‘छबीदार छबी मी तो-यात उभी’,’ देरे
कान्हा चोळी अन् लुगडी’, ‘तुम्हावर केली मी
मर्जी बहाल’ अशा कितीतरी दमदार
लावणी नृत्याने रंगतदार ठरलेला ‘पिंजरा’ हा
चित्रपट आता डॉल्बी साउंड सिस्टीम या
नवीन तंत्रामध्ये १८ मार्च रोजी पुन्हा एकदा
थाटात झळकणार आहे. निर्माता-दिग्दर्शक-
संकलक व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा
मराठीतील पहिला रंगीत चित्रपट आहे. १९७२
सालातल्या ३१ मार्च रोजी तो सर्वप्रथम
झळकला तेव्हा प्लाझा हे त्याचे प्रमुख
चित्रपटगृह होते. आतादेखिल प्लाझा येथेच
हा चित्रपट झळकेल. तेव्हा राज्यातील अनेक
शहरांत पिंजराने रौप्य व सुवर्ण महोत्सवी यश
संपादले.
या चित्रपटात संध्या, डॉ. श्रीराम लागू,
निळू फुले, वत्सला देशमुख, माणिक राज,
गोविंद कुलकर्णी, कृष्णकांत दळवी, भालचंद्र
कुलकर्णी इत्यादींच्या भूमिका आहेत. तर
कथा-पटकथा अनंत माने, संवाद शंकर पाटील
यांचे आहेत. तर जगदीश खेबुडकर यांच्या
गीतांना राम कदम यांचे संगीत आहे.
चित्रपटातील सर्वच्या सर्व बारा गाणी
आज ४५ वर्षांनंतरही लोकप्रिय आहेत हे विशेष.
‘कुण्या राजाची तू गं राणी’, ‘बाई मला
इश्काची इंगळी डसली’, ‘दिसला गं बाई
दिसला’, ‘कशी नशिबाने थट्टा आज
मांडली’ इ. गाण्यांचा त्यात समावेश आहे.
-लोकसत्ता
डॉल्बी साउंड सिस्टीममध्ये पुन्हा झळकणार ‘पिंजरा’
गाभा:
प्रतिक्रिया
4 Mar 2016 - 10:39 pm | भाते
आजच मटामध्ये आणि लोकसत्तामध्ये हि बातमी वाचली.
मागे मी या प्रतिसादात लिहिले होते तेच पुन्हा लिहितो.
दुसऱ्या ठिकाणी दिलेली बातमी चोप्यपस्ते करून धागा काढण्यात काय अर्थ आहे? नविन धागा काढताना धागाकर्त्याने त्यात त्याचे विचार मांडणे अपेक्षित आहे.
वरच्या धाग्यामध्ये तुमचे विचार काय आहेत? लोकसत्तामध्ये आलेली बातमी चोप्यपस्ते केली आहे.
4 Mar 2016 - 10:54 pm | श्रीरंग_जोशी
बातमीचा दुवा देऊन स्वतःचे विचार सविस्तरपणे लिहिले तर काही मुल्यवर्धन होईल.
मिपाकरांपर्यंत बातमी पोचवावीशी वाटली तर बातमीचा दुवा खरडफळ्यावर किंवा सदाहरित धाग्यावर किंवा या विषयाशी संबंधीत धागा मुखपृष्ठावर दिसत असल्यास त्यावर प्रतिसादावाटे देता येईलच.
5 Mar 2016 - 12:02 am | एस
'गं साजणे...' हे सर्वात आवडतं गाणं. आजही त्याच ठसक्यात आणि अर्थात माझ्या भसाड्या आवाजात गायला जाम मजा येते! ;-)
5 Mar 2016 - 12:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
शेम हिअर स्वॅप्स भौ.
गं साजणे
आगीची जळती मशाल हाती ई.ई. चायला लहानपणी पिंजरा आणि चानी नामक चित्रपट कधी घरच्यांनी पाहुन दिले नाहित. मोठा झाल्यावर पाहिले.
5 Mar 2016 - 9:49 am | बोका-ए-आझम
जेव्हा चित्रपट लागेल तेव्हा जाऊन पाहायचाच आहे.
5 Mar 2016 - 11:34 am | भाऊंचे भाऊ
उकरणे पसंत नसुनहि निव्वळ दर्जेदार गाण्यांसाठी हां चित्रपट थेटरात दोनदा पाहणार.
5 Mar 2016 - 11:54 am | मुक्त विहारि
श्रीराम लागू आणि निळू फुले, ह्यांचा अभिनय.
एकापेक्षा एक सुंदर संवाद.
अर्थपूर्ण गाणी आणि गाण्यातील शब्दांना साथ देणारे संगीत.
"गं साजणे..." पासून जे संगीत सुरु होते ते थेट "कशी नशीबाने थट्टा आज मांडली" पर्यंत....
त्यामुळे सिनेमा नक्कीच बघणार.