गाभा:
आयडी ब्यान झाल्यावर काय करावे ??
मिपावरील आयडी ब्यान झाल्यावर काय करावे हा एक चिंतनिय प्रश्न आहे. अशा वेळेस डूआयडीने प्रवेश करणे धोकादायक ठरु शकते.
(डूआयडी आजवर कसा बॅन झाला नाही हेच आश्चर्य आहे.)
शिवाय सारखे सारखे Access denied पाहुन मनाला त्रास होतो. मग मा य _ _ मधे गेलो तरी तिथेही डोक्याची मंडई होते,
फुकटच ४ बॉटल वोडका वेस्ट जाते, त्यातून एक्स्ट्रा किक बसून विमान टेकऑफ करते ते वेगळेच.
संमं ला मस्का मारला तर राँग इम्प्रेशन पडते. मेन मालकाला हात जोडले तरी 'काय होपलेस आहे हा' या अविर्भावात बघत रहातो.
बरं मिपातून बाहेर पडून इतरत्र कुठे सदस्य व्हावे तर बाहेर आपली कीर्ती सुदूर पसरलेली म्हणजे पुन्हा बुडावर ..
तुम्हीच सांगा आयडी ब्यान झाल्यावर काय करावे ?
----
अवांतरः जास्त फेकत नाही, मिपाकरांना झेलायचाही कंटाळा यायचा ;)
प्रतिक्रिया
11 Mar 2016 - 8:54 pm | श्रीरंग_जोशी
हिला इडंबनाची इंगळी डसली :-) ...
विडंबन नेहमीप्रमाणेच फर्मास!!
11 Mar 2016 - 9:00 pm | स्पा
कित्ती गोग्गोड बोलता हो तुम्ही :)
11 Mar 2016 - 9:08 pm | श्रीरंग_जोशी
तो तुमचा भ्रम आहे.
बर्याच मिपाकरांचा अनुभव एकदम उलट आहे ;-) .
11 Mar 2016 - 9:20 pm | सूड
गोग्गोड लिहीण्यात तुमचा हात कोण धरेल?
11 Mar 2016 - 9:21 pm | श्रीरंग_जोशी
तुमचा स्वभाव विनोदी बुवा!!
11 Mar 2016 - 9:23 pm | जेपी
चलु द्या निर्रथक कुंजन राहिल
..
11 Mar 2016 - 9:23 pm | स्पा
तुमच्या विनयशील स्वभावाचे नेहमीच कॊतुक वाटत आलेले आहे
चला एखादे भुभुचे किंवा बिंग पेज होऊन जाउदे
- स्पारंग गोडबोले
11 Mar 2016 - 9:32 pm | श्रीरंग_जोशी
तुम्हाला इतरांसारखा अनुभव नाही आला म्हणजे मिळवली.
11 Mar 2016 - 9:25 pm | अभ्या..
सध्याच्या काळात श्रीरंगाची गरज आहे.
12 Mar 2016 - 10:45 pm | नीलमोहर
सध्याच्या काळात श्रीरंगाची गरज आहे, पण हल्लीचे जग श्रीरंग सारख्या साध्यासरळ लोकांसाठी नाही.
अरेरावी आणि दमबाजीच्या जमान्यात चांगुलपणा अन साधेपणा वरही आक्षेप असावा यात नवल नाही.
13 Mar 2016 - 1:15 am | श्रीरंग_जोशी
लैच हसू येत आहे.
लुटूपुटूचे वाद घालत बसत नाही.
बाकी जेव्हा गरज असेल तेव्हा एक घाव दोन तुकडे हे धोरण राबवतो.
11 Mar 2016 - 8:54 pm | श्री गावसेना प्रमुख
टेबला खालून काही घेत नाही का?
11 Mar 2016 - 8:59 pm | स्पा
बळचकर जिलबि
11 Mar 2016 - 9:02 pm | जेपी
काय आणभव नाही..
बाकी जिल्बी फसली आहे..
11 Mar 2016 - 9:43 pm | जव्हेरगंज
नेहमीजैसा मज्जा नही आया !
11 Mar 2016 - 10:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जय जय राम कृष्ण हरी....जय जय राम कृष्ण हरी...!!
11 Mar 2016 - 10:50 pm | बोका-ए-आझम
दादा/मोगा/फुजि/टाॅफि/नाना नेफळे/काका केंजळे - हे सध्या गरीब चिमणा म्हणून वावरताहेत. त्यांचा गायडन्स घ्या असं सुचवतो!
11 Mar 2016 - 11:25 pm | कंजूस
व्हायच्या अगोदरच शानं बना.
12 Mar 2016 - 9:19 am | भंकस बाबा
हे व्यक्तिस्वातंत्रावर घाला आहे. ताबडतोब कन्हैयाला भेटणे. राहुल गांधी, तीस्ता सेतलवाड, केजरीवाल यांना पत्र टाकणे. याने होईल काय की संपादक मंडळाला पश्चाताप होईल व् सन्मानाने आयडी बहाल करण्यात येईल. मी तर अस ऐकतो आहे की नुकसानभरपाई देखिल मिळेल.
मिपावर सध्या काही विवेकशून्य लोकांचे बरळणं चालु आहे, त्यांचा सल्ला घेऊ शकता.
आमची वरात निघणार बहुतेक!
12 Mar 2016 - 10:10 am | खालीमुंडी पाताळधुंडी
आयडी अॅप्रूवल होण्यासाठी इमेलमध्ये ठराविक प्रकारची आडनावं असावी लागतात का??
(आमच्या एका मित्राची रिक्वेस्ट अॅप्रूवल झाली नाही)
14 Mar 2016 - 11:29 am | भाऊंचे भाऊ
आयडी बाण होउ नये म्हणून काय करावे यावर कोन प्रवचन डिल काय ?
14 Mar 2016 - 2:36 pm | सूड
आयडी बाण होऊ नये म्हणून एक शाळुंखा आणून त्यावर तो बसवावा.
14 Mar 2016 - 2:38 pm | अभ्या..
किंवा आयडी मोठा घ्यावा म्हणजे बाण न होता भाला होईल. ;)
14 Mar 2016 - 3:02 pm | नीलमोहर
शिळा ऐकलं होतं, शाळीग्राम ऐकलं होतं, शाळुंखा ????
हे काय असतं.. ?
14 Mar 2016 - 3:05 pm | सूड
शंकराच्या पिंडीचा, ज्यावर सिलिंडर शेप्ड भाग बसवलेला असतो त्याला शाळुंखा म्हणतात असं कुठेतरी वाचलेलं आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा.
14 Mar 2016 - 3:09 pm | प्रचेतस
होय.
शिवलिंग ज्यावर स्थापित करतात तो खोलगट भाग.
शाळुंखा ही योनीनिदर्शक असते.
शाळुंखेशिवाय जेव्हा नुसतेच शिवलिंग असते तेव्हा त्यास अयोनिज शिवलिंग म्हणतेत. अशी अयोनिज शिवलिंगे पाटेश्वरात पुष्कळ आहेत.
( बाकी मी जाणकार नाही बरं का)
14 Mar 2016 - 3:12 pm | अभ्या..
हो तुम्ही अगोबा आहात.
14 Mar 2016 - 3:13 pm | स्पा
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊलूऊलुलुलुलूऊ
14 Mar 2016 - 3:53 pm | सूड
ऑअऑअऑऽऽऽऽऽऽ...दुधाळ पांडू, जलमध्ये डुबुक डुबुक खुडुक बुडुक..... वैगरे प्रतिसाद कल्पावे.
14 Mar 2016 - 3:55 pm | स्पा
लोल
14 Mar 2016 - 7:14 pm | प्रसाद गोडबोले
दुधाळ पांडू काय ?
आता पुढचे व्हर्जन आले आहे , ते तुम्हाला ठाऊक नाही काय ?
पुचुपुचूदुग्धओढनाथपांडुब्बाय नम: |
=))))
15 Mar 2016 - 1:59 pm | सूड
आंबट आहे अंमळ!! =))
14 Mar 2016 - 9:05 pm | नीलमोहर
कंटाळा आला म्हून बळचकर काढलेल्या, चार वाक्यांच्या जिल्बीला पन पोरं सोडेनात बघा, दंगा करतेत,
काढा वर्गाबाहेर नाहीतर कोंबडा बनवून उभे करा :p
14 Mar 2016 - 9:14 pm | सुरवंट
मोर बनवावा काय त्यांचा?
-(झाडूवाला) सुरवंट
14 Mar 2016 - 10:02 pm | टवाळ कार्टा
नगं...नैतर ये दिल मांगे मोर म्हणत गुर्जी मोरपीशी डाव टाकतील :)