बटाट्याचा शिरा

परीसा's picture
परीसा in पाककृती
16 Sep 2008 - 3:35 pm

प्रथम बटाटी उकडुन घ्यावी. नंतर ती पुर्णपणे कुसकरुन घ्यावी (पिठासारखी). मग ती तुपामधे मस्त खमंग परतवुन घ्यावी. त्यात दुध, साखर, वेलची पावडर, बदामाची पुड घालुन परतवत रहावे. हवे असेल तर केसर सीरप घालावे. हे मिश्रण घट्ट झाले कि गॅस वरुन उतरवावे. थोडे थंड झाले कि खावे. हे तुम्ही फ्रिज मधे ठेवुन नंतर खाल्लात तर अजुन छान लगेल.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 3:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्म्म्म्म ... तोंडाला पाणी सुटलं. आधीच बटाटे आवडते त्यातून तूप, आणि वर बाकी सगळा भारी मालमसाला! करून बघायलाच पाहिजे!