माणूस एवढा विकृत कसा होऊ शकतो ?

गणेश उमाजी पाजवे's picture
गणेश उमाजी पाजवे in काथ्याकूट
1 Mar 2016 - 1:14 pm
गाभा: 

ठाणेकरांची रविवारची सकाळ उजाडली ती एक धक्कादायक बातमी ऐकूनच, ठाण्यातील वडवली गावातील एका पेशाने अकाउंटट असलेल्या तरुणाने (हस्नीन वरेकर) आपल्या कुटुंबातील १४ व्यक्तींची धारदार बकरे कापायच्या सुऱ्याने गळा चिरून हत्या केली, व नंतर स्वताही गळफास लाऊन घेतला.या त्याच्या हल्ल्यात त्याची एक बहिण वाचली कारण तिने त्याचा वार चुकवला व ती आतल्या खोलीत पळाली आणि तिने कडी लाऊन घेतली आणि पहाटे ४ वाजता आरडओरडा करून शेजार्यांच्या मदतीने स्वताची सुटका करून घेतली.शेजार्यांच्या म्हणण्यानुसार तो बाहेर कितीही शांत व मनमिळाऊ असला तरी घरात खूप रागीट वर्तन करत होता. पोलिसांनी खूप शक्यता व्यक्त केल्या आहेत.१) हे खून त्याने केलेच नाहीत व त्याने स्वत सुद्धा आत्महत्या केली नाही.२)हा सगळा नरबळीचा प्रकार असावा.३) प्रोपर्टिच्या वादातून या हत्या झाल्या असाव्यात.४) सदर व्यक्ती हि स्क्रीझोफेनिक असावी, याव्याक्ती खूप संशयी असतात. आपल्या कुटुंबातील माणसे आपल्याविरुद्ध कटकारस्थान करत आहेत असे त्यांना सारखे वाटत असते.५) या व्यक्तीला आपल्या कुटुंबासोबत जन्नत मध्ये जायचे होते व असे त्याने बर्याच वेळा बोलूनही दाखवले होते त्यातून हे कृत्य त्याने केले असावे.आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज तक च्यानेल चे वार्ताहर रतन राधेश्याम भौमिक हे तिथे वार्तांकन करायला गेले असता सदर घरातील भयानक दृश्य बघून त्यांना हृदयविकाराचा शतक आला व इस्पितळात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले, त्यांची २ च वर्षांपूर्वी अन्जीयोप्लास्टि झाली होती.तर मला असे म्हणायचे आहे कि माणसाचे मन एवढे दगड कसे बनू शकते ? स्वताचे आई-वडील, बायको, मुलगी आणि आपल्या बहिणींवर सुरा चालवताना त्याला काहीच वाटले नसेल ? जर ती व्यक्ती खरच स्क्रीझोफेनिक असेल तर अशा व्यक्तींना घरात ठेवेने किती योग्य आहे असे वाटते तुम्हाला ?

प्रतिक्रिया

ही माणसे आहेत का, दावतचा मेनू वाचला असेलच, जसे अन्न तसे मन

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 2:38 pm | तर्राट जोकर

म्हणजे? प्रतिसाद समजला नाही.