महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक सागरी तटीय भ्रमंती

योगेश आलेकरी's picture
योगेश आलेकरी in भटकंती
8 Mar 2016 - 11:21 pm

नमस्कार,
कळविण्यास आनंद होत आहे कि, आम्ही महाराष्ट्र
गोवा,कर्नाटक मधिल सागरी तटावरील किल्ले आभ्यास/
भटकंतीला बाईक वरून जाउन आलो. यामध्ये ५0 किल्ल्यांचा
समावेश करता आला.. एकंदरीत भन्नाट झालं सर्व.. विस्तृत लेखन लवकरच सादर होईल..
कार्यक्रम असा होता-
कालावधी - ३1 जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०१६.
व्याप्ती- ३ राज्ये,१७ जिल्हे,५९ किल्यांची इतिहास-भुगोल-स्
थापत्यासहित माहितीलाभ.
गिरीदर्शन - जलदुर्ग-३१, भुईकोट-१०,गिरीदुर्ग-१०, जंजिरे (संपुर्ण
पाण्याने वेढलेले)८
एकुण मुक्काम -१८
एकुण अंतर दुचाकी प्रवास - ३,४१८ किमी.
सागरी प्रवास - खाडी ओलांडण्यासाठी ६ जलयात्रा.
प्रस्थान - दि.३1 जाने.२०१६, श्री क्षेत्र वढु बु||
स्वस्थान - दि.१७ फेब्रुवारी २०१६. लालमहाल पुणे.

मोहिम मार्ग - श्री क्षेत्र बु||-पुणे-झाई,बोर्डी-डहाणु-शिर
गांव-माहिम-केळवे-भवानीगड-अर्नाळा-वसई-ससून डॉक (गेट वे)-
श्रीबाग-कुलाबा-सर्जेकोट-चौल-रेवदांडा-कोर्लाई-मुरुड-
पद्मदुर्ग-जंजिरा-श्रीवर्धन-वेस्वी-बाणकोट-हर्णे-सुवर्णदुर्ग-
कणकदुर्ग-फत्तेगड-गोवेगड-दापोली-दाभोळ-गोपाळगड-
गुहागर-विजयगड-आंग्रेपोर्ट-जयगड-रत्नदुर्ग-पुर्णदुर्ग-यशवंतगड-
विजयदुर्ग-देवगड-मालवण-सिंधुदुर्ग-निवती-वेंगुर्ला-रेड्डी-
यशवंतगड-तेरेखोल-कोलवाळ थिवी-खोर्जुवे-श्री सप्तकोटेश्वर-
डिचोली-वाळपेई-साखळी-सांतिस्तेव-फोंडा-मर्दनगड-मड
गांव-कुंकळ्ळी-बेतुल-खोलगड-कडवाड-अंजदीव-अंकोला-
मिर्जन-गोकर्ण-होन्नावर-श्री मुर्डेश्वर-भटकळ-कुंदापुर-उड्डु
पी-बसरूर-शृंगेरी-शिवमोग्गा-चन्नगिरी-श्री होदिगेरे-जोग
फॉल्स-कारवार सदाशिवगड-पणजी-शापोरा-अग्वाद-रेईश
मागोश-सावंतवाडी-कुडाळ-कणकवली-राजापुर-संगमेश्वर-
डेरवण-चिपळुण-खेड-पोलादपुर-महाड-श्री रायगड-मुंबई.
# Ultimate_traveller
When the prison doors are opened, the
real # Ultimate will fly out.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Mar 2016 - 9:56 am | प्रचेतस

जबरी भटकंती झालेली दिसतेय.
लेखाची वाट पाहातोय.

तुषार काळभोर's picture

9 Mar 2016 - 10:27 am | तुषार काळभोर

जबरदस्त!!

चांदणे संदीप's picture

10 Mar 2016 - 1:03 pm | चांदणे संदीप

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2016 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तपशीलवार वृत्तांत येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

9 Mar 2016 - 10:31 am | यशोधरा

विस्तृत लेखनाची वाट बघते.

माहितगार's picture

9 Mar 2016 - 10:41 am | माहितगार

१८ दिवसात सागर किनारी भरपूर प्रवास, लै भारी, विस्तृत लेखाची प्रतिक्षा.

दुर्गविहारी's picture

9 Mar 2016 - 11:05 am | दुर्गविहारी

विस्तृत लेखनाच्या प्रति़क्शेत.

बापरे.केवढी भटकंती केवढा अभ्यास.
विस्तृत लिखाणाच्या प्रतीक्षेत.

प्रमोद देर्देकर's picture

9 Mar 2016 - 11:17 am | प्रमोद देर्देकर

नुस्ते वर्णन नको तर भरपुर फटु पण पाहिजेत.
आणि ही लेखमाला एका किल्याला/ जिल्ह्याला एक दिवस या प्रमाणे येवुदे. तसेच जाताना नकाशे , झोपण्याची , खाण्यापिण्याची सोय तसेच वाटेत काय अडचणी आल्या (बाईक दुचाकी विषयीचे अनुभव) हे सगळे येवुदे.
बाकी तुमच्या जिद्दीला सलाम.

वेल्लाभट's picture

9 Mar 2016 - 11:23 am | वेल्लाभट

भाऊ दोन गोष्टी सांगतो.
लिहायला वेळ लागला तरी बेहत्तर पण विस्तृत लिहा
फोटो भरपूर टाका
आणि जमल्यास हे वर्तमानपत्र किंवा पुस्तकरुपात डॉक्युमेंट करून पब्लिश कराच.

बाबा योगिराज's picture

9 Mar 2016 - 11:52 am | बाबा योगिराज

संपूर्ण लेखमाला भरपूर फटू सोबत येऊ द्या. कशी आणि कधी पासून तय्यारी केली ते सगळा प्रवास सम्पल्यावर काय मिळालं आणि तुम्हाला काय वाटलं याच सविस्तर वर्णन वाचायला नक्कीच आवडेल.

लेखमालेची वाट बघणारा
बाबा योगीराज.

योगेश आलेकरी's picture

9 Mar 2016 - 11:53 am | योगेश आलेकरी

पसारा खुप मोठा आहे.. लेखनाला वेळ लागनार.. फोटो चिक्कार हैत..
गोंधळ असा झालाय की दिवसागणित लिहाव की किल्ल्यांचे समुह करून (दर्देकरांनी पण छान सुचवलय) प्रयत्न चालु आहेत सर्व माहिती दर्दी वाचकांपर्यत पोहचवणे माझी जबाबदारी आहे :-)
लेखन खरच विस्तृत न् उत्तम झालं तर वेल्लाभट उवाचं प्रमाणे पुस्तकरूपाचा मानस आहेच.. ;-)
बाकी 50 किल्ल्यांची ईतिहास,भुगोल, वेळ,काळ,कसं,कुठ माहीती जमा आहे तसेच काक समाध्या, मंदिरेही ..एकुणच सर्व मला न झेपणारं आहे तरीही अल्पमतीतुन ट्राय करतोयच.. :-)
अनुभवींच्या सुचनांचे स्वागत असेल :-)

कानडाऊ योगेशु's picture

12 Mar 2016 - 8:22 pm | कानडाऊ योगेशु

डायरी स्वरुपात लिहा. इतिहास/भूगोल महत्वाचा आहेच पण हे सगळे तुमच्या नजरेतुन प्रकट होणे महत्वाचे आहे.
लिखाणासाठी शुभेच्छा!

स्वच्छंदी_मनोज's picture

9 Mar 2016 - 12:03 pm | स्वच्छंदी_मनोज

व्वा व्वा. मस्तच आणी जबरी. उत्तम लेखमालेची वाट बघतो आहे. प्रत्येक दिवसाचा एक ह्याप्रमाणे तेवढे भाग येवुद्या. अशी संपुर्ण सागर किनारा कव्हर करणारी लेखमाला जालावर फार कुठे नाही त्यामुळे तुमचे डॉक्युमेंटेशन आणी शब्दचित्र पुढे असा प्रवास करणार्‍यांना फार ओलाचे होईल. वेळ घ्या (जास्त नको :) ) पण सविस्तर लिहाच.

वेल्लाभट's picture

9 Mar 2016 - 1:04 pm | वेल्लाभट

ओलाचे होईल

?

हो सागरकिनारा म्हणजे ओलाचे आहेच. पण मोलाचेही :)

स्वच्छंदी_मनोज's picture

9 Mar 2016 - 3:37 pm | स्वच्छंदी_मनोज

हा हा.. गुड वन. :)
लेख पटापट येवूद्या.

रंगासेठ's picture

9 Mar 2016 - 3:59 pm | रंगासेठ

योगेशभौ, दमानं घ्या पण नक्की लिहा! Student

वरच्या सर्व प्रतिसादांशी सहमत, फोटो पण येऊदेत लेखात.
शुभेच्छा!

श्रीनिवास टिळक's picture

9 Mar 2016 - 9:58 pm | श्रीनिवास टिळक

यादीमध्ये चौल-रेवदांडा-कोर्लाई हि नावे वाचली आणि हर्ष झाला. रेवदंडा हे माझे जन्मगाव आहे. तेथे पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे(आता नुसतेच अवशेष उरले आहेत). खाडी पार करून गेले कि कोर्लाइचा किल्ला आहे (तोही पोर्तुगीजांनी बांधलेला आहे पण अधिक सुस्थितीत आहे). जानेवारीत मी तेथे जाऊन आलो. दुसऱ्या बाजूला २/३ कि मी दूर चौल हे माझे अत्यंत प्रिय गाव. वरती डोंगरावर दत्ताचे सुरेख मंदिर आहे. हा परिसर माझ्या परिचयाचा असला तरी आपल्याकडून वर्णन वाचायची अत्यंत उत्सुकता आहे.

योगेश आलेकरी's picture

9 Mar 2016 - 11:55 pm | योगेश आलेकरी

रेवदांडा किल्ल्यामध्ये पोर्तुगिजांनी दगडात कोरलेला राजमुकुट पाहिला ...सुरेख..व कैक तोफा.. मागे किनारा न कोर्लई..सुंदर.. गांव तुमचं भाग्यवान आहात..

स्वच्छंदी_मनोज's picture

10 Mar 2016 - 11:55 am | स्वच्छंदी_मनोज

चौल हे गाव तर प्राचीन हा शब्द पण प्राचीन वाटावा असे अतिप्राचीन आहे. सेमुल्ला/चेमुल्ला असे ह्याचे परदेशी दप्तरी नोंद आहे.

ह्याच दत्तमंदीराच्या पुढे असलेल्या लेण्या ह्याची साक्ष पटवतात. सध्यातरी ह्या लेण्यात हिंगुळजा ह्या जैन देवीची स्थापना केली असली तरी ह्या लेण्या निसंशय त्याहून प्राचीन आहेत. १०००-१५०० वर्षे जुन्या कदाचीत त्याहूनही अधीक.

अरिंजय's picture

10 Mar 2016 - 6:48 am | अरिंजय

भन्नाट योजना पार पाडलीत योगेशराव. लेखमालेची वाट बघतोय.

बोका-ए-आझम's picture

10 Mar 2016 - 9:13 am | बोका-ए-आझम

फोटो बघण्यास जीव आतुर हा झाला!
बाईकवरुन फिरलात तुम्ही कोकण झडकरी!
लवकर लिहा विनवितो तुम्हा योगेश आलेकरी!

नाखु's picture

10 Mar 2016 - 11:48 am | नाखु

येणे ही सद्यस्थीतीत* मिपाकरांची गरज आहे आणि भटक्यांसाठी वरदान आहे.

अखिल मिपाकर वाचक चळवळ आणि नेमस्त चावडी वाचन साक्षर वारकरी संघ.

*सद्यस्थीतीत-१
* सद्यस्थीतीत-२

अभ्या..'s picture

10 Mar 2016 - 11:58 am | अभ्या..

+१ अगदी अगदी
येऊ द्या योगेशराव.

नि३सोलपुरकर's picture

10 Mar 2016 - 12:16 pm | नि३सोलपुरकर

१०० नंबरी लेख होईल .

योगेश राव __/\___.

दुर्ग महाकाव्याची वाट पाहात आहे.

"अंकोला-
मिर्जन-गोकर्ण-होन्नावर-श्री मुर्डेश्वर-भटकळ-कुंदापुर-उड्डु
पी-बसरूर-शृंगेरी-शिवमोग्गा-चन्नगिरी-श्री होदिगेरे-जोग" याची फार उत्सुकता आहे.
यादीला क्रमांक टाका.

चाणक्य's picture

12 Mar 2016 - 4:56 am | चाणक्य

सविस्तर वृतांत येउद्या तुमच्या भटकंतीचा.
व्यनि चेकवा.

सविता००१'s picture

14 Mar 2016 - 1:04 pm | सविता००१

येउद्या लिखाण आणि फोटो दोन्ही.
आधीच खूप छान वाटायला लागलंय

मनिमौ's picture

14 Mar 2016 - 8:59 pm | मनिमौ

तुमच्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम.सविस्तर लेख मालेची आतुरतेने वाट बघत आहे.

पैसा's picture

14 Mar 2016 - 9:05 pm | पैसा

लिहा लौकर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2016 - 12:26 am | डॉ सुहास म्हात्रे

१८ दिवसात ५९ किल्ल्यांची झंझावाती सहल ! वर्णन मात्र धावते नको तर निगुतीने लिहा... फोटो टाकताना हात राखू नका.