कोणताही अभ्यासक त्याला प्राप्त झालेल्या दृष्टीकोणातून एखाद्या विशीष्ट गोष्टीकडे पहात असतो हे सहाजीक असावे. आपण स्वतःला स्वतःच्या भूमिकेतून अधिक चांगले समजून घेऊ शकतो तेवढे एखादी त्रयस्थ व्यक्ती समजून घेऊ शकणार नाही. क्रिकेटच्या पिचवर पिच कसा होता बॉल कसा आला बॅट्समन प्रत्यक्षात कसा खेळला हे तो क्षण जगणार्या बॅट्समनला आणि बॉलरलाच माहित असावे, त्यांच्याकडे बघणार्या इतर सर्वांनाच ते दृष्य वेगवेगळ्या अँगल मधून दिसत असते. म्हणजे किमान वेगवेगळे अँगल आलेले असतात. त्यात जर ते प्रेक्षक चष्मे घालत असतील तर दृष्य प्रत्येक प्रेक्षकाला त्याच्या त्याच्या चष्म्यानुसार दिसणे सहाजिक असावे. एकदा हि वस्तुस्थिती लक्षात घेतल्यानंतर त्रयस्थांचे दृष्टीकोण स्विकारले नाहीत तरीही त्यांच्या दृष्टीकोणांच्या मर्यादा लक्षात घेतल्यानंतर आत्मपरिक्षणासाठी त्यांचे विचार मनमोकळेपणाने अभासण्यास तत्वतः हरकत नसावी.
अर्थात कोणतेही त्रयस्थ दृष्टीकोन अभ्यासण्यास घेताना त्या त्रयस्थांना कोणत्या प्रकारचे अँगल दिसले नसतील आणि त्यांनी लावलेले चष्मे लक्षात घ्यावयास हवे. पण काही वेळा असेही होते की लोक आत्मपरिक्षण करताना मैदानावर खेळणारे आपण स्वतः आहोत बाकीच्यांचा अँगल चुकला असू शकतो हे लक्षात घेण्याचे विसरतात अथवा त्रयस्थांच्या चष्म्यांना निटसे लक्षात घेऊ शकतातच असे नाही, आणि स्वतःच त्रयस्थांचे रंगित चष्मे घालून फिरतात.
ऑक्सफर्ड विद्यापिठाची बोडेन संस्कृत प्राध्यापक खुर्ची :
असाच एक वर्ग आहे जो भारत बाह्य इंडॉलॉजीस्टांचा भारतीय संस्कृतीचा विवीध उद्देशांनी अभ्यास करणार्यांचा असतो. यातील बरेच काही जण प्रांजळपणे अभ्यासासाठी अभ्यास करत असतात, तसेच पुर्वग्रहीत उद्दीष्टे ठेऊन अभ्यासकरणारेही असतात. अशा ज्या काही पुरग्रहीत उद्दीष्टांचा इतिहास व्यवस्थितपणे नोंदवल्या गेला त्यांच्यात एक महत्वाचा क्रम लागतो तो ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या बोडेन संस्कृत प्राध्यापक खुर्चीचा.
ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या बोडेन संस्कृत प्राध्यापक खुर्चीचा गेल्या १८४ वर्षांचा म्हणजे इ.सन १८३२ पासूनचा प्रवास उद्बोधक आहे. ब्रिटीश इस्ट् इंडीया कंपनीचा कारभार सतराव्या शतकापासून चालू झाला, पण ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनी कडून इ.स. १८१३ पर्यंत भारतात ख्रिश्चन धर्म प्रसाराची अपेक्षा अधिकृतपणे ठेवली गेली नसावी. परंतु १८१३ नंतर हा दबाव कंपनीवर वाढता असावा. त्यातच त्यांच्या एका जोसेफ बोडेन नावाच्या रिटायर्ड लेफ्टनंट कर्नलला भारतात ख्रिश्चन धर्म प्रसार व्हावा अशी इच्छा झाली म्हणून त्याने त्याच्या मृत्यूपत्रातून त्याची स्वतःची जायदाद ऑक्सफर्ड विद्यापिठात त्याच्या नावाने बोडेन संस्कृत प्राध्यापक खुर्ची साठी दान केली. आणि या खुर्चीसाठीचा पहिला प्रोफेसर १८३२ साली निवडला गेला. मुख्यम्हणजे ख्रिश्चन धर्मसाहित्याचा धर्म प्रसारासाठी अनुवाद ह्या उद्देशाची अधिकृत नोंद झालीच पण त्या काळात ऑक्सफर्ड मधील हि अत्युत्तम पगाराची खुर्ची होतीच संदर्भ त्या शिवाय या खुर्चीवरचा प्रोफेसर विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष मतदानाने निवडला जायचा आणि यासाठी राजकारण एवढे रंगत असे की विद्यार्थ्यांना मतदानाला घेऊन जाण्यासाठी खास रेल्वे वगैरे सुटे, इंग्लडाच्या पार्लमेंटात विषय चघळला जाई. १८६० मधली मॅक्स मुलर आणि मॉनिअर विल्यम यांनी लढवलेली निवडणूक खास गाजली मॉनिअर विल्यमची धर्म प्रसारार्थची आश्वासने अधिक विश्वासर्ह समजली जाऊन तो निवडून आला, पण हा उद्देश निटसा फळास न येऊ शकण्याचे एक कारण म्हण़जे १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या झटक्यानंतर ब्रिटनने भारतीय धर्मांमध्ये स्वतःहून हस्तक्षेप न करण्याचे वचन दिले.
हि खुर्ची ऑक्सफर्डात सांभाळणारे ख्रिस्तोफर मिंकोव्हस्की यांच्या मत आणि माहिती नुसार, भारताच्या ख्रिश्चनीकरणाच्या स्वप्नातली एक अडचण कलकत्त्याच्या अशिआटीक सोसायटीची १७८४ मध्ये स्थापना करणारार्या विल्यम जोन्सने जाणली होती, विल्यम जोन्सच्या मतानुसार , हिंदू बायबलातील चमत्कार स्विकारण्यास तयार होतील पण त्यांना माहित असलेल्या इतर तत्वज्ञाना प्रमाणेच ख्रिश्चन तत्वज्ञानही आहे असे समजतील आणि त्यांच्यासाठी इश्वर उपासना अनेक पद्धतीने करता येते त्यातला एक मार्ग ख्रिश्चन एवढेच ते विचार करतील. ख्रिस्तोफर मिंकोव्हस्की पुढे सांगतात की संस्कृतातून ख्रिश्चन साहित्य उपलब्ध करून देण्याचा विचारच या युरोपियन अज्ञानातून आला होता की ज्युडायिक धर्मातील तत्वज्ञानांना भारतीय परिचीत नाहीत वस्तुतः भारतीय आधी पासूनच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष ज्युडायिक-ख्रिश्चन-मुस्लिम मिथकांशी परिचीत होते. ख्रिस्तोफर मिंकोव्हस्कींनी त्यांचा हा मुद्दा त्यांच्या या भाषणातून सोदाहरण मांडलेला आहे. त्यांनी दिलेले उदाहरण रोचक आणि वाचनीय आहे. त्या शिवाय ओरिएंटलिझम, भारतात ब्रिटीशांना राज्यकरण्यासाठी साहाय्यभूत असे वेगवेगळे ऑक्सफर्डमधील उद्देश मागे पडत गेले याचा त्यांनी छानसा उहापोह केला आहे. आणि संस्कृतातील -यात हिंदु आणि बौद्ध तत्वज्ञान दोन्ही आले- तत्वज्ञानातून घेण्यासारखे काही असल्यास तेवढ्यामर्यादेपुरताच संस्कृतच्या अभ्यासास आता अर्थ असल्याचे त्यांचे मत असावे. संस्कृताच्या युरोमेरीकन अभ्यासाचा आणखी एक उद्देश इंडोयुरोपाई भाषातील वेद हा भाषिक अभ्यासासाठी उपलब्ध जुना दस्तएवज असल्यामुळे तो अभ्यासात रहावा असे काही इंडॉलॉजीस्टांना वाटते.
मग एक गट या युरोमेरीकन इंडॉलॉजीस्टात उरतो तो म्हणजे मिथकांचा अभ्यास करु पहाणार्यांचा पण ते स्वतः भारतीय संस्कृतीत वाढलेले नसल्यामुळे आणि संस्कृतापलिकडील भारतीय भाषांचा अभ्यासही कमी पडत असल्याने बर्याच ठिकाणी त्यांच्या दृष्टीकोणातील अँगल मध्ये उणिवा असू शकतात.
यात काही असेही उरतात की ज्यांनी चष्मे आधी पासून लावलेले असतात निष्कर्ष आधीपासून काढलेले असतात स्वतःचे ठेवायचे लपवून दुसर्याचे बघायचे वाकुन या शैलीत या मंडळींचे काम चालू असावे. यातील एक भारतात येऊन गेलेला आमेरीकन इंडॉलॉजीस्ट भारतात संशोधनासाठी येण्यापुर्वीच भारतीय मिथकांतील स्तर उघडे पाडणे हि मिथकेच आहेत हे ठसवणे हा उघड ठरवलेला उद्देश होता. आता हा विल्य्म जोन्सकडून धडा न घेतलेल्याथॉमस वुल्फ नावाच्या धर्मप्रसारकाची ओळखपान पहा वर्ल्ड ख्रिश्चन कॉन्फरन्स २००७ च्या wcfellowship.org वर उधृत, त्यांच्या मतानुसार भारतातील अनेक नेत्यांना जीजस बद्दल माहिती करून घेण्यात रस असण्याच्या भारत ऐतिहासीक वळणावर असल्यामुळे ते भारतात कार्यरत आहेत. :) आणि त्यांची या लोकसत्ता बातमीतील भारतीय पुरोगाम्यांसोबत उठबशीची धडपड पहा. भारतात धर्मप्रसाराचे बर्या पैकी स्वातंत्र्य आहे त्याचा जरुर लाभ घ्यावा पण आपला तो उद्देश - जो इतरांपेक्षा आपला धर्म अधिक नितीमान असल्याचे सांगण्याचा उद्देश असू शकतो तेव्हा- असा काही उद्देश असल्याची कल्पना देण्याची किमान स्वरुपाच्या ट्रांसपरंसीची (केवळ) नैतिक गरज नसावी का ? पण ज्यांच्या नैतिकता त्यांच्या पाशी. खरेतर भारतात 'एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति' ह्या ऋग्वेदातील सुभाषिताची आठवण द्यावी माझ्या कडे तत्वज्ञानाच्या या चार नव्या ओळी आहेत त्या जोडून घ्या म्हणावे तेवढे पुरेसे ठरावयास हवे पण तेवढ्याने धर्मप्रसारासाठी निधी देणार्या डोनरच्या मिठाची परतफेड होत नसावी. जी उपरती ऑक्सफर्डच्या बोडेन खुर्चीस १८८३ सालीच झाली आणि त्यांनी त्यांचे संस्कृत खुर्चीचे उद्दीष्ट वेळीच बदलले ती जगातील सर्वच धर्म मार्तंडांना होण्यास अद्याप अवधी असावा तसे नसते तर प्रत्येक धर्ममार्तंड आपली झोळी घेऊन दुसर्या धर्मातील तत्त्वज्ञाकडे जाऊन अहो तुमच्याकडील काय चांगले आहे ते द्या मी माझ्या धर्मात घेण्यात उत्सुक आहे म्हणाला नसता का ?
एनी वे दुसर्या एका विषयावर लिहायचे होते पण मार्ग या विषयावरुन जाणार होता आणि आत्ता लिहिण्याचे निमीत्त होण्या मागे असाच एक इवान कोस्टका यांचे नाव वाचण्यात आले, तुम्ही त्यांचे नाव ऐकले आहे का ? ऐकले नसल्यासही ठिकच -मलाही त्यांच्या उद्दीष्टांबद्दल संदर्भासहीत माहिती नाही - संबंधीत विषयावर पुढच्यावेळी लिहिताना संदर्भ आलाच आणि तो पर्यंत अधिक विश्वासार्ह माहिती असेल तर बघू.
प्रतिक्रिया
5 Mar 2016 - 11:22 pm | कंजूस
चष्मे वगैरे ठीक परंतू खूपच सार्वत्रिक विधानं (genaralisation) आहेत.काही संदर्भ वााचनही करायला दिले आहे.
एखाद्या गोष्टीची नोंद त्यावर काही वाच्यता ( judgement)न करता लिहून काढत असतील.