, जोगेश्वरीला,
व अश्या मुस्लिम बहुल भागात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मारुन टाकलेल आहे,

हिंदुबहुल् भागात राहुन रात्रीच्या पहाटेच्या थंडीत स्वतःला उबदार रजाईत गुरफटुन लोकांना उपदेश करणे सोडा, जेंव्हा बाजुच्या मुसलमान वस्तीतुन लोक बेभान होउन येतात तेव्हां काही सुचत नाही. ते बघत नाहीत तुम्ही हिंदु आहात का पारसी ? तुम्ही मुसलमान नसलात मग तोच तुमचा दोष !

एका अमानुष घटनेमुळे दुसरी अमानुष घटना जस्टीफाय होत नाही. शिवाय अशा अमानुष घटना पुढच्या तशाच घटना घडवायला जवाबदार ठरतात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Mar 2016 - 8:20 pm | निनाद मुक्काम प...

२००२ नंतर गुजरात मध्ये मोठी दंगल झाली नाही हेच त्या दंगलीचे च्नागले ऑउत पूट
ह्या दंगलीवर अत्यंत परिणामकारक भाष्य सलीम साहेबांनी घेतले आहे.

२००२ नंतर गुजरात मध्ये मोठी दंगल झाली नाही

हि चुकीची माहिती आहे. त्यानंतर गुजरात मध्ये १०-१२ दंगली झाल्या. त्यातील बडोदा दंगलीत ६-८ मृत्यू पावले,

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Mar 2016 - 12:00 am | निनाद मुक्काम प...

तरीदेखील तेथील जनतेने मोदींना निवडून दिले.आताच
मुझफराबाद येथे भाजपचा आमदार निवडणून आला.
भारताने चंडशोक नाही तर अशोकस्तंभ म्हणून चक्रवर्ती सम्राट ह्यांना राज्यघटनेत स्थान दिले.
अवांतर
काय गमंत म्हटल्यास विरोधाभास पहा
डेविड हेडली च्या साक्षीचा विडीयो पाहून त्याला नाकारणारे
आज एक विडीयो घेऊन आले आहेत
जर ह्या विडीयो ला तुम्ही अंतिम सत्य मानत असाल तर त्या तर्काने तुमचा पुढचा लेख डेविड हेडली ची प्रांजळ मुलाखत
असा यायला हरकत नाही.
चिदम्बरम सोनिया ह्यांच्या नावाने खडे फोडायला
मी पयला असेन

तर्राट जोकर's picture

14 Mar 2016 - 12:11 am | तर्राट जोकर

डेविड हेडली च्या साक्षीचा विडीयो पाहून त्याला नाकारणारे>>> हे मी कुठे केले आहे ते सिद्ध करा नाहीतर आपली टकळी बंद करा. वाट्टेल ते ऐकून घेणार नाही जर्मनीकर, ज्याला धड मराठी लिहायला येत नाही त्या सोकॉल्ड अभ्यासू आयडीकडून तर नाहीच नाही.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Mar 2016 - 1:57 am | निनाद मुक्काम प...

तुम्ही असे प्रत्यक्ष म्हणाला नसाल पण तीच तुमची धारणा आहे अशी माझी पक्की समजूत आहे , निदान तुमचा प्रतीसातून व लेखातून असेच दिसते आता तुमच्या मला उद्देशून असलेल्या प्रतिसादावरून
तुम्हाला असे म्हणायचे आहे का की डेवीड हेडली च्या विडीयो मधील साक्ष तुम्हाला मान्य आहे, आणि त्याप्रमाणे इशरत जहा
दहशतवादी आहे का आणि मोदींना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी पुढे कोन्ग्रेज ने सारे कुंभाड रचले असे तुम्हाला वाटते का

अवांतर
वाट्टेल ते माझ्याकडून ऐकून घेणार नाही ठीक
मग कोणाकडून ऐकून घेणार
मी शुद्ध लेखन सुधारले तर वाट्टेल ते ऐकून घ्याल का
असो

तर्राट जोकर's picture

14 Mar 2016 - 10:34 am | तर्राट जोकर

डेवीड हेडली च्या विडीयो मधील साक्ष तुम्हाला मान्य आहे, आणि त्याप्रमाणे इशरत जहा
दहशतवादी आहे का आणि मोदींना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी पुढे कोन्ग्रेज ने सारे कुंभाड रचले असे तुम्हाला वाटते का

>> उत्तर हो असेच द्यावे ह्या पद्धतीने प्रश्न विचारुन तुम्ही तुमची खरी समजूत तर दाखवली आहेच. इशरत जहाप्रकरणाबद्दल न्यायालय काय म्हणेल तेच सत्य असं मी मानाय्चं ठरवलं आहे. मला काय वाटतं ह्याने तुम्हाला काय फरक पडतो?

तसेहे तुमच्या शिक्के मारण्याच्या उतावीळपणाबद्दल, घाई बद्दल, आंधळेपणाबद्दल, अजून काय बोलावे. तेव्हा असो. शिक्के मारण्याचा उतावीळपणा दाखवण्यापेक्षा शुद्धलेखन सुधारा, ते जास्त उपयोगी आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Mar 2016 - 4:46 pm | निनाद मुक्काम प...

इशरत जहाप्रकरणाबद्दल न्यायालय काय म्हणेल तेच सत्य असं मी मानाय्चं ठरवलं आहे. मला काय वाटतं ह्याने तुम्हाला काय फरक पडतो?
तुमच्या भाषेत सांगायचे तर इशरत जहा च्या ऐवजी गुजरात दंगल २००२ असा बदल तुम्ही करून पहा वरील विडीयो त्यानुसार फुटकळ लेख काढायची गरज भासणार नाही
अवांतर
मी शुद्ध लेखन सुधारतो ,तुम्ही तुमची मानसिकता सुधारा
जर न्यायालयाचा निकाल अंतिम सत्य मानणार आहात तर बाबूच्या विडीयो ला जी किंमत न्यायालय देणार आहेत तेवढीच तुम्ही सुद्धा द्या

मी मोदी किंवा हेंडली बद्दल काहीच म्हटले नाही. फक्त माहिती दुरुस्त केली. तुमचा प्रतिसाद मला उद्देशून नसेल तर ठीक.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Mar 2016 - 5:30 pm | निनाद मुक्काम प...

तो धाग्याच्या लेखकाला उद्देशून आहे

viraj thale's picture

13 Mar 2016 - 8:39 pm | viraj thale

डँबिस

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Mar 2016 - 8:44 pm | निनाद मुक्काम प...

माझे स्पष्ट मत आहे
१९४७ साली तर इंग्रजांनी पोलिस व लष्करी हस्तक्षेप करणे टाळले अश्यावेळी बहुसंख्य हिंदू जनतेवर व शिखांच्या वर अल्पसंख्यांक मुस्लिम मुस्लिम नेत्यांच्या आदेशावरून दंगल सुरु केली त्यावेळी हिंदूंना आपले संरक्षण करण्याची आझादी असती
त्यांना अहिंसे चे हलाहल जबरदस्तीने पाजले नसते तर पाकिस्तान बांगलादेश हे शब्द जगणे ऐकले नसते.
अल्पसंख्यांकांनी हिंसेच्या जोरावर जगाच्या समोर उघडणे आपली मनमानी पूर्ण केली त्यावेशी बेगडी अहिंसेच्या मर्यादा त्रुटी
दिसून आल्या
त्यानंतर उरलेल्या भारतात अल्पसंख्यांक अजूनही दंगली घडवू शकतात
मुंबईत पोलिस व पत्रकार ह्यांच्या समोर हे करतात
ते निव्वळ लज्जास्पद आहे
मला गुजरात मध्ये जे झाले त्याबद्दल अजिबात दुक्ख वाटत नाही ,
जे झाले ती नियती होती. अटल होती कधी ना कधी तरी हे होणारच होते
लज्जास्पद ची लिंक पहा
त्यात मुंबईचे कमिशनर दंगल कर्त्यांना सोडून द्या
सांगत होते कारण त्यांचा जमाव एवढा होता अटक करायला गेले असते तर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली असती
आणि आम्ही चार वकिलांना अटक झाली नाही म्हणून बोंबा मारतो त्यावेळी प्रस्रामाध्यामे पोलिस सरकार सारेच हतबल व चूप होते

ह्या लोकांना बाहेरचा फारसा अनुभव नाहीये. ना ह्यांना खरोखर विचार करायचा आहे. त्यामुळे नक्की सेक्युलारीस्म जिथे त्याचा उगम झालाय तो कसा वापरतात ते पहिलेच नाहीये त्यामुळे कळतच नाही. फक्त सवर्णांना आणि त्यातूने ब्राह्मांना विरोध म्हणजे सेक्युलारीस्म अशी संकल्पना आहे. त्याच्या पलीकडे नक्की काय आणि कसा आहे हे माहितीच नसल्याने आणि जे आहे ते आपल्या संकल्पनेच्या पूर्ण वेगळे असू शकते असेही लक्षात आल्याने झापड बंद करून फक्त २००२ ची दंगल इतकेच लक्षात ठेवले जाते. त्यामुळे तुम्ही वर लिहूनही झोपलेल्याचे सोंग काही उघडणार नाही.

आरोह's picture

13 Mar 2016 - 10:56 pm | आरोह

शब्दशः सहमत

आरोह's picture

13 Mar 2016 - 11:51 pm | आरोह

गांधीजी आणि नेहरूंनी हिंदूंचे प्रचंड नुकसान करून ठेवलंय. अहिंसेचा अतिरेक इतका केला कि हिंदूंची मानसिकता त्यामुळे पूर्ण बदलून गेलीय.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Mar 2016 - 12:14 am | निनाद मुक्काम प...

एवढाच लहान देश पाक
नुकताच स्वतंत्र झाला त्यावेळी भारताकडून ५५ कोटी येणे आहे
अश्यावेळी अजून देश म्हणून गव्हर्नन्स पासून अनेक गोस्घ्तींचे बस्तान बसायचे आहे , पण त्यांनी उद्दामपणे काश्मीर मध्ये आपली घुसखोर घुसवले त्यावेळी आता स्वतंत्र भारताकडे त्यांचे लष्कर आहे व आपले मुस्लिम बांधव अजूनही भारतात आहेत व पाकिस्तान मध्ये येण्यास निघाले आहेत ह्याची त्यांनी तमा बाळगली नाही .
कारण भेकड रोगट अत्यंतिक अहिंसक भारतीय नेतृत्व व संतावर त्यांना पूर्ण विश्वास होता , भारत नुकतच स्वतंत्र झाला आहे
दंगलग्रस्त भाग दोन्ही बाजूने शांत झाले नाही आहेत अश्यावेळी काश्मीर मध्ये परिस्थिती चिघळली आहे अश्यावेळी संत आपल्याच सरकारच्या विरुद्ध उपोषण करत आहेत.
स्वतः पद घ्यायचे नाही जबाबदारी घ्यायची नाही नेतृत्व करायचे नाही फक्त आश्रमातून सत्तेचा रिमोट कंट्रोल ह्यांना आपल्या हातात हव्या
व्यक्तिकेंद्रित राजकारण व्यक्तीपुजेचा उगम इथून सुरु झाला .
कारण आपण कितीही नरसंहार केला तरी समोर नैतिकता तत्वे अश्या शेवाळात लिप्त नेतृत्व आपले शष्प बिघडू शकत नाही अशी तत्कालीन पाकिस्तानी सरकारची समजूत होती ती दुर्दैवाने खरी ठरली
एवढी हरामखोरी करून अहिंसक नेतृत्वाने हा प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेउन पुढील अनेक दशके हिंसेचे पाट वाहण्याची सोय करून ठेवली

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

14 Mar 2016 - 8:47 am | खालीमुंडी पाताळधुंडी

मित्रांनो तुम्ही सगळे हरला आहात,या धाग्यावर चर्चा घडवण्याचा धागाकर्त्याचा हेतू पार पडलेला आहे.तसेच पन्नास च्या वर प्रतिसाद आलेले आहेत.या धाग्याला तुम्ही अनुल्लेखाने मारावयास हवे होत,असे वाटते

आनन्दा's picture

14 Mar 2016 - 9:37 am | आनन्दा

सहमत. असो, आपला तो बाब्या.

सुनील's picture

14 Mar 2016 - 9:43 am | सुनील

आपला तो बाब्या

आपला तो बाबू, असा किंचित फेरफार करावा काय? ;)

आनन्दा's picture

14 Mar 2016 - 9:53 am | आनन्दा

तुम्ही म्हणाल ते. शेवटी कोणत्याही बाजूने बघितले तरी पिवळे दिसायचे तर पिवळेच दिसणार.
आणि बाकी काय, घरोघरी मातीच्याच चुली, आणि नावडतीचे मीठ अळणी.

सुबोध खरे's picture

14 Mar 2016 - 9:51 am | सुबोध खरे

उलट धाग्याचा हेतू सफल झाला असेच मला वाटते.
केवळ मोदी द्वेषापायी त्यांनी हा तिसरा धागा काढला असेच दिसते. हे विडंबन नाही किंवा खरोखर चर्चा करावी अशी त्यांची इच्छा नाही तर आपला मुद्दा काहीही करून सिद्ध करावा हा हेतू आहे हेही स्पष्ट आहे. अन्यथा हि खाजवून खरुज काढण्याचे कारण दुसरे काही दिसत नाही.
जोकर साहेबांनी काळा चष्मा लावला आहे हे यातून ते स्वतःच सिद्ध करून दाखवत आहेत आणि ठाकूर साहेबांनी पण साम्यवादाचा पिवळा चष्मा घातला आहे त्यामुळे त्यांना सगळे जग लाल क्रांती विरुद्ध "क्रांती" करत आहे असा भास होत आहे.
त्यांनी कन्हैय्यचि बकरी पिळायला घेतली पण तो बोकड निघाला याशिवाय दैव दुर्विलास काय असावा.
दोघान्चे दुटप्पी वर्तन त्यांनी स्वतःच उघडे पाडले असल्यामुळे आता धाग्यात काही मलई राहिली नाही ज्यांना हवंय त्यांनी ताक फुंकून प्यावे एवढे बोलून मी रजा घेतो.

विवेक ठाकूर's picture

14 Mar 2016 - 10:28 am | विवेक ठाकूर

या घटनेला अनेक पैलू आहेत. तुम्ही माया कोदनानी प्रकरण वाचलंय का? त्या बाईंना कोर्टानं हत्त्याकांडाची किंगपीन ठरवलं आहे आणि २८ वर्ष कारवासाची सजा झालीये. त्यांना फाशी होऊ नये म्हणून कायकाय खटपटी केल्या गेल्या याची कल्पना आहे का?

भंकस बाबा's picture

14 Mar 2016 - 5:37 pm | भंकस बाबा

या लोकांना समजावून सांगणे फार कठिण आहे.
मला देखिल प्रतिसाद द्यायचा नव्हता पण तुमचे नाव बघितले तेव्हा फक्त तुम्हाला उत्तर द्यावेसे वाटले.
बाबू बजरंगी सारखेच उत्तर काहीसे राजिव गांधीनी 84च्या दंग्यानंतर दिले होते. काहीतरी मोठे वृक्ष कोसळतात तेव्हा..., ह्याच माणसाला पुढे भारताचा पंतप्रधान केले होते.
म्हणजे तुम्ही बलदंड आहात, हे समोरच्याला देखिल माहीत आहे, तरिही ते समोरचे शेम्बडे पोर तुमच्या कानफटात मारते. तुम्ही दुर्लक्ष केले तर तुम्हाला हिणवले जाते की तुम्ही षंढ आहात. जेव्हा तुम्ही आत्मरक्षेसाठी त्या पोराच्या कमरेत लाथ घालता व् त्या पोराला चिथावणाऱ्या काही मूर्खांची टाळकी सड़कता तेव्हा तुम्ही क्रूरकर्मा ठरता.
जरा गोधरा दंगलीच्या वेळचे काही मिडिया फुटेज पहा ज्यात खान्ग्रेसी बरळत आहेत. मेलेल्या कारसेवकाबद्दल एकहि शब्द ते बोलत नाही आहेत. वा रे असहिष्णुता! वा रे सेक्युलारिजम!
त्या 78 जणांना मारल्याबद्दल जन्मठेप ,फाशी नाही, आणि आमचा ओवेसीभाई याकूब मेमन ला फाशी दिल्यावर विचारतो आता बघुया माया कोडनानी व् बाबू बजरंगिला फाशी होते काय?
वरील सेक्युलर प्रतिसाद देणाऱ्यानी एकतर दंगली अनुभवल्या नाहीत. दंगलीच्या वेळी पोलिसांचे हात कसे बांधले जातात हे त्यांनी बघितले नाही म्हणूनच असे फ़ालतू धागे ते काढत बसतात.

तर्राट जोकर's picture

14 Mar 2016 - 6:46 pm | तर्राट जोकर

त्या 78 जणांना मारल्याबद्दल जन्मठेप ,फाशी नाही>> हे कोण ७८ जण?? गोद्राबळी ५९ आहेत ना??

>>
गोध्राप्रकरणी कोर्टाचा निर्णयः

On February 2011, the trial court convicted 31 people and acquitted 63 others, saying the incident was a “pre-planned conspiracy". The convictions were based on the murder and conspiracy provisions of Sections 302 and 120B of the Indian Penal Code respectively and under Sections 149, 307, 323, 324, 325, 326, 332, 395, 397, and 436 of the Code and some sections of the Railway Act and Police Act.[49] The death penalty was awarded to 11 convicts; those believed to have been present at a meeting held the night before the incident where the conspiracy was formed, and those who,according to the court, had actually entered the coach and poured petrol before setting it afire. Twenty others were sentenced to life imprisonment

Maulvi Saeed Umarji, who was believed by the SIT to be the prime conspirator, was acquitted[49] along with 62 other accused for lack of evidence.[59] The convicted filed appeals in the Gujarat High Court. The state government also challenged the trial court's decision to acquit 61 persons in the High Court and sought death sentences for 20 convicts awarded life imprisonment in the case

><

वरील सेक्युलर प्रतिसाद देणाऱ्यानी एकतर दंगली अनुभवल्या नाहीत. दंगलीच्या वेळी पोलिसांचे हात कसे बांधले जातात हे त्यांनी बघितले नाही म्हणूनच असे फ़ालतू धागे ते काढत बसतात.
>> संवेदनशील भागात राहणार्‍या आणि धार्मिक दंगली पाचवीलाच पुजलेल्या असलेल्यांना इथले काही सदस्य 'ह्यांना काही अनुभव नाही' असे म्हणतात तेव्हा हसावे की रडावे असा प्रश्न पडतो.

काही दारुड्यांची मुलं बापाचं दारू पिणं बघून बघून दारुडी होतात, काही मुलं तेच बघून दारूचा भयंकर तिरस्कार करतात. आपण कोणतं मूल व्हावं हे आपल्यावर असतं.

अनुप ढेरे's picture

14 Mar 2016 - 10:22 am | अनुप ढेरे

काय म काय ठरलं? बाबुराव खर बोल्तायत का खोटं?

अर्धवटराव's picture

14 Mar 2016 - 10:53 am | अर्धवटराव

बरं वाटलं. सुरुवातीला अगदीच अडखळला होता बिचारा.

टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला
तर्राट जोकर - Tue, 08/03/2016 - 07:32
टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत व्हायचं नाही. कारण मला काय वाटतं ह्याने त्याला कोर्ट काय शिक्षा देईल हे ठरत नसतं.

न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्‍यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्‍यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.

ईथे तजो साहेबांशी सहमत. बाकी चालुद्या

चेक आणि मेट's picture

14 Mar 2016 - 12:55 pm | चेक आणि मेट

निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.

हे बाकि छान आहे

तर्राट जोकर's picture

14 Mar 2016 - 12:47 pm | तर्राट जोकर

बर्‍याच चष्मे लावलेल्या लोकांना ह्या धाग्याचा प्रांजळ हेतु लक्षात आला नाही किंवा मी घसा कोकलून सांगतोय तर विश्वास ठेवायचा नाही. असो, ज्याचे त्याचे विचार.

हा धागा काढण्याचा उद्देश कुणाला मोदींविषयी विखारी द्वेष वाटत असेल तर वाटु देत. मला काहीही फरक पडत नाही. कारण जे मुळात नाही त्यासाठी का वैताग करावा. पण काही लोकांना तो स्वतःहून करुन घ्यायचा असतो. त्यात मी काही करु शकत नाही. लोक उतावीळ पणे मोदींच्या विरोधात असलेली एकही गोष्ट आगीचा बंब घेऊन विझवायला येतात हे इथे सिद्ध झाले. मी आधीच दुसर्‍या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे मोदींनी स्वत: २००२ चा लोड घेणे सोडून दिलेय पण भक्त अजून सोडायला तयार नाहीत हेही सिद्ध झाले. टिका करणारे कसे लायकच नाहीत, महत्त्वाचे नाहीत हे सिद्ध करायची पराकाष्ठाही इथे झाली. मोदींविरूद्ध बोलत राहीलात तर तुम्हाला खास मान-सन्मान, आदर, ओळख मिळणार नाही, तुमच्या इतर विषयातील मतांनाही आम्ही किंमत देणार नाही हेही सांगून झाले. तुम्ही मोदींविरुद्धच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करताच असा अट्टाहास केला गेला आणि तो अट्टाहास अजिबात चुकीचा नाही असेही काही सदस्यांना इथे वाटते. http://www.misalpav.com/comment/814473#comment-814473 इथे जे मी बोललो ते सगळे सत्य करायचा चंग बांधला आणि पुर्णत्वास नेला. या धाग्यावर एकही प्रतिक्रिया आली नसती तर मला जास्त आनंद झाला असता. असो.

धाग्याचा उद्देश दुसर्‍याच प्रतिक्रियेत दिला आहे. न्यायालयाचे निर्णय जेव्हा आपल्या बाजूने असतात तेव्हा न्यायालयाने योग्य निर्णय दिला, अखेर न्याय मिळाला असा आनंद व्यक्त करायचा. जेव्हा आपल्या बाजूने निर्णय नसतो तेव्हा पुरावे कमी पडले, पोलिसांना पुरावे गोळा करतांना अडचणी आल्या, वकिल बाजू मांडण्यात कमी पडले, न्यायालयात फक्त निर्णय दिला जातो, न्याय नाही अशा बोंबा मारायच्या. हा दुटप्पीपणा आहे. हा उघडा पाडण्यासाठी हा धागा होता. करिम टूंडा हा निर्दोष सुटला तेव्हा खरेसरांनी त्या न्यायालयीन निर्णयात आलेल्या अडचणींचा पाढा वाचला, निष्पाप लोकांच्या बळी गेलेल्यांची द्वाही दिली. तेच बाबु बजरंगी प्रकरणात झाले तर पुरावा नाही म्हणजे दोषी नाही असा काही सदस्यांनी पवित्रा घेतला. असे अनेक खटले असतात जिथे पुराव्या अभावी गुन्हेगार सुटून जातात, निर्दोष बळी जातात. कन्हया प्रकरणात आपण न्यायालयाचा निर्णय योग्य अशी भूमिका घेतोय, त्यात कसे सुनावले इत्यादीबद्दल पेढे वाटत फिरतो. अफझल प्रकरनात फाशी योग्य ठरवतो. मग करिम टूंडाबद्दल पुरावे नाहीत म्हणून निर्दोष सुट्ला तर वाईट वाटतं. म्हणजे तुमच्या मनाच्या न्यायालयात तुम्ही आधीच निवाडा केलाय. आपल्या आवडीचा निर्णय तेव्हा न्यायालयाला समर्थन, नावडता निर्णय तो न्यायालयीन व्यवस्थेचा कमकुवतपणा. इथे हे झिरोडाऊन होतं. आपला आणी परका. बस एवढंच. बाकी सारं ढोंग आहे. निष्पाप लोकांचे गेलेले जीव इत्यादी.

गोध्राची घटना हे ट्रीगर आहे असे मानणार्‍या सदस्यांनी गुजरात दंगल समर्थनीय ठरवली. तिथे निष्पापांचे बळी गेले हे लक्षात घ्यायचे नाही. एक आसुरी आनंद जो बाबु बजरंगीच्या चेहर्‍यावर आहे तोच इथल्या गुजरात दंगलीचे समर्थन करनार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसतो. तात्त्विक दृष्ट्या काही फरक नाही. आपले क्रौर्य, निर्ममता जस्टीफाय करायला गोध्राचे फक्त निमित्त पुढे करत आहात. देशात लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर, कायद्याचे राज्य, गुन्हे अन्वेषण विभाग, न्यायव्यवस्था ह्या अस्तित्वात नाहीत हे कबूल करत आहात. भारत जणू पुर्वमध्ययुगिन काळात आहे असे इथल्या काही तथाकथित उच्चशिक्षित, चांगल्या पदांवर महत्त्वाचे काम करणार्‍या सुसंस्कृत सदस्यांना वाटते. मुस्लिमांच्या क्रौर्यांच्या कहान्या रंगवून रंगवून सांगणार्‍या बैठकींनी तुम्हाला त्यांच्या समकक्ष केले आहे. आपलाच चेहरा किती भेसूर दिसतो हे ह्या विडियोतल्या बाबु बजरंगीच्या चेहर्‍याशी म्याच करुन पाहा. एकही प्रतिक्रिया अशी नाही जिथे बाबु बजरंगीच्या कृत्याचा स्पष्ट निषेध व्यक्त केला गेला. सरळ आहे, बाबु बज्रंगी तुम्हाला आपला वाटतो. यु रिलेट विथ हिम. तुम्हालाही त्याने जे केले तेच करावे वाटले असते. गर्भवतीच्या पोटातल्या बाळाला सुद्धा कापणारी हिस्त्रता तुमच्याही मनात भरलेली आहे. इथल्या प्रतिसादांवरुन तुम्ही नागडे झाला आहात. निष्पक्ष असण्याचे, निष्पापांबद्दल जाण असण्याचे ढोंग मिरवणे उघडे पडले आहे.

आता माझे मत. जे नेहमीच न्यायालयासोबत राहिले आहे. मोदींविरुद्ध पुरावे नाहीत तर नाहीत. त्यांना दोषी मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा माझ्या मानण्या न मानण्याने असा काय फरक पडतो. मला साबरमती एक्सप्रेसमधे बळी गेलेल्या निष्पाप जीवांबद्दलही तेवढीच काळजी आहे, त्यांना मारणार्‍यांबद्दल अतिव संताप आहे. कोर्टाने त्यांना योग्य निर्णय देऊन शिक्षा केली आहे. त्या निर्णयाचे समर्थन आहे. निष्पाप जीव कोणतेही असो, त्यांचे जाणे दुर्दैवी असतेच. ते कोणत्याही जातीधर्माचे, देशाचे असो. माझ्या मनात कणव आहे. काही लोक भेद करतात. मला जमत नाही. काही हिंदू "जबरा शिक्षा मिळाली त्यांना, असेच कापले पाहिजे ह्यांना" असे म्हणून गुजरात दंगलीचे समर्थन करतो तेव्हा मी त्याच्याशी रिलेट करु शकत नाही. मी त्यांच्य भाषेत फुरोगामी, खाण्ग्रेसी, लिब्टार्ड, विदेशी फंडावर जगणारा असा असतो. एवढा सगळे बिल्ले मिरवनारा मी 'हिंदू' मात्र नसतो. त्यांच्या लेखी खरा हिंदू म्हणजे मुस्लिमांविषयी वैरभाव ठेवणारा. असो बापडे. संवेदनशील भागात राहणार्‍या आणि धार्मिक दंगली पाचवीलाच पुजलेल्या असलेल्यांना इथले काही सदस्य 'ह्यांना काही अनुभव नाही' असे म्हणतात तेव्हा हसावे की रडावे असा प्रश्न पडतो.

धाग्याचा उद्देश हिंदु विरुद्ध मुस्लिम किंवा मोदी असा नाही त्यामुळे त्याविषयी चर्चा मी करणार नाही. धाग्याचा विषय न्यायालयिन निर्णयांबद्दलचे बायस हा आहे.

उपरोक्त प्रतिसाद कोणत्याही सदस्याला वैयक्तिक उद्देशून नाही. अंगावर घेऊ नये.

चेक आणि मेट's picture

14 Mar 2016 - 1:28 pm | चेक आणि मेट

मोदींविरूद्ध बोलत राहीलात तर तुम्हाला खास मान-सन्मान, आदर, ओळख मिळणार नाही, तुमच्या इतर विषयातील मतांनाही आम्ही किंमत देणार नाही हेही सांगून झाले.

एक नंबरचे खोटारडे आहेत तुम्ही,
असे कोणी म्हटले आहे,
मोदींना विरोध जरूर करा फक्त खोडसाळपणा करू नका असं म्हटलं आहे,
फोलपणा तुम्ही मान्य करत नाही.
तुमच्या प्रतिसांदांमध्ये प्रचंड विरोधाभास असतो.

एकही प्रतिक्रिया अशी नाही जिथे बाबु बजरंगीच्या कृत्याचा स्पष्ट निषेध व्यक्त केला गेला.

साहेब तुम्ही तर कुठे माझ्या धाग्यावर देशविरोधी घोषणाबाजीचा निषेध व्यक्त केला होतात?शेवटी मी तीन-चार वेळा विचारून ते तुमच्याकडून वदवून घेतले.
.
.
बाकि प्रवचन छान आहे,

उपरोक्त प्रतिसाद कोणत्याही सदस्याला वैयक्तिक उद्देशून नाही. अंगावर घेऊ नये.

असो
बाकि शब्दांचे भावनिक खेळ सारे.

प्रतिसाद आवडला. विशेषतः तुमची भूमिका. आता माझे २ पैसे.
१. मुळात हा सगळा विषय सुरू झाला कन्हैया वरून, जिथे विठांनी धागा काढून कन्हैयाचे उदात्तीकरण करण्याअचा प्रयत्न केला. तो देशद्रोही आहे की नाही हा वेगळा विषय आहे, पण ज्या प्रकारे पूर्वी मिपावर एका आयडीने केजरीवालांचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला होता, आणि सगळ्या विरोधकांना शिंगावर घेतले होते, त्याची बर्‍याच मिपाकरांना आठवण झाली, आणि बरेच मिपाकर जुने हिशोब चुकते करायला इथे आले.
२. विठांच्या धाग्यात झालेल्या वादंगावरूनच पुढचा अफझल गुरूचा धागा आला. गंमत अशी आहे की दोन्ही धाग्यांवर मोदींबद्दल कारण नसताना भरपूर चर्चा झालेली होती. अगदी भक्त आणि विरोधक दोघांनी भरपूर धुणी धुतलेली होती. आणि त्यानंतर मोदींना कारण नसताना मधे आणणे वगैरे विषय देखील झाले.

आता एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही धागे वेगवेगळे असले, तरी विषय एकच होता, तो म्हणजे अफझल गुरू. कन्हैयाच्या धाग्यावर देखील अफझल गुरूचाच विषय मूळ होता.

आता तुम्ही तिसरा धागा काढलात, त्यामध्ये या दोन गोष्टींशी संबंध नसलेली गोधरा दंगल मध्ये आणून मोदींना टारगेट करण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही भले म्हणाल मी टारगेट केले नाही, पण तो व्हिडिओ आणि काही प्रतिसाद हेच दाखवतात. अश्या परिस्थितीत मोदीसमर्थक गप्प राहतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. हे म्हणजे आपण दगड मारायचा आणि समोरचा मारायला आला की तो बघा कसा मारतो म्हणून कांगावा करायचा. याला अर्थ नाही.

आता विषय तुम्ही वर आणलेल्या मुद्द्यांचा -

लोक उतावीळ पणे मोदींच्या विरोधात असलेली एकही गोष्ट आगीचा बंब घेऊन विझवायला येतात हे इथे सिद्ध झाले. मी आधीच दुसर्‍या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे मोदींनी स्वत: २००२ चा लोड घेणे सोडून दिलेय पण भक्त अजून सोडायला तयार नाहीत हेही सिद्ध झाले.

मोदींनी सोडले का हे माहीत नाही, पण भक्तांनी हे लोड घेतले आहे कारण विरोधकांनी अजून हे लोड घेणे सोडले नाही. मोदींविरुद्ध बोलायला दुसरा कोणताही समर्पक मुद्दा न मिळणे हे विरोधकांचे देखील अपयशच आहे नाही का? पण अजून विरोधक चांगले मुद्दे उचलायला तयार नाहीत. खरेतर मोदींच्या कार्यकाळात धीम्या गतीने होणार्‍या आर्थिक सुधारणा हा देखील एक महत्वाचा विषय आहे विरोधकांसाठी, किंवा शेतकरी आत्महत्या, जीडीपी वगैरे बरेच मुद्दे आहेत. पण अजूनही विरोधक असहिष्णुता किंवा जातीय तणाव याच मुद्द्यांवरून आरडाओरडा करताना दिसतात. त्यामुळे भक्तांना देखील मधे यावेच लागते. खरेतर बर्‍याच मोदीसमर्थकांमध्ये सरकारच्या कामगिरीबद्दल असमाधान आहे, पण असा आक्रस्ताळेपणा करून विरोधक स्वतःचीच किंमत कमी करून घेत आहेत. खरे तर मोदीसमर्थकांना २००२ च्या दंगलीबद्दल काहीही घेणेदेणे नाही. त्यांचा मुद्दा आहे आर्थिक विकास. मुस्लिम समाजामध्ये बालवयापासून आर्थिक विकासाचे कार्यक्रम राबवल्याशिवाय त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणता येणार नाही याबद्दल बर्‍याच संघीय लोकांमध्ये देखील एकमत आहे. पण मुळात माध्यमे/ पुरोगामी हा विषय अयोग्य तर्हेने हाताळत असल्यामुळे त्यांना देखील विरोधात जाअण्याशिवाय पर्याय उरत नाही.

न्यायालयाचे निर्णय जेव्हा आपल्या बाजूने असतात तेव्हा न्यायालयाने योग्य निर्णय दिला, अखेर न्याय मिळाला असा आनंद व्यक्त करायचा. जेव्हा आपल्या बाजूने निर्णय नसतो तेव्हा पुरावे कमी पडले, पोलिसांना पुरावे गोळा करतांना अडचणी आल्या, वकिल बाजू मांडण्यात कमी पडले, न्यायालयात फक्त निर्णय दिला जातो, न्याय नाही अशा बोंबा मारायच्या.

असे आपण सगळेच करतो, माणूस हा मुळात स्वार्थी आहे, प्रथम स्वतः, मग कुटुंब, मग सगेसोयरे, मग जात, धर्म वगैरे अशी त्याची स्वार्थाची पायरी आहे. याच्या पलिकडे जाऊन जो विचार करतो त्याला संत म्हणतात. खरेतर तुमच्याअ विचारवंताला हे माहीत असायला हवे. हे केवळ भक्तालाच लागू होत नाही, तर विरोधकाला देखील लागू होते. परंतु देश चालवणे किंवा न्याय करणे हे भावनिक पातळीवर होत नाही. आणि जोपर्यंत आपल्या मनासारखे होत नाही तोपर्यंत समोरच्याला आपल्यावर अन्याय होतो आहे असेच वाटत राहते. तसे नसते तर सुप्रीम कोर्टात एव्हढे खटले गेलेच नसते. विषय असा आहे की हा आरोप मोदीभक्तांवर करताना तुम्ही पूर्ण निष्पक्षपाती आहेत असा तुम्हाला विश्वास आहे का? आणि असेल तर मग तो तुमच्या जालीय वावरात का दिसत नाही?

गोध्राची घटना हे ट्रीगर आहे असे मानणार्‍या सदस्यांनी गुजरात दंगल समर्थनीय ठरवली. तिथे निष्पापांचे बळी गेले हे लक्षात घ्यायचे नाही. एक आसुरी आनंद जो बाबु बजरंगीच्या चेहर्‍यावर आहे तोच इथल्या गुजरात दंगलीचे समर्थन करनार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसतो.

याबाबत अंशतः सहमत. गोध्राची घटना हे ट्रीगर आहे, असे माझे देखील मत आहे. अगदी साधे उदाहरण देतो . बहुतांश घरांमध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा ते अचानक उद्भवलेले नसतात. परंतु त्या सगळ्या वादांना काहीतरी ट्रिगर असतो. इथे देखील हेच झालेले आहे. बर्‍याच दिवसांचा साठून राहिलेला राग जेव्हा असा बाहेर पडतो तेव्हा तो असेच विकृत रूप घेऊन बाहेर पडतो, मग ती कौटुंबिक हिंसा असो किंवा सामजिक. त्यावरचे उपाय हे मूलगामी आणि दूरगामी असावे लागतात. केवळ तू हिंसक आहेस आणि तुमचा समाज्/नेता हिंसक आहे असे आरोप करून हे प्रश्न सुटत नाहीत. तर त्यासाठी दीर्घकाळ चालणारी लढाई लढावी लागते. परंतु "गोध्राची घटना हे ट्रीगर आहे" याचा अर्थ गुजरात दंगलीचे समर्थन केले असा होत नाही. गोधराची घटना ही ट्रिगर होते, आणि मला गुजरात दंगलीबद्दल दु:ख आहे या दोन वेगळ्या धारणा आहेत आणि त्या एकाच वेळेस एक माणूस बाळगू शकतो. परंतु रागाच्या भरात दारूड्या बापाच्या डोक्यात दगड घालणारा मुलगा, आणि पैशासाठी बापाचा खून करणारा मुलगा या दोघांना जशी वेगवेगळ्या हाताळणीची गरज असते, तशीच ती दंगलखोर आणि अतिरेकी यांना हाताळताना देखील दाखवावी लागते. हे आक्रस्ताळेपणाचे काम नव्हे, नाहीतर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय?

आता माझे मत. जे नेहमीच न्यायालयासोबत राहिले आहे. मोदींविरुद्ध पुरावे नाहीत तर नाहीत. त्यांना दोषी मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा माझ्या मानण्या न मानण्याने असा काय फरक पडतो. मला साबरमती एक्सप्रेसमधे बळी गेलेल्या निष्पाप जीवांबद्दलही तेवढीच काळजी आहे, त्यांना मारणार्‍यांबद्दल अतिव संताप आहे. कोर्टाने त्यांना योग्य निर्णय देऊन शिक्षा केली आहे. त्या निर्णयाचे समर्थन आहे. निष्पाप जीव कोणतेही असो, त्यांचे जाणे दुर्दैवी असतेच. ते कोणत्याही जातीधर्माचे, देशाचे असो. माझ्या मनात कणव आहे. काही लोक भेद करतात. मला जमत नाही. काही हिंदू "जबरा शिक्षा मिळाली त्यांना, असेच कापले पाहिजे ह्यांना" असे म्हणून गुजरात दंगलीचे समर्थन करतो तेव्हा मी त्याच्याशी रिलेट करु शकत नाही.

याच्याशी असहमत होण्याचा प्रश्नच येत नाही. पण हीच गोष्ट इतर दंगलींना देखील लागू होते हे पण लक्षात असावे. आणि स्वार्थाच्या क्रमाप्रमाणे माणसाची सहानुभूती आपल्या धर्मबांधवांकडेच असणार. बाकी हे "जबरा शिक्षा मिळाली त्यांना, असेच कापले पाहिजे ह्यांना" मात्र मी देखील ऐकलेले आहेम आणि त्यावेळेस माझी प्रतिक्रिया देखील WTF अशीच होती. याला एक्सप्लनेशन नाही, आणि नाहीच. परंतु त्याच वेळेस हे देखील तेव्हढेच खरे, की गुजरात दंगलीच्या वेळेस भले मोदींची सहानुभूती हिंदूंच्या बाजूने असेल (हे मी समजा वादासाठी मान्य केले) तरी देखील त्यांनी राजधर्म पाळला हे देखील खरे आहे.

जाता जाता -
तुम्ही ज्यांना भक्त म्हणताय, ते खरे तर फार पूर्वीपासून् भाजपासमर्थक होते/ आहेत. त्यांची संख्या देखील खूप होती. पण माध्यमे हातात नसणे, मध्यमवर्गीय असल्यामुळे पैसे नसणे, पांढरपेशे असल्यामुळे आंदोलने करण्याची कुवत नसणे. या गोष्टींमुळे या वर्गाला अनेक वर्षे आपले कोणीच ऐकत नाहीये असेच वाटत होते. आता त्यांच्या हातात समाजमाध्यमे आली आहेत, प्रस्थापित माध्यमे अजून देखील त्यांचे ऐकत नाहीत. ते आपल्याअपल्यात बोलतात. त्याला आता थांबवणे अशक्य आहे. ती मॅच्युरिटी भारतात काय, जगात कुठेही नाही. अन्यथा ट्रंप महाशय एव्हढे बोलून देखील त्यांना इतका पाठिंबा मिळाला नसता. (कदाचित अमेरिकेतही मिडिया हिलरींच्या बाजूने असेल. पण तो एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे). तुम्ही त्या भक्तांना विरिध करून त्यांचेच महत्व वाढवताय, हे लक्षात आले तरी माझा हा मेगाबायटी प्रतिसाद संपन्न झाला असे समजेन.

+१
चांगला प्रतिसाद..आवडला..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Mar 2016 - 10:18 pm | निनाद मुक्काम प...

उत्कृष्ट प्रतिसाद
मोदी समर्थक व मोदी विरोधक ह्यांना २००२ चे काडीमात्र स्वारस्य नाही आहे. त्यांना १९८४ मध्ये नाही आहे
इतकेच कशाला तामिळनाडू ची जनता श्रीलंकन सरकारने केलेल्या नरसंहारावर शुब्ध आहे मात्र उर्वरीत भारतीयांना त्याचे देणे घेणे नाही हे कडवे सत्य आहे
कारण भारतीयांनी हिंसा दंगा धर्म जातीवर भांडण हे लहानपणापासून पाहिले आहे.
आता त्यांना विकास भांडवलशाही चंगळवाद हवा आहे. ह्या देशात बीफ वरून हत्या हा राजकीय मुद्दा विरोधक बनवतात तेव्हा तामिळनाडू मध्ये नुकतेच उच्चवर्गीय पित्याने दलित जावयाला मारले तेही आधी तुला मारणार हे वारंवार सांगून
तेथे भाजपचे अस्तित्त्व शून्य त्यामुळे हे प्रकरण भाजपवर शेकत येत नसल्याने ह्या मुद्याला राजकीय सोडा पण मुख्य पटलावर राजदीप सारखे आणत नाहीत

बाप्रे !
विवेक ठाकूर - Sat, 12/03/2016 - 01:03
हे नरेंद्र भाई कोण ? सध्या ते कुठे असतात आणि काय करतात ?

प्रतिसाद द्या
कुठल्यातरी ऑफिसमधे झाडू
तर्राट जोकर - Sat, 12/03/2016 - 01:18
कुठल्यातरी ऑफिसमधे झाडू मारतांनाचा फोटो बघितला होता. तेच असतील ते. पण तो फोटोही फेक होता म्हणे त्यांच्यासारखाच.

प्रतिसाद द्या

याचा अर्थ काय?
बाबू बजरंगीच्या कृत्याचा निषेध कुणी केला नाही याचा अर्थ सगळ्यांचं त्याच्या कृत्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन आहे हा अर्थ कसा काय काढलात? तुम्ही त्याच्याशी relate करता हा निष्कर्ष कशावरून काढलाय? तुम्हालाही त्याने जे केले तेच करावे असे वाटले - हा निष्कर्ष कशावरून?

मला साबरमती एक्सप्रेसमधे बळी गेलेल्या निष्पाप जीवांबद्दलही तेवढीच काळजी आहे, त्यांना मारणार्‍यांबद्दल अतिव संताप आहे.

याचा उल्लेख एकदाही तुमच्या धाग्यात नाही, या शेवटच्या प्रतिक्रियेशिवाय. म्हणजे तुम्हाला गोध्र्यामध्ये मारल्या गेलेल्या लोकांबद्दल काहीही वाटत नाही - असा निष्कर्ष बाकीच्यांनी काढला पाहिजे - तुमचाच न्याय वापरून.

कोर्टाने त्यांना योग्य निर्णय देऊन शिक्षा केली आहे. त्या निर्णयाचे समर्थन आहे.

असाच विचार लोक बाबू बजरंगीबद्दल करत असतील असं तुम्हाला का वाटत नाही? तुम्ही ते बाबू बजरंगीच्या कृत्यांचं समर्थन करतात असं मानून मोकळे झालात.

आता माझे मत. जे नेहमीच न्यायालयासोबत राहिले आहे.

हे जर खरं असेल तर लोकांनी प्रतिक्रिया न दिल्याचा अर्थ लोक बाबू बजरंगीशी relate करतात आणि त्याच्या कृत्यांना त्याचा पाठिंबा आहे आणि समर्थन आहे असा काढू नका. न्यायालय पूर्वग्रहदूषित दृष्टीने चालत नाही. आपण जर न्यायालयाचा सन्मान करत असू तर आपणही पुराव्यांशिवाय निष्कर्ष काढणं सोडायला हवं.

sagarpdy's picture

14 Mar 2016 - 2:36 pm | sagarpdy

एकदम सहमत

बाकी लेखकहो, लेख लिहून झाल्यावर वा त्याच्या प्रस्तावनेत तुम्हाला नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे ते लिहित चला (म्हणजे नंतर "भांडे लपवण्याचे" आरोप होत नाहीत)

गामा पैलवान's picture

14 Mar 2016 - 1:08 pm | गामा पैलवान

तजो,

मी तुमच्या वरील प्रतिसादाशी फारसा सहमत नाही. पण एक गोष्ट मात्र रोचक वाटली.

>> मुस्लिमांच्या क्रौर्यांच्या कहान्या रंगवून रंगवून सांगणार्‍या बैठकींनी तुम्हाला त्यांच्या समकक्ष केले आहे.

हे खरोखरंच झालं तर मुस्लिम क्रौर्य वाढेल की कमी होईल?

आ.न.,
-गा.पै.

बाळ सप्रे's picture

14 Mar 2016 - 1:19 pm | बाळ सप्रे

बर्‍याच अंशी सहमत..

पण जसं कोणत्याही राजकीय पक्षाला क्लीन चीट देउन प्रत्येक वेळा पाठीशी घालता येत नाही तसचं.. न्यायालयांनादेखिल क्लीन चीट देणं कठीण वाटतं कधी कधी.. शेवटी तीदेखिल माणसचं असतात.. कधी कधी निष्पक्ष कधी तर सत्ताधार्‍यांच्या प्रभावाखाली .. पण शेवटी न्यायालयाचा निर्णय अंतिम मानणे सिस्टीम टिकवण्यासाठी अनिवार्य आहे. पण सिस्टीम सुधारण्यासाठी त्यावर देखिल चर्चा आवश्यक आहे. जसं खेळात सामना चालू असताना पंचांचा निर्णय अंतिमच पण नंतर तो कसा जास्त न्याय्य होउ शकेल यासाठी चर्चा हवी.. पण तिथेदेखिल माझ्याविरुद्ध गेलेलेच निर्णय कसे चुकले याऐवजी कींवा माझ्याविरुद्धच कसे जास्त निर्णय गेले याऐवजी एकूण निर्णायात चुका किती याचे निराकरण नि:पक्षपातीपणे होण्यासाठी तारत्म्य हवे.

नाना स्कॉच's picture

14 Mar 2016 - 1:30 pm | नाना स्कॉच

प्रश्न आपण तजो ह्यांना विचारला आहात तरी मधे बोलल्या बद्दल आगाऊ माफ़ी मागत एक सांगू इच्छितो, आपण विचारलेत की

हे खरोखरंच झालं तर मुस्लिम क्रौर्य वाढेल की कमी होईल?

तर मुस्लिम क्रौर्य कमी होईल का ते माहीती नाही, हिंदु क्रौर्य म्हणजे काट्याने काटा असेल का ते ही माहीती नाही, हे ही माहीती नाही कारण मी समजशास्त्रज्ञ नाही अन मला त्यात विशेष गती ही नाही

तरीही

"An eye for an eye makes the whole whole world blind"

हे एका महान (आमच्यालेखी) असलेल्या *विभूती चे वचन आठवले.अधिक काय बोलणार

*नाव मुद्दाम घेत नाही कारण वाचणारे किमान सुज्ञ आहेतच अन ती विभूती बऱ्याच लोकांस त्याज्य आहे

धन्यवाद.

गामा पैलवान's picture

14 Mar 2016 - 7:15 pm | गामा पैलवान

स्कॉचनाना, तुमच्या त्या विभूतीस मुस्लिमांची हिंसा मान्य होती. पण हिंदूंनी जर्रा डोळे वटारले की यांचा थयथयाट सुरू होत असे. अशा विभूतीच्या फडतूस समाधानासाठी हिंदूंनी आपला जीव गमवावा का?
आ.न.,
-गा.पै.

नाना स्कॉच's picture

14 Mar 2016 - 7:19 pm | नाना स्कॉच

असो! गैरसमज भरपुर आहेत तुमचे, इथे नवा विषय नको, नंतर विषयानुरूप बोलता येईल,

आभारी

नाना

अप्पा जोगळेकर's picture

14 Mar 2016 - 1:59 pm | अप्पा जोगळेकर

'शिळ्या कढीला ऊत' नावाचा नवीन विभाग सुरु करावा अशी संपादक मंडळास विनंती.

पक्षी's picture

14 Mar 2016 - 5:10 pm | पक्षी

खिक्क...

अनिरुद्ध.वैद्य's picture

14 Mar 2016 - 5:39 pm | अनिरुद्ध.वैद्य

हा एकच प्रतिसाद प्रचंड आवडला.

पिलीयन रायडर's picture

14 Mar 2016 - 6:11 pm | पिलीयन रायडर

फार फार मनातुन अनुमोदन!!

कंटाळा येत नाही का? सगळीकडे एकच एक विषय बोलुन बोलुन...

बोका-ए-आझम's picture

14 Mar 2016 - 9:55 pm | बोका-ए-आझम

आजकाल मिपावर यायचाच कंटाळा येतो.

बेकार तरुण's picture

15 Mar 2016 - 7:23 am | बेकार तरुण

पहिल्या पानावर निम्मे धागे चिखलफेकीचेच असतात, आणी तेच जाणकार आणी तेच मुद्दे आणी त्याच मारामार्‍या !

ह्यासाठी वेगळे दालनच उघडुन दिले तर !

गामा पैलवान's picture

15 Mar 2016 - 12:15 pm | गामा पैलवान

बेत, धुळवडीसाठी वेगळं मैदान आखून दिलं जात नाही. लोकांना सार्वजनिक ठिकाणीच ती खेळायला आवडते.
आ.न.,
-गा.पै.

पक्षी's picture

15 Mar 2016 - 11:31 am | पक्षी

अगदि सह्मत...

आज काल फारच कंटाळा येतो या असल्या useless ani hopeless धाग्यांचा आणि प्रतिसादांचा

तेच ते मोदि/कॉंग्रेस/ब्रिगेड/हिंदू/मुस्लिम/ब्राह्मण/.....(दादा/फुजी/नाना/हितेश/तजो).

बाकीचे जाऊदे, पण मिपा वर अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट लेख लिहिणारे कशाला अश्या फालतू धाग्यांना footage देतात.

असल्या काथ्याकुटातून कुठलच conclusion निघालेलं नाही आणि निघत नाही, पण चर्चा भलतीकडेच भटकते.

असले धागे वाचून खुपचं negative वाटत....

ह्म्म्म.........

जेपी's picture

14 Mar 2016 - 7:59 pm | जेपी

आगा 100 झाले की,
त्यानिमीत्त सर्वांना 'बजरंगी भाईजान' चित्रपटाचे मॅटिनी पास* देऊन सत्कार करण्यात येत आहे..

-शुभच्छुक-जेपी आणी मॅटिनी शो प्रेमी कार्यकर्ते..

*पासच ब्लॅक करु नये..

प्रदीप साळुंखे's picture

14 Mar 2016 - 8:36 pm | प्रदीप साळुंखे

खिक...
तुम्ही नेमकं सावज टिपून ठेवता कि काय?
49,99 प्रतिसाद कि एकदम झडप घालून सत्कार करून रिकामे होता.:'(
.
.
"वास्तविकतेशी प्रांजळपणाची भेट" पार्ट 4 कधी येणार काथ्याकूटक्यांनो??

तर्राट जोकर's picture

14 Mar 2016 - 8:56 pm | तर्राट जोकर

"वास्तविकतेशी प्रांजळपणाची भेट" पार्ट 4 कधी येणार काथ्याकूटक्यांनो??

>> आता कोणाचा नंबर? १९८४ बद्दल कोणाचा स्टिंग, मुलाखत आहे का? पार्ट ५ वाल्यांनी आणीबाणी तयार ठेवा.

असे करत करत पार्ट ७८३४८९ हा १९ लाख वर्षांआधी रिवत (का रायवत?) इथं झालेल्या होमो सेपियन्सच्या आक्रमणाचाही असू देत. तेवढंच घासकडवी सरांना पुरक लेखमाला होईल आणि हेही कळेलः माणूस कधीच, कशानेच बदलत नाही. भांडणाची कारणे आणि मारामारीची साधने बदलतात. भांडण करण्याची खुमखुमी काही बदलत नाही.

परत एकदा, पुर्णपणे सहमत.

नाखु's picture

15 Mar 2016 - 9:24 am | नाखु

"आनंदा" यांच्या प्रतिसादासाठी हा धागा वाचनखूण केला आहे.

बाकी इथले बरेच मिपाकर हे न्यायालयाच्या आणि संसदेच्या, घटनेच्याही,देशहिताच्या बरेच वर आहेत. आणि त्या बद्दल मिपाकरांनी अभिमान बाळगला पाहिजे (अमेरिका,इंग्लड इथेच मार खातात).

स्वतंत्र धुळवड विभाग झालाच पाहिजे.

नुरा कुस्तीला वैतागलेला नाखु

धन्यवाद. या विषयावर एक पूर्ण चर्चा घडवून आणायचा मानस आहे. जरा हा धुरळा बसला की पाहतो.

तर्राट जोकर's picture

15 Mar 2016 - 12:03 pm | तर्राट जोकर

बरेच लोक राजकिय चर्चांच्या नावाने बोटे मोडतात, मेगाबायटी प्रतिसादांबद्दल नाकं मुरडतात. त्यांना ते वाचल्याशिवाय समजत असेल काय? जर वाचण्याची आवड व गरज वाटते तर मग इथे अशा राजकिय चर्चा-प्रतिसादांबद्दल नाकं का मुरडतात? मला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-)

चेक आणि मेट's picture

15 Mar 2016 - 12:21 pm | चेक आणि मेट

ला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-)

अगदी अगदी..
मोदींना मध्ये आणून धुरळा उडवायचा आणि नंतर मोदींचा काय संबंध म्हणून आरडओरडा करायचा,असा वाटतो.
http://www.misalpav.com/comment/816617#comment-816617

चेक आणि मेट's picture

15 Mar 2016 - 12:25 pm | चेक आणि मेट

आणि वरून फोलपणा मान्य करायचा नाही

'
'
श्री श्री हट्टयोगी बाबा प्रसन्न

तजो साहेबांचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपूर्ण आणि relevant असतात

हीच पध्दत असेल तर याला दोन बाजु आहेत.

१. माजी पंतप्रधान कै. राजिव गांधी शिखांच्या हत्ये संदर्भात काय म्हणाले.
२. त्या ह्त्याकांडाचे संशयीत आरोपी ज्यांच्यावर कधीच खटला चालला नाही यांचे काय म्हणणे आहे.
३. ह्या संदर्भात आणखी काही